असचं वाटलं म्हणुन|

केदार केसकर's picture
केदार केसकर in जे न देखे रवी...
12 Dec 2008 - 11:58 am

मित्रांनो,

मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे.

कशी वाटतेय नक्की सांगा.

उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं|
लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं|
मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो|
काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो||

लो.अ.

केदार

चारोळ्याविचार

प्रतिक्रिया

राघव's picture

12 Dec 2008 - 1:07 pm | राघव

छान आहे. :)

काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो||
यात
काहींना परत पाठवून, पुन्हा उजेडात येतो||
असा बदल केला तर?

शुभेच्छा! येऊ देत अजुन!
मुमुक्षु

केदार केसकर's picture

12 Dec 2008 - 2:03 pm | केदार केसकर

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल! मुमुक्षु, काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| या मधे मला एक forcible क्रिया दाखवायची आहे. अशी क्रिया जी मनाविरुध्द असते, पण करण भाग पडतं. पुनःश्च धन्यवाद!

लो.अ.

केदार

दत्ता काळे's picture

12 Dec 2008 - 1:17 pm | दत्ता काळे

मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो
ह्यापेक्षा,

मग काही थेंब सांडतात, काही मी टिपून घेतो
असं केलं तर ?

छान वाटली

केदार केसकर's picture

12 Dec 2008 - 2:05 pm | केदार केसकर

suggestion आवडलं. नक्की बदल करीन.

लो.अ.

केदार

सिद्धू's picture

12 Dec 2008 - 6:22 pm | सिद्धू

सुंदर चारोळी आहे..
भावना चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्या आहेत ४ ओळींमध्ये.
शेवटी लो. अ. काय आहे ते मात्र नाही समजलं..

शक्तिमान's picture

12 Dec 2008 - 7:44 pm | शक्तिमान

माझ्यामते,
लो.अ. = लोभ असावा

विनायक प्रभू's picture

12 Dec 2008 - 7:48 pm | विनायक प्रभू

लय भारी चारोळी. तुम्ही आमचे बाप निघालात.

ग्रीष्म's picture

15 Dec 2008 - 11:58 am | ग्रीष्म

...............खरच छान जमलि मित्रा ..अजुन

केदार केसकर's picture

15 Dec 2008 - 12:23 pm | केदार केसकर

लो.अ. = लोभ असावा.

मदनबाण's picture

15 Dec 2008 - 2:15 pm | मदनबाण

छान..
(४ओळीं प्रेमी)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -