कॉंग्रेस

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
6 Dec 2008 - 12:51 am

निवडणुकीची धामधूम संपली होती
निकालांचा घोष झाला...
कॉंग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले
चोहीकडे जल्लोष होता...
ताज, ओबेरॉय, चौपाटी फुलली होती
सीएसटीवर होता जयघोष...
सरकार हे आमचेच आहे
बाबरी पडली, दंगली झाल्या, स्फोट झाले
बळी गेले सामान्यांचे...
यात कॉंग्रेसचा काही दोष नाही
हे तर विरोधकांचे देशविरोधी षडयंत्र आहे
पाकबरोबर त्यांचे संगनमत आहे...
कुणी अनाथ, कुणी विधवा, कुणी बेघर झाले
तेच याला जबाबदार आहेत
माणूस बुडो, राज्य बुडो, देश बुडो, जग बुडो
कॉंग्रेसचे सरकार चांगले आहे
सीएसटीवर जयघोष होता
सरकार हे आमचेच आहे
----
जयघोष कानात घुमत असतानाच आली हाळी
अरे बंड्या उठ, साडेदहा वाजत आलेत
ऑफिसला जायचंय ना; उठ लवकर उठ!
म्हटलं, झोपू दे जरावेळ सरकार कॉंग्रेसचच आहे!

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

झंडू बाम's picture

6 Dec 2008 - 5:42 pm | झंडू बाम

वरील मजकूर अप्रतिम आहे. कॉंग्रेस हा निर्लज्जांचाच पक्ष आहे. पण या पक्षालाच दोष देऊन चालणार नाही. भाजप तर त्यापेक्षाही हीन पातळीचे राजकारण करू शकतो. शिवसेनाही त्याचा माळेतील मणी. आपल्या मताशी मी सहमत आहे.

विसोबा खेचर's picture

6 Dec 2008 - 5:49 pm | विसोबा खेचर

सगळे पक्ष सारखेच नालायक आहेत!

आता महाराष्ट्राच्या बाबतीत आम्ही फक्त मनसेकडे आशेने पाहात आहोत..!

तात्या.

विकास's picture

6 Dec 2008 - 8:28 pm | विकास

सगळे पक्ष सारखेच नालायक आहेत!

असेच वाटते!

आता महाराष्ट्राच्या बाबतीत आम्ही फक्त मनसेकडे आशेने पाहात आहोत..!

ह्या संदर्भात मी इतकेच म्हणेन की नुसते एका पक्षाकडे आशा लावून चालणार नाही तर, मते देण्यापासून सक्रीय नागरी प्रक्रीयेत (ऍक्टीव्ह सिव्हिल प्रोसेस) मधे सहभागी होणे महत्वाचे आहे. उ.दा. एखादा उमेदवार निवडून आला तरी पुढची पाच वर्षे त्याच्याशी संपर्क, त्याला डिमांड करणे आणि "आमचे लक्ष तुझ्याकडे" आहे हे सतत जाणवून देणे, ते ही कलेक्टीव्हली, याची गरज आहे.

टायगर's picture

6 Dec 2008 - 5:58 pm | टायगर

माझेही मत असेच आहे. एकदा मनसेला संधी द्यायलाच हवी. सर्व पक्षांनी जनतेला गृहित धरले आहे. तिच्या नरड्यावर पाय दिला, तिचा जीव घेतला, तरी अन्य कुणालाही त्याचे वाईट वाटत नाही. राजकारणी जनतेचा पैसा लाटून गबर होण्यात गर्क आहेत. जनता मात्र नैसर्गिक, राजकीय सर्व आपत्तींना तोंड देत जगत आहे. या जगात जगताना तुमच्या माझ्यापैकी कुणीच सुरक्षित नाही, सुखी नाही. सगळ्यांची ससेहोलपट सुरू आहे.
अन्वय तुमची कविता काळजाला भिडली आहे. आपल्या आणखी कविता वाचायला आवडतील. मिपावर उपलब्ध करून द्याव्यात.
पुढील लिखाणास शुभेच्छा!

नितिन नवले's picture

6 Dec 2008 - 7:50 pm | नितिन नवले

एकदा राजसाहेबांना संधि देवुन बघा.महाराष्ट्रत सुख्-शान्ति नांदेल्.आपली कविता अप्रतिम आहे राजसाहेबांच्या पुढिल वाट्चालीस हार्दिक शुभेच्छा .

आपला
शंभर वेळा व्यसन सोड्लेला
नितिन नवले.

स्वानन्द's picture

6 Dec 2008 - 8:34 pm | स्वानन्द

>>म्हटलं, झोपू दे जरावेळ सरकार कॉंग्रेसचच आहे!

एक नंबर! एका वाक्यात सगळं आलं

विजय राणे's picture

8 Dec 2008 - 6:19 pm | विजय राणे

नाही .....दोन नंबर. बरं का.