Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शंतनु _०३१ on Wed, 07/15/2015 - 16:10
स्त्रीधन " भेंडीच्या भाजीत कांदा ?? " ठेवणीच्या स्वरातील प्रश्न वजा नावड दर्शवणारे वाक्य "तिला " उद्देशुन तोंडातून निघून गेले, आता संसार सुरु झाला अस आईचे खोचक ( की सूचक ?) वाक्य आणि तिची अतीव प्रेमाच्या नजरेला एकाच वेळेस तोंड द्यावा लागलं. पुढच्या गंभीर परिणामांची कल्पना घेवून थोडा मावळ सूर आवळला आणि उसन (धाडसी ) अवसान आणून " हि अशी भाजी मी आजपर्यंत खाल्लीच नाही ” असा स्वत: चा बचाव केला. " पण आमच्याकडे अशीच करतात हो " ( बिटवीन द लाईन : खावून घ्या असा धमकी वजा प्रेमळ सल्ला ) मिळाला. अरे खा की तिनं तिच्या पद्धतीने केलीये टेस्ट तर कर . इति आई शरणागती पत्कारून "मुकाट्याने" उदरभरण सुरु केला पण एक शब्द मात्र पिच्छा सोडत नव्हता. " तिची पद्धत " लग्नानंतर बऱ्याच नवीन गोष्टी अनुभव येतो. २५-३० वर्ष घराच्या पद्धतींच्या साच्यामध्ये त्यात बरेचसे नवीन addition होत असतात. पण नवीन गोष्टीना स्विकारायला वेळ लागतो, रोजच्या सध्या सध्या सवयी मध्ये बदल करणं / स्विकारायला मन सहसा तयार होत नाही. मनात नवीन आणि जुनं अशी तुलना कायम सुरूच असते. नवीन गोष्टींसाठी आपण आपली जुनी पद्धत का सोडावी असा प्रश्न जेव्हां दोन्ही बाजूला पडतो तेव्हां आपल्या पिढ्यांच्या पद्धतीत " add - on " कसे होत गेले याचे उत्खनन करणे महत्वाचे होते . आपण आत्ता पर्यंत ज्या साच्यात जगत आलोय त्यात अनेक पिढ्यांकडून ओतीवकाम झालं आहे. मुळात घराणं अथवा परंपरा पुढे चालावी म्हणून जी साथीदार आलेली असते ती रिकाम्या हाताने कधीच नाही. तिची आजवरची जडण घडण, संस्कार, आवड निवड हे स्त्रीधन घेवूनच ती येते. काही गोष्टी अनवधानाने, काही गैरसमजातून, तर काही धाकाने बदलल्या अथवा लादल्या जातात. आहे त्यात भर घालण्याची स्त्री ची उपजत वृत्ती, अनेक वर्षापासून हे चालूच आहे नी रहाणार ही. हे होत असताना जुन्या गोष्टीही जपल्या गेल्या पहिजे. घरात आलेली काकू, मामी, वाहिनी , बायको तिचं असं आपल्यासाठी आणते, हळूहळू त्याची सवय हि जडते, हे स्त्रीधन स्वीकारताना सासू आणि सून या दोन परड्या कडे त्रयस्थ पणेच पहावं नि समतोल साधलाच पाहिजे, जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे
  • Log in or register to post comments
  • 17462 views

प्रतिक्रिया

Submitted by पद्मावति on Wed, 07/15/2015 - 16:59

Permalink

अतिशय सुंदर लिहिलय. समतोल

अतिशय सुंदर लिहिलय. समतोल पणे दोन्ही बाजुंचा विचार करण्याची पद्धत आवडली. नवीन सून घरात आल्यावर जरा भांड्याला भांडं लागणारच. शेवटी सासू काय आणि सून काय दोघीही त्या घरच्या सुनाच. एक आधी आली तर दुसरी नंतर. दोघीही आप आपल्या घरातल्या पद्धती आणणारच. ते स्वभावीकच आहे. सुनेनी भेंडीच्या भाजीत कांदा आणला, तिची सून त्या भाजीत अजुन काहीतरी नवीनच टाकेल. हे चालतच राहणार.
हे स्त्रीधन स्वीकारताना सासू आणि सून या दोन परड्या कडे त्रयस्थ पणेच पहावं नि समतोल साधलाच पाहिजे, जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे
उत्तम विचार, छान मांडलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:07

In reply to अतिशय सुंदर लिहिलय. समतोल by पद्मावति

Permalink

स्त्रीधन

धन्यवाद …
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Wed, 07/15/2015 - 17:13

Permalink

जुनं जपून नव्याचाही स्विकार

जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे. अतिशय छान विचार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:08

In reply to जुनं जपून नव्याचाही स्विकार by द-बाहुबली

Permalink

जुनं जपून नव्याचाही स्विकार केला पाहिजे. अतिशय छान विचार आहेत.

___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Wed, 07/15/2015 - 18:14

Permalink

उत्तम विचार

उत्तम विचार
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:09

In reply to उत्तम विचार by भिंगरी

Permalink

स्त्रीधन

आभारी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/15/2015 - 18:29

Permalink

लेखन आवडले.

लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:28

In reply to लेखन आवडले. by रेवती

Permalink

रेवती

धन्यवाद …
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 07/15/2015 - 20:37

Permalink

शिर्षक वाचून काही तरी वेगळं

शिर्षक वाचून काही तरी वेगळं ज्वलंत असं वाचायला मिळेल असं वाटलं होतं पण इथे सगळा वरण भात!
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:14

In reply to शिर्षक वाचून काही तरी वेगळं by उगा काहितरीच

Permalink

उगा काहितरीच - वरण भात

वाम्बाळ ( पावसाळी ) वातावरणात उगा काहीतरीच खाण्यापेक्षा वरण भात कधीही चांगला, पौष्टिक आणि हलका :)
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:17

In reply to शिर्षक वाचून काही तरी वेगळं by उगा काहितरीच

Permalink

उगा काहितरीच - वरण भात

वाम्बाळ ( पावसाळी ) वातावरणात उगा काहीतरीच खाण्यापेक्षा वरण भात कधीही चांगला, पौष्टिक आणि पचायला हलका :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 07/15/2015 - 20:44

Permalink

मला वाटलं एखादी भयकथा असेल,

मला वाटलं एखादी भयकथा असेल, गेला बाजार एखादी रहस्यकथा तरी? पण छे!!
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:31

In reply to मला वाटलं एखादी भयकथा असेल, by सूड

Permalink

सूड - रहस्यकथा

रहस्यकथा नाही लिहिली कधी ( पण यात घरातले महाभारत कसे टाळायचे याचे रहस्य आहेच )
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 07/15/2015 - 21:38

Permalink

हाहा!

लिखाण आवडले. पण जरा त्रोटक वाटले. उदाहरणातल्या सासू सून एकत्र होऊन निवेदकाला कांदा घातलेली भेंडीची भाजी खाऊ घालतात याची मात्र मजा वाटली. प्रत्यक्षात १०० पैकी ९५ घरांत सासू आणि सून यांच्यात "भेंडीच्या भाजीत आम्ही कांदा घालतोच" आणि "जन्मात कध्धी बघितला नाही असला प्रकार" या दोन टोकाच्या प्रतिक्रिया आणि त्यातून उद्भवणारी महायुद्धे हेच महान सत्य असते. मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही बाजूंनी मार खाणारा मृदंग होतो आणि नक्की कोणाला खूश ठेवावे हे न कळल्याने तो घराबाहेर जाऊन मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:23

In reply to हाहा! by पैसा

Permalink

हाहा!

धन्यवाद …
मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही बाजूंनी मार खाणारा मृदंग होतो आणि नक्की कोणाला खूश ठेवावे हे न कळल्याने तो घराबाहेर जाऊन मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतो
ह्याला पळपुटे पणा म्हणतात
  • Log in or register to post comments

Submitted by हवालदार on Fri, 07/17/2015 - 17:54

In reply to हाहा! by शंतनु _०३१

Permalink

तुमचे लग्न झाले आहे काय?

...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/21/2015 - 10:40

In reply to तुमचे लग्न झाले आहे काय? by हवालदार

Permalink

हेच्च विचारायला आलेलो ;)

हेच्च विचारायला आलेलो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:22

In reply to तुमचे लग्न झाले आहे काय? by हवालदार

Permalink

लग्न ……??

अनुभवा शिवाय " मि पा " लिहु नये म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/21/2015 - 10:40

In reply to हाहा! by पैसा

Permalink

मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही

मधल्या मधे नवर्‍याचा दोन्ही बाजूंनी मार खाणारा मृदंग होतो आणि नक्की कोणाला खूश ठेवावे हे न कळल्याने तो घराबाहेर जाऊन मित्रांसोबत वेळ घालवणे जास्त पसंत करतो.
खी खी खी
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Wed, 07/15/2015 - 23:48

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on गुरुवार, 07/16/2015 - 15:26

In reply to मस्त by कविता१९७८

Permalink

कविता१९७८

धन्यवाद …
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 07/16/2015 - 17:00

Permalink

छान. विचार करायला लावणारा लेख

छान. विचार करायला लावणारा लेख.प्रत्येक स्त्री सासरी येताना स्वतःची संस्कार शिदोरी घेऊनच येते.तीचे अनुभव तिच्या पध्दती ती नव्या घरात रुळवुन त्या घरातल्या पध्दती घेऊन स्वतःचं असं वेगळंच स्त्रीधन निर्माण करते.ते पुढे तिची लेक घेऊन जाते.किती सुंदर देवाणघेवाण आहे ही स्त्रीधनाची! ही गोष्ट समजावुन घेऊन त्याचा अादर करणारे घर,नवरा तिला मिळाला तर संसार सुखाचा नक्की व्हावा!
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:48

In reply to छान. विचार करायला लावणारा लेख by अजया

Permalink

छान. विचार करायला लावणारा लेख

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 07/16/2015 - 17:44

Permalink

मला मुळात ना घरातली बाई

मला मुळात ना घरातली बाई म्हणजे "दुसर्‍या घरातुन नव्या घरात आलेली व्यक्ति" हाच विचार खटकतो. बापे मात्र अनादी काळापासुन त्याच घरातले असतात.. तिचं कुळ बदला, नाव - आडनाव बदला, कु चं सौ च पाहिजे बाई.. Miss to Mrs.. मग तिची पद्धत आणि "आपली" पद्धत.. साला जाम बोरिंग आहे हा प्रकार..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/16/2015 - 17:52

In reply to मला मुळात ना घरातली बाई by पिलीयन रायडर

Permalink

ईशान्य भारतात कैक ठिकाणी

ईशान्य भारतात कैक ठिकाणी शिष्टीम उलट आहे. तिथले नवरेही बहुधा असाच विचार करीत असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Fri, 07/17/2015 - 17:20

In reply to मला मुळात ना घरातली बाई by पिलीयन रायडर

Permalink

घरजावई करून घ्या

मुलीच्या नवर्‍यांना घर जावई करून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. १००-२०० वर्षांनंतर चक्र उलटं फिरलेलं असेल. मी माझ्या बायकोला ही ऑफर दिली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/17/2015 - 17:58

In reply to घरजावई करून घ्या by आदिजोशी

Permalink

ऑफर नक्की काय दिली होती

ऑफर नक्की काय दिली होती ज्यामुळं त्यांनी ती नाकारली?
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:50

In reply to ऑफर नक्की काय दिली होती by प्यारे१

Permalink

ऑफर नक्की काय दिली होती

हाहाहाहाहाहा
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 07/21/2015 - 12:01

In reply to मला मुळात ना घरातली बाई by पिलीयन रायडर

Permalink

couldn't agree more

couldn't agree more आजकाल जिथे दोघही आपापल्या (आईवडीलांच्या) घरापासून वेगळे रहातात तिथेही असेच विचार दिसतात..
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:30

In reply to मला मुळात ना घरातली बाई by पिलीयन रायडर

Permalink

साला जाम बोरिंग आहे हा प्रकार.. / @पिलीयन रायडर

नेमका कशामुळे बोरिंग वाटतंय, आणि त्यात बदल करायचा झाल्यास काय करायला हवे हे स्पष्ट करताल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 07/17/2015 - 18:39

Permalink

भेंडी

पत्नीने केल्याल्या स्वयंपाकाची तुलना कधीच आईने केलेल्या स्वयंपाकाशी करु नये . स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे तसेच भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी आहे असा गपगुमान विचार करुन जेवावे ! हाच संसारसागरातुन तरुन जाण्याचा मार्ग आहे =)) भेंडी अगदीच असह्य होत असेल तर "ह्यावेळी ते आंब्याचे लोणचे काय मस्त झाले आहे गं ! किंव्वा तुझ्या आईने करुन पाठवलेला तो साखरांबा कित्ती अप्रतिम लागतोय किंव्वा आज त्या पिझ्झावर केवढा डिस्काऊंट आहे " असे काही तरी म्हणावे , भेंडी आपोआप बाजुला सारली जाते ;) ! जर बायको काही डिश आई पेक्षा जास्त च्छान बनवत असेल तर कधीही एकत्र जेवायला बसु नये ! आणि हो , एकवेळ कांदा घालुन करतात ती भेंडी ची भाजी "अन्नपुर्णे सदा पुर्णे शंकरः प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यासिध्यर्थम् भिक्षाम देहि च पार्वती ।। " असे म्हणत घशाखाली सारता येते पण ते ताक घालुन करतात ती भेंडीची भाजी साक्षात अन्नपुर्णेने पानात वाढली तरी खाता येणार नाही :-\
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/17/2015 - 21:07

In reply to भेंडी by प्रसाद गोडबोले

Permalink

भेंडी ही क्षणाची भाजी आणि

भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी
भेंडी अगदीच असह्य होत असेल तर "ह्यावेळी ते आंब्याचे लोणचे काय मस्त झाले आहे गं ! किंव्वा तुझ्या आईने करुन पाठवलेला तो साखरांबा कित्ती अप्रतिम लागतोय किंव्वा आज त्या पिझ्झावर केवढा डिस्काऊंट आहे " असे काही तरी म्हणावे , भेंडी आपोआप बाजुला सारली जाते ;) !
जर बायको काही डिश आई पेक्षा जास्त च्छान बनवत असेल तर कधीही एकत्र जेवायला बसु नये !
माताय, काय अब्यास, काय अब्यास. अनुभवाचे बोल अशेच असतात. एका वाक्यातून ब्रह्माण्ड दाखवणारे. _/\_ तदुपरि
आणि हो , एकवेळ कांदा घालुन करतात ती भेंडी ची भाजी "अन्नपुर्णे सदा पुर्णे शंकरः प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यासिध्यर्थम् भिक्षाम देहि च पार्वती ।। " असे म्हणत घशाखाली सारता येते पण ते ताक घालुन करतात ती भेंडीची भाजी साक्षात अन्नपुर्णेने पानात वाढली तरी खाता येणार नाही :-\
ठ्ठो =)) =)) =)) तदुपरि आमचे तीर्थरूप आणि कै. पितामह हे दोघेही स्वयंपाक आवडला नाही तर किमान शब्दांत कमाल इफेक्टने सांगण्यात एकदम वाकबगार. काय एकेक कमेण्टी त्या, बापरेबाप. त्या सर्व स्मृतीत जपून ठेवल्या आहेत. योग्य वेळ येताच अस्त्रे बाहेर काढू =))
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 07/21/2015 - 09:53

In reply to भेंडी ही क्षणाची भाजी आणि by बॅटमॅन

Permalink

आत्ता तुला

कळले ना स्वानुभवासारखा गुरू नाही आणि " काही मोठे मिळवायचे असेल छोट्या छोट्या बाबींचा त्याग करायला शिका"
पोपशास्त्रीप्र्वचने भाग ५ प्रकरण "जागा आणि जागू द्या" पान ५६
प्रवचनाचा नेमस्त वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/21/2015 - 10:41

In reply to आत्ता तुला by नाखु

Permalink

खिक्क

खिक्क
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 07/21/2015 - 13:55

In reply to आत्ता तुला by नाखु

Permalink

अ‍ॅक्चुअली , नाखुकाका ,

अ‍ॅक्चुअली , नाखुकाका , पोरगीपटाव आणि भेंडीपचाव ही दोन अत्यंत भिन्न शास्त्रे आहेत =)) ! अगदी जमीन अस्मानचा फरक आहे दोन्हीत ! भेंडी शेपु आंबाडी आणि कारले ही म्हणजे शंखचक्रगदापद्म सारखी महाअस्त्रे आहेत 'स्त्रीधना'तील ! - रीटायर्ड पोपशास्त्री आणि भेंडीपचावशास्त्राचा होतकरु विद्यार्थी प्रगो
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/21/2015 - 14:54

In reply to अ‍ॅक्चुअली , नाखुकाका , by प्रसाद गोडबोले

Permalink

खरपूस फ्राय केलेले कारले

खरपूस फ्राय केलेले कारले आवडते मला :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/22/2015 - 12:55

In reply to अ‍ॅक्चुअली , नाखुकाका , by प्रसाद गोडबोले

Permalink

बाकीचं माहीत नाही पण

बाकीचं माहीत नाही पण आंबाडीअस्त्र आपल्या बाजूस वळवता येते- आंध्रास्टाईल गोंगुरा (आंबाडी) चटणी करावयास लावली तर. (गोंगुराप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 07/22/2015 - 14:19

In reply to अ‍ॅक्चुअली , नाखुकाका , by प्रसाद गोडबोले

Permalink

बरोबर है

पण पोपशास्त्रींनी इतर (पोपशास्त्रुत्तरार्धावर) संशोधनात्मक** टीका रहस्य लिहू नयेच काय? असा काही दंडक आहे काय ?? ही पोपशास्त्रींची जाहीर गळचेपी नाही काय??? (खाजगी गळचेपी विचारण्याचा अधिकार आम्हा पामरांस नाही याची जाणीव आहे) प्रवचनाभिलाषी भावीक नाखु
संशोधनात्मक**="रोकड्या अनुभवातून आलेले सराव हातखंडे"
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:39

In reply to भेंडी ही क्षणाची भाजी आणि by बॅटमॅन

Permalink

भेंडी ही क्षणाची भाजी आणि

प्रतिसादा दाखल शब्द सापडत नाहीयेत __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/21/2015 - 10:41

In reply to भेंडी by प्रसाद गोडबोले

Permalink

माताय...वैवाहीक जीवनाचे स्सार

माताय...वैवाहीक जीवनाचे स्सार / आमटी / सांबार म्हणतात ते हेच्च अस्णार =))
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:37

In reply to माताय...वैवाहीक जीवनाचे स्सार by टवाळ कार्टा

Permalink

स्सार / आमटी / सांबार

स्सार / आमटी / सांबार
स्सार / आमटी / सांबार तुम्ही निश्चितच चाखलेले असणार, बोल ( इथे वाक्य) अनुभवाचे वाटतायेत आपले
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:34

In reply to भेंडी by प्रसाद गोडबोले

Permalink

भेंडी

हाहाहाहा ------ by the way ताकातल्या भेंडीची पाककृती मिळेल का ??
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Sat, 07/18/2015 - 19:34

Permalink

लेख आवडला, छान लिहिलय.

लेख आवडला, छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:34

In reply to लेख आवडला, छान लिहिलय. by सानिकास्वप्निल

Permalink

लेख आवडला, छान लिहिलय.

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by तळ्यात मळ्यात on Tue, 07/21/2015 - 07:35

Permalink

छान लेख

स्वैपाकघर हीच तर सासूसुनेची युद्धभूमी असते त्यामुळे हा त्रयस्थपणा आणि समतोल ढळू न देणं फारच कठीण!
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:42

In reply to छान लेख by तळ्यात मळ्यात

Permalink

त्रयस्थपणा आणि समतोल ढळू न देणं फारच कठीण!

मृदुंग दोन्हीकडून बडवता आला पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by रायनची आई on Tue, 07/21/2015 - 11:47

Permalink

पैसाताईनच्या प्रतिसादाशी

पैसाताईनच्या प्रतिसादाशी सह्मत..ले़ख छान आहे..वरणभात नाहिये. लग्न झालेल्यानाच पटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 07/21/2015 - 13:35

In reply to पैसाताईनच्या प्रतिसादाशी by रायनची आई

Permalink

@लग्न झालेल्यानाच पटेल.>>

@लग्न झालेल्यानाच पटेल.>> मंजे हा लेख पटायचा "असेल",तर लग्न क्रावे का? :-D
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:47

In reply to @लग्न झालेल्यानाच पटेल.>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

लेख पटायचा "असेल",तर लग्न क्रावे का? :-D

त्यानिमित्ताने तुम्ही चतुर्भुज तरी होताल , बाकी मग अनुभव येतील आणि सहमत ही होताल
  • Log in or register to post comments

Submitted by शंतनु _०३१ on Tue, 07/21/2015 - 13:43

In reply to पैसाताईनच्या प्रतिसादाशी by रायनची आई

Permalink

.ले़ख छान आहे..वरणभात नाहिये.

धन्यवाद
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com