स्त्रीधन

शंतनु _०३१'s picture
शंतनु _०३१ in काथ्याकूट
15 Jul 2015 - 4:10 pm
गाभा: 

स्त्रीधन
" भेंडीच्या भाजीत कांदा ?? "
ठेवणीच्या स्वरातील प्रश्न वजा नावड दर्शवणारे वाक्य "तिला " उद्देशुन तोंडातून निघून गेले, आता संसार सुरु झाला अस आईचे खोचक ( की सूचक ?) वाक्य आणि तिची अतीव प्रेमाच्या नजरेला एकाच वेळेस तोंड द्यावा लागलं. पुढच्या गंभीर परिणामांची कल्पना घेवून थोडा मावळ सूर आवळला आणि उसन (धाडसी ) अवसान आणून " हि अशी भाजी मी आजपर्यंत खाल्लीच नाही ” असा स्वत: चा बचाव केला. " पण आमच्याकडे अशीच करतात हो " ( बिटवीन द लाईन : खावून घ्या असा धमकी वजा प्रेमळ सल्ला ) मिळाला.
अरे खा की तिनं तिच्या पद्धतीने केलीये टेस्ट तर कर . इति आई

शरणागती पत्कारून "मुकाट्याने" उदरभरण सुरु केला पण एक शब्द मात्र पिच्छा सोडत नव्हता. " तिची पद्धत "
लग्नानंतर बऱ्याच नवीन गोष्टी अनुभव येतो. २५-३० वर्ष घराच्या पद्धतींच्या साच्यामध्ये त्यात बरेचसे नवीन addition होत असतात. पण नवीन गोष्टीना स्विकारायला वेळ लागतो, रोजच्या सध्या सध्या सवयी मध्ये बदल करणं / स्विकारायला मन सहसा तयार होत नाही. मनात नवीन आणि जुनं अशी तुलना कायम सुरूच असते. नवीन गोष्टींसाठी आपण आपली जुनी पद्धत का सोडावी असा प्रश्न जेव्हां दोन्ही बाजूला पडतो तेव्हां आपल्या पिढ्यांच्या पद्धतीत " add - on " कसे होत गेले याचे उत्खनन करणे महत्वाचे होते . आपण आत्ता पर्यंत ज्या साच्यात जगत आलोय त्यात अनेक पिढ्यांकडून ओतीवकाम झालं आहे. मुळात घराणं अथवा परंपरा पुढे चालावी म्हणून जी साथीदार आलेली असते ती रिकाम्या हाताने कधीच नाही. तिची आजवरची जडण घडण, संस्कार, आवड निवड हे स्त्रीधन घेवूनच ती येते. काही गोष्टी अनवधानाने, काही गैरसमजातून, तर काही धाकाने बदलल्या अथवा लादल्या जातात. आहे त्यात भर घालण्याची स्त्री ची उपजत वृत्ती, अनेक वर्षापासून हे चालूच आहे नी रहाणार ही. हे होत असताना जुन्या गोष्टीही जपल्या गेल्या पहिजे. घरात आलेली काकू, मामी, वाहिनी , बायको तिचं असं आपल्यासाठी आणते, हळूहळू त्याची सवय हि जडते, हे स्त्रीधन स्वीकारताना सासू आणि सून या दोन परड्या कडे त्रयस्थ पणेच पहावं नि समतोल साधलाच पाहिजे, जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

15 Jul 2015 - 4:59 pm | पद्मावति

अतिशय सुंदर लिहिलय. समतोल पणे दोन्ही बाजुंचा विचार करण्याची पद्धत आवडली.
नवीन सून घरात आल्यावर जरा भांड्याला भांडं लागणारच. शेवटी सासू काय आणि सून काय दोघीही त्या घरच्या सुनाच. एक आधी आली तर दुसरी नंतर. दोघीही आप आपल्या घरातल्या पद्धती आणणारच. ते स्वभावीकच आहे. सुनेनी भेंडीच्या भाजीत कांदा आणला, तिची सून त्या भाजीत अजुन काहीतरी नवीनच टाकेल. हे चालतच राहणार.

हे स्त्रीधन स्वीकारताना सासू आणि सून या दोन परड्या कडे त्रयस्थ पणेच पहावं नि समतोल साधलाच पाहिजे, जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे

उत्तम विचार, छान मांडलाय.

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:07 pm | शंतनु _०३१

धन्यवाद …

द-बाहुबली's picture

15 Jul 2015 - 5:13 pm | द-बाहुबली

जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे. अतिशय छान विचार आहेत.

भिंगरी's picture

15 Jul 2015 - 6:14 pm | भिंगरी

उत्तम विचार

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:09 pm | शंतनु _०३१

आभारी आहे

रेवती's picture

15 Jul 2015 - 6:29 pm | रेवती

लेखन आवडले.

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:28 pm | शंतनु _०३१

धन्यवाद …

उगा काहितरीच's picture

15 Jul 2015 - 8:37 pm | उगा काहितरीच

शिर्षक वाचून काही तरी वेगळं ज्वलंत असं वाचायला मिळेल असं वाटलं होतं पण इथे सगळा वरण भात!

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:14 pm | शंतनु _०३१

वाम्बाळ ( पावसाळी ) वातावरणात उगा काहीतरीच खाण्यापेक्षा वरण भात कधीही चांगला, पौष्टिक आणि हलका :)

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:17 pm | शंतनु _०३१

वाम्बाळ ( पावसाळी ) वातावरणात उगा काहीतरीच खाण्यापेक्षा वरण भात कधीही चांगला, पौष्टिक आणि पचायला हलका :)

मला वाटलं एखादी भयकथा असेल, गेला बाजार एखादी रहस्यकथा तरी? पण छे!!

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:31 pm | शंतनु _०३१

रहस्यकथा नाही लिहिली कधी ( पण यात घरातले महाभारत कसे टाळायचे याचे रहस्य आहेच )

पैसा's picture

15 Jul 2015 - 9:38 pm | पैसा

लिखाण आवडले. पण जरा त्रोटक वाटले. उदाहरणातल्या सासू सून एकत्र होऊन निवेदकाला कांदा घातलेली भेंडीची भाजी खाऊ घालतात याची मात्र मजा वाटली. प्रत्यक्षात १०० पैकी ९५ घरांत सासू आणि सून यांच्यात "भेंडीच्या भाजीत आम्ही कांदा घालतोच" आणि "जन्मात कध्धी बघितला नाही असला प्रकार" या दोन टोकाच्या प्रतिक्रिया आणि त्यातून उद्भवणारी महायुद्धे हेच महान सत्य असते. मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही बाजूंनी मार खाणारा मृदंग होतो आणि नक्की कोणाला खूश ठेवावे हे न कळल्याने तो घराबाहेर जाऊन मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतो.

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:23 pm | शंतनु _०३१

धन्यवाद …

मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही बाजूंनी मार खाणारा मृदंग होतो आणि नक्की कोणाला खूश ठेवावे हे न कळल्याने तो घराबाहेर जाऊन मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतो

ह्याला पळपुटे पणा म्हणतात

हवालदार's picture

17 Jul 2015 - 5:54 pm | हवालदार

...

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 10:40 am | टवाळ कार्टा

हेच्च विचारायला आलेलो ;)

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:22 pm | शंतनु _०३१

अनुभवा शिवाय " मि पा " लिहु नये म्हणे

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 10:40 am | टवाळ कार्टा

मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही बाजूंनी मार खाणारा मृदंग होतो आणि नक्की कोणाला खूश ठेवावे हे न कळल्याने तो घराबाहेर जाऊन मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतो.

खी खी खी

कविता१९७८'s picture

15 Jul 2015 - 11:48 pm | कविता१९७८

मस्त

शंतनु _०३१'s picture

16 Jul 2015 - 3:26 pm | शंतनु _०३१

धन्यवाद …

छान. विचार करायला लावणारा लेख.प्रत्येक स्त्री सासरी येताना स्वतःची संस्कार शिदोरी घेऊनच येते.तीचे अनुभव तिच्या पध्दती ती नव्या घरात रुळवुन त्या घरातल्या पध्दती घेऊन स्वतःचं असं वेगळंच स्त्रीधन निर्माण करते.ते पुढे तिची लेक घेऊन जाते.किती सुंदर देवाणघेवाण आहे ही स्त्रीधनाची! ही गोष्ट समजावुन घेऊन त्याचा अादर करणारे घर,नवरा तिला मिळाला तर संसार सुखाचा नक्की व्हावा!

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:48 pm | शंतनु _०३१

धन्यवाद

पिलीयन रायडर's picture

16 Jul 2015 - 5:44 pm | पिलीयन रायडर

मला मुळात ना घरातली बाई म्हणजे "दुसर्‍या घरातुन नव्या घरात आलेली व्यक्ति" हाच विचार खटकतो. बापे मात्र अनादी काळापासुन त्याच घरातले असतात.. तिचं कुळ बदला, नाव - आडनाव बदला, कु चं सौ च पाहिजे बाई.. Miss to Mrs.. मग तिची पद्धत आणि "आपली" पद्धत..

साला जाम बोरिंग आहे हा प्रकार..

बॅटमॅन's picture

16 Jul 2015 - 5:52 pm | बॅटमॅन

ईशान्य भारतात कैक ठिकाणी शिष्टीम उलट आहे. तिथले नवरेही बहुधा असाच विचार करीत असावेत.

आदिजोशी's picture

17 Jul 2015 - 5:20 pm | आदिजोशी

मुलीच्या नवर्‍यांना घर जावई करून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. १००-२०० वर्षांनंतर चक्र उलटं फिरलेलं असेल. मी माझ्या बायकोला ही ऑफर दिली होती.

प्यारे१'s picture

17 Jul 2015 - 5:58 pm | प्यारे१

ऑफर नक्की काय दिली होती ज्यामुळं त्यांनी ती नाकारली?

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:50 pm | शंतनु _०३१

हाहाहाहाहाहा

बाळ सप्रे's picture

21 Jul 2015 - 12:01 pm | बाळ सप्रे

couldn't agree more

आजकाल जिथे दोघही आपापल्या (आईवडीलांच्या) घरापासून वेगळे रहातात तिथेही असेच विचार दिसतात..

नेमका कशामुळे बोरिंग वाटतंय, आणि त्यात बदल करायचा झाल्यास काय करायला हवे हे स्पष्ट करताल का ?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2015 - 6:39 pm | प्रसाद गोडबोले

पत्नीने केल्याल्या स्वयंपाकाची तुलना कधीच आईने केलेल्या स्वयंपाकाशी करु नये .

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे तसेच भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी आहे असा गपगुमान विचार करुन जेवावे ! हाच संसारसागरातुन तरुन जाण्याचा मार्ग आहे =))

भेंडी अगदीच असह्य होत असेल तर "ह्यावेळी ते आंब्याचे लोणचे काय मस्त झाले आहे गं ! किंव्वा तुझ्या आईने करुन पाठवलेला तो साखरांबा कित्ती अप्रतिम लागतोय किंव्वा आज त्या पिझ्झावर केवढा डिस्काऊंट आहे " असे काही तरी म्हणावे , भेंडी आपोआप बाजुला सारली जाते ;) !

जर बायको काही डिश आई पेक्षा जास्त च्छान बनवत असेल तर कधीही एकत्र जेवायला बसु नये !

आणि हो , एकवेळ कांदा घालुन करतात ती भेंडी ची भाजी "अन्नपुर्णे सदा पुर्णे शंकरः प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यासिध्यर्थम् भिक्षाम देहि च पार्वती ।। " असे म्हणत घशाखाली सारता येते पण ते ताक घालुन करतात ती भेंडीची भाजी साक्षात अन्नपुर्णेने पानात वाढली तरी खाता येणार नाही :-\

बॅटमॅन's picture

17 Jul 2015 - 9:07 pm | बॅटमॅन

भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी

भेंडी अगदीच असह्य होत असेल तर "ह्यावेळी ते आंब्याचे लोणचे काय मस्त झाले आहे गं ! किंव्वा तुझ्या आईने करुन पाठवलेला तो साखरांबा कित्ती अप्रतिम लागतोय किंव्वा आज त्या पिझ्झावर केवढा डिस्काऊंट आहे " असे काही तरी म्हणावे , भेंडी आपोआप बाजुला सारली जाते ;) !

जर बायको काही डिश आई पेक्षा जास्त च्छान बनवत असेल तर कधीही एकत्र जेवायला बसु नये !

माताय, काय अब्यास, काय अब्यास. अनुभवाचे बोल अशेच असतात. एका वाक्यातून ब्रह्माण्ड दाखवणारे. _/\_

तदुपरि

आणि हो , एकवेळ कांदा घालुन करतात ती भेंडी ची भाजी "अन्नपुर्णे सदा पुर्णे शंकरः प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यासिध्यर्थम् भिक्षाम देहि च पार्वती ।। " असे म्हणत घशाखाली सारता येते पण ते ताक घालुन करतात ती भेंडीची भाजी साक्षात अन्नपुर्णेने पानात वाढली तरी खाता येणार नाही :-\

ठ्ठो =)) =)) =))

तदुपरि आमचे तीर्थरूप आणि कै. पितामह हे दोघेही स्वयंपाक आवडला नाही तर किमान शब्दांत कमाल इफेक्टने सांगण्यात एकदम वाकबगार. काय एकेक कमेण्टी त्या, बापरेबाप. त्या सर्व स्मृतीत जपून ठेवल्या आहेत. योग्य वेळ येताच अस्त्रे बाहेर काढू =))

नाखु's picture

21 Jul 2015 - 9:53 am | नाखु

कळले ना स्वानुभवासारखा गुरू नाही आणि
" काही मोठे मिळवायचे असेल छोट्या छोट्या बाबींचा त्याग करायला शिका"

पोपशास्त्रीप्र्वचने भाग ५ प्रकरण "जागा आणि जागू द्या" पान ५६

प्रवचनाचा नेमस्त वाचक नाखु

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 10:41 am | टवाळ कार्टा

खिक्क

प्रसाद गोडबोले's picture

21 Jul 2015 - 1:55 pm | प्रसाद गोडबोले

अ‍ॅक्चुअली , नाखुकाका ,

पोरगीपटाव आणि भेंडीपचाव ही दोन अत्यंत भिन्न शास्त्रे आहेत =)) ! अगदी जमीन अस्मानचा फरक आहे दोन्हीत !

भेंडी शेपु आंबाडी आणि कारले ही म्हणजे शंखचक्रगदापद्म सारखी महाअस्त्रे आहेत 'स्त्रीधना'तील !

-
रीटायर्ड पोपशास्त्री आणि भेंडीपचावशास्त्राचा होतकरु विद्यार्थी

प्रगो

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 2:54 pm | टवाळ कार्टा

खरपूस फ्राय केलेले कारले आवडते मला :)

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 12:55 pm | बॅटमॅन

बाकीचं माहीत नाही पण आंबाडीअस्त्र आपल्या बाजूस वळवता येते- आंध्रास्टाईल गोंगुरा (आंबाडी) चटणी करावयास लावली तर.

(गोंगुराप्रेमी) बॅटमॅन.

नाखु's picture

22 Jul 2015 - 2:19 pm | नाखु

पण पोपशास्त्रींनी इतर (पोपशास्त्रुत्तरार्धावर) संशोधनात्मक** टीका रहस्य लिहू नयेच काय? असा काही दंडक आहे काय ?? ही पोपशास्त्रींची जाहीर गळचेपी नाही काय??? (खाजगी गळचेपी विचारण्याचा अधिकार आम्हा पामरांस नाही याची जाणीव आहे)

प्रवचनाभिलाषी भावीक नाखु

संशोधनात्मक**="रोकड्या अनुभवातून आलेले सराव हातखंडे"

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:39 pm | शंतनु _०३१

प्रतिसादा दाखल शब्द सापडत नाहीयेत __/\__

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 10:41 am | टवाळ कार्टा

माताय...वैवाहीक जीवनाचे स्सार / आमटी / सांबार म्हणतात ते हेच्च अस्णार =))

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:37 pm | शंतनु _०३१

स्सार / आमटी / सांबार

स्सार / आमटी / सांबार तुम्ही निश्चितच चाखलेले असणार, बोल ( इथे वाक्य) अनुभवाचे वाटतायेत आपले

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:34 pm | शंतनु _०३१

हाहाहाहा ------
by the way ताकातल्या भेंडीची पाककृती मिळेल का ??

सानिकास्वप्निल's picture

18 Jul 2015 - 7:34 pm | सानिकास्वप्निल

लेख आवडला, छान लिहिलय.

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:34 pm | शंतनु _०३१

धन्यवाद

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 7:35 am | तळ्यात मळ्यात

स्वैपाकघर हीच तर सासूसुनेची युद्धभूमी असते त्यामुळे हा त्रयस्थपणा आणि समतोल ढळू न देणं फारच कठीण!

मृदुंग दोन्हीकडून बडवता आला पाहिजे

रायनची आई's picture

21 Jul 2015 - 11:47 am | रायनची आई

पैसाताईनच्या प्रतिसादाशी सह्मत..ले़ख छान आहे..वरणभात नाहिये. लग्न झालेल्यानाच पटेल.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2015 - 1:35 pm | अत्रुप्त आत्मा

@लग्न झालेल्यानाच पटेल.>> मंजे हा लेख पटायचा "असेल",तर लग्न क्रावे का? :-D

त्यानिमित्ताने तुम्ही चतुर्भुज तरी होताल , बाकी मग अनुभव येतील आणि सहमत ही होताल

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 1:43 pm | शंतनु _०३१

धन्यवाद