USA it is ...

Jack_Bauer's picture
Jack_Bauer in जनातलं, मनातलं
26 Jun 2015 - 9:52 pm

हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही त्रुटी असल्यास नक्की सांगा, पुढच्यावेळी त्या टाळण्याचा प्रयत्न करेन.
---------------------------------------------------------------------------------------------
हा माझा अनुभव २०१० मधील आहे.

१५ जुलै २०१० ला माझा F१ वीसा मंजूर झाला आणि एकच घाई उडाली. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्या बाबतीत संन्याश्याचं लग्न जरी नसलं तरी तयारी मात्र खूप करावी लागली. खरेदी, डॉक्टर, औषध, पैश्याची व्यवस्था, तुटपुंजा का होईना पण स्वतः पुरता स्वयंपाक शिकणे, बॅग भरणे, वजनात ती बसवणे इत्यादी गोष्टी करून झाल्यावर शेवटी एकदाचा १९ ऑगस्ट उजाडला. आई बाबांचा एअरपोर्ट वर निरोप घेउन मी आत गेलो. आत गेल्यावर पहिली चिंता म्हणजे बॅग्ज वजनात बसतील की नाही? घरी वजन केले होते पण तरीही धाकधूक होतीच. नाही बसल्या तर काय करायचं ह्याचा प्लान चालू होता पण ती वेळ आली नाही, माझ्या बॅग्ज कार्गो लगेज मधून USA साठी रवाना झाल्या. आता ह्यांच दर्शन USA मध्येच ! तेवढ्यात Columbia University ला जाणारे माझे मित्र भेटले, मग काय निवांत गप्पा चालू झाल्या. केबिन बॅगेजचं सिक्यूरिटी चेक पास करून आम्ही वेटिंग एरिया मध्ये आलो. तिथे थोड खाउन घेतलं तेव्हड्यात आमच्या विमानाची घोषणा झाली. विमानामध्ये बसलो.

परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ! विमानाची वेळ रात्री १ वाजताची होती. १ वाजता विमानाने टेक-ऑफ करायला हवे होते पण काय झाल काय माहित? तशी काही चिन्ह दिसेनात! मग एक रुबाबदार दिसणारा माणूस स्विस एयरवेजचा शुभ्र पांढरा ड्रेस वगेरे घातलेला आला आणि त्यानी प्रवासी मोजायला चालू केलं. थोड्या वेळानी समजलं की प्रवाश्यांचा काउंट हा त्याच्या रिकॉर्ड मध्ये असलेल्या काउंटशी जुळत नाहीये. म्हणजे राहिलं वाटतं कोणी तरी खाली.. माझ्या मनात विचार.. च्यायला कोण पनवती आहे हा ? पण ५ मिनिटांनी विमान चालू झाले. मला खिड़कीची जागा मिळाली होती. विमान बराच वेळ रनवेवर फिरत राहिले. कधी नागमोडी कधी सरळ, इकडून तिकडे.. सरळ जायला लागल की वाटे आत्ता उड़ेल पण कुठच काय ? विमान खुप वेळ फिरून एक जागी जावून थांबल! हे काय? परत काय गडबड झाली की काय ? असा मनात विचार येत असतानाच विमान परत पुढे जाऊ लागले. पायलट ने गेअर बदललेले लक्षात आले. विमानाचा वेग आता खुप वाढला आणि बघता बघता प्रचंड वेगाने विमान आकाशात झेपावल! आणि क्षणार्धात रात्रीची झगमगणारी मुंबई मला दिसू लागली. माझ्या मातृभूमीचे हे ह्या वेळासाठीचे शेवटचे दर्शन!! सुन्दर अर्धचंद्राकृति दिसणारा तो मरीन ड्राइव्ह, रात्रीच्या दिव्यानी सजलेला तो वांद्रे वरळी सागर सेतू! डोळ्याआड़ जाईपर्यंत बघत होतो. हळूहळू मी आणि मुंबई ह्यांच्या मध्ये ढगांचा पड़दा आला. गुड बाय इंडिया....

आता मी विमानाच्या आत लक्ष देवू लागलो. माझ्या समोर एक स्क्रीन होती आणि माझ्या डाव्या हाताच्या आर्मरेस्ट खाली एक रिमोट होता. त्या रिमोट ची फ़क्त दोनच बटन दबता येत होती. prev आणि next. बाकीची बटन हॅन्डलच्या खाली होती. हे काय? काय कळेना.. बराच वेळ खटाटोप केल्यावर लक्षात आल की त्या आर्मरेस्टच्या बाजूला एक गुप्त बटन आहे ते दाबल की ते रिमोट आपोआप वर येत!! हे कळेपर्यंत दुबई निघून गेल होत! मग त्या TV वर थोडा टाइमपास करून मग मी झोपलो.

सकाळी ६ वाजता Zurich एअरपोर्ट वर आम्ही आलो. उतरण्याआधी सर्वांना स्विस चोकलेट दिली. मी माझे ते पँटच्या खिशात ठेवले. अमेरिकेला जाणारे विमान सुटायला अजून ५ तासाचा अवधी होता. ढगाळ हवा होती. परदेशात आल्याची पहिली जाणीव मला रेस्टरूम मध्ये गेल्यावर झाली!!! डिटेल्सची गरज नाही पण नको तिकडे वाट्टेल तितकं पाणी आणि हवं तिथे साधा एक वॉटरजेट नाही? काय घाणेरडा प्रकार! पण लक्षात आलं आता इथून पुढे सगळीकडे हे असंच, असो.

माझ्या पुढच्या फ्लाइटला ५ तासाचा अवधि होंता त्यामुले बराच वेळ मी Zurich एअरपोर्ट आणि (पुलंच्या भाषेत ) तिथली चालती बोलती प्रेक्षणीय स्थळ पाहत बसलो. माझी पुढची फ्लाईट स्विस एयरवेजचीच होती.. Zurich - JFK .. विमानात फक्त एकूण ४ इंडियन होतो बाकि सर्व गोरे लोक! विमान दिवसा १२ वाजता असल्याने ९ तासांचा प्रवास पूर्ण झगझगीत सूर्यप्रकाशात झाला. मला Emergency exit row मधली aisle सीट मिळाली होती, विमानात लंच दिला पण माझ्या सीटला ट्रे दिसेना.. च्यायला ही काय नवी कटकट? मी बराच प्रयत्न केल पण मला माझा ट्रे कुठेही दिसेना! शेवटी मी एयर होस्टेसला बोलावलं आणि तिने हँडलवरचं एक छोटंसं अगदी छोट, बटन दाबल आणि माझ्या आर्मरेस्ट खालून तो ट्रे जादुगाराच्या टोपितुन ससा निघावा तसा बाहेर आला ! त्या एयर होस्टेसने माझ्या कड़े बघून एक smile दिला आणि निघून गेली.. मी पण तिच्या कड़े लक्ष न देता समोर आलेल्या लंच वर focus केल . निवांत जेवलो, मस्त apple juice वगेरे घेतला आणि आता परत ते बटन दबला अन तो ट्रे काही आत जायला तयार नाही, बरेच प्रयत्न केले पण नाहीच! श्या.. परत एयर होस्टेस , परत तेच smile ..तिने एक बोटाने एक स्प्रिंग दाबली आणि झटकन तो ट्रे handle च्या आत गेला !!! पुन्हा तेच smile देत ती निघून गेली !

१० तासाच्या प्रवासानंतर दुपारी ४ ला न्यूयॉर्क JFK ला पोहोचलो. आत्तापर्यंत एकूण २१ तासाचा प्रवास झाला असल्याने खरच खूप कंटाळा आला होता आणी तिथे immigration च्या लाइनमध्ये १ तास ३० मिनिटे उभे राहून अगदी अंत पाहिल्यावर माझा एकदाचा नंबर आला. तेवढ्यात एक मुलगी माझ्या पुढे आली आणि पुढे घुसली मी काही बोलायच्या आत ती पोहोचली पण काउंटरपाशी!! मी मनात विचार केला.. ओके ladies फर्स्ट… बहुदा तिला कशाची तरी घाई असावी ! ५ min झाली पण ती काही काउंटरवरून हटेना. तिची आणि त्या ऑफिसरची काही तरी बाचाबाची झाली, ती पुढे निघून गेली म्हणुन मी काउंटर पुढे आलो तर तो ऑफिसर एकदम heavy bass effect असलेल्या त्याच्या आवाजात म्हणाला , "one at a time , I will call your name then come, step back" वाह, अमेरिकेतलं पहिलं स्वागत ! ती मुलगी काउंटर पुढेच घुटमळत होती , तो ऑफिसर तिला म्हणाला "I have asked you to go and see the authority, why you are standing here ? Don't waste my time, go !" छान , म्हणजे हा माणूस आधीच तापलाय आणि आत्ता आपण त्याच्या पुढे , all the best dude.. त्याने माझा पासपोर्ट आणि वीसा डोळे बारीक़ करत पहिला, त्याच्या कंप्यूटर वर काहीतरी टाइप केला आणि १-२ मिनट भयाण शांततेत गेल्यावर त्याने माझा पासपोर्ट परत केला with DS-94 i.e. Entry to USA is permitted! चला एक काम तरी झाल.. आता कस्टम ऑफिसर .. त्याने परत माझा वीसा चेक केला आणि काहीही न विचारता OK असा इशारा दिला आणि मी तिथून सुटलो.

बॅग्ज घेउन बाहेर आलो, आता मित्राला फ़ोन करायचा होंता की मी टॅक्सी घेउन येतोय तू घरीच रहा. तशी मी त्याला भारतात असतानाच आधीच कल्पना दिली होती पण आता पोहोचल्यावर फोन करा म्हणून मी माझा मोबाइल काढला , आणि पाहतो तर काय ? मी जे ग्लोबल calling कार्ड घेतल होंता (₹२०००/- देऊन ) त्यात बॅलन्सच नव्हता!! त्या कॉलिंग कार्ड वाल्यांनी तर सांगितलं होतं की तिथे जाऊन फोन ऑन करा लगेच नेटवर्क पकडेल, बॅलन्स तर आहेच तुमचा, लगेच वापरायला सुरवात करू शकता, इथे नेटवर्क तर आहे पण कॉल केलं तर बॅलन्स शून्य दाखवतोय. आता फ़ोन कसा करू? थोडा विचार केला, तिथल्या एक काउंटर वरून $१० भरून calling कार्ड घेतल , आणि पे फ़ोन पाशी गेलो . मला वाटल हे डेबिट कार्ड सारखा आहे आणि आता आपण हे कार्ड insert करून त्यातील balance असेपर्यन्त बोलू शकू पण पाहतो तर काय ? तिथे coin insert करायला slit नाही की कार्ड swipe करायला slot नाही, आता कॉल करू कसा ? तिथे आपला अड़ाणीपणा समोर आला, लोक माझ्या कड़े एवढा शिकला सवरलेला दिसतोय आणि साधा फ़ोन नाही लावता येत असा विचार करतात की काय असा मला वाटलं! जिथून ते कार्ड घेतल तिथली बाई कुठेतरी गेली होती.

शेवटी मी तिथे गस्त घालणाऱ्या एक पोलिस ऑफिसरला बोलवलं आणि मला ह्या नंबर वर ह्या कार्ड थ्रू कॉल करायचा आहे, हेल्प करा असा सांगितल. तिने ते कार्ड घेतल आणि अमेरिकेच्या झेंड्याची डिजाईन असते त्यावरून तिचे नख घासले आणि त्या मागे एक पिन कोड लपला होंता तो तिने ड़ायल केला. लाईन ओपन झाली आणि मग मित्राचा नंबर लावला, २ min च काम आणि मी २० मिनिट त्या फ़ोन बूथ वर खेळत होतो त्या फ़ोनशी , कधी फोन खाली बघ कधी वर, कुठे कॉइन टाकता येतो का, कुठे कार्ड टाकता येता का.. पण शेवटी एकदाचा बोलण झाल आणि त्या पोलिसला धन्यवाद देऊन मी तिथून exit च्या दिशेने चालू लागलो, १० मिनिट चालत गेलो तर एक अतिशय धिप्पाड कृष्णवर्णीय समोर आला आणि म्हणाला "where you want to go?" मला एकदम पुणे स्टेशन मधून बाहेर आल्यावर रिक्शावाले जसे अंगावर येतात त्याची आठवण झाली. अमेरिकेला जायच्या आधी बर्याचजणांनी अश्या लोकापासून सावध राहायला सांगितला होत. मी त्याला चुकवायला म्हटलं "No" आणि पटकन बाजूला असलेल्या रेस्टरूम मध्ये घुसलो :) थोड्या वेळाने डोकावून पाहिले तर तो निघून गेला होंता.. मी बाहेर पडलो आणि एअरपोर्टच्या एक्सिट मधून बाहेर आलो .. वाह.. २३ तासां नंतर नैसर्गिक हवा आणि सूर्यप्रकाश.. मी छाती भरून श्वास घेतला, आणि मनात म्हटलं..

शेवटी गाठली एकदाची अमेरिका !!!! Welcome to USA .....

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 9:59 pm | मुक्त विहारि

मस्त...

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2015 - 10:08 pm | श्रीरंग_जोशी

ही अनुभवकथनपर लेखमालिका असेल असे वाटत आहे.

सुरुवात आवडली. मिपावर स्वागत आहे.

संदीप डांगे's picture

26 Jun 2015 - 10:09 pm | संदीप डांगे

एकदम मस्त लिहिलंय... इनोसंट इट इज..

हाहाहा, सुरुवातीला असे अनुभव येतात च. छान झालीये सुरुवात. आमची खरड फळ्यावर पण अशी एक चर्चा रंगली होती.

१० मिनिट चालत गेलो तर एक अतिशय धिप्पाद नीग्रो समोर आला....Are you stupid? Means if you have stayed in USA…and still using N word, then I feel pity about you. And this what you are teaching others that it’s OK to use N word in America. By the way did you buy that guy somewhere or someone else bought him. Common….grow up

Jack_Bauer's picture

27 Jun 2015 - 12:21 am | Jack_Bauer

आपले म्हणणे मान्य. माझ्या मनात २०१० साली जे काही आले होते ते तसेच्या तसे लिहिले आहे. भारतात असताना हा एकच शब्द २०१० मध्ये माहित होता आणि त्या शब्दाचा एकच अर्थ माहित होता . इथे अमेरिकेत आल्यावर आपसूक कुठले शब्द वापरायचे आणि कुठचे नाही हे माहीत झाले.

चिगो's picture

26 Jun 2015 - 10:49 pm | चिगो

मिपावर स्वागत.. छान लिहीलंय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत (ह्यापुढे पुभाप्र) ;-)

उगा काहितरीच's picture

26 Jun 2015 - 10:56 pm | उगा काहितरीच

वा शुद्धलेखन छान आहे.

स्वीत स्वाति's picture

27 Jun 2015 - 9:01 am | स्वीत स्वाति

लेखकाचे अनुभव वाचायचे सोडून यांचे लक्ष शुद्धलेखनात ।
हा हा हा .....

उगा काहितरीच's picture

27 Jun 2015 - 11:39 am | उगा काहितरीच

त्यांचा पहिलाच प्रयत्न ना ? त्यामुळे तसं लिहीलं यात हसण्यासारखं काय आहे ? (लेख मुक्तपिठीय वाटला असे स्पष्ट लिहीले असते तर चालले असते का ? ) आणि हो लेख (?) वाचल्याशिवाय का शुद्धलेखन कळाले ? रच्याकने माझा आयडी उगा काहितरीच असा आहे.

जुइ's picture

27 Jun 2015 - 12:09 am | जुइ

इथे येतानाच्या पहिल्या प्रवासाची आठवण करून दिली.

हामेरिका हामेरिका म्हणतात ती हीच! लेखन आवडले.

लेखन आवडले.पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

पाटील हो's picture

27 Jun 2015 - 10:08 am | पाटील हो

छान लिहीलंय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत

मृत्युन्जय's picture

27 Jun 2015 - 10:18 am | मृत्युन्जय

मिपावर स्वागत.

अमितसांगली's picture

27 Jun 2015 - 10:40 am | अमितसांगली

मस्त लिहलय...

योगी९००'s picture

27 Jun 2015 - 11:31 am | योगी९००

मिपावर स्वागत...!!

तुमचा पहिलाच लिखाणाचा प्रयत्न आवडला.

पण एक सल्ला देतो की तुम्हाला आलेले प्रवासातले वेगळे अनुभव लिहा. जे वरील काय लिहीले आहे त्याने कुणाची तरी रोजनिशी वाचतो आहे असे वाटते. स्विस चॉकलेट मिळाले काय, ते पँटच्या खिशात ठेवले काय, बटन दाबून ट्रे समोर आला आणि स्प्रिंग दाबून आत गेला काय, एअर हॉस्टेस ने स्माईल काय दिले. हे वर्णन एकदम रोजनिशी टाईप लिखाण झाले. मला वाटले की पँटच्या खिशात ठेवलेल्या चॉकलेटमुळे तुम्हाला पुढे काही त्रास झाला किंवा काही गंमत झाली असे समजून मी पुढे पुढे वाचत संपुर्ण लेख वाचला...!!

इरसाल's picture

27 Jun 2015 - 12:33 pm | इरसाल

मला वाटले की पँटच्या खिशात ठेवलेल्या चॉकलेटमुळे तुम्हाला पुढे काही त्रास झाला किंवा काही गंमत झाली असे समजून मी पुढे पुढे वाचत संपुर्ण लेख वाचला...!!

ते चॉकलेट मे बी पिरघळले असेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jun 2015 - 1:21 am | निनाद मुक्काम प...

एक सल्ला देतो
कुणाचाही सल्ला मनावर घेऊ नका
माझा सुद्धा
तुमची लिखाणाची जी नैसर्गिक शैली आहे तीच कायम ठेवा
येथे कोणीही व्यावसायिक कथा पठकथा लिहित नाही.
आपले मनोगत व्यक्त करावे मिपाकारणी ते वाचावे कधी डोक्यावर घ्यावे तर कधी ,,,
मिपावर स्वागत असो
फक्त एकच सल्ला
लिहिण्यात खंड पडू देऊ नका
अमेरिकेचे प्रवास वर्णन अनुभव वाचायला आवडतील
युरोप चे दिवसा आड वाचायला मिळते

श्रीरंग_जोशी's picture

30 Jun 2015 - 1:37 am | श्रीरंग_जोशी

निनादच्या सल्ल्याला अनुमोदन. बिनधास्त लिहा स्वतःच्या शैलीत.

भारतीय विद्यार्थ्याच्या नजरेतून अमेरिकेतील अनुभव वाचायला आवडतील.

द-बाहुबली's picture

27 Jun 2015 - 11:33 am | द-बाहुबली

आपण हे लिखाण २४ एपिसोडमधे लिहले असते तरा आपल्या नावाला(ID ला) साजेशे ठरले असते असं राहुन राहुन वाटुन जातयं.. ;)

तिमा's picture

27 Jun 2015 - 11:55 am | तिमा

नांवावरुन मला असं वाटलं की तुम्हाला मिपावरचा, 'बॉरं' हा छ्दमी उच्चार माहिती आहे.

रामदास's picture

27 Jun 2015 - 1:29 pm | रामदास

आता फारसा वेळ न घालवता पुढचा भाग लिहा. शैली आणि शूध्दलेखन आपोआप सुधारत जाईल.
आर्मरेस्टच्या बाजूला एक गुप्त बटन आहे ते दाबल की ते रिमोट आपोआप वर येत!! हे कळेपर्यंत दुबई निघून गेल होत!
किंवा नको तिकडे वाट्टेल तितकं पाणी आणि हवं तिथे साधा एक वॉटरजेट नाही? काय घाणेरडा प्रकार! पण लक्षात आलं आता इथून पुढे सगळीकडे हे असंच, असो.

असे गमतीदार अनुभव सुरुवातीला सगळ्यांनाच येत असतील नाही का ? या लेखाच्या निमित्ताने बाकीच्या सभासदांनी पण आपले अनुभव लिहावेत ही विनंती

इशा१२३'s picture

27 Jun 2015 - 10:27 pm | इशा१२३

मस्त लिहिलेत अनुभव..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2015 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर स्वागत !

छान लिहीले आहे. पुभाप्र.

मदनबाण's picture

28 Jun 2015 - 9:05 am | मदनबाण

मस्त ! :)
तिथली चालती बोलती प्रेक्षणीय स्थळ पाहत बसलो.
अरेरे... उगाच जुने दिवस आठवले ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2015 - 2:13 pm | श्रीगुरुजी

छान लिहिलंय.

मी पहिल्यांदा देशाबाहेर प्रथमच गेलो ते अमेरिकेला. पुण्यातील घर सोडल्यापासून अमेरिकेत पाय ठेवेपर्यंत तब्बल ४८ तास लागले होते व खिशात ५० डॉलर्स सुद्धा नव्हते. एक फ्लाईट डिले झाल्याने पुढच्या सर्व फ्लाईट्स चुकल्या होत्या. परदेश प्रवासाचा शून्य अनुभव, विमान प्रवासाचा शून्य अनुभव, परकीय चलन वापरायचा शून्य अनुभव, परदेशातून फोन करण्याचा शून्य अनुभव इ. तून तरलो. जमलं तर सविस्तर अनुभव लिहीन.

आदिजोशी's picture

29 Jun 2015 - 2:25 pm | आदिजोशी

अनेक भागांच्या लेखमालेसाठी शुभेच्छा :)

अविनाश पांढरकर's picture

29 Jun 2015 - 3:04 pm | अविनाश पांढरकर

तुमचा पहिलाच लिखाणाचा प्रयत्न आवडला.

तुडतुडी's picture

29 Jun 2015 - 4:02 pm | तुडतुडी

झकास !!
बटन दाबून ट्रे समोर आला आणि स्प्रिंग दाबून आत गेला काय, एअर हॉस्टेस ने स्माईल काय दिले. हे वर्णन एकदम रोजनिशी टाईप लिखाण झाले.>>>
मला नाही असं वाटत . पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार्यांना काय गमतीदार प्रोब्लेम्स येवू शकतात हे चांगलं लिहिलंय.

मधुरा देशपांडे's picture

29 Jun 2015 - 4:11 pm | मधुरा देशपांडे

छान लिहिलंय. अनेकांच्या पहिल्या परदेश प्रवासाच्या आठवणी जागवतील.

पैसा's picture

1 Jul 2015 - 6:55 pm | पैसा

लिहा अजून पटापट!

आमचा पहिला परदेशप्रवास पण हामेरिकाच, पण कवतिकानं सांगावेत असे काही अण्भव आले न्हवते. कदाचित आजूबाजूला सगळी सावरुन घेणारी असल्यामुळे!!

सविता००१'s picture

1 Jul 2015 - 8:49 pm | सविता००१

मला आवड्लं. आणि मलाही ते रोजनिशीसारखं नाही वाटलं.येउद्या अजून.