काही तरी अकालनिय नक्की होते त्या वाड्यात. नविनच आलेल्या अमरला जाणवायचे ते, त्यात रात्रीच्या भयानतेत तो गुढ आवाज, काम करणाऱ्या सदूने पण शिफातीने टाळले होते त्याला...
अचानक झोप चावळली त्याची, कुठेतरी खुट्ट झाले होते नक्की . तोच. हो.. परत तोच ड्रावर उघडल्याचा आवाज.. पुढे काय होणार त्याला माहित होते. पण हेडफ़ोन वर गाणी लावून टाळणा-या त्या गुढ आवाजाचा आज छडा लावायचाच ठरवले त्याने, क्षणभर शातंता व तो जीवघेणा आवाज सुरु झाला. ठक..... ठक....
उजाडेपर्यन्त बोबडी वळली होती त्याची. धडपडत सदूची खोली गाठली त्याने. सदू दिसताच कसाबसा स्फ़ुटला तो... ते आवाज.... ते आवाज..... श्य.... श...
.....
....
...खिन्नपणे म्हणाला सदू ........ शंभरच होते ना ? मेला, तेव्हासुद्धा शतशब्दकथा लिहावी म्हणून झपाटलेला होता बिचारा....
प्रतिक्रिया
15 Jul 2015 - 10:31 pm | उगा काहितरीच
काय चाललंय काय ?
15 Jul 2015 - 11:26 pm | ब़जरबट्टू
१०० या नम्बर ने झपाटलेल्या शतशब्दकार मिपाकराची कथा आहे ती... :)
15 Jul 2015 - 10:35 pm | एस
अकालनिय हा शब्द फारच अनाकलनीय आहे. आणि ही कथाही.
15 Jul 2015 - 11:08 pm | चित्रगुप्त
हे अकालनीय गुढ हुडकायला राँर्ब्र्र्ट-लाच बोलवावे लागणार.
7 Aug 2015 - 10:13 am | नाखु
"ओं नमी जी मो जीवनस्य जीवे भग्नो कृश्न मावशी प्रसन्न" हा मंत्र १०१ वेळा म्हणावा लागेल असे दिसते..
जीमोनिसोअकुगिगुकथावाचक्संघ
15 Jul 2015 - 11:20 pm | प्यारे१
शतशब्दकथेच्या पहिल्या भागाच्या मध्यन्तराआधीच्या भागातलं काही समजलं नसल्यानं मध्यांतरापर्यंतच्या भागासाठी शुभेच्छा!
16 Jul 2015 - 11:45 am | द-बाहुबली
खतरनाक _/\_
16 Jul 2015 - 12:16 pm | तुडतुडी
कैच्या कै . बंद करा रे
16 Jul 2015 - 12:49 pm | खटपट्या
ह्म्म,
6 Aug 2015 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
6 Aug 2015 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
फक्त तेवढं त्या शिर्षकाचं बघा जरा... "अकालनीय" नाही, तुम्हाला "अनाकलनीय" म्हणायचे आहे बहुदा.
6 Aug 2015 - 9:13 pm | ब़जरबट्टू
ते केव्हाच लक्षात आले. पण एव्हडी कथा लिहिली, आणि इतका साधा शब्द चुकला, याची मिपाकर म्हणून लय लाज वाटली..
नेक्स्ट टाइम .. :)
7 Aug 2015 - 1:07 am | अनन्त अवधुत
मस्तय. शशकचे मिपावर आलेले पिक पाहता कदाचित सत्य पण असेल.