या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!

दमामि's picture
दमामि in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 1:23 pm

१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो.
2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते.
३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते.
४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)
५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा.
या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो. ( रात्र चांगली जाण्यासाठी टिपा पुढिल भागात, एकावेळी एक विषय हा माझा नियम आहे)
तळटीप- क्रमांक ४ च्या गोष्टीचा क्रम, वेळ पडल्यास बदलला तरी चालेल. फक्त त्यानंतर साबण लावून हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

विडंबनविचार

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Sep 2015 - 1:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुम्ही स्वत: हे सगळे रोज करता की फक्त सल्ला आहे ?

अंघोळी बद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.

पैजारबुवा,

वा काय नेमका प्रश्न विचारलात!
आंघोळ म्हणजे निव्वळ वेळेचा आणि पाण्याचा अपव्यय ! चार सहा महिन्यातून एखादवेळ करावी हवी तर पण ती रोज करायला लावण्यामागे एक मोठ्ठे कट कारस्थान असावे आणि त्यात साबण कंपन्यांचा हात असावा असा आम्हाला दाट संशय आहे.
आंघोळ या शब्दाची व्युत्पत्ति शोधल्यावर कळले की मूळ शब्द होता "आणखी घोळ" . पूर्वी बायका ( आपापल्या)नवऱ्यांना उपहासाने विचारीत, " काय आता आणखी घोळ करणार का?" कालौघात त्यातील उपहास जाऊन प्रश्नकम्आद्न्या आली तसेच णखी जाऊन अनुस्वार आला.
असो , तूर्तास इतके पुरे. अजून कशावर मत अथवा सल्ला श्रवा असल्यास नि:संकोच विचारा.
आपलाच ,
दमामि.

चार सहा महिने एवढा अत्यंत कमी काल विचारात घेतल्याबद्दल दमामि यांचा निषेध.

माझा निषेध करणाऱ्यांची इथे लाइन लागली आहे, तुमचा नंबर कितवा त्यात?:)

प्यारे१'s picture

8 Sep 2015 - 2:52 pm | प्यारे१

माझ्या बाजूनं मी पैला आहे. तुमच्या बाजूचं ठौक नाही.

माझीही शॅम्पेन's picture

7 Sep 2015 - 1:38 pm | माझीही शॅम्पेन

यासाठी धागा काढण्याची गरज नाही. उठायच्या (झोपेतून गैरसमज णको) आधी केलेलें प्रताप सांगायचे नाहीत

दमामि's picture

8 Sep 2015 - 2:46 pm | दमामि

खिक्क!

नाखु's picture

7 Sep 2015 - 2:10 pm | नाखु

ते तो लाहो प्राणीजात!

दुपारचे १.५५ झलेत ऐकूयात सुमधूर गीत खास मिपाकरांच्या पसंतीनुसार मराठमोळं गाण.

"कशी नशिबान थट्टा आज मांडली"

असली सवड तरच आपली आवड कार्यक्रमातून साभार.

सा.सं.नी दुवा द्रुश्य स्वरूपात करावा ही जाहीर विनंती.

प्यारे१'s picture

7 Sep 2015 - 2:27 pm | प्यारे१

'असेल आवड तर नक्की सवड' हा कार्यक्रम बंद झालाय काय?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Sep 2015 - 2:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चहाच्या आधी चमचाभर आवळा रस कोमट पाण्यासोबत घेत जा रे दमाम्या.

सूड's picture

7 Sep 2015 - 2:42 pm | सूड

दिवस चांगला जातो.

काय सांगता?

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Sep 2015 - 2:45 pm | माम्लेदारचा पन्खा

दर्जा साफ घसरलाय धाग्यांचा...... विचारप्रवर्तक धाग्यांचे ग्रहण आहे वाटतं मिपावर......

मिपा सोडावे लागणार लवकरच !!

बबन ताम्बे's picture

7 Sep 2015 - 3:03 pm | बबन ताम्बे

विचारप्रवर्तक धाग्यांचे ग्रहण वगैरे काही नाही.
कुठल्या पाच (कळ) गोष्टी करू नयेत या विचारप्रवर्तक धाग्याचे वैचारीक विडंबन आहे ते.

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Sep 2015 - 5:17 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्यात काही राम नाही आता....

रॉजरमूर's picture

8 Sep 2015 - 1:32 pm | रॉजरमूर

दर्जा घसरतोय तो असल्या बिनडोक धाग्यांमुळे .
प्रत्येक गोष्टीचे विडंबन हे करायलाच हवे का ?
तुमच्यात जर एवढीच क्षमता असेल तर तुम्हीही रचनात्मक लेखन करा की कोणी अडवलय तुम्हाला.
पण ते न करता दुसर्यांनी काढलेल्या धाग्यांवर विडंबन टाकून उगीचच इथे कचरा टाकायचा आणि आपली उघड करायची यात कसले आलेय शहाणपण?
आणि त्या लेखात लेखकाला जे वाटले ते लिहिले आणि शेअर केले त्याची चिरफाड करणारे तुम्ही कोण टिकोजीराव ?
तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील तर लेखाला प्रतिसाद लिहा की धागे कसले काढताय?
संपादक मंडळानेही वेळीच हस्तक्षेप करावा ही विनंती नाहीतर आलेल्या प्रत्येक धाग्यावर विडंबन, प्रतिविडम्बन याचे पिक येत राहील ,
आणि संस्थळाचा दर्जा खालावून चांगले लोक सोडून जातील यात शंकाच नाही .
उदयोन्मुख लेखक ही मग विडंबन निघेल या भीतीने लेख लिहिणार नाहीत .

दमामि's picture

8 Sep 2015 - 2:22 pm | दमामि

ऑ, अच्चं जालं तल?

तिज्यायला हितं तरी वरिजनल डॉयलॉग लिव्हा.
हेच लिहिणारा स्पावड्या कुटं खपला देव जाणं. :(

दमामि's picture

8 Sep 2015 - 4:57 pm | दमामि

अस म्हणता? मग हे घ्या,
"बहिर्वक्र म्हणा हवे तर.विडंबन हा आरसा
दोष अथवा गुण असो ,त्या फरक नाही फारसा"
अभ्याभौ, तुमच्यासाठी काय पन.:)

खटपट्या's picture

7 Sep 2015 - 3:11 pm | खटपट्या

चांगलंय !!

मुख आरोग्यास लाभदायक असते.

म्हंजे हो काय दमामि सर?

पैसा's picture

7 Sep 2015 - 3:50 pm | पैसा

सकाळी उठावंच कशाला? दुपारी उठलं तर नाही का चालणार?

खिक्क्क.

-वाईट विचार न केलेला

पीके's picture

7 Sep 2015 - 11:58 pm | पीके

किती पवित्र विचार...,.,..

ते काय 'चालवायचं' आहे त्यावर अवलंबून आहे.

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 2:45 pm | बॅटमॅन

इतका 'विकारी' प्रतिसाद? ;)

प्रसाद गोडबोले's picture

7 Sep 2015 - 4:52 pm | प्रसाद गोडबोले





अजया's picture

7 Sep 2015 - 7:43 pm | अजया

मशेरी न लिहिल्याचा णिषेढ.त्याशिवाय ३ आणि ४ शक्य नाही.

पाच नंबरची गोष्ट केल्याशिवाय चार नंबरसाठी मला प्रेशरच येत नाही.

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 9:36 pm | हेमंत लाटकर

सकाऴी या पाच गोष्टी कराव्यात.

1. झोपेतून उठणे.
2. दात घासणे, डोळे व चेहरा धुणे.
3. वाफाळता चहा घेणे.
4. शौचास जाणे,मोबाईलवर मिपा करणे.
5. आंघोळ करणे.

नाव आडनाव's picture

7 Sep 2015 - 10:13 pm | नाव आडनाव

दोन नंबरचं काम चार नंबरला का लिहिलं? निषेध.
आणि त्यात परत २ कामं एकत्रं? तुमचं काय कंफ्युजन होत नाही का?

कपिलमुनी's picture

8 Sep 2015 - 5:58 pm | कपिलमुनी

म्हणून तर त्यांचे लेख पो पडल्या सारखे बदाबदा पडत असतात

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2015 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif.............http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif

म्हणून तर त्यांचे लेख पो पडल्या सारखे बदाबदा पडत असतात

मांत्रिक's picture

8 Sep 2015 - 2:47 pm | मांत्रिक

दमामि, आवडलं विडंबन.
अगदी सौम्य विडंबन आहे. कुणी रागवण्यासारखं तर नक्कीच नाही.

विजुभाऊ's picture

9 Sep 2015 - 12:00 pm | विजुभाऊ

कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)

तुमचं वय काय हो काका? नाही म्हणजे मला हे माझ्या एका मित्राच्या आज्जीने एकदा तिला तिच्या पणजीने सांगितल्याचं सांगितलं होतं.
( मित्राची आज्जी आज असती तर ती नक्की शंभरीपार वयाची असती)

दमामि's picture

13 Sep 2015 - 7:37 am | दमामि

आता माझं वय म्हंजे बघा म्हाराज सिहासनावर बसले तवा मी असेन धाएक वर्षाचा.

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 12:50 pm | बोका-ए-आझम

अलभ्य लाभ! कुठे होतात इतके दिवस?

नाखु's picture

9 Sep 2015 - 3:07 pm | नाखु

दमामीचे अभिनंदन या निमित्ताने विजूभौ आले !!!

"घारापुरी"यादवाला नाखु

हेमंत लाटकर's picture

9 Sep 2015 - 4:02 pm | हेमंत लाटकर

शौच सोडून बाकीच्या चार गोष्टी एकदिवस नाही केल्या तर?

द-बाहुबली's picture

9 Sep 2015 - 4:19 pm | द-बाहुबली

त्यापेक्षा शौच ४ दिवसातुन एकदा करा.

गोकुल's picture

12 Sep 2015 - 7:36 pm | गोकुल

चहा+तभाखु + मिशेरी=शौच

दिनु गवळी's picture

14 Sep 2015 - 10:58 am | दिनु गवळी

काय करावे हो तसच स्नान करायच की पोट साफ होन्याची वाट पहावी.