विहीर - कथा

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
16 Aug 2015 - 10:28 pm

गावाबाहेरच्या माळाजवळ सदूची चहाची टपरी होती . शेजारच्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक , प्रवासी हेच त्याचे
गिरहाईक. एरवी मोकळ्या वेळात सदू त्या माळावर चालणारे मुलांचे खेळ , दंगा पाहात बसे . त्या माळावरच एक जुनाट पडकी विहीर होती . एखादी खोडसाळ पोरे जर खेळताना त्या विहीरीच्या फार जवळ जात असेल ,तर , सदू त्या पोरांवर जोरात ओरडत असे " ए पोरांनो , त्या ईहिरीच्या जवळ जाउ नका . आरं , त्या ईहिरीमध्ये सात आसरा हाईती . त्या माणसाला भूलवून पार पाताळात घेऊन जातात . पळा तिथनं " . सदूच्या ओरड्यामूळे आणी त्या विहीरीच्या भीतीमूळे पोरं तिथून लांब पळून जात .
आज सदू खूप अस्वस्थ होता . त्या माळावर एका कारखान्याचे गोडाउन बांधले जाणार होते . कारखान्याच्या मालकाच्या भाडोत्री गुंडांनी आज दुपारी सदूला धमकी दिली होती " दोन दिवसात हि टपरी इथून हलव . नाहितर उभा गाडीन " . यामुळे सदू पार हादरून गेला होता . संध्याकाळी सगळी सामसुम झाल्यावर सदूने टपरी बंद केली . आणी तो चालू लागला .....त्या विहीरीच्या दिशेने .

कथालेख

प्रतिक्रिया

एस's picture

16 Aug 2015 - 10:41 pm | एस

कथा छान आहे.

जडभरत's picture

16 Aug 2015 - 11:13 pm | जडभरत

मस्त आहे......
पण साती आसरा म्हणजे नक्की काय?

रेवती's picture

16 Aug 2015 - 11:23 pm | रेवती

कथा आवडली.

एक एकटा एकटाच's picture

16 Aug 2015 - 11:34 pm | एक एकटा एकटाच

छान आहे...कथाबिज चांगल होत..
शतशब्दांची लिमीट नसल्याने कथा अजुन थोडी फ़ुलवली असती तर वाचायला अजुन मजा आली असती.

पुढिल लिखाणास शुभेच्छा

सिरुसेरि's picture

16 Aug 2015 - 11:48 pm | सिरुसेरि

धन्यवाद . आसरा = अप्सरा या शब्दाचा ग्रामिण भागात तसा उल्लेख केला जातो . = पाताळ लोकातील यक्षिणी .

जडभरत's picture

16 Aug 2015 - 11:52 pm | जडभरत

पण मला वाटतं एका मराठी चित्रपटात त्यांना देवी स्वरूपात चित्रीत केलेलं आहे. ते कसं काय? अनेक ठिकाणी सा.आ. या उपद्रवकारक निम्न श्रेणीच्या देवता मानल्या जातात. त्यांची पिडा टाळायचे शाबर मंत्रही सापडतात.

पद्मावति's picture

17 Aug 2015 - 12:24 am | पद्मावति

खुपच छान लिहिलय. कथा आवडली.

उगा काहितरीच's picture

17 Aug 2015 - 12:56 am | उगा काहितरीच

छान !

चैत्रबन's picture

17 Aug 2015 - 2:04 am | चैत्रबन

छान लिहिलिये..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Aug 2015 - 5:14 am | अत्रुप्त आत्मा

पटकन +१ टाकणार होतो..

gogglya's picture

17 Aug 2015 - 2:37 pm | gogglya

टाकणार होतो. सुरेख कथा.

आसारा ह्या पाण्यात राहणाऱ्या १ प्रकारच्या देवता (? कारण त्या झपाटतात . )असतात म्हणे . त्यावर एक सत्यकथा वाचली होती

खटपट्या's picture

17 Aug 2015 - 3:59 pm | खटपट्या

क्रमशः आहे का?

सिरुसेरि's picture

17 Aug 2015 - 5:16 pm | सिरुसेरि

क्रमशः नाही . धन्यवाद . हि लघूकथा स्वरूपात लिहिली आहे .