मेंदू

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
6 Jul 2015 - 4:48 pm

जे नको ते नेमका वाचाळतो मेंदू
रोज वारुणीमधे बुचकाळतो मेंदू

बंद कर पारायणे गीताकुराणाची
देवधर्माने अता भंजाळतो मेंदू

दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू

भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण
त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू

तू जरा आता नवी होऊन ये दुनिये
त्याच त्या जगण्यास हा कंटाळतो मेंदू

जीवघेणे तू असे हासू नये राणी
तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू

डॉ.सुनील अहिरराव

gazalहे ठिकाण

प्रतिक्रिया

डॉक्टर मस्त आहे कविता!
जीवघेणे तू असे हासू नये राणी
तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू

ही ओळ खास आवडली.
मस्तच वेगळा प्रयत्न पण मस्त

वेल्लाभट's picture

6 Jul 2015 - 6:05 pm | वेल्लाभट

ग़ज़ल छान आहे !

सुरेखच.

फक्त तेजाब (तेज़ाब) या शब्दाचा मराठीतला उपयोग रुचला नाही. उर्दू हिंदी शब्द मराठीत वापरलेले मला स्वतःला भावत नाहीत. अर्थात हे वैयक्तिक मत झालं.

पुनरुच्चार करतो; ग़ज़ल अप्रतिमच जमली आहे.

दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू

हे खलास !

पण मला तेजाब हा शब्द भारीच वाटतो.
त्याच्या मराठी तेज या शद्बाशी साधर्म्याने काहीतरी आग, प्रखरता, तीव्रता असं डोळ्यासमोर उभं राअहतं.

जडभरत आणि वेल्लाभट खूप खूप धन्यवाद सर!
'तेजाब' शब्द सहजतेने आला त्यामुळे बदलावासा वाटला नाही. अम्ल वगैरे वापरता आले असते. पण ते त्यामानाने कदाचित सौम्य वाटले असते.अर्थ सारखा असला तरी तेजाबाची प्रखरता अम्लाठिकाणी जाणवत नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2015 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या डॉक्टरसाहेब गझला.

भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण
त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू

क्लास.

-दिलीप बिरुटे

drsunilahirrao's picture

6 Jul 2015 - 7:04 pm | drsunilahirrao

धन्यवाद सर!

रातराणी's picture

7 Jul 2015 - 1:20 am | रातराणी

मस्त! आवडली :)

एक एकटा एकटाच's picture

7 Jul 2015 - 10:12 am | एक एकटा एकटाच

मस्त
आवडली

पथिक's picture

7 Jul 2015 - 2:14 pm | पथिक

मस्तच!
'तेजाब' हा शब्दच इथे योग्य वाटतो.

वेल्लाभट's picture

7 Jul 2015 - 3:37 pm | वेल्लाभट

मी तेजाब योग्य वाटतो की त्याऐवजी दुसरा शब्द असावा असं नव्हतं म्हटलं, एकंदरित उर्दू शब्द किंवा हिंदी शब्द मराठीत वापरलेले (मला स्वतःला) रुचत नाहीत इतकंच म्हणालो.

तुम्हाला तो आवडत किंवा योग्य वाटत असेल तर ऑफकोर्स यू कॅन यूज इट.

दमामि's picture

7 Jul 2015 - 5:04 pm | दमामि

वा! आवडली!

पथिक, रातराणी, एक एकटा एकटाच,दमामि
खूप खूप धन्यवाद

मदनबाण's picture

14 Jul 2015 - 12:17 pm | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर

अनुप ढेरे's picture

14 Jul 2015 - 12:26 pm | अनुप ढेरे

आवडली कविता!

तिमा's picture

14 Jul 2015 - 12:38 pm | तिमा

कविता आवडली. वर तेजाबा संबंधी बरीच चर्चा झाली आहे म्हणून लिहितो.
तेजाब हे कधीच वाफाळणारे नसते.(सल्फ्युरिक अ‍ॅसिड)
३५ टक्क्याचे हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड किंवा ९८ टक्क्यांचे नत्राम्ल (नायट्रिक अ‍ॅसिड) मात्र वाफाळणारे असते.

drsunilahirrao's picture

16 Jul 2015 - 9:49 am | drsunilahirrao

@मदनबाण,अनुप ढेरे,तिमा
खूप धन्यवाद.

तिमाजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल विशेष आभार