आज गणेश विसर्जनाचा दिवस. सर्वत्र ढोल ताशे वाजत होते. मी सुध्दा माझ्या मित्रांसोबत गणपती पहायला गेलो. गणपतीचा सण म्हणजे, ढोल-ताशे, विविध गणेश मंडळ. त्या-त्या गणेश मंडळाचे लेझीम पथक, टी-शर्ट. मी लहान असताना त्या गणपतीच्या सणाच्या काळात लेझीम खेळणा-यांना देण्यात येणा-या टी-शर्टचे मला फार आकर्षण होते. पण मला ते कधीच मिळालेच नाही. असो. अशा सार्वजनिक सणाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. आमच्या येथे तर चौका-चौकामध्ये पोलीस उभे असतात. सध्या बॉम्बस्फोटाच्या चर्चेमुळे सुरक्षा व्यवस्था अजूनच कडक करण्यात आली होती. तसेच मुलींची छेड काढणा-यां टपोरी मुलांना पकडण्यासाठी पोलीस साध्या ड्रेसमध्ये सर्व लोकांत मिसळलेले असतात.
मी माझे मित्र सर्व एका ठिकाणी बसुन गणपतीच्या मिरवणुका पाहत होतो. माझ्या एका मित्राने एका गणेश मंडळाचे टी-शर्ट घातले होते. काय माहीत कोणत्या गणेश मंडळाचे आणले होते. कारण तो ज्या कॉलनीत राहतो त्यांच्या गणेश मंडळाचे चे टी-शर्ट नव्हते. आम्ही बरंच वेळ झालं एकाच ठिकाणी उभे होतो. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तो चौक फार महत्त्वाचा होता आमच्यासाठी. आम्ही रोज रात्री सर्व मित्र तेथे गप्पा मारत बसतो. तो आमचा ठरलेला कट्टाच आहे. गणपतीच्या काळात तर सर्व मिरवणुका तेथुनच जात आणि आम्ही या जाणा-या मिरणुका पाहत तिथेच बसलेलो. कधी मिरवणुक पहायची तर कधी मिरवणुक पाहकयला येणा-या सुंदर सुंदर मुलींना पहायचो. माझ्या मित्रांना फार छंद मुलींना पाहण्याचा. मी त्यांना अनेकवेळा सांगतो की, एखाद्या पोलीसाने आपल्याला पाहीले तर फालतु लफडे वाढेल. तसे माझे मित्र काही त्यांची छेड काढत नाहीत. फक्त येणा-या जाणा-यांना पाहतात.
बराच वेळ झाला होता एकाच ठिकाणी बसुन आणि आज मिरवणुकीचा रस्ता सुध्दा बदलला होता पावसामुळे. त्या मुळे मी त्यांना दुस-या साईडला जाऊन आपण मिरवणुक बघु असे सांगितले. तिकडे फार गर्दी आहे असे सांगुन त्यांनी मला नकार दिला. तरी सुध्दा मी त्यांना रस्ताच्या दुस-या साईडला मिरवणुक पाहण्यासाठी नेले. मिरवणुकी पाहील्या. बराच वेळ मिरवणुकी पाहील्यानंतर आम्ही वापस आमच्या नेहमीच्या कट्टावर निघालो. गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही मागेपुढे झालो. माझे मित्र मागे होते आणि मी एका मित्रासोबत पुढे चाललो होतो. नंतर मी मागे पाहीले असता ते दिसेनासे झाले होते म्हणुन मी त्यांना पाहण्यासाठी थांबलो. त्यांना पाहताना ते पुढे कधी गेले मला समजलेच नाही. मग मी त्यांच्या पाठीमागे निघलो. तितक्यात एक साडीघातलेली बाई हातात काठी घेऊन मागुन आली व तिने माझ्या मित्राला (ज्याने गणेश मंडळाचा टी-शर्ट घातलेला) पकडले. मी खुप घाबरलो. कारण ती बाई काही तरी त्याला जोर-जोरात विचारत होती. ढोल-ताश्यांच्या आवाजामुळे मला काही ऐकु येत नव्हते. पण तीच्या हातवा-यावरुन ती त्याला रागवत होती असं वाटत होतं. मला वाटलं की, यांचा कुणाला धक्का तर नाही ना लागला का यांनी कोणाची छेड तर नाही ना काढली. मी खुपच घाबरलो. नंतर थोड्यावेळाने ती बाई त्याला बोलून निघुन गेली. मी पटकन जाऊन त्या मित्राला विचारलं की, कोण होती ती बाई? काय म्हणत होती? तो सुध्दा खुप घाबरलेला. तो थोड्या वेळ शांतच होता. नंतर तो म्हणाला की काही नाही ती मला विचारत होती की, आपलं गणेश मंडळ कुठे आहे....
-राहुल अरुणकिशन रणसुभे
शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
abhipray23@gmail.com
rahulkransubhe@gmail.com
प्रतिक्रिया
9 Dec 2008 - 2:08 am | वेलदोडा
चांगली वाटली कथा. शेवट जरा अजून फुलवायला हवा होता.
9 Dec 2008 - 2:16 am | भडकमकर मास्तर
मस्त रे .. मजा आली गोष्ट वाचून...
फक्त एक सूचना...
परिच्छेद नीट केले तर अजून छान वाचता येईल
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
9 Dec 2008 - 3:51 am | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/