पलायमान (हतबुद्धी)

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 3:18 pm

झंप्या:- उरकलं की नाही रे?
गंप्या:- झालं, पण काहीतरी राह्यल्यासारखं वाटतंय!!
झंप्या:- अस्सं? मग उरक लवकर!!
गंप्या:- तेच!
झंप्या:- तेच काय? उरक म्हटलं ना तुला?
गंप्या:- थांब की जरा!
झंप्या:- अजून? जातोच मी आता?
गंप्या:- आलो म्हटलं ना तुला!!
झंप्या:- तंतरली ?
गंप्या:- ............
झंप्या:- बोल ना तंतरली?
गंप्या:- खिक्क!!
झंप्या:- दात काय काढतोस! कोणीतरी येईल आता. निघ की लवकर!!
गंप्या:- राजें, जरा मान उंचावून वर बघा!!
झंप्या:-अच्छा? तुला नाही दिसत? तूच बघ नि सांग!!
गंप्या:-पलिकडल्या खाचरातून तुझी आवडती व्यक्ती येत्ये!!
झंप्या:- कोण? ती आपली मधल्या आळीतली मधू?
गंप्या:- आपली? नानाची टांग तुझ्या!! पांडू येतोय दांडू घेऊन, पाह्यलंन आंबे पळवताना!!

औषधोपचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

31 Jul 2015 - 4:02 pm | सस्नेह

प्रेर्ना स्त्रोत लिवायचा र्‍हायलाय वाट्टं..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 4:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

खिक् !

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 4:27 pm | टवाळ कार्टा

=))
आधी वाटले ता संप्रदायाचा वारसा चालवायला अगदी योग्य आणि ट्यालेंटेड व्यक्ती मिळाली

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 4:29 pm | पाटीलअमित

दादा कोंडके यांचे पंखे दिसत

============================

आजची स्वाक्षरी
बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

जडभरत's picture

31 Jul 2015 - 6:50 pm | जडभरत

मस्त आहे विडंबन!!!

मी-सौरभ's picture

31 Jul 2015 - 8:27 pm | मी-सौरभ

आवडेश

मयुरा गुप्ते's picture

1 Aug 2015 - 2:10 am | मयुरा गुप्ते

लेखनविषयः औषधोपचार... जबरीच आहे.

--मयुरा.