मिपावर निलंबने वाढत आहेत

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 11:34 am

आपल्या मिपावरील निलंबनांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने निलंबनांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या चांगल्या प्रतिसादकर्त्यांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारची निलंबने बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके असहिष्णु आहोत का की आज आपल्याला चांगले विरोधी लेखन दुरापास्त होत आहे.

ज्यांनी मिपाचे उत्तमोत्तम धागे हायजॅक केले, आपला वेळ देउन पंचशतकी केले तेच आज (असल्या निलंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले धागा-अपहरणकर्ते उत्तमोत्तम काड्या टाकत राहतील. चांगल्या धागाअपहरणकर्त्यांना फक्त दोन शतक प्रतिसादांची अपेक्षा असते व साहेबांचे प्रेम हवे असते.

प्रत्येक निलंबनकाराने हा विचार करावा की ज्यांनी मिपाच्या भल्यासाठी पुर्ण वेळ दिला त्यांच्यावर आपल्यामुळे मिपापासुन दूर जाण्याची वेळ येऊ नये. आणि प्रत्येक धागाअपहरणकर्त्याने देखील मनाशी ठरवावे की माझे निलंबन झाले म्हणून काय झाले, डु-आयडीने पुनरागमन पुनर्गमनाय करीनच करीन.

एवढे बोलुन मी माझा निबंध संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

विडंबनप्रतिसाद

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

4 Sep 2015 - 11:36 am | मांत्रिक

ज्यांनी मिपाचे उत्तमोत्तम धागे हायजॅक केले, आपला वेळ देउन पंचशतकी केले तेच आज (असल्या निलंबनकारांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते लोल!!!!!

मांत्रिक's picture

4 Sep 2015 - 11:38 am | मांत्रिक

मस्तच हो आनंदाभाऊ! अगदी खुसखुशीत!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Sep 2015 - 11:40 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच रे आनन्दा.

खटपट्या's picture

4 Sep 2015 - 11:40 am | खटपट्या

हायला मनात आले आणि धागा आला. आता मनात काही आणणारच नाही बघा.

नाखु's picture

4 Sep 2015 - 11:48 am | नाखु

दिस आनंदाचा !!!!

चांगल्या धागाअपहरणकर्त्यांना फक्त दोन शतक प्रतिसादांची अपेक्षा असते व साहेबांचे प्रेम हवे असते.

खिक्क...!

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2015 - 3:25 pm | श्रीगुरुजी

मस्त लिहिलंय!

आनन्दा's picture

4 Sep 2015 - 3:33 pm | आनन्दा

धन्यवाद. तुम्हीच आम्ची प्रेर्णा.

असंका's picture

5 Sep 2015 - 3:35 pm | असंका

टकाटक! एकदम ब्येष्ट!!