'वेन्स्डे' जरूर पाहा

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
29 Oct 2008 - 9:09 am

कालच बहुचर्चित 'वेन्स्डे' चित्रपट पाहिला. निव्वळ अप्रतिम आहे. सुजाण रसिका॑नी अवश्य पहावा.
हा चित्रपट केवळ दीड तासाचाच आहे. गाणी, हिरो, हिरॉईन, कवायत नृत्ये नाहीतच. अनुपम खेर व नसरूद्दिन शाह या॑च्या कसलेल्या अभिनयाने चित्रपट अपेक्षित उ॑ची गाठतो हे सा॑गण्याचीही गरज नाही.
सध्या सगळ्या जगाला ग्रासणार्‍या इस्लामी दहशतवाद ह्या समस्येवर हा चित्रपट आहे. दिग्दर्शकाचा (नीरज पा॑डे) या विषयाचा व एकूणच अतिरेकी आणि त्या॑च्या विरूद्ध लढणार्‍या पोलीस य॑त्रणेच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास सतत जाणवत राहतो. सुरूवातीच्या श्रेयनामावलीत मी जे॑व्हा राकेश मारीया॑चे नाव वाचले (मु॑बईचे कर्तबगार सहपोलीस आयुक्त) ते॑व्हाच ता॑त्रिक अचूकतेविषयीची माझी अपेक्षा आपोआपच वाढली व ती पूर्णही झाली.
फ्लॅशबॅकमधून कथा साकार होते. मु॑बई पोलीस मुख्यालय, गच्चीवर लॅपटॉपसमोर बसलेला नसिरूद्दिन व एक मिडियावाली ह्या त्रिकोणात कथावस्तू आकार घेते. मध्य॑तरापूर्वी ह्या तिघा॑ची कॅरेक्टर्स उभी केली आहेत. नसिरने एका मध्यमवर्गीय स॑सारी माणसाची व अतिरेक्याची भूमिका अफलातून केली आहे. (फारच विस॑गती आहे ना दोन पार्श्वभूमीत? पण तिथेच नसीर जि॑कतो!) ख॑डणीसाठी फोन आल्यावर त॑तरलेल्या अभिनेत्याबरोबर कमिशनर अनुपम खेर तर इलेक्ट्रिक खा॑बाला बराच वेळ चिकटूनही जिव॑त राहीलेल्या 'इलेक्ट्रिक बाबाची' मुलाखत घेणारी मिडियावाली (दीपल शॉ) अशी काही र॑गविली आहेत की आपल्या मनात 'च्यायला हे असेच असते' असे येतेच!
शहरात पाच ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या फोनन॑तर पोलिसा॑ची होणारी धावपळ पाहून पोलिसा॑विषयीची सहानुभूती वाढते. कट्टर इस्लामी जिहाद्याचे थ॑ड आवाजातले लहानपणीच तीन खून केल्याचे सा॑गणेही अ॑गावर शहारा आणते.
सस्पेन्स कहाणी आहे व शेवट अगदीच अनपेक्षित आहे. त्यामुळे डिट्टेल इष्टूरी सा॑गत नाहीये.
अतिशय परिणामकारक पार्श्वस॑गीत (स॑जोय चौधरी) व वेगाने पुढे सरकणारी कथा खुर्चीस खिळवून ठेवते हे निश्चित. म्हणूनच हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पहावा असा मी आग्रहाचा सल्ला देईन.
हा चित्रपट निव्वळ मनोर॑जन नाही तर आपल्याला विचारात पाडणारा आहे. थक्क करणारा आहे. खेळ स॑पल्यावर बाहेर पडणारे बहुतेक प्रेक्षक सुन्नावस्थेत होते.
बहुत काय लिहिणे.. मिपामित्रा॑नी पहावाच!

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

बबलु's picture

29 Oct 2008 - 12:10 pm | बबलु

दाढेसाहेब, चित्रपट परिक्षणाबद्द्ल धन्यवाद.
आता हा चित्रपट पहायलाच हवा म्हणतो.

....बबलु

विसोबा खेचर's picture

29 Oct 2008 - 4:41 pm | विसोबा खेचर

धन्यवाद दाढेसाहेब,

हा चित्रपट नक्की पाहणार...

तात्या.

यशोधरा's picture

29 Oct 2008 - 4:43 pm | यशोधरा

चांगला आहे हा सिनेमा, सगळ्यांची कामेही छान झाली आहेत.

मन्जिरि's picture

29 Oct 2008 - 4:48 pm | मन्जिरि

फरच अप्रतिअम सिनेमा आहे

सागर's picture

29 Oct 2008 - 4:50 pm | सागर

अप्रतिम चित्रपट

मी हा चित्रपट ३-४ वेळा पाहिला आहे (संगणकावर आहे म्हणून)
त्यातील शेवटचे सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात असलेली आंदोलने नसिरुद्दीन शाहने अतिशय प्रभावी पद्धतीने मांडली आहेत.

अनुपम खेर व नसिरुद्दीन शाह हे दोन ताकदीचे अभिनेते असतानाही जिमी शेरगिलची छोटीशीच पण कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याची भूमिका मनात घर करुन राहतेच.
अप्रतिम टायमिंगचा वापर हे या चित्रपटाचे वैशिष्ठ्य ठरावे. कोणती गोष्ट कोठे दाखवावी याचे योग्य नियोजन या चित्रपटात दिसले.

तसेच इन्-डायरेक्ट पणे पोलिसांच्या सध्याच्या कार्यपद्धतीत किती हायटेक् सुधारणा होणे गरजेचे आहे हे ही दाखवले आहे.
एक छोटासा मुलगा पोलिसांना संभाव्य टेररिस्ट लोकेट करण्यात मदत करतो यातच सगळे येते.

तसेच बाँब टाईप केल्यावर इंटरनेटवर ३५२ साईट्स सापडतात ज्यात बाँब तयार करण्याची सविस्तर पद्धत उपलब्ध आहे
घरचा साबणही एक बाँब होऊ शकतो,
आणि सर्वसामान्य लोक असे कोणत्याही बाबतीत सहजपणे मूर्ख होऊ शकतात, कोणतीही गोष्ट स्वीकारु शकतात

या व अशा अनेक बाबी नसिरुद्दीन शाह च्या स्पीचमधे हायलाईट केल्या गेल्या आहेत, ज्यांचा सर्वसामान्यांनी खरेच विचार करणे खूपच आवश्यक आहे

एक चिंतन असेच मी या चित्रपटाचा उल्लेख करेन....

जरुर पहावा....

(देशप्रेमी) सागर

स्वाती दिनेश's picture

29 Oct 2008 - 4:58 pm | स्वाती दिनेश

हा चित्रपट पाहिला,संग्रही ठेवला आहे. तुम्ही परिक्षण उत्तम केले आहेत डॉक्टर..
स्वाती

छोटा डॉन's picture

29 Oct 2008 - 5:43 pm | छोटा डॉन

अगदी परफेक्टच्या जवळ म्हणावा असा चित्रपट आहे हा ...
सगळ्यांचीच ऍक्टिंग अप्रतिम पण खरे द्वंद्व हे "अनुपम खेर व नासीर" मध्येच, अक्षरशः तोडला आहे दोघांनी ...

बाकीच्या लोकांनी बरेच काही लिहले आहे त्याला सहमत आहे.
नक्की पहा हा चित्रपट व कुठल्याही जोशात न जाता शांतपणे विचार करा ...

अवांतर : हा पिक्चर कमीत कमी ४-५ वेळा पाहिल्याने डोक्यात बरेच काही सुतच गेले, ते अर्धेकच्चे कादगावर उतरवले आहे.
एक मुक्तक स्वरुपाचाअ लेख लिहायचा विचार होता मी टाळाटाळ करत होतो. पण आता डॉ. दाढ्यांचा लेखामुळे प्रेरणा मिळाली आहे.
लवकरच लिहुन टाकतो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार's picture

29 Oct 2008 - 6:40 pm | केशवसुमार

दाढेशेठ,
हा चित्रपट २ वेळा बघितला, अतिशय उत्तम चित्रपट,
नासिरुद्दीन आणि अनुपन खेर यांच्या भुमिका लाजवाब झाल्या आहेत.. बरेच दिवसांनी एक चांगला हिंदी चित्रपट बघितल्याचे समधान मिळाले
(सहनत)केशवसुमार

तसाच शिवायला टाकला.असंही वाटलं की शेवटची पंधरा मिनीटंच वारंवार बघावी.

रेवती's picture

29 Oct 2008 - 7:21 pm | रेवती

मागच्या महिन्यात पाहिला. खूपच छान आहे.
आपले परिक्षण आवडले.

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2008 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.साहेब, आपल्या परिक्षणाने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे, पाहावा म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

29 Oct 2008 - 7:58 pm | प्राजु

अतिशय उच्च दर्जाची कलाकृती आहे.
शेवटची कलाटणी जबरदस्त आहे. आणि सगळ्या महत्वाचे म्हणजे शेवटी नासिरूद्दिन शहा ची आणि अनुपम खेर यांची होणारी भेट. ही सुवर्ण कळस आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

29 Oct 2008 - 8:22 pm | चतुरंग

सशक्त कथा, पटकथा आणि संवाद व उत्तम दिग्दर्शन असले की नासिर आणि अनुपम सारखे अभिनेते हे काय कमाल दाखवतात हे सिद्ध करणारा अतिशय सुंदर चित्रपट! आवर्जून बघावाच!! (जिमी शेरगिलचे ही काम लक्षणीय)
सर्वसामान्य माणसाच्या मनात खदखदणार्‍या प्रश्नांना अतिशय संयत रीतीने हात घातलाय आणि कोणताही आक्रस्ताळी प्रकार न करताही प्रभावी चित्रपट केला आहे.

डॉ.साहेब परीक्षण चांगले केले आहे.

चतुरंग

जनोबा रेगे's picture

29 Oct 2008 - 9:19 pm | जनोबा रेगे

सॉल्लीड पिक्चर आहे. खर॑ तर ही एका॑किकाच वाटते आय. एन. टीची ! कर॑डक हलविणारी :)
प्राजूताई॑शी सहमत. नासिर व अनुपम खेरची भेट व एकमेका॑कडे ते पाहतात तो क्षण अत्त्युच्च आहे. नासिरचे स्वगतही क्लास आहे.

एक जन्मजात खोड: अनुपम खेरला नासिरचा पत्ता कसा काय कळतो? त्या टप्पोरी हॅकरला तर मिळालाच नसतो, मग कोण सा॑गत॑?

प्राजु's picture

29 Oct 2008 - 9:24 pm | प्राजु

एक जन्मजात खोड: अनुपम खेरला नासिरचा पत्ता कसा काय कळतो? त्या टप्पोरी हॅकरला तर मिळालाच नसतो, मग कोण सा॑गत॑?

मिळालेला असतो.. म्हणून तर तो म्हणतो की, "सर उसको छोड दिजिए, आय वॉज राँग. ही इज नॉट जस्ट गुड बट ही इज बेस्ट". त्याला तो पत्ता मिळाल्याचा संवाद नाहिये केवळ देहबोलीतून ते दाखवले गेले आहे.

आवांतर : अक्षरांवर अनुस्वार देण्यासाठी M (shift + M) असे लिहावे म्हणजे अनुस्वार नीट उठतात.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जनोबा रेगे's picture

29 Oct 2008 - 9:31 pm | जनोबा रेगे

धन्यू प्राजूताई. आता तो सीन पाह्यला 'बुधवार'ला परत जावे लागणार!

१.५ शहाणा's picture

30 Oct 2008 - 5:43 pm | १.५ शहाणा

फरच अप्रतिअम सिनेमा आहे
परिक्षण उत्तम दाढेसाहेब
चित्रपट परिक्षणाबद्द्ल धन्यवाद.

शेखस्पिअर's picture

30 Oct 2008 - 9:31 pm | शेखस्पिअर

....मी असं म्हणेन की आज जर तुम्ही 'वेन्स्डे' बघितला असेल ..
तर दुसर्‍या दिवशी 'धर्म' बघा..पंकज कपूर चा...
दोन्हीही नट म्हणजे एक एक स्वतंत्र विश्वविद्यालये आहेत...
परत दोन्ही चित्रपटातील तौलनीकता बघितली तर एक वेगळाच अनुभव मिळतो...
बघा...प्रयत्न करून..

मनिष's picture

4 Nov 2008 - 12:11 pm | मनिष

तर दुसर्‍या दिवशी 'धर्म' बघा..पंकज कपूर चा...
दोन्हीही नट म्हणजे एक एक स्वतंत्र विश्वविद्यालये आहेत...

खरं आहे!!! फक्त पंकज कपूरला त्याच्यातील अभिनयक्षमतेला न्याय देणारे जास्त चित्रपट नाही मिळाले ह्याची खंत वाटते. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2008 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉमन मॅन आवडला.

हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पहावा असा मी आग्रहाचा सल्ला देईन.

सॉरी बरं का ! टीव्हीवर पाहिला :(
थेटरमधेच पाहिला असता तर मजा आली असती असेही वाटले.

-दिलीप बिरुटे
(कॉमन मॅन)

भडकमकर मास्तर's picture

6 Dec 2008 - 1:57 am | भडकमकर मास्तर

गेल्या आठवड्यात पुन्हा पाहिला ...
एकूणच मुंबई दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा परत पाहताना नसीरचा शेवटचा संवाद पुन्हा प्रचंड परिणाम करून गेला ..

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

6 Dec 2008 - 2:56 am | स्वाती राजेश

आणखी एक
या सिनेमामध्ये शेवटपर्यंत अनुमप खेर आणि नसरुद्दीन शाह एकमेकांसमोर येत नाहीत.
सिनेमाच्याशेवटी एकमेकांसमोर येतात....तो सीन फारच छान....:)

मुक्तसुनीत's picture

6 Dec 2008 - 3:19 am | मुक्तसुनीत

हा चित्रपट अलिकडे पाहिला. मिपावरील अनेकांना तो आवडल्यामुळे त्याच्याबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. परंतु , यावेळी इतरांपेक्षा थोडी वेगळी प्रतिक्रिया झाली.

खरे तर चित्रपटाचा सस्पेन्स अखेरपर्यंत राखण्याचा चांगला प्रयत्न केला गेला आहे ; पण मला सस्पेन्स पहिल्या १५ मिनिटांमधेच लक्षात आल्यामुळे असेल कदाचित, पण माझा उत्साह आधीच थोडा ओसरला होता. नसीरुद्दीन शहाचे काम आवडले. मात्र अनुपम खेर काही कमिशनर म्हणून शोभला असे मला वाटले नाही. सामान्य माणसाला दहशतवादाबद्दल जे वाटते ती बाजू चांगली मांडली आहे असे वाटले. कदाचित सामान्य माणूस इतक्या परिणामकारक रीतीने असे काहीतरी करतो आहे याचा एक "फील-गुड" परिणाम प्रेक्षकांवर झाला असावा. मात्र सामान्य माणसाच्या या , अवास्तव अशा या सुपर-मॅनीकरणामुळे मला हा चित्रपट एका स्वप्नरंजनाचा भाग वाटला. क्रूर , हिंसक , मानवताविरोधी शक्तिंविरुद्ध सामान्य माणूस जिंकावा , तो जिंकू शकतो असे वाटणे वेगळे आणि अशा अतिरिक्त आणि अवास्तव मार्गाने तो जिंकतो असे दाखविणे निराळे.

अर्थातच हा चित्रपट इतर अनेकानेक फालतू, धंदेवाईक , मसाला चित्रपटांपेक्षा १०० पट चांगलाच आहे, पण मला वाटलेल्या अतिसुलभीकरणामुळे माझ्या फार पसंतीस उतरला नाही.

कोलबेर's picture

6 Dec 2008 - 8:39 am | कोलबेर

चित्रपट पाहुन तंतोतंत असेच वाटले.

अर्थातच हा चित्रपट इतर अनेकानेक फालतू, धंदेवाईक , मसाला चित्रपटांपेक्षा १०० पट चांगलाच आहे, पण मला वाटलेल्या अतिसुलभीकरणामुळे माझ्या फार पसंतीस उतरला नाही.

अगदी हेच म्हणतो. सस्पेन्स सुरुवातीलाच बर्‍यापैकी लक्षात येतो. अनुपम खेरची भुमिका शोभेशी वाटली नाही, नसीरुद्दीन शाह बाबत क्या कहैने? सगळ्या मुद्द्यांशी सहमत!

कोलबेर यांच्याशी या बाबतीत सहमत.

ही बाब सोडता मलाही अतिशय आवडलेला चित्रपट. सस्पेंस मला शेवटीच कळला म्हणून असेल पण खूप छान वाटला. डॉ.साहेबांनी लिहिलेले परिक्षण उ त्त म.

अनुपम खेर यांच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांना कमिशनरच्या भूमिकेत पहायला आवडलं असतं.

(बच्चनप्रेमी) बकासुर.