http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia
नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .
परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !
प्रतिक्रिया
24 Jul 2015 - 4:32 pm | स्पंदना
Sun never sets on British Empire
because even God does not trust British in Darkness.
टाळ्या!!
चर्चिल ने They are dying any way असा दाखवलेला अमानुष attitude, येथुन नेलेलं अन्न्धान्य यांच्या रक्तपिपासू सैनिकांना म्हणे.
आला एकदाचा लेख. मला वाटल मिपाने दुर्लक्ष केलं की काय या बातमीकडे.
24 Jul 2015 - 4:44 pm | मृत्युन्जय
ते भाषण पुर्ण ऐकायचे आहेच. पण शशी थरूर यांच्या भाष्णाचा साधारण आशय कळला आहे. त्या भाषणाबद्दल त्यांचे सणसणीत अभिनंदन. त्यांनी कधी पुण्यातुन निवडणुक लढवलीच तर बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरुन त्यांना एक मत तरी नक्की देइन. :)
24 Jul 2015 - 4:51 pm | प्रसाद गोडबोले
<blockquote> त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा </blockquote>
<< पु.ना मोड ऑन >>
अहों कोहिनुर काय कोहिनुर ? सम्यंतक मणी आहे तो आमच्या भगवान श्री कृष्णांचा
<<पु.ना मोड ऑफ्फ>>
=))
24 Jul 2015 - 5:01 pm | बॅटमॅन
सम्यन्तक नाही स्यमन्तक! उच्चारात फरक झाला की पावर कमी होते, काय समजलेत?
25 Jul 2015 - 5:29 am | dadadarekar
तो हिरा भिक्कारडा आहे.
27 Jul 2015 - 12:28 pm | बॅटमॅन
हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक दगड फक्त. त्याला लोक किंमत देतात इतकेच. अन्यथा इट्स जस्ट अनदर दगड.
28 Jul 2015 - 4:28 pm | नाखु
सगळ्या धुराळी प्रतिसादासाठी तू हे गाणं म्हण पाहू
दगड
म्हणजे सगळे दगड आनंदतील
बॅट्या शेजारील "पायथ्याचा दगड"
28 Jul 2015 - 4:35 pm | बॅटमॅन
पाहतो नाखु'नकाका.
28 Jul 2015 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले
वापरलेला ?
;)
29 Jul 2015 - 8:23 am | नाखु
उरलेला
29 Jul 2015 - 1:05 pm | खटपट्या
पूसून उरलेला. उगाच तो ऐतीहासीक पुसायचा धागा आठवला..
29 Jul 2015 - 1:42 pm | जडभरत
कृपया धागा व्यनि कराल?
29 Jul 2015 - 1:42 pm | प्रसाद गोडबोले
येणार येणार आमचा स्यमन्तक !!
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...
=))
24 Jul 2015 - 4:54 pm | बाळ सप्रे
भाषण ऐकलं.. छानच होतं
पण ते कशानिमित्ताने होतं ते समजलं नाही..
24 Jul 2015 - 5:16 pm | वेल्लाभट
काहीही म्हणा,
that man earned himself a million salutes !
24 Jul 2015 - 5:57 pm | पुण्याचे वटवाघूळ
बरोबर आहे. इंग्लंडने भारताला लुटले त्याची नुकसानभरपाई दिलीच पाहिजे. आणि भारतानेही इंग्लंडला सगळा सावळागोंधळ संपवून युनिव्हर्सिटी एज्युकेशन, राजकीय स्थैर्य, प्रशासन आणि विशेष म्हणजे इंग्रजी ही जागतिक भाषा दिली त्याबद्दल पैसे दिलेच पाहिजेत.
24 Jul 2015 - 6:07 pm | पद्मावति
शशी थरूर यांचे आभार आणि अभिनंदन. वेल डन.
24 Jul 2015 - 6:58 pm | पुण्याचे वटवाघूळ
शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट मनापासून दिले आहे असे वाटणार्यांच्या भाबडेपणाची किव आली. एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे हितसंबंध कसे गुंतले आहेत बघा--
थरूर-- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून सुटणे हा उद्देश. तो सोडवू कोण शकेल किंवा चौकशीचा ससेमिरा कोण कमी करू शकेल? तर मोदी. म्हणून मोदींना सुखावणार्या गोष्टी मधूनमधून करायच्या. मग ते स्वच्छ भारताचे आमंत्रण स्विकारणे असो की मधूनमधून मोदींची स्तुती करणे असो. मधूनच राष्ट्रवादाचा राग आळवला की मोदी खूष होतील असे थरूर यांना वाटायची शक्यता आहेच.
मोदी-- काँग्रेसच्या ताब्यात राहिलेल्या राज्यांमध्ये सगळ्यात लवकर निवडणुक आहे केरळ आणि आसामात. केरळात थरूर हे काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून उद्यास येत होते. चंडी आणि अॅन्टनी भांडणात काँग्रेस दमली झाली आहे केरळात. अशावेळी काँग्रेसचे अधिक खच्चीकरण करायचे थरूर यांना हाताशी धरून. त्यातूनच भाजपला केरळात वाढायला वाव मिळेल.
मध्यंतरी सोनिया गांधींनी थरूरना खडसावणे आणी मोदींनी कौतुक करणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अशा उगीचच घडलेल्या नाहीत.
24 Jul 2015 - 7:23 pm | जडभरत
हं वाघुळराव बात में दम है.
24 Jul 2015 - 9:13 pm | निनाद मुक्काम प...
@शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट मनापासून दिले आहे
तुमच्या भापडे पणाची कीव आली
मुळात शशी थरूर ह्यांनी हे वक्तव्य भाजपला खुश करण्यासाठी वापरले नाहि येथे भाजप व नमो ह्यांचा संबंध येत नाहि
ही बातमी वाचा.
शशी थरूर हे जागतिक स्तरावर नावाजलेले व्यक्तिमत्व असून जागतिक व्यासपीठावरून विविध इतिहास राजकारण ह्या विषयांवर त्यांनी अनेक भाषणे तीही तगडे मानधन घेऊन दिली आहेत.
आणि ह्या विषयावर ह्या आधी फार वर्षापूर्वी कांगारूंच्या देशात त्यांनी भारताने सोफ्ट पॉवर का व्हायला पाहिजे हे सोफ्त पॉवर म्हणजे काय हे समजून सांगत ब्रिटीश वसाहतवादाला कोपर खळ्या मारत सविस्तर समजावून सांगितले आहे ते भाषण देखील ह्या भाषणं इतकेच महत्वाचे आहे
मिपाकरांनी जरूर वाचावे
25 Jul 2015 - 10:36 am | पुण्याचे वटवाघूळ
हे तुमचे मत झाले. पूर्वी वाचाळपणासाठी नोटोरिअय असलेले शशी थरूर (आठवा कॅटल क्लास, सौदी अरेबियात जाऊन तो देश भारत आणि पाकिस्तानमध्ये इंटरलोक्यूटर कसा होईल असे म्हणणे) सुनंदा पुष्करच्या मृत्यूनंतर मात्र एकदम बदलले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एका आठवडयातच आता नरेंद्र मोदी हे मोदी २.० व्हर्जनमध्ये कसे बदलले आहेत हा लेख त्यांनी लिहिला ( http://www.huffingtonpost.com/shashi-tharoor/narendra-modi-shashi-tharoo...) मोदींनीही त्रिवेंद्रममधून लोकसभा निवडणुक जिंकल्याबद्दल शशी थरूरचे स्पेशल अभिनंदन केले होते. मोदींनी इतर ५४५ खासदारांपैकी किती जणांचे अभिनंदन केले होते कुणास ठाऊक. स्वच्छ भारत अभियानासाठी अगदी पहिल्या दिवशी मोदींनी ९ पैकी एक म्हणून शशी थरूर यांना नॉमिनेट केले आणि ते थरूर यांनी लगोलग स्विकारले. त्याबद्दल काँग्रेस स्पोक्समन पदावरूनही त्यांची उचलबांगडी झाली. एकीकडे मणिशंकर अय्यर सारखे वाचाळ्वीर मोदींविरूध्द हवे तसे बरळत असताना मात्र थरूर एकीकडे मोदींना सपोर्टच करतात आणि मोदी पण ते रेसिप्रोकेट करत आह्ते. हे सगळे फिक्सिंग आहे असे का म्हणू नये?
याच स्वरूपाची बातमी भारतीय न्यूजमध्येही आली होती.तीच बातमी वॉल स्ट्रिट जरनलमधून देऊन तुम्ही नक्की काय सिध्द करायचा प्रयत्न करत आहात?
बरं मग?
मुद्दा एवढाच-- की थरूर यांनी मोदीस्तुतीची जपमाळ ओढणे, मोदींनी ते रेसिप्रोकेट करणे आणि भाजपमधील कट्टर राष्ट्रवादी गटाला सुखावणारे भाषण करणे-- आणि ते कांगारूंच्या देशात नव्हे तर इंग्लंडमध्ये आणि ते पण ऑक्सफर्डसारख्या ब्रिटिश अभिमानाच्या ठिकाणी जाऊन करणे यात वरकरणी दिसते त्यापेक्षा बरेच काही जास्त आहे असे म्हणायला वाव आहे.
25 Jul 2015 - 4:12 pm | पैसा
शशि थरूर यांचा सगळा इतिहास वाचून फक्त तिरस्कारच वाटतो. त्यांच्यापेक्षा शतमूर्खपणा करणारे लोक परवडले. जोपर्यंत सुनंदा पुष्करच्या खुन्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवता येत नाही.
24 Jul 2015 - 8:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
त्याबद्दल संपूर्ण देशात
यांचे कौतुक होत असून
ठळक अन अधोरेखित केलेल्या शब्दाची अंमळ गंमतच वाटली बाकी काही नाही,
कोहिनूर किंवा स्यमंतक हिर्या बद्दल बोलायचे झाले तर तो हीरा दळभद्री आहे शब्दशः, त्याचा इतिहास (पौराणिक दृष्टया) हा की तो हिरा कृष्ण भगवानाच्या हाती आला तर त्यांचा अवतार संपला, यादव वंशी लोक प्रभासक्षेत्री डोकी फोडून चचले, द्वारका नगरी समिंदराने गिळंकृत केली , मोगलांकड़े जाता त्यांच्या सगळ्यां डुया चचल्या राज्य उसवले , लेटर मुग़ल तर उपाशी ही राहिले, त्यानंतर फ्रांस मार्गे बहुतेक इंग्लॅण्ड ला गेला अन स्थिरावला कारण तो मणि फ़क्त बाईच्या हाती टिकतो! काय करायची असली पनवती माघारी आणून असू देत तिकडच!!!
बाकी वाघुळ बुआ नेमके बोललेच हैती!
24 Jul 2015 - 8:30 pm | जडभरत
हा इतिहास म्हैत नव्हता सोन्याबापू. छानच अपडेट दिलात.धन्यवाद.
24 Jul 2015 - 9:25 pm | बन्डु
त्यांना ईटलीची (नौक??)राणी असे म्हणतात,
29 Jul 2015 - 1:52 pm | dadadarekar
mahàaraajaa रणजितसिंहांचा मुलगा द्लिप्सिंह याने इंग्रजांना भेट दिला.
तो हिरा राणीच्य मुकुटात आहे ना ? मग तो कसा काढणार ?
24 Jul 2015 - 9:44 pm | वॉल्टर व्हाईट
इच्छुकांसाठी ओक्स्फ़र्ड युनिअनच्या रेपरेशन डिबेट मधले काही महत्वाचे व्हिडिओ
24 Jul 2015 - 9:56 pm | नगरीनिरंजन
थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले. बरेच देशभक्त लोक इंग्रजांनी माफी मागितली पाहिजे वगैरे आता म्हणू लागतील.
थरुर यांचे आर्ग्युमेंट जोरदार आहे. ते म्हणतात "यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू हन्ड्रेड यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सेलिब्रेट दॅट दे आर डेमॉक्रॅटिक"
पण हेच आर्ग्युमेंट जर भारतीय समाजाला लावले तर त्यात जातींच्या नावावर जे २००० वर्षांचे शोषण झाले आहे त्याचा हिशोब कोण देणार? ६०-७० वर्षांच्या आरक्षणाविरुद्ध छाती पिटणारे लोक थरुर यांच्या भाषणाचे समर्थन करताना विचार करतील? मला नाही वाटत.
यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर २००० यिअर्स ॲन्ड ॲट द एन्ड ऑफ इट सिम्पली डिक्लेअर दॅट ऑल आर इक्वल.
24 Jul 2015 - 9:59 pm | कैलासवासी सोन्याबापु
जबरी पॉइंट!!! _/\_
एखाद्या तर्कसंगत प्रतिवादाच्या प्रतीक्षेत असलेला
(काजीसाहेब) बाप्या
24 Jul 2015 - 10:32 pm | अर्धवटराव
आणि या व्यवहारात बेनिफिशिअरी/सप्रेस्ड कसे विभागले होते ? ज्या देशात थरुर साहेबांनी हे आर्ग्युमेण्ट केलय त्यातल्या सर्वकालीन व्यवस्था कशा वेगळ्या होत्या?
सिरीयसली विचारतोय.
25 Jul 2015 - 3:42 am | गुलाम
यात "पण" पेक्षा "आणि" जास्त बरोबर वाटलं नसतं का? हे म्हणजे जातीच्या नावावर हजारो वर्षे शोषण झालेच की मग साम्राज्यवाद्यांनी २०० वर्षे केले म्हणून काय बिघडलं असं वाटतंय. दोन्हीही तेवढंच निंदनीय आहे.
हे अतिसामान्यीकरण होतंय. मुख्य म्हणजे याचा प्रत्यास असा होतो की; आरक्षणाचे समर्थन करणारे, पुरोगामी हे कुणी देशभकत नसतात आणि त्या सगळ्यांचा इंग्रज सत्तेला पाठिंबा होता. मला नाही वाटत तुमचं असं मत असेल.
25 Jul 2015 - 1:00 pm | नगरीनिरंजन
बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत; पण इंग्रज आले नसते तर पहिला प्रकार सहजासहजी थांबला असता का असा प्रश्न पडतो.
28 Jul 2015 - 8:07 pm | स्वधर्म
सहमत
24 Jul 2015 - 9:59 pm | पाटीलअमित
आर्य लोक पण बाहेरुच्नच आले
आपण द्रविड लोकांचे dene lagato
24 Jul 2015 - 10:00 pm | कैलासवासी सोन्याबापु
ही थ्योरी डिस्प्यूटेड असल्याचे वाचले आहे
25 Jul 2015 - 11:57 am | चौकटराजा
अगदी मानवी समूहांच्या टोळ्या या काळापासून राजकारणी-नोकरशहांच्या टोळ्या या अवार्चिन स्थितीपर्यंत एकाने दुसर्यास गिळावे हीच जगाची परंपरा राहिलेली आहे. त्यात सगळे आले. राजे आले,पातशहा आले किंग आले अर्ल आले सगळेच आले.जगाचा नकाशा, भाषा, हे सारे बदलतच असते. ब्रिटीश भारतात आले म्हणून अनेक कारणानी तुकडे तुकडे असलेला
भारत नावाचा देश निर्माण झाला हे कटू असले तरी सत्य आहे. भारतात सोन्याचा धूर निघत होता.ते ब्रिटीशानी लूटून नेले
असे म्हणण्याची एक पद्धत आहे. सोन्या पेक्षाही जनांची शोधक वृती , उद्योजकता, कल्पकता, ही देशाला मोठे करीत असते.
आज भारतीय स्वतंत्र असले तरी १९४७ ते २०१५ या कालात किती पेटंटचा धूर भारतातील उद्योजकानी, जनांनी काढला आहे
याची काही आकडेवाडी शशी आहेब देतील काय?
25 Jul 2015 - 4:01 pm | चिनार
थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल अभिनंदन !
पण थरूर परराष्ट्र मंत्री असताना त्यांना हे का सुचले नसेल ? नुकसानभरपाईसाठी ब्रिटीश सरकारला अधिकृत पत्र सुद्धा पाठवता आलं असतं त्यावेळी.
25 Jul 2015 - 4:05 pm | पुण्याचे वटवाघूळ
तोच तर मुद्दा आहे. त्यावेळी सुनंदा पुष्कर हयात होत्या आणि सत्तेत काँग्रेसच होती.त्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागायचे काहीच कारण नव्हते. :)
28 Jul 2015 - 12:08 am | निनाद मुक्काम प...
माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर हा प्रतिसाद खरडायची गरज भासली नसती
बर मग चे उत्तर देतो
माझ्या पहिल्या प्रतिसादात थरूर हे मंत्री असतांना कांगारूंच्या देशात भाषण केले होते ज्याची क्लिप माझ्या प्रतिसादात आहे त्यात त्यांनी ब्रिटीश साम्राज्यावर कोरडे ओढले आहेत.
त्यांची ही मते त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर वेगवेगळ्या देशात मांडली आहेत अगदी मोदी हे मुख्य मंत्री होते व ते देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार नव्हते तेव्हा ही भाषणे थरूर ह्यांनी केली आहेत तेव्हा त्यांची मते व भाषणे ह्यांचा मोदींशी संबंध जोडू नये त्यांना मी चेपू वर फोलो करतो . मोदी सरकार विरुद्ध त्यांच्या निर्णयाविरुद्ध लिहिण्यात आघाडीवर असणाऱ्या कॉंग नेत्यांच्या मध्ये थरूर ह्यांचे नाव आघाडीवर आहे ,
28 Jul 2015 - 12:51 am | निनाद मुक्काम प...
थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल मिडीयावर मिळालेली प्रसिद्धी विषेतः गेल्या काही वर्षात व इतक्यात इंग्लिश सरकारने भारतीय विद्यार्थ्यांवर जाचक बंधन लादणारे निर्णय घेतले असेच निर्णय भारतीय कंपन्यांना भारतातून नोकरीसाठी लोकांना आणण्यास आडकाठी करणारे घेतले गेले त्या पार्श्वभूमीवर ठरूर ह्यांचे १५ मिनिटाचे भाषण तुफान गाजले , ज्यांना भक्त म्हणून हिणवले जाते अश्या लोकांनी सुद्धा ते डोक्यावर घेतले त्यात नमो ह्यांनी त्यांची स्तुती केली व अनेक लोकांनी शशी व नमो असा संबंध जोडून पहिला
माझ्या पहिल्या प्रतिसादात मी जे लिहिले होते त्या प्रमाणे थरूर ह्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी आपली ही मते मांडली आहेत प्रत्येक वेळेला त्यास प्रसिद्धी व नमो कडून शाबासकी मिळाली नाही
ह्याचा पुरावा म्हणून नव्हे तर प्रत्येक भारतीयाने पहावी असे शशी ह्यांच्या भाषणाची लिंक येथे अडकवत आहे.
भाषणाचा विषय तोच ब्रिटीश वसाहत वादाने केलेली भारताची हानी
कार्यक्रमाचे शीर्षक द एम्पायर डिबेट सुप्रीम कोर्ट लंडन
स्थळ इंग्लंड
काळ २०१४
येथे सुद्धा थरूर ह्यांनी तडाखेबंद भाषण करून वादविवाद स्पर्धा जिंकली
त्याबद्दल भारतीय वृत्तपत्रात व्यवस्थित बातमी आली
तेव्हाही थरूर ह्यांनी नमो ह्यांना खुश करण्यासाठी हे भाषण केले असे म्हणायचे का कारण हिंदू सह अनेक वृत्त पात्रांच्या मध्ये ही बातमी आली पण नमो ह्यांचा साधा उल्लेख सुद्धा नाही.
म्हणूनच माझ्या पहिल्या प्रतिसादाच्या सुरवातीला म्हटले होते
की कीव आली.
1 Aug 2015 - 6:56 pm | अभिजित - १
मला पण तुमच्या भाबडे पणाची कीव येते. वाचा .. काही समजतेय का ?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/congress-has-not-appreciat...
काँग्रेसमध्ये मी बेदखल: शशी थरुर
Maharashtra Times| Aug 1, 2015, 03.10 PM IST
28 Jul 2015 - 2:07 am | डॉ सुहास म्हात्रे
इथल्या बर्याच प्रतिसादांमध्ये एक महत्वाचा मुद्दा विसरला जात आहे. ती म्हणजे...
कोणती व्यक्ती बोलत आहे त्यापेक्षा ती व्यक्ती काय बोलत आहे हे जास्त महत्वाचे असते.
या धाग्याच्या संदर्भात शशी थरून यांच्या भाषणातले मुद्दे बरोबर/सत्य आहेत की नाहीत हे जास्त महत्वाचे आहे.
ते सत्य कोणत्या कारणाने बाहेर येत आहे किंवा शशी थरूर यांची पूर्वीची आणि आताची राजकिय पार्श्वभूमी किंवा त्यांचे सद्या चालू असलेली कायद्याची समस्या या तीनही गोष्टींचा या भाषणातील तथ्यांशी काही संबंध नाही... त्या गोष्टींबद्दल थरूर यांना जी काही योग्य राजकिय अथवा कायदेशीर किंमत चुकवावी लागेल व त्याचे विवेचन इतरत्र योग्य व्यासपिठांवर केले जावेच यात वादच नाही... पण त्यामुळे त्यांच्या सदर भाषणांतील मुद्द्यांतील तथ्यांची किंमत कमी होत नाही.
वर निनाद मुक्काम प... यांनी दिलेल्या दुव्यातल्या २०१४ मध्ये ब्रिटीश न्यायव्यवस्थेतील धुरीणांसमोर केलेल्या भाषणातही थरूर यांनी तेच मुद्दे जवळजवळ तसेच उल्लेखलेले आहेत ही एक गोष्टही सद्याच्या भाषणाच्या कारणपरंपरेचा अंदाज लावताना ध्यानात घेणे जरूरीचे आहे.
28 Jul 2015 - 8:13 pm | मंदार कात्रे
धन्यवाद निनादजी आणि डॉक्टर साहेब
29 Jul 2015 - 6:56 am | dadadarekar
सीताहरणाबद्दल व शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?
29 Jul 2015 - 7:35 am | जडभरत
काहीही हां दादा!
29 Jul 2015 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?
आमचे अनुमोदन आहे !
पण, त्यासाठी इथल्या वानरांनी त्यांच्या मर्कटलीला थांबवून त्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करायची गरज आहे ना ! :) ;)
29 Jul 2015 - 4:10 pm | चिनार
बरोबर काका !
पण आपल्या इथल्या वानरांना माफीनाम्यापेक्षा 'राजीनामा' मागण्यातच जास्त रस आहे..
आजची स्वाक्षरी
वानरांचा संसदेत उच्छाद..!
29 Jul 2015 - 2:02 pm | सुनील
अणुमोदन!
गझनीच्या मुहम्मदाने लुटून नेलेली सोमनाथाची संपत्ती अफगाणिस्थानातून परत कधी आणायची?
29 Jul 2015 - 4:29 pm | कपिलमुनी
त्यांनी सोन्याची लंका जाळली म्हणून भरपाई मागितली तर अवघड होईल ;)
29 Jul 2015 - 8:37 am | विद्यार्थी
शशी थरूरांच्या Oxford मधील भाषणाच्यानिमित्ताने माझ्या एका इंग्रज मित्राशी चर्चा करण्याचा योग आला. इंग्लंडमधील लोकांचे मुख्य दोन गट पाहायला मिळतात, एक ज्यांना त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या अन्याय, आक्रमण आणि अत्याचाराबद्दल लाज आणि वाईट वाटते आणि दुसरा ज्याला याबद्दल कुठलीही भावना नाही.
पण माझ्या मित्राने विचारलेल्या एका प्रश्नाने मी थोडा अंतर्मुख झालो. तो म्हणाला की भूतकाळातील चुकांसाठी माफी मागितली तर त्याने आजच्या इंग्रज पिढीच्या मनाचा मोठेपणा पण दिसेल. पण इंग्रजांनी काही देश वगळता बहुतेक सर्व जगावरच राज्य केले होते. जर आजचे सरकार अशी माफी मागू लागले तर किती देशांची माफी ते मागणार? यातूनसुद्धा काही चुकीचे पायंडे पडण्याचा धोका आहे. त्यातून आजची इंग्रज पिढी या इतिहासापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे आणि या इतिहासामध्ये त्यांचे काहीच योगदान नाही त्यामुळे माफी का मागायची हा प्रश्न त्यांना पडला तर ते पूर्णपणे गैर नाही.
काही भारतीय लोकांच्या इंग्रजांविषयीच्या भावना थोड्या तीव्र असणे मला अगदी स्वाभाविक वाटते. भारतीय स्वातंत्र्याचा जो इतिहास आपण शाळेमध्ये आणि अवांतर वाचनातून शिकलो, तो पाहता स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अन्याय आणि अत्याचाराची मोजदाद होऊ शकणार नाही.
वादविवाद आणि चर्चांसाठी हा विषय उत्तम आहे. या ऐतिहासिक घटनांचे पैशात मुल्य करून भरपाई मागणे उचित नाही असे मला वाटते. शशी थरूरांनी म्हटल्याप्रमाणे जर आजच्या इंग्रज पिढीने त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या ऐतिहासिक चुकांची नुसती जाणीव ठेवली तरी पुरेसे आहे.
29 Jul 2015 - 11:04 am | dadadarekar
इंग्रजानी देश लुटला ते इथल्याच राज्यकर्त्यांच्या परवानगीने.
इंग्रजांच्याकडुन सैन्यचे संरक्षण्विकत घेतले.
त्याबदल्यात कर गोळा करायचेअधिकार दिले.
काही राजानी इंग्रजांकडुन कर्जे घेतली व त्यामोबदल्यात इंग्रजांना अनिर्बंध व्यापाराचे परवाने दिले. इंग्रजानी त्याच वापर केला. उदा. झाशी.
कोहिनूर हिरा शीखानी इंग्रजाना भेट दिला होता.
......
देशाची माफी कुणी मागय्ला हवी ?
इंग्राजानी की संसथानिकानी ?
29 Jul 2015 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर असला तर इतरांना त्याला लुटण्याची पूर्ण नैतीक परवानगी असते का ?
जर हे सत्य असले तर "आम्ही जगात सुधारणा आणि लोकशाही पसरवली" हे कोणत्या तोंडाने बोलले जाते ? आणि त्याचे "अतीबुद्धिवान" समर्थन शहाणपणाचे मानावे का ?
29 Jul 2015 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून... नेहमी विसरले जाणारे वास्तव...
१. वसाहतींतल्या सुधारणा (रस्ते, रेल्वे, पोस्ट, इ) ह्या त्यावेळेच्या वसाहतवादी शासनाला आणि त्यांच्या व्यापाराला हव्या होत्या तश्याप्रकारे आणि त्याच जागी केल्या गेल्या... त्यांचा मूळ देशवासियांच्या प्रगतीशी काडीचा संबंध नव्हता. मात्र, वसाहतींतून बर्यावाईट मार्गांनी जमा केलेला पैसाच त्या सुधारणा करण्यात खर्ची पडला होता.
२. एकूण एक वसाहतींत वसाहतवादी सत्तांची गच्छंती झाल्यावरच लोकशाही आली, त्याअगोदर नाही. किंबहुना अनेक वसाहतींत आपल्याला धार्जिणी, उघड अथवा लोकशाहीच्या बुरख्याखालील, एकाधिकारशाही राहील याची पुरेपूर तजविज करून मगच वसाहतवादी सत्ता (नाईलाजाने) दूर झालेल्या आहेत.
वरचे उघड वास्तव दिसायला डोळ्यावरचा वसाहतवादी गुलामगिरीचा चष्मा काढणे जरूर आहे.
29 Jul 2015 - 1:44 pm | dadadarekar
एतद्देशीय राजेत्कर्तव्यपरांगमुख झाले.
त्यांनीदेखील माफी / दंड सोसायला हवा.
29 Jul 2015 - 12:26 pm | होबासराव
तुम्हि परत आत्मघातकी वाटेवर चालु लागलायत... आणखि आयडी असतीलच म्हणा तुमच्याकडे. टॉलरन्स (सहिष्णुता) कळते का तुम्हाला ? ति आमच्याकडे आहे म्हणुन तुम्हि इथे आहात. एव्हढया चांगल्या देशात चांगले जीवन जगताय, मिपा सारख्या संस्थळाचा चांगल्या लिखाणाकरता (ते तुम्हाला शक्य नाही) निदान वाचण्याकरता उपयोग करा. नाहि तर तुमचे भाउबंद आहेतच कि तिकडे बघा कोणाच्या मदतीने ईस्लामाबादेत केश-कर्तनालय उघडता आले तर. ह्या हजामती तिकडे करा.
29 Jul 2015 - 12:33 pm | मदनबाण
मी हे भाषण ऐकले आहे, आणि ते अतिशय आवडले ! :) त्यांचे इंग्रजी भाषेवरील उत्तम प्रभुत्व नीट ऐकण्यासाठी डाउनलोड मारुन ठेवला आहे.
यावरची एक बातमी...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
29 Jul 2015 - 12:45 pm | कैलासवासी सोन्याबापु
कीथ वाझ म्हणाले की ब्रिटन ने कोहिनूर भारताला परत करावा (आगामी मोदी भेटीच्या वेळी) बाकी कसली माफ़ी अन कसले काय आज भारत इंग्लॅण्ड मधे सर्वाधिक फॉरेन इन्वेस्टमेंट करणारा देश आहे (ह्याचा वो परेशान करते रहे हम काम करते रहे सोबत काही संबंध नाही) आपल्या नवआत्मविश्वास प्राप्त कंपनी अन सरकार ने उद्या त्यांची लंगोटी ओढून आणायची ही शक्यता आहे तेव्हा माफ़ी मागा न मागा पण भारत इज अ इकनोमिक एंड मिलिट्री पॉवर टु रेकन विथ हा संदेश इंग्लॅण्ड ला गेला असेल काय???
29 Jul 2015 - 1:31 pm | निनाद मुक्काम प...
माफी
नको जाणीव असू द्या जशी प्रत्येक जर्मन नागरिकांना त्यांच्या बालवयात ज्यू छळ छावण्यांच्या मध्ये नेले जाते व हिटलर ने काय केले ते सांगितले जाते तसे इंग्रजी मुलांना त्यांच्या पूर्वजांनी वसाहतवाद म्हणून काय केले हे सुद्धा सांगितले पाहिजे आणि आता इंग्रजांच्या कडून पैसे नकोत मात्र एकेकाळी जसे भारतीयांनी इंग्रजंना रोजगार पुरावरला आपल्या देशात विसा न मागता येऊ दिले अगदी तसे नाही पण सध्या भारतीय स्थलांतरित लोकांच्या विरुद्ध जसा जुलमी कायदा आणला आहे तो रद्द करावा
रोमेनिया व बल्गेरिया सारख्या देशातून जर लोक मुक्तपणे इंग्लंड मध्ये येऊ शकतात तर निदान योग्य भारतीय पाकिस्तानी बांगलादेशी व्यक्तींना सुद्धा इंग्लड मध्ये प्रवेश सुलभ करावा ,
हे योग्यतेचे निकष काही वर्षांच्या पूर्वी इंग्लंड सरकार ने निश्चित केले होते , व डेविड केमेरून च्या हुज्रूर पक्षाच्या सरकारने ते क्रमाक्रमाने अधिक कठीण व भारतीयांसाठी इंग्लड मध्ये प्रवेश दुर्लभ करून ठेवला आहे.
अवांतर
अण्वस्त्र सज्ज व अंतराळ मोहीम राबविणाऱ्या भारताला ब्रिटन ने दरवर्षी आर्थिक मदत का करावी ह्या अर्थी तेथे मोठा वाद विवाद चर्चा सत्रे जाहली. जेव्हा भारतात ह्या संबंधी चर्चा झाली तेव्हा तत्कालीन भारत सरकारचे प्रतिनिधी थरूर ह्यांनी बिनतोड युक्तिवाद करून त्यांची तोंड बंद केली.
29 Jul 2015 - 3:52 pm | गॅरी ट्रुमन
मी राष्ट्रवादाचा समर्थक असलो तरी याविषयीची माझी मते थोडी वेगळी आहेत.
काही मुद्दे---
ब्रिटिशांनी भारतीयांना नुकसानभरपाई दिली पाहिजे म्हणजे नक्की कोणाला? वेगळ्या शब्दात भारतीय म्हणजे नक्की कोण? भारतीय ही ओळख आपण आज वापरतो. पण २०० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांची तीच ओळख होती का? म्हणजे आज आपली भारतीय ही ओळख आहे ती निर्माण करण्यात ironically त्याच ब्रिटिश राजचा वाटा आहे.
भारतात ब्रिटिश आले त्यावेळी आणि मुख्य म्हणजे नुसता व्यापार सोडून ते राजकारणातही लुडबूड करू लागले तेव्हाही हे परकीय आहेत ही भावना त्यावेळी होती का? की परस्पर रस्सीखेच करायच्या विविध राजे-रजवाड्यांच्या काळात तत्कालीन राजकारणात वर्चस्वाच्या त्या खेळात इतर खेळाडूंसारखेच ते पण एक खेळाडू होते अशा स्वरूपाचेच त्यांच्याकडेही बघितले जात होते? आणि ब्रिटिश किंवा अन्य कुणीही परके आहेत हे म्हणायला आपण कोण आणि आपले कोण ही व्याख्या पक्की पाहिजे. ती तशी होती का हा प्रश्न आहे.
नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांची मदत घेतली होती. पुढे टिपू सुलतानविरूध्द ब्रिटिशांच्या बाजूने मराठेही होतेच.टिपू सुलतानाने जे हिंदूंवर अत्याचार केले त्याविरोधात मराठ्यांनी शत्रूच्या शत्रूच्या बाजूला जायचे म्हणून इंग्रजांना मदत केली. म्हणजे टिपू आणि इंग्रज यात नक्की कोण आपला आणि कोण परका? हे ठरवायचे कोणत्या आधारावर? की दोघेही मराठ्यांप्रमाणेच राजकारणातील खेळाडू आणि तत्कालीन राजकारण/धर्मकारणाप्रमाणे जे सोयीचे वाटले त्याप्रमाणे मराठ्यांनी आपली पावले उचलली?
पुढे १८१८ मधील कोरेगाव-भीमाच्या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांच्या सैन्याविरूध्द दलित सैनिक लढले. आजही पुणे-नगर रस्त्यावर त्या लढाईत मारल्या गेलेल्यांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभ आहे. त्या सैनिकांच्या बाजूने विचार केला तर ते पेशव्यांच्या विरोधात लढले यात त्यांचे काय चुकले? त्यांच्या दृष्टीने पेशव्यांचे राज्य आपले वाटायचा संबंधच नव्हता. आणि ब्रिटिश जर का त्यापासून सुटका करून देत असतील तर त्यांना मदत का करू नये? म्हणजे पेशवे आणि ब्रिटिश यांच्यात परके कोण? की दोघेही परके आणि आपल्या हितसंबंधांच्या सोयीप्रमाणे त्या सैनिकांनी त्यांना योग्य वाटेल ते केले?
१८५७ विषयी लिहावे तितके थोडे आहे. ज्या राणी लक्ष्मीबाईचा इतका उदो-उदो केला जातो त्याच राणीने नक्की काय केले होते हे बिपीन चंद्रांच्या India’s Struggle for Independence या पुस्तकात काय लिहिले आहे ते बघू--
"The most outstanding leader of the Revolt was Rani Lakshmibai, who assumed the leadership of the sepoys at Jhansi. Lord Dalhousie, the Governor-General, had refused to allow her adopted son to succeed to the throne after her husband died and had annexed the state by the application of the Doctrine of Lapse. The Rani had tried everything to reverse the decision. She even offered to keep Jhansi ‘safe’ for the British if they would grant her wishes."
म्हणजे समजा लॉर्ड डलहौसीने झाशीच्या राणीने केलेली मागणी मान्य केली असती तर राणी ब्रिटिशांविरोधात लढली असतीच असे म्हणता येईल का? राणीने "मेरी झांसी नही दुंगी" असे म्हटले होते तर "मेरा भारत नही दुंगी" असे म्हटले नव्हते. अर्थात त्याबद्दल तिला दोषही देण्यात अर्थ नाही.कारण तत्कालीन राजकारणात प्रत्येकाचे इमान आपल्या राज्यापुरते असेल आणि "आपण भारतीय" अशी काही संकल्पनाच नसेल तर त्या काळात रूढ असलेल्या संकल्पनेप्रमाणे तिने केले. जगदीशपूरच्या कुंवरसिंगाची पण गोष्ट थोडीशी अशीच. ब्रिटिशांनी कुंवरसिंगाची जमीन हडप केली म्हणून तो ब्रिटिशांविरूध्द उठला.
ज्याला बंडवाल्यांनी आपला नेता मानले त्या बहादूरशाह झफरविषयी बिपीन चंद्रा लिहितात---"When the sepoys arrived from Meerut, Bahadur Shah seems to have been taken by surprise and promptly conveyed the news to the Lt.Governor at Agra." पंजाबात शीखांनी अगदी एकदिलाने ब्रिटिशांना मदत केली. कारण अगदी साधे होते. शीख आणि मुघल यांच्यात पिढ्यानपिढ्यांचे वैर होते.आणि मुघल बादशहा (कितीही नामधारी असेना) हा बंडवाल्यांमध्ये म्हणजे शीखांना त्याच्याविरोधात ब्रिटिशांच्या बाजूने उभे रहायचे कारणच होते. गुरू तेगबहादूरांच्या दोन मुलांचा शिरच्छेद औरंगजेबाने कसा केला होता त्याच्या कहाण्या आठवत याच बहादूरशहाच्या दोन मुलांचा शिरच्छेद शीख सैनिकांनी केला.
हे सगळे रामायण लिहायचे कारण म्हणजे ब्रिटिश भारतात आले त्यावेळी कोण आपला आणि कोण परका या व्याख्याच मुळात पक्क्या नव्हत्या.म्हणजे ब्रिटिशांना परके म्हणायचे ते नक्की कोणत्या आधारावर? पुढे १८५७ नंतर राणीचा जाहिरनामा आला आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व संपून भारत ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली आला. त्यानंतर संथाळांचे बंड, वासुदेव बळवंत फडके इत्यादी स्थानिक पातळीवर उठाव झाले.पण ब्रिटिशांविरूध्द देशव्यापी चळवळ उभी राहायला कित्येक दशके गेली. ती चळवळ उभी राहिली १९१० च्या दशकाच्या शेवटी.दरम्यानच्या काळात लाल-बाल-पाल सारख्या पुढार्यांनी आपण सगळे भारतीय आहोत आणि मुळात आपण पारतंत्र्यात आहोत ही भावना दृढमूल केली. या सगळ्यासाठी इतकी वर्षे जावी लागली.
आता माझा प्रश्न: ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर अत्याचार केले हे मान्य. पण त्यावेळी ते पूर्वज स्वतःला भारतीय असे म्हणवतच नसतील तर आपण (२०१५ मधील भारतीय) हे २०० वर्षांपूर्वीच्या "हिंदी महासागर आणि हिमालय यामधील भूभागात राहणार्या" लोकांचे राजकीय उत्तराधिकारी कसे काय ठरतो? आणि आपण त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांविरूध्द सध्याच्या ब्रिटिशांकडून (ते तेव्हाच्या ब्रिटीशांचे राजकीय उत्तराधिकारी नक्कीच आहेत) नुकसान भरपाई कशी मागू शकतो? आणि मग त्याच न्यायाने ब्रिटिशांनीही त्या भूभागात राहणार्या लोकांना एक राजकीय आणि राष्ट्रीय ओळख दिली म्हणून आम्हाला तुम्ही पैसे द्या असे मागितले तर त्यांचे काय चुकले?
याविषयी जरा जाज्वल्य अभिमान वगैरे बाजूला ठेऊन विचार करा (यापूर्वी केला नसल्यास) ही विनंती. चर्चा अधिक रंगल्यास अजून लिहिनच.
(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
29 Jul 2015 - 4:05 pm | संदीप डांगे
सर्वप्रथम तुमच्या पुनरागमनानिमित्त मनापासून हार्दिक स्वागत. तुमची उणीव गेल्या काही चर्चांमधे जाणवत होती खरीच.
काही मुद्दे पटलेत.
सविस्तर प्रतिसाद नंतर देइन...
29 Jul 2015 - 4:54 pm | dadadarekar
सहमत,
29 Jul 2015 - 6:25 pm | उगा काहितरीच
हे असे विचार वाचायला भेटतात त्यामुळेच मिपा आवडते ! असा विचार कधी केलाच नव्हता .
29 Jul 2015 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
बारश्याच्या शुभेच्छा ! :)
खरा मुदा असा आहे...
ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर अत्याचार आणि त्यांच्या भूभागाची लूट केली हे सर्वमान्य सत्य आहे. त्यावेळचे पिडित लोक स्वतःला काहीही म्हणवत असले तरी आज (२०१५ मधील) भारतीय (यात पाकिसानी, बांगलादेशी आणि म्यानमारी, इत्यादींचीही भर घालता येईल) म्हणवणार्या त्यांच्या वारसांना त्यांची २०० वर्षे जुलूमी लूट करणांर्या ब्रिटीशांच्या वारसांकडून भरपाई मागण्याचा हक्क आहे. वर देश याऐवजी भूभाग म्हटले आहे याचे कारण हे आहे की पिडीत देशांच्या आजच्या राजकीय सीमा पण वसाहदवादी राष्ट्रांनीच आखलेल्या आहेत; हे विसरून चालणार नाही.
वरचा नैसर्गिक न्याय मानला नाहीतर आंतरराष्ट्रिय न्यायदानात फार मोठी तृटी राहील : माणसावर अन्याय करून त्याला जीवे मारले की गुन्ह्यातून मुक्तता होईल; आणि देशाच्या राजकिय सीमा बदलून पिडित देशात केलेल्या गुन्ह्यांतून मुक्तता होईल... थोडक्यात गुन्ह्याचे स्वरूप योग्य तेवढे तीव्र करणे हा गुन्ह्यातून मुक्त होण्याचा मार्ग होईल.
वरच्या विधानामागची कारणे अशी आहेत...
१. शेकडो वर्षे चाललेल्या वसाहतवादात स्वतःच भरपाई मागण्यासाठी कुठल्याच वसाहतीतला कोणीच पीडीत आज जिवंत असणे कठीण आहे. तेव्हा केवळ पिडीताच्या जीवनकालातच भरपाई देण्याचे ठरवले तर कोणत्याही दीर्घकाळ चालणार्या (आणि म्हणूनच जास्त घृणास्पद असू शकणार्या) गुन्ह्यातल्या बहुसंख्य पिडितांना अथवा त्यांच्या वारसांना (भरपाईच्या रुपाने किंचीत का होईना पण) न्याय मिळणे दुरापास्त होईल. म्हणूनच अश्या गुन्ह्यात, गुन्हेगार जिवंत नसल्यास त्याचे दाईत्व गुन्हेगार नसलेल्या वारसावर जाते. फक्त तो स्वतः गुन्हेगार नसल्याने त्याला शारिरीक शिक्षा न करता त्याची जबाबदारी भरपाई देण्याइतकीच मर्यादीत ठेवली जाते.
२. शेकडो वर्षे चाललेल्या वसाहतवादात केलेल्या प्रत्यक्ष अत्याचारांमध्ये आणि जुलूमी व असमान कायद्यांच्या मदतीने केलेल्या लूटीचा वसाहतवादी राष्ट्रांच्या आजच्या समृद्धीमध्ये सिंहाचा वाटा आहे, हे सर्वमान्य आहे. त्या समृद्धीचा उपभोग वसाहतवाद्यांचे आजचे वारस घेत आहेत. म्हणजेच, त्यांच्या आजच्या सुब्बत्तेमागे पूर्ववसाहतींच्या भूभागावर आज रहात असलेल्या पिडितांच्या आजच्या अनावस्थेचा बर्याच प्रमाणात हात आहे. त्यामुळे पिडित राष्ट्रांना भरपाई देणे ही त्यांची केवळ नैतीक नव्हे तर अधिभौतीक जबाबदारी आहे. पूर्व वसाहत्वादी राष्ट्रे ही वस्तूस्थिती (वसाहदवादी दिवसांतल्याप्रमाणे) स्वार्थी चतुर भाषा वापरून टळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, आणि त्यांच्या सद्याच्या जागतीक सामरिक आणि राजकिय वर्चस्वामुळे बर्याच अंशी सफल होतात. जेथे त्यांना हे टाळणे अशक्य झाले आहे तेथे त्यांनी नाईलाजाने का होईना भरपाई दिलेली आहे, उदा. न्युझिलंड (मावरी लोक), हैती, लिबिया, इ.
29 Jul 2015 - 7:24 pm | गॅरी ट्रुमन
मुद्दा असा आहे की आज भारतीय म्हणून नुकसान भरपाई मागायची मागणी होत आहे. म्हणजे ही मागणी राजकीय आहे. ज्यांच्या पूर्वजांवर ब्रिटिशांनी अत्याचार केले त्यांच्या वंशजांनी ब्रिटिश सरकारकडून वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई मागितली तर त्यात काहीच गैर नाही.पण जेव्हा आपण म्हणतो की "भारताला" नुकसान भरपाई दिली पाहिजे तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तत्कालीन "भारतीयांवर" ब्रिटिशांनी अत्याचार केले. माझा मुद्दा हा की त्यावेळी ते पूर्वज स्वतःला भारतीय म्हणवतच नव्हते.तेव्हा आपण या मागणीला राजकीय स्वरूप देऊ शकत नाही. वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई जरूर मागा.
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई मागायची ठरवली तर कुठे थांबायचे हा प्रश्नच आहे. म्ह़णजे मग त्यात भारतातले दलित, अमेरिकेतले कृष्णवर्णीय, ऑस्ट्रेलियातले अॅबओरिजिनल्स, इराणमधले पारशी (त्या बिचार्यांचा तर इराणमधून निर्वंशच झाला आणि जे काही पारशी आहेत ते भारतात आहेत), बांगलादेशात शिरकाण झालेले, १९४७ मध्ये शिरकाण झालेले हिंदू इत्यादी इत्यादी.
दुसरे म्हणजे ब्रिटिशांमुळे ज्यांच्या पूर्वजांचे नुकसान झाले त्यांचे वंशज आज नुकसान भरपाई मागत असतील तर ब्रिटिशांमुळे ज्यांचे चांगले झाले ते त्यांना उलटे पैसे देणार आहेत का? इंग्रज राज्याचा अगदी दैवी देणगी म्हणून बहुमान करणारे लोक त्यावेळी होते. त्यात आघाडीच्या समाजसुधारकांचाही भाग होता.त्याचे कारण काय असावे? ब्रिटिश अधिकारावर येण्यापूर्वी जो प्रचंड बुजबुजाट होता त्यातून सावरून एक स्थिर प्रशासन, कायद्याचे राज्य, इतर जगाशी सामान्य लोकांची झालेली ओळख इत्यादी ब्रिटिश राज्याचे फायदे त्या धुरीणांना कळले होते. त्याचा आज आपल्याला अजिबात फायदा झालेला नाही का? आता त्याबद्दल आपण ब्रिटिशांना उलटे पैसे देणार आहोत का?
29 Jul 2015 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई मागायची ठरवली तर कुठे थांबायचे हा प्रश्नच आहे. म्ह़णजे मग त्यात भारतातले दलित, अमेरिकेतले कृष्णवर्णीय, ऑस्ट्रेलियातले अॅबओरिजिनल्स, इराणमधले पारशी (त्या बिचार्यांचा तर इराणमधून निर्वंशच झाला आणि जे काही पारशी आहेत ते भारतात आहेत), बांगलादेशात शिरकाण झालेले, १९४७ मध्ये शिरकाण झालेले हिंदू इत्यादी इत्यादी.
या सगळ्यांनी कधी ना कधी, या ना त्या प्रकाराने भरपाई (जी केवळ पैश्यांपुरती मर्यादीत नसते) मागितली आहेच. तो त्यांचा हक्क आहेच आणि तो मानवतेचा प्रभाव जनमानसावर असेपर्यंत अबाधित राहील. ती भरपाई मिळाली की नाही किंवा मिळेल की नाही हे वेळोवेळीच्या राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीवर अबलंबून राहीले आहे व राहील... केवळ नैसर्गिक न्यायावर नाही, तो बर्याचदा राकटपणे अथवा धूर्तपणे तुडवला जातो हे सार्वकालीक सत्य आहे. किंबहुना निती, न्याय या संकल्पनांचीही राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीनुसार जेत्यांनी आपल्या सोईप्रमाणे वेळोवेळी मोडतोड केलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुलामीची प्रथा बंद करण्याचा कायदा ब्रिटनमध्ये आस्तित्वात आला तेव्हा इंग्लंडच्या सरकारने अनेक ब्रिटिश कंपन्यांना / लॉर्ड गृहांना (हाउसेस) नुकसान झाले म्हणून भरपाई (कॉम्पेन्सेशन्स) दिलेली आहेत ! अश्या लोकांनी वसाहतवादाच्या जुलुमाची आणि लूटीची भरपाई करायची गरज नाही हे म्हणणे म्हणजे "द मोस्ट क्रुएल जो़क ऑफ द मिल्लेनियम आहे" असे म्हणणेही आहे त्यांना झुकते माप देणेच आहे !!!
तुमच्या बाकीच्या मुद्द्यांची उत्तरे वरच्या प्रतिसादातच आहेत, त्यामुळे पुनरुक्ती टाळतो.
(अवांतर : तुमचे अनेक राजकिय विषयांवर अत्यंत समतोल विचार असलेले लेख आवडीने वाचले आहेत. त्यामुळे आताचे विचार (उपरोधीक / डेव्हिल्स अॅड्व्होकेट म्हणून नसल्यास) आश्चर्यकारक वाटले. पण याचा अर्थ प्रत्येकाला आपापले मत असायला हरकत आहे असे अजिबात नाही.)
29 Jul 2015 - 9:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझ्या मते कमीत कमी भरपाई म्हणजे...
आता ब्रिटिश साम्राज्याने जगावर किती उपकार केले हे (बर्याच जणांच्या मते चुकीचे) जसे ब्रिटिश शाळांतल्या नविन पिढ्यांना शिकवले जाते त्याबरोबर ब्रिटिश साम्राज्याने जगातल्या अनेक इतर समाजांवर किती अत्याचार केले, त्यांची कशी लूटमार केली हे सत्यही शिकवले जावे. मग कदाचित त्या पिढीला ब्रिटिश साम्राज्याबद्दल समतोल विचार करता येईल.
29 Jul 2015 - 8:24 pm | हुप्प्या
१८५८ साली राणीच्या जाहीरनामा प्रकाशित करुन ब्रिटनने अधिकृतरित्या भारत आपल्या ताब्यात घेतला. त्या जाहिरनाम्याचे नाव गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट. अर्थात तेव्हाही इंडिया म्हणजे भारत ह्या नावाचे काहीतरी अभिप्रेत होतेच. त्या जाहीरनाम्यातही भारताच्या वेगवेगळ्या तुकड्यांचे उल्लेख करण्याइतके त्या देशाला ब्रिटन विभाजित समजत नव्हते. तेव्हा राष्ट्र ही कल्पना तेव्हा निर्माण होऊ लागली होती. पुरेशी भौगोलिक आणि सांस्कृतिक कारणे आधीच अस्तित्त्वात होती ज्यामुळे काही प्रमाणात तरी एकसंधता होती. आज जे सार्वभौम एकसंध राष्ट्र आहे ते तेव्हा नक्कीच नव्हते पण काही प्रमाणात ही निर्मिती ही ब्रिटिश लोकांच्या वागणुकीमुळे घडली आहे.
तेव्हा आपण राष्ट्र म्हणून एकसंध नव्हतो, प्रबळ नव्हतो. आज आहोत. तेव्हा ब्रिटिश ताकदवान होते. श्वेतवर्णीय श्रेष्ठ आहेत असे मानले जाणारा काळ होता त्याचा त्यांनी फायदा घेतला. आज तसे नाही. ब्रिटिशांनी अत्याचार करताना असा विचार केला का की उद्या समजा भारत ताकदवान झाला तर आपल्याला त्याची फळे भोगावी लागतील? मग आपणच असा विचार का करायचा की १५० वर्षापूर्वी आपण दुबळे होतो म्हणून आज भक्कम झाल्यावरही दुबळे असल्यासारखेच वागायचे?
ब्रिटिश लोक ह्या मागण्यांना कितपत दाद देणार आहेत ह्याबद्दल मी साशंक आहेच. पण ह्या निमित्ताने त्यानी म्हणजे ब्रिटिश सरकारने माफी मागितली तरी चालेल.
ब्रिटिश राज्य असताना भारत आज आहे तसा नसला तरी ब्रिटन १५० वर्षापासून आहे तसेच आहे. निदान हा मुद्दा तरी विचार करण्याजोगा आहे.
29 Jul 2015 - 7:14 pm | होबासराव
दोघांचेही प्रतिसाद वाचनिय आणि अभ्यासपुर्ण आहेत वादच नाहि, पण मलातरी इए काकांचा प्रतिसाद आणि मुद्दे पटले.
29 Jul 2015 - 8:13 pm | जडभरत
हं मला पण डाॅ. सुहास म्हात्रेंचा मुद्दा आवडला. ब्रिटिशांनी जालियनवाला बागेत घेतलेली भूमिका अत्यंत संताप आणणारी होती. त्याबद्दल कोण त्यांना माफ करू शकेल.
29 Jul 2015 - 8:50 pm | गॅरी ट्रुमन
अहो चर्चा भटकवू नका हो. प्रश्न नुकसान भरपाई मागण्याचा आहे.़जालियनवाला बाग प्रकरणी इंग्रजांना माफ करा असे कोण म्हणत आहे? सांगाल का?
29 Jul 2015 - 9:28 pm | प्यारे१
हा फक्त दीड (अंकी १ १/२) ओळीचा प्रतिसाद क्लिंटन यांचा असूच शकत नाही एवढं बोलून मी माझे .... शब्द संपवतो. ;)
29 Jul 2015 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
जालियनवाला बाग प्रकरणी इंग्रजांना माफ करा असे कोण म्हणत आहे? सांगाल का?
कोणतीही गोष्ट माफ न करण्यासारखी आहे म्हणजेच तिच्यामुळे अ़क्षम्य अन्याय झालेला आहे हे सिद्ध होत नाही का ? अश्याच अक्षम्य गोष्टीचे परिमार्जन करण्याचे साधन म्हणून भरपाई या संकल्पनेचा जन्म झाला आहे.
Reperation = the action of making amends for a wrong one has done, by providing payment or other assistance to those who have been wronged.
===============
जालियनवाला बाग हे एक प्रकरण झाले. त्यापासून बंगालच्या दुष्काळात लाखो लोकांना भुकेने मरायला ठेवून भारतातले धान्य युरोपियनांसाठी राखीव साठा ठेवणे इथपर्यंत आणि त्यामधल्या आणि त्या सीमांच्या बाहेरच्या परिघातले अनेक अत्याचार ब्रिटिशांनी भारतिय उपखंडातल्या लोकांवर केले आहेत. बंगालच्या दुष्काळात लोक लाखांनी मरत आहेत असे स्वतःच्या अधिकार्यांचे अहवाल वाचून तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान चर्चिलचे जगप्रसिद्ध वचन होते : "गांधी अजून मेले नाहीत काय ?" (येथील गांधीचा आदरार्थी उल्लेख माझ्यातर्फे आहे.) ... वसाहतवादाच्या काळातले बहुतेक सगळे अन्याय हे नजरचुकीने झालेले नसून वंशवरिष्ठतेच्या गुर्मीतून आणि सामरिक वर्चस्वाच्या बळावर झालेले आहेत हे तर पूर्ववसाहतवादी राष्ट्रेही नाकारत नाहीत.
अश्या अक्षम्य गुन्ह्यांकरिता मानवी हक्कांचे जागतिक पुरस्कर्ते म्हणवून घेणार्या (पूर्ववसाहतवादी) राष्ट्रांनी भरपाई नाकारण्यामागे सारासारविवेक नसून इतर अनेक कारणे आहेत. त्यातली काही महत्वाची अशी आहेत...
१. संभाव्य अर्थिक भरपाईपासून बचाव;
२. भूतकालात केलेल्या अश्लाघ्य कृत्यांची जागतिक स्तरावर उजळणी होऊन होणारी बदनामी;
३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ;
४. वरचा इतिहास उघडपणे स्विकारल्यामुळे इतर जागतिक प्रकरणांमध्ये जागतिक स्तरावर कमी झालेली/होणारी पत;
इत्यादी.
बाकी सगळी उघडपणे सांगितली जाणारी कारणे केवळ कातडी बचावण्यासाठी केलेले धुर्त शाब्दिक खेळ आहेत ! याला इंग्लिशमधल्या "हॉगवॉश" या शब्दाइतका उत्तम दुसरा इंग्लिश आणि मराठी शब्द मला माहित नाही.
वाईट इतकेच की या "हॉगवॉश" ला अनेक विचारी माणसेही बळी पडतात आणि इतिहास विसरतात की "अशी अनेक धुर्त वचने (किंवा डिसइन्फॉर्मेशन किंवा हॉगवॉश) वसाहती निर्माण करण्यासाठी आणि त्या वसाहतींचे अनेक शतके जुलुमाने शोषण करण्यात महत्वाचे शस्त्र म्ह्णून कामी आणली गेली होती".
29 Jul 2015 - 10:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ आणि त्यामुळे निवडणुकीत कमी होणारी मते;
29 Jul 2015 - 11:16 pm | एस
नेमके प्रतिसाद!
29 Jul 2015 - 11:44 pm | गॅरी ट्रुमन
तुम्ही माझा एक महत्वाचा मुद्दा विसरत आहात. वैयक्तिक भरपाई द्यायला आणि मागणी करायलाही काहीच चूक नाही. पण तशी मागणी आपण राजकीय दृष्ट्या करू शकत नाही कारण त्यावेळी भारतीय म्हणून अशी ओळख आपल्या पूर्वजांची नव्हती.
त्यावेळी जुलमी राजे होतेच. समजा अशा जुलमी राजाने कत्तली केल्या असतील आणि लोकांना लुटले असेल तर त्याची भरपाई कोणाकडून घेणार? जसा हा राजा जुलमी तसे इंग्रजही जुलमी. की पोस्ट फॅक्टो जजमेम्ट वापरून आपले पूर्वज जसे भारतीय तसा हा राजाही भारतीय?
आज अंबानींसारखे अनेक भारतीय जनतेला लुबाडत आहेत. त्यांनी जमा केलेली माया नंतरच्या १० पिढ्यांनाही पुरेल. मग अचानक जागे होऊन दहा पिढ्यांनंतर अंबानींच्या वंशजांना धरून भरपाई मागणार?
असो. याविषयावरील प्रतिसाद आता थांबवत आहे.
29 Jul 2015 - 11:27 pm | शशिकांत ओक
थरूर जाणीव करून देत होते की अन्याय झाला आहे. म्हणून आजच्या ब्रिटिश लोकांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली नाही.
अशा मागण्या आता मान्य करून नसत्या प्रश्नांची निर्मिती होईल. व मानवी संहार घडून नव्या सूडाचा मार्ग प्रशस्त होईल. असे मला वाटले. काही गोष्टींचा क्षमा करून निपटारा केला गेला तर तो उदारपणे मान्य करण्यात मानवी मूल्यांची बूज राखली जाईल.
29 Jul 2015 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
असे का बरे होईल ?!
१. सुधारणेचा मार्ग "चूक झाली हे कबूल करणे आणि त्याबद्दल शरम वाटणे" या पहिल्या पायरीपासून होतो असे म्हणतात.
२. जर चूकच कबूल नाही तर मग सुधारणा कश्यात करायची ? किंवा सुधारणा करायची काय गरज आहे ?
३. समोरच्याला क्षमा करण्यासाठी प्रथम त्याने चूक झाली आहे हे कबूल करायला पाहिजे, नाहीतर क्षमा कोणाला आणि कशाबद्दल करायची ?
४. जर केलेली कृती चूक आहे हे कबूल नाही तर तीच (चूक नसलेली = बरोबर असलेली) कृती परत परत करायला हरकत नसावी, नाही का ?!
या जगातला वाईटपणा "येथे वाईट माणसे आहेत" यापेक्षा जास्त "इथली चांगली माणसे वाईटपणा पाहून गप्प बसणे पसंत करतात" यामुळे आहे.
30 Jul 2015 - 11:17 pm | रमेश आठवले
थरूर आपल्या भाषणाच्या सुरवातीस असे म्हणतात की ब्रिटीशांचे भारतात आगमन होण्यापूर्वी भारताची अर्थ परिस्थिती जागतिक अर्थ परिस्थितीचा २३% भाग होईल इतकी चांगली होती. म्हणजे आपण असे मानू की १७५० साली जागतिक अर्थ परिस्थिती १००० कोटीची असेल तर त्यातील भारताचा वाटा २३० कोटी होता. थरूर पुढे असे ध्वनित करतात कि पुढील दोनशे वर्षात सत्तेवर असताना ब्रिटीशांनी पद्धतशीर प्रमाणे प्रयत्न करून भारताची अर्थ स्थिती केवळ ४% वर आणली. पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली-या गोष्टीचा विचार थरूर करत नाहीत असे वाटते. समजा की इतर देशात प्रगती झाल्याने जागतिक अर्थ स्थिती २०० वर्षांनी ५७५० कोटी इतकी झाली पण भारताची अर्थ स्थिती २३० कोटीच राहिली- तरी सुद्धा भारताची जागतिक व्यवस्थेतील टक्केवारी ४% च होइल. मला ब्रिटीशांनी भारताची आर्थिक प्रगती रोकांयचा प्रयत्न केला नाही असे म्हणायचे नाही. पण जगातील इतर घडामोडीचा परिणाम लक्षात न घेता अशा प्द्ध्तीतेने टक्केवारी मांडल्याने थरूर याना त्यांचा मुद्दा पटविण्यास मदत होत असली तरी त्यांचे विधान अतिरंजित होते आहे असे दिसते .
31 Jul 2015 - 2:07 am | डॉ सुहास म्हात्रे
पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली-
त्याच भाषणात तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आहे...
इंग्रजांनी भारतातील कच्चा माल कवडीमोल भावाने आपल्या कंपनीच्या माध्यमात इंलंडमध्ये निर्यात केला आणि तयार माल अनेक पटींनी जास्त किंमतीने हक्काची बाजारपेठ म्हणून वापरून इथे विकला. त्यासाठी स्थानिक उद्योगधंदे अनेक जुलुमी कारवायांनी बंद पाडले. मलमलीच्या विणकरांची नखे, बोटे आणि मग हात तोडल्याचे वाचले असेलच, हे एक अत्याचारी उदाहरण आहे. इतर अनेक आहेत. थोडक्यात औद्योगीक क्रांतीतल्या मालाला जर जुलुमाने कब्ज्यात असलेली बाजारपेठ मिळाली नसती तर ती इतकी यशस्वी झाली नसती.
शिवाय युरोपियन भारतात येण्याअगोदर जागतीक अर्थकारणात असलेला २३ टक्के सहभाग हेच सिद्ध करत नाही का की भारतियांनी स्वतःच्या बळावर जागतिक अर्थकारणात आपले स्थान निर्माण केले होते ? युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना भारतिय आहेत तिथेच बसून राहिले असते काय ? त्यांनीही प्रगती चालू ठेवली असतीच नाही का ? आताही नाही का प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्य देशांचे अनेक अडथळे असूनही जागतीक अर्थकारणात भारत आपले स्थान मिळवून आहे ? इथे बनवली नसती तरी पाश्चिमात्यांकडून औद्योगिक उपकरणे विकत घेऊन पौर्वात्य देशांनी आपला विकास चालू ठेवला असता. वसाहतवादाच्या अगोदरच्या आणि सुरुवातीच्या काळात बंदूका, तोफा, इ माल पाश्च्यात्य इथे विकतच होते. त्याकाळात पाश्च्यात्य सत्तांनी बर्यावाईट क्लृप्त्या वापरून जमीन आणि व्यापारावर वर्चस्व मिळविले तेथेच जुलुमी असमतोल सुरु झाला.
खुल्या व्यापारी व्यवस्थेची चर्चा करताना, ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारत आणि ब्रिटन भारत यांचा तौलनिक व्यापारी दर्जा काय होता हे पाहण्यासाठी, काही महत्वाची तथ्य उधृत करतो...
१. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या राणीच्या खलित्याने झालेल्या पहिल्या व्यापारी भारत मोहिमेतील जहाजे इतर काही गोष्टींसह खास ब्रिटिश ब्रॉडशीट (कापड) भारतात घेऊन आली होती. त्या कापडाची जाडी आणि भरड वीण पाहून त्यातला एक यार्डही भारतात विकला गेला नाही. कारण त्यावेळेस भारतात त्याच्या अनेक पटींनी उत्तम कापड बनत होते. अर्थातच ती मोहीम पूर्णतः अयशस्वी झाली.
२. भारतातून मसाल्यांचे पदार्थ आणि चीनमधून चहा यांच्या निर्यातीचा पूर्व-पश्चिम व्यापारात मोठा भाग होता. युरोपियन सत्तांनी सर्वप्रथम सागरी मार्गांवर प्रभुत्व मिळवून या दोन गोष्टींचे व्यापार आपल्या अंकित केले. यासाठी त्यांना अरबी दर्यावर्द्यांचेही शिरकान करावे लागले. या सागरी चकमकी चांचेगिरीपेक्षा काही वेगळ्या नव्हत्या.
असो. सद्या इतकेच पुरे.
31 Jul 2015 - 4:23 am | रमेश आठवले
आपल्याला माझा मुद्दा समजलेला नाही.
सध्या एवढेच पुरे .
31 Jul 2015 - 12:09 pm | प्रसाद गोडबोले
बरेच दिवसानी मिपावर कोणी तरी अत्मसत्य उगारलेले पाहुन आनंद जाहला =))
31 Jul 2015 - 3:27 pm | कपिलमुनी
एका व्यक्तीचा मुद्दा दुसऱ्यास समजून सहमती झाली आहे हेच दुर्मिळ आहे
31 Jul 2015 - 3:42 pm | प्रसाद गोडबोले
>> हा मुद्दा मात्र १००% समजला . संपुर्ण सहती नोंदवत आहे :)
31 Jul 2015 - 3:49 pm | टवाळ कार्टा
आजच दादाद रेकर बिन्शर्त श्रीगुरु जी यांच्याशी सहमत झालेले याची देही याची डोळा बघितले :)
31 Jul 2015 - 6:53 pm | श्रीगुरुजी
ह ह पु वा !
31 Jul 2015 - 4:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
"युरोपात औद्योगिक क्रांती होत असण्याच्या प्रक्रियेकडे भारतिय उपखंडातले लोक हातावर हात ठेवून गप्प बसून बघत राहिले असते, त्यामुळे आपोआप युरोप आशिया खंडापेक्षा जास्त श्रीमंत झाला असता." हाच एक महत्वाचा मुद्दा तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे आणि मी ते कसे बरोबर नाही हे तात्कालीक सत्यांच्या आधारे सांगितले आहे.
आता... तुमचा व माझा दोन्ही प्रतिसाद परत वाचल्यास उलगडा होईल असे वाटते.
31 Jul 2015 - 8:38 pm | रमेश आठवले
भारत सोडा पण चीन सारख्या आणि पारतंत्र लादले नसलेल्या पूर्वेतील इतर देशातही त्या दोनशे वर्षात युरोप मध्ये झाली तशी औद्योगिक क्रांती झाली नसल्याने, त्यांची जागतिक आर्थिक व्यवस्थेतली टक्केवारी त्या काळात खाली घसरली आणि तुलनेने युरोपातील देशांची वाढली. भारतात ही घसरण ब्रिटीशांच्या कारवायांमुळे अधिक झाली असेल, पण ती २३% वरून ४% वर यायला केवळ ब्रिटन एकटे जबाबदार आहे असे नाही. तर इतर काही युरोपातील देशात त्याच काळात प्रवेगाने वाढलेल्या उत्पादनामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेत मधील त्यां देशांचा वाटा वाढत गेला हे ही आहे. .
31 Jul 2015 - 10:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
कृपया,
१. चीनचा संपूर्ण इतिहास नाही तरी कमीत कमी ब्रिटनची चीनबरोबरची अफू युद्धे आणि ब्रिटिश लोकांनी चीनमधून चहाच्या रोपांची चोरी करून चहाच्या व्यापारावर कसा कब्जा केला हे वाचा...
शांघाईतली कन्सेशन्स आणि हाँग काँग ब्रिटिशांच्या ताब्यात कसे आले ते वाचा...
केवळ एकट्या चहाच्या व्यापाराचा सामरीक ताकदीने आणि चोरीने (दोन्हीही जुलुमानेच) ताबा घेतल्याने जागतिक व्यापारातील चीनचे स्थान किती खाली गेले आणि ब्रिटनचे (विशेषतः ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे, जी व्यापारी फायद्याच्या बळाबर अनेकदा ब्रिटिश सरकारवर हावी झाली होती) स्थान किती वर गेले हे समजेल.
२. फ्रेंचांनी इंडोचायनात काय केले ते वाचा...
३. डचांनी इंडोनेशियात काय केले ते वाचा...
मग इतर कोणला इथे काही लिहीण्याची गरज भासणार नाही.
केवळ वरवरच्या व्यक्तीगत अंदाजांवर नाही तर विश्वासू तथ्यांवर सिद्ध झालेल्या इतिहासावर चर्चा करायची असेल असेल तर पुढे चालू ठेऊ... अन्यथा राम राम !
1 Aug 2015 - 12:59 am | रमेश आठवले
पास
31 Jul 2015 - 11:33 pm | वगिश
भरपाई तर मग आपल्याला मुघल व त्यापूर्वीचे सर्व सम्राट यांच्याकडूनही घ्यायला हवी. सर्व राज्यकर्ते हे आपली पोतडी भरणारच मग तुम्ही त्याला लुट,व्यापार,भ्रष्टाचार इत्यादी काहीही नावे द्या. मुघालान्पुर्वी भारत(?) हा अतिशय पुण्यवान व निस्वार्थी राज्यकर्त्यांनी भरलेला असा देश होता असा जर कुणाचा समज असेल तर मला वाटते तो चुकीचा आहे. आर्थिक लुट,शोषण ह्या गोष्टी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेत आधीपासून होत्या आणि पुढेही सुरूच राहतील .