डावा डोळा...!

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
22 Aug 2015 - 4:54 pm

‘हा घे नंबर... फक्त एकदाच जाऊन बघ..’
घनिष्ट मित्राने नंबर हाती थोपवत डावा डोळा झाकला. उजवा का नाही? तर डाव्या गोष्टीत जास्त मौज असते! दुसऱ्या दिवशी पूर्ण वेळ मोकळा होता म्हणून दुपारच्या जेवणानंतर मी त्या नंबरवर कॉल केला. किनऱ्या पोरकट आवाजात ‘कौन चाहिये? किसने नंबर दिया? क्या काम है?’ वगैरे मराठी हेलातील हिंदी प्रश्नावली ऐकून घेतल्यावर मी घनिष्ट मित्राचे नाव सांगितले.
‘अच्छा, मग या ना कवाबी आमी तयार हायेतच.’ अशा गावरान मराठीत स्वागत झाले. 'बालगंधर्वापाशी आल्याव फोन करा, मंग सांगतो कसं यायचं त्ये.’ त्या पोराने माहिती पुरवली.
मला दम कुठला निघतो? तासाभरातच बालगंधर्व गाठले. चार वाजले होते.
पुन्हा फोन केल्यावर तो म्हणाला- ‘संभाजी बागच्या गेट समूर या.’ तिथे पोचलो.
‘आता बगा, समूर ली शोरूम दिसतंय का? न्हायी? अवो ली जीन्सच्या कपड्याचं दुकान दिसतंय का न्हायी? हं... तिथंच या...’
मी गेलो. तिथे घुटमळू लागलो. कुठेच त्या मसाज सेंटरच्या नावाचा बोर्ड नव्हता.
‘उजव्या अंगाला या. तुमच्या उजव्या अंगानं न्हायी... शो रुमच्या उजव्या अंगानं या...’ गेलो. तिथेही काहीच मागमूस लागत नव्हता.
‘अवो, हाय की हितंच. आता जाळीची लिफ्ट दिसती का बगा... दिसली का? हं... मंग घुसा आत. आन पार शेवटचा नंबर दाबा. डायरेक्ट वरती यायचं. काय? कळलं ना? या लौकर...’
लिफ्टने वरच्या शेवटच्या मजल्यावर पोहोचलो. तो मजला नव्हता, त्या बिल्डींगची टेरेस होती. तिथे पोचल्यावर पुरता बावचळलो. कुठे असेल मसाज सेंटर? असा विचार करत असतांनाच डाव्या बाजूने एका पोराने हसत मुखाने हातवारे करीत हाक मारली, ‘हिकडं या, हिकडं.’ गेलो. एका अतिशय सध्या दरवाज्यातून त्याने आत घेतले व लगेच कडी लावून घेतली.
अहाहा... आतला माहौल काय वर्णावा? अतिशय उत्तम वेटिंग रूम होती ती! बसायला मौमौ गुबगुबीत सोफे होते. सुगंधी रूमफ्रेशनर दरवळत होते. त्या शिडशिडीत पोराच्या टेबलवर देखण्या गुलाबाची फुले खोचलेला फ्लॉवरपॉट लक्ष वेधून घेत होता. खिडक्या तावदाने लावलेली होती परंतु पडदे खूपच आकर्षक होते. वेटिंग रुममध्ये पुढील बाजूने चार दरवाजे लावलेले दिसत होते. कदाचित यातूनच प्रवेश करून मसाज घेतला जात असावा हा माझा कयास चुकीचा नव्हता.
एका दरवाज्यातून एक सुंदर तरुणी डोकावून पोराला मंजुळतेने म्हणाली, ‘सर.. नेक्स्ट गेस्ट आहे का कुणी?’ ‘येस मॅम’ त्याचे उत्तर ऐकून मी अचंबित झालो! कारण तिथून पुढे तो पोरगा अस्खलित मराठीच काय इंग्रजी सुद्धा बोलत होता!
‘हं सर, तुमचा नंबर आहे लगेच. इथे रजिस्टरवर नाव लिहा. मोबाईल नंबर लिहा. आणि हो, मोबाईल इथेच ठेवायला लागेल. सेलफोन नॉट अलाउड इनसाईड... ओके.. थँक्यू सर... हॅव अ ग्रेट सर्व्हिस!!!’ त्यानेही डावा डोळा मिचकावून सूचक अनुमोदन दिले जे की घनिष्टाने कालच दिले होते.
आत गेलो...
ती रुपवती लोभस स्मित करीत जवळ आली. तिने स्कर्ट मिनी घातलेली होती. त्यातून तिचे पुष्टत्व जाणवण्याइतपत अर्धपारदर्शी होतेच.
‘गुड इव्हिनिंग सर. हाऊ यू लाईक टू हॅव माय सर्व्हिस?’
परंतु मी पडलो शुद्ध मऱ्हाठी इसम.
‘हो का? पहिल्यांदाच आलात का? असू द्या ना. आमच्या मॅडम सांगतील सर्व. मग ठरवा...’
तिने एक बटन दाबले. त्याच रुमच्या दुसऱ्या एका दरवाजातून तिच्यासारखीच कमनीय युवती प्रवेशती झाली. तिनेही शॉर्टकट्स वस्त्रे परिधान केलेली होती. तिचे उन्नत्व दखल घेण्याजोगे जाळीदार होतेच!
‘व्हॉट हॅपन्ड?’
‘नथिंग मॅम. ही इज न्यु कमर. मस्ट टू बी कन्सलटेड.’
ती काय समजायचे ती समजली आणि माझ्याकडे सुहास्य वदनाने वळून म्हणाली...
‘सर. कोणती सर्व्हिस घ्यायची आहे? बरं ठीकय. सांगते मी. फेस टू फेस मसाज तीन हजारांत, मग टॉपलेस मसाज घ्या, साडेचार हजार होतील फक्त. आणि सहा हजारांत बॉडी टू बॉडी मसाज घ्या ना तोही मस्त असेल. मी तर म्हणेन फुल्ल सर्व्हिस अनुभवाच एकदा... दहा हजारांत खूप खुश व्हाल तुम्ही. नक्कीच आवडेल ती सर्व्हिस तुम्हांला.’ इथे तिनेही डावाच डोळा हळुवारपणे मालवला होता...
...
‘पुढच्या वेळी नक्की या हं...’ दारांतून डोकावत लाडीकपणे ती रुपवती निरोप देत होती. मी डौलदार मोरासारखा पिसारा फुलवून माझ्याच मस्तीत चालत बाहेर पडलो होतो.....

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 5:13 pm | प्यारे१

चान चान!

खटपट्या's picture

22 Aug 2015 - 5:14 pm | खटपट्या

स्वानुभव हाय का?

अभ्या..'s picture

22 Aug 2015 - 6:31 pm | अभ्या..

हान्तेचाय्ला.
मज्जा मज्जा. अं???

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 6:42 pm | प्यारे१

अं???

काय रे अभ्या? काय नेमकं?
'अबब, ऊसच ऊस!' असं उद्गारवाचक चिन्ह की प्रश्नचिन्ह?

अभ्या..'s picture

22 Aug 2015 - 6:47 pm | अभ्या..

अं???

ज्या पद्धतीने पुर्ण पता सांगितालाय, अ‍ॅड तर नाही ना? रेट सकट सगळं सविस्तर..
बाकि मिपा चा असाही उपयोग होतो हे अत्ता कळले.

द-बाहुबली's picture

22 Aug 2015 - 6:52 pm | द-बाहुबली

रेट खरोखर काहीच्या काही वाटत आहेत. आवो कोरेगाव पार्कात तरी एवडा रेट असेल का ? १०के मधे होतकरु कलाकारही मिळुन जाइल अर्थात या ऐकीव गोष्टी म्हणा, खरं खोटं जाणार्‍यालाच ठावं...

मांत्रिक's picture

23 Aug 2015 - 12:17 pm | मांत्रिक

रेट खरोखर काहीच्या काही वाटत आहेत. आवो कोरेगाव पार्कात तरी एवडा रेट असेल का ? केवढी डिट्टेल माहिती तुम्हाला! ;)
(गंमतीत घ्या!)

द-बाहुबली's picture

23 Aug 2015 - 12:29 pm | द-बाहुबली

पार्कात ३ वर्षे काढली असल्याने तिथल्या लेन ७ जवळच्या पोलिसस्टेशनच्या सपशेल समोर असणार्‍या पार्लमधे (कधीकाळी) काय रेट होते व आज काय असु शकतील हे माहित असणं आपसुकचं आलं नाही का ? नंतर त्याच पोलींसांनी त्याच पार्लरवर छापा टाकल्याने अजुन मौज आली होती.

बाकी अजुन काही माहिती हवी असल्यास जरुर विचारा. (इथे डावा डोळा झाकल्याचा आविर्भाव कल्पावा)

बहुगुणी's picture

22 Aug 2015 - 7:04 pm | बहुगुणी

डॉ. दिवटे! बस नाम ही काफी है!

खरं तर अनुल्लेखाने मारायला हवं, पण विचारतोच, "डॉ. दिवटे" नामक लेखकाने कायम केवळ अश्लीलतेकडेच झुकणारं, कामुक असंच काही लिहिलं पाहिजे का? पुनरागमन केलंत तरी निराशाच करताहात. कधी सुधारणार?

तिमा's picture

23 Aug 2015 - 1:26 pm | तिमा

आवो मालक, फार्फार वर्सांपूर्वी कोनीतरी, 'दिवट्यांच्या मनांत बारा महिने भाद्रपद' का कायसं लिवलं हुतं, ते आटावताय का? तेंव्हापासून ते गायब झाले हुते. आता परत आलेत.

नाखु's picture

25 Aug 2015 - 5:36 pm | नाखु

घन "नि(रा)ळा" बरसला !!!

आता ऐकू पुढचे गीत "इथेच टाका तंबू"

सांजधारा प्रेक्षक्श्रोता संघ

या वर्षी अधिक महीना आला नसता तर?
आत्ता श्रावण चालू आहे त्या ऐवजी.....

निसर्गानं आपलं काम केल्याने होत आहे रे!

सायकलस्वार's picture

22 Aug 2015 - 7:34 pm | सायकलस्वार

"फिर नींदमे से आंख कब खुली भाई सलिम तेरी?"

उगा काहितरीच's picture

23 Aug 2015 - 1:09 am | उगा काहितरीच

बस ? संपलं का इतक्यात ? मला वाटलं कि पूर्ण तपशील द्याल ! (इथे डावा डोळा बारीक केलेली स्मायली कल्पावी)

पिलीयन रायडर's picture

23 Aug 2015 - 9:32 am | पिलीयन रायडर

जाहिरात आहे काय हो?

जेपी's picture

23 Aug 2015 - 9:40 am | जेपी

शिर्षकात A* लिहायच की ..

* ONLY FOR ADULTS

मदनबाण's picture

23 Aug 2015 - 9:45 am | मदनबाण

आयो... मसाज पार्लरची डिटेल जाहिरात !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص

द-बाहुबली's picture

23 Aug 2015 - 12:17 pm | द-बाहुबली

उजवा का नाही? तर डाव्या गोष्टीत जास्त मौज असते!

हे खासचं.

अभ्या..'s picture

23 Aug 2015 - 12:25 pm | अभ्या..

च्यायला वाममार्गी.
(बक्षी तुम्हाला नाही म्हणलो हा. बंगालात हायेत डावे लै पण तुम्ही वाटत नाहीत. ;) )

जव्हेरगंज's picture

24 Aug 2015 - 11:30 pm | जव्हेरगंज

डाव्याच बाजुला जास्त मौज असते. (इथेही डावा डोळा बारीक केलेली स्मायली कल्पावी);-)

तरी म्हटलं भाद्रपद जवळ आला तरी दिवटे कसे उगवले नाहीत!!

समजून घ्या राव, त्यांचा 'सीझन' है...!

मितान's picture

25 Aug 2015 - 6:02 pm | मितान

अती सुमार !
आज काय दिवे ते बघायला आले न अपेक्षेप्रमाणे अळंबी आढळली !

मी तर म्हणेन फुल्ल सर्व्हिस अनुभवाच एकदा... दहा हजारांत खूप खुश व्हाल तुम्ही/blockquote>
ह्म्म्म. दहा हजार काय? पुण्यात एवढी महागाई का आहे याचे महत्वाचे कारण आत्ता कळले. अजून एक , या धंद्यात सर्विस देणार्या रूपवती, कमनीय, उन्नत, पुष्ट मदनिका मराठी बोलत असतील यावर विश्वास बसत नाही. कारण मराठी बोलणार्या स्वस्त मदनिका पेठेत उपलब्ध असतात ऐसे ऐकिवात आहे.

या सगळ्याच्या नादात पार्श्वभाग उघडा पडला ना साहेब !

चलत मुसाफिर's picture

26 Aug 2015 - 1:36 pm | चलत मुसाफिर

श्वास(सुद्धा!) रोखून वाचत गेलो. आणि मारनिंग शोमदी नेमका शीन सुरू होयाच्या येळी फेडाऊट होऊन दोन गुलाबं भिडताना दिसावी तसं झालं बगा!!

मांत्रिक's picture

26 Aug 2015 - 3:53 pm | मांत्रिक

बराच्च अनुभव दिसतोय तसल्या मुवींचा! ;)
गंमतीत घ्या!

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 3:57 pm | प्यारे१

सातारा चं कुठलं ते टॉकीज रे मांत्रिका....???

मांत्रिक's picture

26 Aug 2015 - 4:37 pm | मांत्रिक

चित्रा, शिवसागर येथे अतिशय उत्तम लोकजागृतीपर चित्रपट पहावयास मिळत!

ही दोन्ही बंद पडली. चित्राचं तर शॉपिंग कॉम्पलेक्स झालं. ते कृषणा ना आत आहे ते. पंचमुखी गणपती पासून पुढं गेल्यावर खालचा रस्ता ते राधिका रोड च्या मध्ये.

मांत्रिक's picture

26 Aug 2015 - 4:45 pm | मांत्रिक

म्हणून तर मिळत असा भूतकाळी उल्लेख केला. ;)

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 4:52 pm | प्यारे१

अरे भावा (हा ख़ास सातारी शब्दप्रयोग आहे. लक्षात घ्या)
मध्येच पेट्रोल पम्प आहे आणि शनिचं छोटं देऊळ, पुढे वखार त्याच्या मध्ये एक थेटर हाय की...! त्याचं नाव काय?