खेळ जुना खुर्चिचा हा
पुन्हा नव्याने चालला
जे गेले बळी त्यांचा
खेद कुणा वाटला?
कोण आले? कोण गेले?
मारीले कुणी ? कोण मेले?
सत्तेचे भुकेले बघ
पुन्हा प्रवासा निघाले
आतंकाचे कुंड जळते
अन मुक्यांच्या आहूती
कोणी रक्षावे कुणाला?
षंढ सारे भोवती
विध्वंसाचे पर्व मोठे
आघात त्यांचे विषारी
हात व्यस्थ रक्षकांचे
खुर्चीचे सारे पुजारी
हे नित्याचेचा आता
सवय याची लाउन घे
मेले त्यात तु नव्हता
धन्यता मानुन घे
प्रतिक्रिया
6 Dec 2008 - 5:27 pm | विसोबा खेचर
हे नित्याचेचा आता
सवय याची लाउन घे
मेले त्यात तु नव्हता
धन्यता मानुन घे
खरं आहे! या सत्तेच्या अन् खुर्चीच्या दलालांना ना लाज, ना लज्जा!
मनोजराव, वास्तवाचे चित्रण करणारी सुंदर कविता...!
आपला,
(एक सामान्य नागरीक) तात्या.
6 Dec 2008 - 7:32 pm | श्रीकान्त पाटिल
हे नित्याचेचा आता
सवय याची लाउन घे
मेले त्यात तु नव्हता
धन्यता मानुन घे
हे विदीर्ण सत्य आहे , काहि फरक पडेल असे नाही वाटत.....
7 Dec 2008 - 12:06 pm | सुक्या
अगदी सत्य . . .
मुंबईला एवढं सारं होउनही सत्तापिपासुंची सत्तेसाठी चाललेली धड्पड पाहुन विषण्ण वाटले.
सत्ताधारी लोकांना याचे काहीही सुख दु:ख नाही हेच खरे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)