पहा कशी लोळते सुखाने उधारवारी
अजून खस्ताच खात आहे दुकानदारी
पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले
निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी
खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे
उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी
शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही
उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी
बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते
मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 9:40 am | dadadarekar
वृत्त कोणते ?
16 Jul 2015 - 10:05 am | drsunilahirrao
लगालगागा/लगालगागा/लगालगागा
वृत्त:सती जलौघवेगा
16 Jul 2015 - 11:43 am | पगला गजोधर
दुकानातल्या स्टीकरची आठवण झाली, कि ज्याच्या
अर्ध्या भागात, कपाळाला हात लावून रिकाम्या तिजोरीसमोर बसलेला खंगलेला शेट , म्हणत असतो 'मैने सब उधारमें बेचा',
उरलेल्या अर्ध्या भागात, गरगरीत ढेरीवरून हात फिरवणारा गल्छबु शेट, इस्त्रीचे कपडे टोपी घालून म्हणत असतो ' मैने सिर्फ नगदमें बेचा'