ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई
http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia
नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजतागायत कोणी हा मुद्दा उचलून धरला होता का? इथे तर अशी परिस्थिति आहे की ब्रिटीशांनीच भारताचे कल्याण केले ,विकास घडवला , रेल्वे /पोस्ट /तार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान आणून पुराणकथात रमणार्या भारतीय /हिंदू समाजाचा उद्धार (?) केला अशी मते बाळगणारे आणि व्यक्त करणारे लोकही आज भारतात सापडतात , त्यांना सणसणीत चपराक हाणत शशी थरूर यांनी ब्रिटीशांनी भारताला किती व कसे लुटले? भारतीय सैनिकांचा वापर करून पहिले व दुसरे महायुद्ध जिंकताना भारताच्या हाती मात्र धुपाटणेच कसे आले ?बंगाल मध्ये 1943 साली पाडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी ब्रिटिश सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, जालियानवाला बागेत क्रौर्या ची परिसीमा गाठणारे अमानुष हत्याकांड याचा समग्र ऊहापोह थरूर यांनी केला . ब्रिटिश येण्यापूर्वी जगाच्या व्यापारातील भारताचा हिस्सा 24% होता ,परंतु 1947 साली तो हिस्सा फक्त 4% राहिला होता. देशी उद्योगधंद्याना पद्धतशीरपणे मारून टाकायचे, भारतीय कच्चा माल स्वस्त दरात विकत घेवून ब्रिटनमध्ये त्यावर प्रक्रिया करून पुन्हा चढया दराने भारतात आणि जगात विकायचा ,असा अव्यापारेषू व्यापार ब्रिटीशांनी केला . या आणि अशा अनेक "गुन्ह्यांसाठी" ब्रिटन जबाबदार असून त्याची जबाबदारी ब्रिटनला टाळता येणार नाही ! त्याचबरोबर भारतातून “चोरलेला” कोहिनूर हिरा त्वरित भारतास परत करावा आणि ब्रिटिश सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची ,अशी रास्त मागणीही केली .
परखड मत व्यक्त करून खर्या इतिहासाची जाणीव ब्रिटीशांना ,जगाला आणि भारतीयांनादेखील करून दिल्याबद्दल शशी थरूर यांचे (ते कोंग्रेसवासी असूनही ) माझ्याकडून जाहीर आभार व अभिनंदन !
वाचने
25617
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
Sun never sets on British
ते भाषण पुर्ण ऐकायचे आहेच. पण
<blockquote> त्याचबरोबर
In reply to <blockquote> त्याचबरोबर by प्रसाद गोडबोले
सम्यन्तक नाही स्यमन्तक!
In reply to सम्यन्तक नाही स्यमन्तक! by बॅटमॅन
तो हिरा भिक्कारडा आहे.
In reply to तो हिरा भिक्कारडा आहे. by dadadarekar
हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक
In reply to हिरा म्हणजे तरी काय, पारदर्शक by बॅटमॅन
बॅट्या अता
In reply to बॅट्या अता by नाखु
पाहतो नाखु'नकाका.
In reply to बॅट्या अता by नाखु
"पायथ्याचा दगड"
In reply to "पायथ्याचा दगड" by प्रसाद गोडबोले
पुरून
In reply to पुरून by नाखु
पूसून उरलेला. उगाच तो
In reply to पूसून उरलेला. उगाच तो by खटपट्या
कृपया धागा व्यनि कराल?
In reply to सम्यन्तक नाही स्यमन्तक! by बॅटमॅन
येणार येणार आमचा स्यमन्तक !!
भाषण ऐकलं.. छानच होतं
काहीही म्हणा,
बरोबर आहे
शशी थरूर यांचे आभार आणि
भाबडेपणा
In reply to भाबडेपणा by पुण्याचे वटवाघूळ
हं वाघुळराव बात में दम है.
In reply to भाबडेपणा by पुण्याचे वटवाघूळ
@शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट
In reply to @शशी थरूर यांनी हे स्टेटमेन्ट by निनाद मुक्काम …
तुमचे मत
In reply to तुमचे मत by पुण्याचे वटवाघूळ
संपूर्ण सहमत आहे
त्याबद्दल संपूर्ण देशात
In reply to त्याबद्दल संपूर्ण देशात by कैलासवासी सोन्याबापु
हा इतिहास म्हैत नव्हता
In reply to त्याबद्दल संपूर्ण देशात by कैलासवासी सोन्याबापु
आपल्या कडे पण आहे ना अशी राणी
In reply to त्याबद्दल संपूर्ण देशात by कैलासवासी सोन्याबापु
शेवटी कोहिनूर
इच्छुकांसाठी
थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले
In reply to थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले by नगरीनिरंजन
जबरी पॉइंट!!! _/\_
In reply to थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले by नगरीनिरंजन
याचा काहि विदा आहे का?
In reply to थरुर यांचे आर्ग्युमेंट पाहिले by नगरीनिरंजन
"यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू
In reply to "यू कॅननॉट ऑप्रेस पीपल फॉर टू by गुलाम
बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत;
In reply to बरोबर. दोन्ही निंदनीय आहेत; by नगरीनिरंजन
सहमत
आर्य लोक पण बाहेरुच्नच आले
In reply to आर्य लोक पण बाहेरुच्नच आले by पाटीलअमित
ही थ्योरी डिस्प्यूटेड
सगळेच जग बदलते ..
थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल
In reply to थरूर साहेबांचे या भाषणाबद्दल by चिनार
तोच तर मुद्दा आहे
माझा प्रतिसाद नीट वाचला असता
थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल
In reply to थरूर ह्यांचे भाषण त्याला सोशल by निनाद मुक्काम …
मला पण तुमच्या भाबडे पणाची
इथल्या बर्याच
धन्यवाद निनादजी आणि डॉक्टर
..
In reply to .. by dadadarekar
काहीही हां दादा!
In reply to .. by dadadarekar
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल
शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल श्रीलंकेच्या अध्यक्षाकडून माफीनामा कधी घ्यायचा ?आमचे अनुमोदन आहे ! पण, त्यासाठी इथल्या वानरांनी त्यांच्या मर्कटलीला थांबवून त्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करायची गरज आहे ना ! :) ;)In reply to शेकडो वानरांच्या मृत्युबद्दल by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर काका !
In reply to .. by dadadarekar
सहमत!
In reply to .. by dadadarekar
माफीनामा
दुसरी बाजू
In reply to दुसरी बाजू by विद्यार्थी
सहमत
In reply to सहमत by dadadarekar
म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर
In reply to म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर by डॉ सुहास म्हात्रे
अजून... नेहमी विसरले जाणारे
In reply to म्हणजे एखादा मूर्ख / कमजोर by डॉ सुहास म्हात्रे
इंग्र्जांचे समर्थन केलेले नाही.
द रेकर
मी हे भाषण ऐकले आहे, आणि ते
कीथ वाझ म्हणाले की ब्रिटन ने
माफी
माझे मत
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
सर्वप्रथम तुमच्या
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
.
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
हे असे विचार वाचायला भेटतात
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
बारश्याच्या शुभेच्छा ! :)
In reply to बारश्याच्या शुभेच्छा ! :) by डॉ सुहास म्हात्रे
ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर
In reply to ब्रिटिशांनी आपल्या पूर्वजांवर by गॅरी ट्रुमन
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई
पण अर्थातच अशी नुकसान भरपाई मागायची ठरवली तर कुठे थांबायचे हा प्रश्नच आहे. म्ह़णजे मग त्यात भारतातले दलित, अमेरिकेतले कृष्णवर्णीय, ऑस्ट्रेलियातले अॅबओरिजिनल्स, इराणमधले पारशी (त्या बिचार्यांचा तर इराणमधून निर्वंशच झाला आणि जे काही पारशी आहेत ते भारतात आहेत), बांगलादेशात शिरकाण झालेले, १९४७ मध्ये शिरकाण झालेले हिंदू इत्यादी इत्यादी.या सगळ्यांनी कधी ना कधी, या ना त्या प्रकाराने भरपाई (जी केवळ पैश्यांपुरती मर्यादीत नसते) मागितली आहेच. तो त्यांचा हक्क आहेच आणि तो मानवतेचा प्रभाव जनमानसावर असेपर्यंत अबाधित राहील. ती भरपाई मिळाली की नाही किंवा मिळेल की नाही हे वेळोवेळीच्या राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीवर अबलंबून राहीले आहे व राहील... केवळ नैसर्गिक न्यायावर नाही, तो बर्याचदा राकटपणे अथवा धूर्तपणे तुडवला जातो हे सार्वकालीक सत्य आहे. किंबहुना निती, न्याय या संकल्पनांचीही राजकिय-सामरिक वर्चस्वाच्या परिस्थितीनुसार जेत्यांनी आपल्या सोईप्रमाणे वेळोवेळी मोडतोड केलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुलामीची प्रथा बंद करण्याचा कायदा ब्रिटनमध्ये आस्तित्वात आला तेव्हा इंग्लंडच्या सरकारने अनेक ब्रिटिश कंपन्यांना / लॉर्ड गृहांना (हाउसेस) नुकसान झाले म्हणून भरपाई (कॉम्पेन्सेशन्स) दिलेली आहेत ! अश्या लोकांनी वसाहतवादाच्या जुलुमाची आणि लूटीची भरपाई करायची गरज नाही हे म्हणणे म्हणजे "द मोस्ट क्रुएल जो़क ऑफ द मिल्लेनियम आहे" असे म्हणणेही आहे त्यांना झुकते माप देणेच आहे !!! तुमच्या बाकीच्या मुद्द्यांची उत्तरे वरच्या प्रतिसादातच आहेत, त्यामुळे पुनरुक्ती टाळतो. (अवांतर : तुमचे अनेक राजकिय विषयांवर अत्यंत समतोल विचार असलेले लेख आवडीने वाचले आहेत. त्यामुळे आताचे विचार (उपरोधीक / डेव्हिल्स अॅड्व्होकेट म्हणून नसल्यास) आश्चर्यकारक वाटले. पण याचा अर्थ प्रत्येकाला आपापले मत असायला हरकत आहे असे अजिबात नाही.)In reply to पण अर्थातच अशी नुकसान भरपाई by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या मते कमीत कमी भरपाई
In reply to माझे मत by गॅरी ट्रुमन
इंग्रजांच्या कृपेने
क्लिंटनभौ आणि इए काका
In reply to क्लिंटनभौ आणि इए काका by होबासराव
हं मला पण डाॅ. सुहास
In reply to हं मला पण डाॅ. सुहास by जडभरत
अहो चर्चा भटकवू नका हो.
In reply to अहो चर्चा भटकवू नका हो. by गॅरी ट्रुमन
हा फक्त दीड (अंकी १ १/२)
In reply to अहो चर्चा भटकवू नका हो. by गॅरी ट्रुमन
जालियनवाला बाग प्रकरणी
जालियनवाला बाग प्रकरणी इंग्रजांना माफ करा असे कोण म्हणत आहे? सांगाल का?कोणतीही गोष्ट माफ न करण्यासारखी आहे म्हणजेच तिच्यामुळे अ़क्षम्य अन्याय झालेला आहे हे सिद्ध होत नाही का ? अश्याच अक्षम्य गोष्टीचे परिमार्जन करण्याचे साधन म्हणून भरपाई या संकल्पनेचा जन्म झाला आहे. Reperation = the action of making amends for a wrong one has done, by providing payment or other assistance to those who have been wronged. =============== जालियनवाला बाग हे एक प्रकरण झाले. त्यापासून बंगालच्या दुष्काळात लाखो लोकांना भुकेने मरायला ठेवून भारतातले धान्य युरोपियनांसाठी राखीव साठा ठेवणे इथपर्यंत आणि त्यामधल्या आणि त्या सीमांच्या बाहेरच्या परिघातले अनेक अत्याचार ब्रिटिशांनी भारतिय उपखंडातल्या लोकांवर केले आहेत. बंगालच्या दुष्काळात लोक लाखांनी मरत आहेत असे स्वतःच्या अधिकार्यांचे अहवाल वाचून तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान चर्चिलचे जगप्रसिद्ध वचन होते : "गांधी अजून मेले नाहीत काय ?" (येथील गांधीचा आदरार्थी उल्लेख माझ्यातर्फे आहे.) ... वसाहतवादाच्या काळातले बहुतेक सगळे अन्याय हे नजरचुकीने झालेले नसून वंशवरिष्ठतेच्या गुर्मीतून आणि सामरिक वर्चस्वाच्या बळावर झालेले आहेत हे तर पूर्ववसाहतवादी राष्ट्रेही नाकारत नाहीत. अश्या अक्षम्य गुन्ह्यांकरिता मानवी हक्कांचे जागतिक पुरस्कर्ते म्हणवून घेणार्या (पूर्ववसाहतवादी) राष्ट्रांनी भरपाई नाकारण्यामागे सारासारविवेक नसून इतर अनेक कारणे आहेत. त्यातली काही महत्वाची अशी आहेत... १. संभाव्य अर्थिक भरपाईपासून बचाव; २. भूतकालात केलेल्या अश्लाघ्य कृत्यांची जागतिक स्तरावर उजळणी होऊन होणारी बदनामी; ३. सद्य सरकारने वरील दोन गोष्टी होऊ दिल्या म्हणून स्वतःच्या देशातल्या जनतेचा होणारा प्रक्षोभ; ४. वरचा इतिहास उघडपणे स्विकारल्यामुळे इतर जागतिक प्रकरणांमध्ये जागतिक स्तरावर कमी झालेली/होणारी पत; इत्यादी. बाकी सगळी उघडपणे सांगितली जाणारी कारणे केवळ कातडी बचावण्यासाठी केलेले धुर्त शाब्दिक खेळ आहेत ! याला इंग्लिशमधल्या "हॉगवॉश" या शब्दाइतका उत्तम दुसरा इंग्लिश आणि मराठी शब्द मला माहित नाही. वाईट इतकेच की या "हॉगवॉश" ला अनेक विचारी माणसेही बळी पडतात आणि इतिहास विसरतात की "अशी अनेक धुर्त वचने (किंवा डिसइन्फॉर्मेशन किंवा हॉगवॉश) वसाहती निर्माण करण्यासाठी आणि त्या वसाहतींचे अनेक शतके जुलुमाने शोषण करण्यात महत्वाचे शस्त्र म्ह्णून कामी आणली गेली होती".In reply to जालियनवाला बाग प्रकरणी by डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादात थोडी भर...
In reply to वरच्या प्रतिसादात थोडी भर... by डॉ सुहास म्हात्रे
नेमके प्रतिसाद!
In reply to जालियनवाला बाग प्रकरणी by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही माझा एक महत्वाचा
स्नो बॉल इफेक्ट
In reply to स्नो बॉल इफेक्ट by शशिकांत ओक
असे का बरे होईल ?!
थोडीशी फसवी टक्केवारी
In reply to थोडीशी फसवी टक्केवारी by रमेश आठवले
पण त्याच काळात इतर देशात आणि
पण त्याच काळात इतर देशात आणि विशेषत:युरोप मध्ये औद्योगिक क्रांती झाल्याने त्याची उत्पादन क्षमता वाढली आणि त्यांची अर्थ स्थिती खूपच सुधारली-त्याच भाषणात तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आहे... इंग्रजांनी भारतातील कच्चा माल कवडीमोल भावाने आपल्या कंपनीच्या माध्यमात इंलंडमध्ये निर्यात केला आणि तयार माल अनेक पटींनी जास्त किंमतीने हक्काची बाजारपेठ म्हणून वापरून इथे विकला. त्यासाठी स्थानिक उद्योगधंदे अनेक जुलुमी कारवायांनी बंद पाडले. मलमलीच्या विणकरांची नखे, बोटे आणि मग हात तोडल्याचे वाचले असेलच, हे एक अत्याचारी उदाहरण आहे. इतर अनेक आहेत. थोडक्यात औद्योगीक क्रांतीतल्या मालाला जर जुलुमाने कब्ज्यात असलेली बाजारपेठ मिळाली नसती तर ती इतकी यशस्वी झाली नसती. शिवाय युरोपियन भारतात येण्याअगोदर जागतीक अर्थकारणात असलेला २३ टक्के सहभाग हेच सिद्ध करत नाही का की भारतियांनी स्वतःच्या बळावर जागतिक अर्थकारणात आपले स्थान निर्माण केले होते ? युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होत असताना भारतिय आहेत तिथेच बसून राहिले असते काय ? त्यांनीही प्रगती चालू ठेवली असतीच नाही का ? आताही नाही का प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्य देशांचे अनेक अडथळे असूनही जागतीक अर्थकारणात भारत आपले स्थान मिळवून आहे ? इथे बनवली नसती तरी पाश्चिमात्यांकडून औद्योगिक उपकरणे विकत घेऊन पौर्वात्य देशांनी आपला विकास चालू ठेवला असता. वसाहतवादाच्या अगोदरच्या आणि सुरुवातीच्या काळात बंदूका, तोफा, इ माल पाश्च्यात्य इथे विकतच होते. त्याकाळात पाश्च्यात्य सत्तांनी बर्यावाईट क्लृप्त्या वापरून जमीन आणि व्यापारावर वर्चस्व मिळविले तेथेच जुलुमी असमतोल सुरु झाला. खुल्या व्यापारी व्यवस्थेची चर्चा करताना, ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारत आणि ब्रिटन भारत यांचा तौलनिक व्यापारी दर्जा काय होता हे पाहण्यासाठी, काही महत्वाची तथ्य उधृत करतो... १. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या राणीच्या खलित्याने झालेल्या पहिल्या व्यापारी भारत मोहिमेतील जहाजे इतर काही गोष्टींसह खास ब्रिटिश ब्रॉडशीट (कापड) भारतात घेऊन आली होती. त्या कापडाची जाडी आणि भरड वीण पाहून त्यातला एक यार्डही भारतात विकला गेला नाही. कारण त्यावेळेस भारतात त्याच्या अनेक पटींनी उत्तम कापड बनत होते. अर्थातच ती मोहीम पूर्णतः अयशस्वी झाली. २. भारतातून मसाल्यांचे पदार्थ आणि चीनमधून चहा यांच्या निर्यातीचा पूर्व-पश्चिम व्यापारात मोठा भाग होता. युरोपियन सत्तांनी सर्वप्रथम सागरी मार्गांवर प्रभुत्व मिळवून या दोन गोष्टींचे व्यापार आपल्या अंकित केले. यासाठी त्यांना अरबी दर्यावर्द्यांचेही शिरकान करावे लागले. या सागरी चकमकी चांचेगिरीपेक्षा काही वेगळ्या नव्हत्या. असो. सद्या इतकेच पुरे.क्षमस्व
In reply to क्षमस्व by रमेश आठवले
आपल्याला माझा मुद्दा समजलेला
In reply to क्षमस्व by रमेश आठवले
मिपावर
In reply to मिपावर by कपिलमुनी
एका व्यक्तीचा मुद्दा दुसऱ्यास
In reply to मिपावर by कपिलमुनी
आजच दादाद रेकर बिन्शर्त
In reply to आजच दादाद रेकर बिन्शर्त by टवाळ कार्टा
ह ह पु वा !
In reply to क्षमस्व by रमेश आठवले
"युरोपात औद्योगिक क्रांती होत
फक्त काही देशात क्रांती
In reply to फक्त काही देशात क्रांती by रमेश आठवले
चीन आणि वसाहतवाद...
In reply to चीन आणि वसाहतवाद... by डॉ सुहास म्हात्रे
पास
भरपाई तर मग आपल्याला मुघल व