लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 1:52 pm

सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो

हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
९. इतर शंका हळू हळू

राहणीचौकशी

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

26 Feb 2015 - 4:12 pm | ऋषिकेश

१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?

यात सगळ्यात मोठी अडचण आहे जागा. एकदा का 'खोली' गावली का नाय मंग पार्टनर मिळुनच जायेल!

२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?

कुठेही चालेल. आजकाल मुंबईत यासाठी लोकलचे डब्बे, बसमधील फुडल्या शीटांची पाठ यांची फुल्ल चलती हाय. जरा वेगळ्या प्रकारचे पार्टनर हवे असतील तर सार्वनजिक मुतार्‍यांच्या भितीही ट्राय करू शकता.

३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?

नाय बा! काय कल्पना नाय!

४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)

हात साला! जे काय करायचा हाय त्याला खोली पुरते. उंगाच कशाला होल बिल!

५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?

तुझ्या षौकावर डिपेन् हाय! नैतर हव्वी ती लाँज्री नाय म्हनून पन मानापमान होतात म्हने!

६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे

नकोच ते.. ते मदे मदे येत अस्नार! पोशाक टांगायला खिल्ला पण पुरतो, नैरत र्‍हावू दे की जमिनीवर!

७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?

कोनाकोनाच्या?

८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)

लिव्ह मंजी र्‍हाणे, इन म्हंजी आत नी रिलेशनशिप म्हंजी संबंद आसं मास्तुराने शिकवलेला!
म्हणून मी तरी वरची माहिती "आत राहून (ठेवलेल्या) संबंधा"ची दिलेली हाय!! बरुबर अर्थय ना!?

खटासि खट's picture

26 Feb 2015 - 7:53 pm | खटासि खट

अभ्यास अभ्यास !!
नतमस्तक हो ! एक दडवत घ्यावा..

यमगर्निकर's picture

27 Feb 2015 - 12:21 pm | यमगर्निकर

खटसि खट जर तुमचे लग्न झाले असेल तर सुखाने संसार करा, कशाला नसत्या भानगडित पाय अडकऊन घेत आहात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 12:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्रैनुभवाचे बोल?

काळा पहाड's picture

27 Feb 2015 - 1:26 pm | काळा पहाड

अशा प्रतिगामी लोकांच्या सल्ल्यामुळेच असे नवीन उपक्रम बंद पडतात.

खटासि खट's picture

27 Feb 2015 - 2:40 pm | खटासि खट

जबरी हो का.प.
दडवत घ्यावा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 2:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला असता हो. पण काय करणार युज अँड थ्रो वृत्ती नाही. :)

यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे???????

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 3:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्रिदंडी

=))

त्रिदंडानुभव पंथ =))

बॅटमॅन's picture

27 Feb 2015 - 3:08 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =)) =))

त्रिदंडानुभवी त्रिगर्तगामी पंथ =))

खटासि खट's picture

27 Feb 2015 - 2:46 pm | खटासि खट

तुमचा अधिकार मोठा हे मान्य करून पण म्हणावेसे वाटते की , फुर्र ..फुर्र ..फु हु हु हु हुश्श !
अनुभव घेतल्याशिवाय इतरेजनास बरंवाईट सांगता येतं का ? लिव्ह इन झाले की नव्यानेच येऊ घातलेले सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात वन नाईट स्टँड्चा सुद्धा विचार करावा म्हणतो.

बॅटमॅन's picture

27 Feb 2015 - 3:08 pm | बॅटमॅन

यू मीन एकनिशीपंथ?

एकनिशीउत्तिष्ठपंथ?

नाही. शब्दशः भाषांतर केले तर वरील शब्दाचा अर्थ काही वेगळाच व्हायचा. =))

संदीप डांगे's picture

27 Feb 2015 - 3:39 pm | संदीप डांगे

मराठीदिनाच्या दिवशी खरी मराठीची सेवा तर इथे सुरु आहे.. जिओ मिपा... :-)

तुम्हीच ओ. नायतर बाकीचे लोक उगा दुर्लक्षानं मारतात अशा सेवेला. निष्काम सेवेची दखल घेतल्याबद्दल आनंद वाटला.

टवाळ कार्टा's picture

27 Feb 2015 - 4:45 pm | टवाळ कार्टा

नवीन निष्काम कर्मयोगी तुम्हीच बॅट्या =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 5:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

निष्काम. ह्म्म्म्म. =))

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 11:17 am | अत्रुप्त आत्मा

निष्काम कर्म-योगी(????) http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-cartoon-022.gif

या खाटुकाला हाणा रे सगळ्यांनी मिळून...काय लेकाचा एकेक कल्पना प्रसवतो! =))

हाडक्या's picture

2 Mar 2015 - 5:48 am | हाडक्या

काय लेकाचा एकेक कल्पना प्रसवतो!

:)))) . :))))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Mar 2015 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

निष्काम कल्पनाप्रसव अ‍ॅवॉर्ड चे विजेते हैत ब्रुस्वेण "खाटुक" गॉथमहळ्ळीकर...

(अखिल मिपा मापंकाढे समिती)

खटपट्या's picture

27 Feb 2015 - 11:44 pm | खटपट्या

असे नाहीये वो !! आत्ताच "एकनिशीउत्तिष्ठ" या शब्दावर एक तासाची अतिशय प्रतीभाशाली चर्चा झाली...

एस's picture

28 Feb 2015 - 12:12 am | एस

हल्ली कुठल्याही 'रिलेशन' संबंधी धागा आला की तो सुसाट सुटतो. पूर्वीसारखा काड्यासारू, ज्वलंत विषयांवरचा धागा हल्ली दुर्लक्षाने मारला जातो. हे मराठी संस्थळांबाबत म्हणायचे झाले तर क्रांतीचेच एक प्रकारे लक्षण आहे. चांगलंय. तसल्या वांझोट्या चर्चा वाचून डोके उठायचे. आता मस्त करमणूक होते. लगे रहो!

ब़जरबट्टू's picture

2 Mar 2015 - 10:35 am | ब़जरबट्टू

तर मुळात मिपाचे पण "व्हाट्अप" होतोय तर... :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Mar 2015 - 11:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्चं होतयं तल!!!

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 11:30 am | टवाळ कार्टा

ते "अच्चा अच्च जालं तल" असे आहे ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 11:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हैती आहे बे...मी मुद्दाम बदललं आहे थोडं>.

तुडतुडी's picture

4 Aug 2015 - 2:28 pm | तुडतुडी

सेम प्रश्न माझे पण . फक्त ६ आणि ७ मध्ये जरा बदल आहेत
६. अंगठ्या सोन्याच्याच असाव्यात का ? त्यांचा खर्च कोण करणार
७. पतीस कल्पना द्यावी का ?
;-)

डायवर's picture

16 Aug 2015 - 12:35 pm | डायवर

" ली अ री " प्रकाराबद्दल अंमळ कन्फ्युजन आहे तरीही इथल्या धुरिणांनी टिंगल न उडवता खालील काही प्रश्नांची उत्तरे देवून हि संकल्पना समजण्यासाठी मदत करावी हि विनंती.
- समजा आपला "ली अ री " जोडीदार आपल्याला परपुरुषाच्या बाहुपाशात आढळला किंवा आपण अचानक घरी आलो असता ती तिच्या एखाद्या मित्रासोबत नको त्या अवस्थेत रंगे हात सापडल्यास आपले रक्त खवळले पाहिजे कि डोके तरीपण थंडच राहिले पाहिजे?
कारण समजा काही जाब विचारलाच तर " मी काही तुझी बायको नाही" असे उत्तर मिळू शकते. किंवा कसे?
- जर "ली अ री " मध्ये असे काही बंधन नसतीलच तर हे म्हणजे एक भिन्न लिंगी रूम- पार्टनर सोबत राहिल्यासारखेच नाही का ?
- थोडक्यात जर दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकमेकांच्या फक्त रूम पार्टनर असतील तर त्यांनाहि "ली अ री " कपल म्हणता येईल काय?

आदूबाळ's picture

16 Aug 2015 - 12:52 pm | आदूबाळ

डायवरभौ, गल्लीत खेळलेलं क्रिकेट डोळ्यांसमोर आणा. त्यात कसे खेळाडूंच्या सोईनुसार एक टप्पा औट,डावीकडच्या भिंतीला दोनरन्स, मुळीकांच्या घरात गेला तर औट वगैरे नियम बनवलेले असतात. आता हेच नियम असेच्या असे दुसऱ्या गल्लीत चालतील का?

तर हे लि इ री.

नाय तर मग डैरेक पांढरे कपडे घालून टेस्ट म्याच खेळा.

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 12:14 am | संदीप डांगे

फक्त _/\_, ;-)

नाखु's picture

27 Aug 2015 - 4:30 pm | नाखु

काही जण त्याला गाजराची पुंगी म्हणतात खखो माहीत नाही.

लेईरीतज्ञजिंक्य्वीद्यापीठाधीशनुभवसिद्ध्योगीपुरूष यमगर्नीकर महाराज श्रोता-भावीक संघ

<<४.लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?>.

अगदीच बाळबोध प्रश्न . अस कस व्ह ?

अकिलिज's picture

3 Sep 2015 - 8:38 pm | अकिलिज

ही ईन्द्राणी बै ८७ साली लि ई री मध्ये होती म्हणतेय....
म्हंजे आटरा वर्स जूना कंसेप्ट आपण चघळत बसलोय.

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 8:44 pm | प्यारे१

गणित नापास झालतंस काय रे अक्या?
१९८७ पस्नं २०१५ आटरा हुत्यात व्हय?

-कोल्लापुरी ट्रॉय प्रेमी ;)

अकिलिज's picture

3 Sep 2015 - 9:06 pm | अकिलिज

M3 उडलाता.