बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार
ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार
मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव
प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव
छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं
ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं
दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला
बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला
माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं
बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं
-राहुल अरुणकिशन रणसुभे
शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
abhipray23@gmail.com
rahulkransubhe@gmail.com
प्रतिक्रिया
8 Dec 2008 - 10:16 pm | टारझन
कविता कळत नाही , म्हणून नो कमेंट. पण हा गांधींनंतर अजून एक डोक्यात जाणारा बापू आहे.
- टारझन
9 Dec 2008 - 6:23 pm | विसुनाना
अनिरुद्ध बापू यांच्याबद्दल आपले काय मत आहे?
या बापू लोकांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून विचारले हो! इतकेच.
9 Dec 2008 - 2:52 am | शंकरराव
सहमत+
हा डोक्यात जाणारा बापू
अध्यात्माच्या नावावर बाजार , गून्हेगारी, फसवेगिरी ....
9 Dec 2008 - 2:53 am | धनंजय
पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
(पहिल्या अडीच कडव्यांत लय/ठेका/वृत्त सांभाळले होते - पण मग नंतर का सोडून दिले?)
9 Dec 2008 - 9:15 am | प्रकाश घाटपांडे
चांगली कविता , बाकी मत धनंजयाप्रमाणे
प्रकाश घाटपांडे
9 Dec 2008 - 11:31 am | विनायक प्रभू
लोकसंख्येवर ह्या बापु कडे लै भारी उपाय आहेत. तो म्हणतो फक्त एकदाच करा. एकात नाय झाले तर काञ/ ह्या प्रश्नाचे उत्तर देत नाही.
9 Dec 2008 - 7:08 pm | वेताळ
पण शेवट असा हवा होता.
माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं
हजारोंच्या नावाने आज बापु पोट भरत होतं
वेताळ
9 Dec 2008 - 7:13 pm | विकेड बनी
का बरें?
-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.