राहिले रे अजून देश किती?
ट्वीटरावर तुझाच मेस किती!
आजची रात्र ब्रिक्स देशांची
आज टोप्या किती नि ड्रेस किती ?
मी कसे शब्द थोपवू त्यांचे?
भाविका! लपवशील फेस किती?
ट्वीट माझे विरंगुळा त्यांचा
ट्रॉल्सना मी करेन फेस किती?
बोलताना कुणीतरी हसले
पेटले भक्त ते विशेष किती!
हे असे गेम? ही अशी भाषा?
मी धरावे अजून वेश किती?
रोज त्यांना करून ब्लॉक, सख्या!
मी करू पोलिसांत केस किती?
-- स्वामी संकेतानंद
९ जुलै, २०१५
( पळतो आता................)
प्रतिक्रिया
13 Jul 2015 - 12:45 pm | एस
हाहाहा! पळा पळा... या देशांच्या यादीत अधूनमधून 'भारत' याही गरीब बिचार्या देशाचा समावेश असला म्हणजे मिळवले!
13 Jul 2015 - 1:08 pm | स्वामी संकेतानंद
व्यक्तिश: मी मोदींच्या विदेशनितीचा फ्यान आहे. नुकताच केलेला मध्य आशियाई देशांचा दौरा हा मास्टरस्ट्रोक आहे. आधीच्या सगळ्याच शासनांनी तिकडे दुर्लक्ष केले. खरे तर यु एस एस आर च्या विघटनानंतरची पोकळी भरायला भारताने पुढाकार घ्यायला पाहिजे होता. मोदींचे सगळेच दौरेच आवश्यक आहेत.भाषणात मोदींचे क्वचित वाहत जाणे क्षम्य नाही(पंतप्रधान आहेत ते) पण एकदंर दौरे भारतासाठी लाभदायक ठरतील. पण याचा अर्थ आम्ही दोन-चार जोक मारू नये असा होत नाही.. ;) आणि उरलेले शेर मोदींपेक्षा जास्त भक्तमंडळींवर किंवा ट्रॉल्सवर आहेत.. :)
13 Jul 2015 - 1:28 pm | एस
शेम शेम.
बाकी आधीच्या सरकारांनी मध्य आशिया आणि एकूणच परदेशनीतीकडे दुर्लक्ष केले हे म्हणणे पुरेशा माहितीअभावी आले असावे. मध्य आशियात भारताचा सामरीक विमानतळ आणि सुखोई स्क्वाड्रन आहे. अजूनही मुद्दे आहेत, पण कवितेचा लाईट मूड घालवत नाही.
13 Jul 2015 - 1:37 pm | स्वामी संकेतानंद
माहीत आहे मला. तरीही त्या भागाकडे आपण नव्वदीनंतर 'पुरेसे लक्ष' दिले नाही यावर ठाम आहे. :)
असो. चर्चेचा हा धागा नाही.
13 Jul 2015 - 1:41 pm | स्वामी संकेतानंद
आणि हो, एकूणच विदेशनितीकडे पूर्वीच्या शासनांनी दुर्लक्ष केले असे म्हणायचे नाही, ते विधान फक्त मध्य आशियाबद्दल होते.. मनमोहनसिंग स्वत: बरेच सक्रीय होते. कुठलाही पंतप्रधान परराष्ट्र धोरणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही हो.. :)
असो. असो...असोच.....
13 Jul 2015 - 12:48 pm | पैसा
खिखिखि! खुखुखु!! खोखोखो! ख्याख्याख्या!!!!
या निमित्ताने पंतप्रधानांच्या स्वगताला "तुम तो ठहरे परदेसी" गाणे वाजवून मार खाणार्या बँडवाल्यांबद्दलचा जोक आठवला!
13 Jul 2015 - 12:51 pm | नाखु
आणी बिनपाण्याने.. पुलेशु
चमन नाखु
13 Jul 2015 - 1:00 pm | काळा पहाड
मेस म्हणजे?
13 Jul 2015 - 1:03 pm | स्वामी संकेतानंद
सावळागोंधळ... एम इ एस एस
13 Jul 2015 - 1:10 pm | पुण्याचे वटवाघूळ
आपण पुणे महापालिकेत उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत हे विसरून अमेरिकेची आर्थिक घडी बसविण्यासाठी काय करायला पाहिजे यावर लेक्चर झोडता आले पाहिजे. त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीवर-- आपल्याला कळो की न कळो, त्यामागची गुंतागुंत आपल्या कितीही प्रकाशवर्षे डोक्यावरून जाओ, टिका करता आली पाहिजे. अन्यथा पुरोगामी, विचारवंत, विश्लेषक इत्यादी इत्यादी कसे म्हणवता येणार?
एकदम रद्दड.
13 Jul 2015 - 1:34 pm | स्वामी संकेतानंद
विनोदबुद्धी देगा देवा| कमेंटलाइकांचा रवा||
कृपया वर मी स्वॅप्स ह्यांना दिलेला प्रतिसाद वाचावा.
13 Jul 2015 - 1:48 pm | विशाल कुलकर्णी
तथास्तु ;)
13 Jul 2015 - 3:02 pm | खेडूत
उंदीरमामांचा उप्रोध हाय ओ त्यो!
बाकी कविता आवडली .
पुकप्र !
13 Jul 2015 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
स्वामिज्जी की म'हान रचनांएं। :-D
13 Jul 2015 - 2:52 pm | प्यारे१
खिक्क्क!
काय ओ स्वामीजी? आज एका देशाचा उद्या दुसऱ्या देशाचा ऎसे दौरे पंतप्रधान स्वत: ठरवून जातात का? की सगळा सेट अप असतोय आणि मुख्य म्हणजे त्यामागे काही उद्देश्? ;)
13 Jul 2015 - 3:12 pm | सूड
सुंदर!!