राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती.
मित्रांनो बर्याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये किती लव स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??
प्रतिक्रिया
18 Aug 2015 - 6:59 pm | चाणक्य
मला आधी वाटलं शशकच आहे.
18 Aug 2015 - 7:04 pm | अभ्या..
+१
.
.
आमच्या मिक्याच्या शब्दात " यु आर लेट, यू फूल" ;)
18 Aug 2015 - 7:07 pm | जिन्क्स
फस्ट साईट लव....
मला वाटल लेखक गवंडी आहे आणि तो काम करत असलेल्या पहिल्या साईटच्या प्रेमात पडला.
18 Aug 2015 - 7:09 pm | अभ्या..
संपादक्स प्लीज हा धागा ऊडवू नका हं.
प्लीज्च.
मला लै स्टोर्या लिहायच्यात. लै काय काय वाटतं मला.
19 Aug 2015 - 8:08 pm | यशोधरा
जे काही लिहिणार असाल ते अर्धवट न ठेवता पूर्ण करा म्हंजे झालं!
18 Aug 2015 - 7:10 pm | अस्वस्थामा
चेहरा स्कार्फच्या आड असताना प्रेमात पडला असतात तर ते तुमचे शाश्वत चिरंतन प्रेम. स्कार्फ काढल्यावर तोंड पाहून पयले तो आकर्षणच होयेगा ना भौ..
(प्रेमाच्या बाबतीत डोपमिन रोल बाबत कुठलीही शंका नसलेला)
19 Aug 2015 - 11:44 am | भीमराव
म्हण्जे? नुसतीच फिगर बघुन होतं ते प्रेम शाश्वत प्रेम का? बराय बराय, आम्ही ऊगाच त्याला आयटॉनिक समजत होतो
19 Aug 2015 - 12:05 pm | प्यारे१
विषय उच्च पातळीवर चालू असताना अकारण खाली घसरणाऱ्या बाबूदादांचा सौम्य निषेध!
18 Aug 2015 - 7:22 pm | संदीप डांगे
अशा तर्हेने आजवर १,२४,३४५ वेळा प्रेमात पडलोय. कदी कदी तर एका सायटीत चार चार वेळा पडलोय चार जणींच्या. तेबी बिनास्कार्पवाल्या पोरींच्या. त्येनी आमची 'साईट' पवून पटपट स्कार्प चडवले हे येगळं. काय कथा सांगायच्या तुमाला आणि तुमी बी आयकायच्या... मिपाचं सर्वर परत डाऊन व्हइल आणि पोर्न कोनतं फायला पायजेल त्याची चर्चा ऐन्वेळंला बंद पडंल...
18 Aug 2015 - 7:38 pm | एक एकटा एकटाच
हा हा हा
19 Aug 2015 - 5:44 pm | बॅटमॅन
"सायटीत" चा नेहमीचा अर्थ घेतल्यामुळे अर्थ समजलासे वाटले पण नंतर कळालं की इशय वेगळाच आहे. =))
19 Aug 2015 - 5:57 pm | संदीप डांगे
;-) तुमची ती साईट वेगळीच है दादा...!
अहो, लोक एका 'फायटीत' चार चार जणांना लोळवतात, आम्ही एका सायटीत चार चार जणींच्या प्रेमात ळोळतो. खी खी.
18 Aug 2015 - 7:34 pm | माम्लेदारचा पन्खा
आता पुना एकदा हळहळ ,भळभळ ,चळवळ ,तळमळ बघणे आले !
18 Aug 2015 - 7:54 pm | प्यारे१
>>> स्कार्प
म्हन्जे?
18 Aug 2015 - 8:25 pm | चेतन677
सोप्या भाषेत म्हणजे मुली ज्याने आपला पुर्ण चेहरा आणि डोके झाकतात फक्त डोळे ऊघडे ठेवतात तो म्हणजे स्कार्प
18 Aug 2015 - 10:14 pm | प्यारे१
फ कधी वापरतात मग?
19 Aug 2015 - 2:09 pm | खेडूत
नाशिकचे काका वापरतात तेव्हां !
:)
19 Aug 2015 - 2:16 pm | प्यारे१
गूड वन!
-मूर्ती लहान किर्ती महान बाहुबली.
18 Aug 2015 - 7:55 pm | द-बाहुबली
घालमेल झाली होती का ?
20 Aug 2015 - 10:14 pm | नाव आडनाव
हां ... हे मत्वाचं!
"घालमेल" शबूद याया पायजे ष्टूरीत, तर कुढं गोष्ट पुढं सर्कती...
र्हावल्याला यकदा इचारून यावा लेकक शेट...
18 Aug 2015 - 8:04 pm | रातराणी
पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती
.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती
ही वाक्य वाचून मीच काय घोड मारलं होत पी एम टी च असं वाटल. :(
18 Aug 2015 - 8:19 pm | चेतन677
कमी गर्दीची पीएमटी हवी असेल तर रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी प्रवास करा.....
18 Aug 2015 - 8:53 pm | अजया
परवाचा प्रेम की आकर्षण धागा वाचा हो भौ.तिथे बरीच उत्तरं मिळतील.
18 Aug 2015 - 10:19 pm | पिलीयन रायडर
धागा स्किप मारला तरी चालेल... प्रतिक्रिया नक्की वाचा!!!
18 Aug 2015 - 9:26 pm | जडभरत
प्रेम = आकर्षण
आकर्षण = प्रेम
पोपशास्त्री यांच्या सिद्धांताचा अनुयायी!!!
19 Aug 2015 - 6:49 pm | मी-सौरभ
हे लव बिव सगळ झूट असतं.
आपल्या मुठीत जोर असला की सगळं व्यवस्थित होतं
19 Aug 2015 - 6:53 pm | सूड
+१
20 Aug 2015 - 6:18 pm | बॅटमॅन
मिपा वयात आलं. _/\_
20 Aug 2015 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा
खाटुकाशी शमत!
20 Aug 2015 - 9:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ख्या ख्या ख्या!!
20 Aug 2015 - 10:45 pm | खटपट्या
वैश्विक सत्य
7 Sep 2015 - 4:11 pm | प्रसाद गोडबोले
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ =))))
19 Aug 2015 - 8:45 pm | कोमल
मला पहिल्यांदा वाटलं चेसुगु यांची नव्याने यंट्री झाली की काय..
19 Aug 2015 - 9:06 pm | प्यारे१
चेसुगु म्हणायचं नाही.
आवडत नाही त्यांना.
काय आत्मुबुवा? बरोबर ना? ;)
20 Aug 2015 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा
बराब्बर .. चेसुगु डूख धरतात.
21 Aug 2015 - 6:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
फुस्स फुस्स!! =))
21 Aug 2015 - 11:37 am | प्यारे१
एवढा छोटा फुत्कार नसतो. पानभर मोठा असतो.
त्यात नक्की कुठे आहे तो शोधावा लागतो.
21 Aug 2015 - 8:41 pm | जडभरत
चेसुगु कोण? कुणीतरी कृपया लिंक द्या!!!
20 Aug 2015 - 9:08 pm | Sanjay Uwach
आमच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये मुली फारच कमी होत्या याचा परिणाम म्हणून कि काय मुले बाहेरील गार्डन मध्ये गवत कापायला येणाऱ्या मुलीना बघून लांबून खिडकीतून उगीचच शिट्या मारीत असत य़ाला तुम्ही कसले आकर्षण म्हणणार. त्यात उन्हाळ्यात सर्व सरदारजी मुले सुटीच्या दिवशी त्याचा डोक्यावरून नाहण्याचा कार्यक्रम असायचा.अंघोळ झाली कि ती पाठीवर केस सोडून सुकवण्यासाठी बाहेरच्या गार्डन मध्ये ओळीने बसत होते . बघणाऱ्या व्यक्तीला असे वाटायचे कि या सर्व गवत कापणाऱ्या मुलीच ओळीने बसल्या आहेत . मग शिट्यांचा सिलसिला जोरात चालू होत असे . या वर मात्र एक शेर आठवणीने म्हणत होतो "दूर से देखा दिल बेकरार था,दूर से देखा दिल बेकरार था, नजदीक से देखा साला सरदार था
21 Aug 2015 - 8:48 pm | जडभरत
अरेरेरेरे!!! स्वप्नभंग!!! अपेक्षाभंग!!! फुस्स्स्स्स्स!!!
24 Aug 2015 - 3:24 pm | gogglya
मुली येत असत? लय भारी कॉलेज होत तुमचे...