लहानपणापासून पहात होतो मी तिला
लोक सांगायचे कि ती वेडी आहे
खायला काळ आणि भुईला भार अशी
एक बिन अकलेची घोडी आहे
मेंदूने असहकार पुकारला असला
तरी शरिराने आपल कर्तव्य बजावलं होतं
तिच्या निरागस मनाला न जुमानता
तिला ज्वानीच्या बाजारात आणलं होतं
एका ओल्या काळरात्री गावाच्या वेशीवर
ती भांबावलेली सैरभैर रडवेली दिसली
मला पहाताच " आई गर्दीत हरवली"
निरागसपणे सांगुन दात विचकून हसली
अश्याच संधीच्या शोधात मी देखील होतो
म्हटलं मनात की शिकार आयतीच गवसली
क्षणातच तिच्या गोबर्या गालावर वळ उमटले
मुस्काट दाबून तिला झुडूपांत फरफटवली
पाऊस आता बेभान कोसळत होता
मला अडवायला जिवाचे रान करत होता
त्याच्या राज्यातले हे वासनेचे कौर्य पाहुन
चंद्र ही ढगांच्या आड तोंड लपवत होता
बर्याच वेळाने तो बिभीत्स खेळ थांबला
धरणी हळहळली,आसंमतानेही निषेध नोंदवला
त्या विटंबित झालेल्या कलेवराची
निर्जीवता बघुन माझ्याही काळजाचा ठोका चुकला
सावरताच स्वतःला घडलेल्या कृत्याची सल बोचली
आपल्या पापाचा पुरावा तिथेच गाडुन धूम ठोकली
थोडे दिवस चाललेली गडबड बिनबोभाट थंडावली
त्यावेळी मी ही सुखावलो "चला नसती ब्याद टळली"
त्या रात्री केव्हातरी गडगडाटाने दचकून जाग आली
पाहिल तर बाहेर पाउस अन कोपर्यात ती उभी होती
विजेच्या लखलखाटात ओठांवर गहिर हास्य नाचवत
थिजलेल्या डोळ्यांनी पहात, दात विचकून हसत होती.
प्रतिक्रिया
11 Apr 2015 - 11:31 pm | टवाळ कार्टा
आयला...तो स्पा एक न आता तुम्ही
मिपावर भयकथांचा मोसम सुरु झाला कै
12 Apr 2015 - 1:21 am | अत्रुप्त आत्मा
@मिपावर भयकथांचा मोसम सुरु झाला कै>> अगदी अगदी..!
12 Apr 2015 - 6:51 am | पॉइंट ब्लँक
+१.
12 Apr 2015 - 9:50 am | एक एकटा एकटाच
भयकथांचा मौसम.......
खरच करायला काय हरकत आहे.
विनोदी कथा
प्रवास वर्णन
व्यक्तीचित्रण
ललित
ह्याप्रमाणे
भयकथा ह्यासाठी एक प्रयत्न करायला काय हरकत आहे.
धारप, मतकरी त्याच बरोबर मिपा वरचे ही बरेच लेखक उत्कृष्ट भयकथा लिहितात.
निदान एका थोड्या काळापुरत तरी आमच्यासारख्या भयकथा वाचणार्यांची चैन होईल.
बाक़ी
प्रतिसादासाठी मनपुर्वक आभार
12 Apr 2015 - 8:19 am | स्पा
बाब्बॊ
भयकविता पयल्यांदाच वाचली.
डेंज्जर
12 Apr 2015 - 9:58 am | एक एकटा एकटाच
धन्यवाद
"स्पा"
30 Jun 2015 - 10:53 am | जडभरत
भयानक रसात पार बुचकळून काढलेली कविता आहे. ३ए भाऊ, तुम्ही भयकथा का लिहित नाही. मस्त लिहाल याची खात्री आहे. असो, पण खूप छान सुचली आहे. (कविता ही लिहिली जात नसते, ती सुचतच असते, बरोबर नं!).
अशी अनेक खरी उदाहरणं आहेत. कवितेला छान म्हणणं बरोबर नाही, कारण जे कथानक आहे, ते खरंच मनाला भयचकित करणारं आहे.
30 Jun 2015 - 11:59 am | रातराणी
विदारक सत्य. अशा घटना अगदी राजरोस घडू शकतात हे केवढं दुर्दैव.
30 Jun 2015 - 12:19 pm | तुडतुडी
पुढे काय झालं ? खरंच मी पा वर भयकथा , गुढकथा आहेत आहेत . कुणीतरी मनावर घ्या कि लिहायचं
30 Jun 2015 - 8:23 pm | एक एकटा एकटाच
माझ्या माहितीत तरी मिपावर स्पा आणी विशाल कुलकर्णी ह्यांच्या भयकथा वाचा मजा येईल.
30 Jun 2015 - 8:24 pm | एक एकटा एकटाच
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
30 Jun 2015 - 8:56 pm | कविता१९७८
भयानक सत्य
18 Jul 2015 - 9:43 am | एक एकटा एकटाच
प्रतिसादासाठी धन्यवाद
18 Jul 2015 - 3:09 pm | पद्मावति
अतिशय प्रभावी लिहिलय. भयानक रस आणि करुण रस यांचं जबरदस्त मिश्रण.
18 Jul 2015 - 3:54 pm | प्यारे१
कविता थेट पोचते आहे!
त्रासदायक...
19 Jul 2015 - 10:25 am | वडाप
खुनी कवी मोकळ्या डोसक्यानी हितंबी फिरतायेत.
22 Jul 2015 - 4:45 pm | तुडतुडी
एक एकटा एकटाच, तुमचं जेवढं पण लेखन मी मि . पा वर वाचलंय ते सगळंच आवडलं . लिवा अजून . मस्त लिवताय
22 Jul 2015 - 8:38 pm | शब्दबम्बाळ
छान म्हणावस वाटत नाही पण कविता प्रभावी आहे!
23 Jan 2016 - 4:05 am | रसिकामहाबळ
ही तुझि सर्वात मस्त कविता आहे अमोल my all time favorite
23 Jan 2016 - 10:04 pm | एक एकटा एकटाच
धन्यवाद रसिका
23 Jan 2016 - 10:05 pm | एक एकटा एकटाच
सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे मनपुर्वक आभार
24 Jan 2016 - 11:01 am | जव्हेरगंज
मिपावरच्या बेस्ट कवितांपेकी ही एक!
जबरदस्त लिहीलीयं!
सुचलेल्या संधीचं सोनं केलंयं!
जियो!!!!
28 Jan 2016 - 3:32 am | एक एकटा एकटाच
धन्यवाद मालक
24 Jan 2016 - 11:58 am | दिनु गवळी
असे प्रसंग घडतात पन या जगात कविता आवडली
28 Jan 2016 - 3:32 am | एक एकटा एकटाच
जव्हेरगंज आणि दिनु साहेब
प्रतिसादासाठी आभार.