एखादे पुस्तक वाचल्यानन्तर त्यातील पात्रे आपल्याला भेटली तर किती बरे असे वाटत रहाते. आणि जर ते पुस्तक तुमच्या आवडत्या पुस्तकापैकी असेल तर मग विचारायलाच नको.
"चीपर बाय डझन" हे पुस्तक मी प्रथम किर्लोस्कर मासीकातुन तुकड्यातुकड्यात वाचले. मग नन्तर कधितरी ते आख्खे पुस्तक हातात लागले. आजतागायत त्याची पारायणे झाली तरी मनातुन अजून् सुटले नाही.
चीपर बाय डझन ही बारा भावन्डे आणि त्यांचे आईवडील यांची खरी कहाणी. त्या बारा भावंडांपैकी दोघानी सांगितलेली. आपल्याला आई वडीलानी कसे वाढवले; त्या सगळ्या गम्मती सांगतानाच पालकत्व कसे असावे हेही सांगणारी मस्त गोष्ट असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल.
फ्रॅन्क गिल्ब्रेथ आणि लिलीयन मोलर ही दोघे टाईम ऍन्ड मोशन स्टडीचे कन्सल्टन्ट. त्याना बारा मुले होती. इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी देताना करावे लागनारे सर्व प्राथमीक प्रयोग त्यानी आपल्या मुलांवर केले. यात गणीत शिकवण्यपासून ते भाषा शिकण्यापर्यन्त सर्व काही. मुलाना भाषा लवकर शिकता यावी तसेच मिळालेला प्रत्येक क्षण उपयोगात आणता यावा यासाठी मुले आंघोळ करताना भाषेच्या रेकॉर्ड्स लावुन ठेउन त्यांच्या कानावर भाषा पडावी किंवा झोपतानासुद्धा मुलाना सहजगत्या गणीताची सूत्रे डोळ्यासमोर दिसावीत म्हणून ती छतावर लिहुन ठेवणे यासारखे मजेदार उपाय त्यानी केले.
कारखान्यात हालचालींचे व्यवस्थापन शिकवताना सर्वात आळशी कामगार समोर ठेवा की तो कमीतकमी हालचालीत काम करतो असे भन्नाट पण उपयोगी युक्त्यांचा वापर करत.
बारा मुले घरात कशी एकमेकांची देखभाल करताना होणार्या गम्मती हा तर या पुस्तकाचा सर्वात धम्माल भाग.
शस्त्रक्रिया करताना सर्जनना स्वतःचावेळ वाचवता यावा म्हणून या गिल्ब्रेथ महाशयानी स्वतःवर शस्त्रक्रिया करतानाच्या फिल्म्स घेउन त्याचे ऍनालिसीस केले. तसेच दाढी करताना दोन्ही हातानी केल्यास १९ सेकन्द वेळ वाचतो असेही प्रयोग करुन पाहिले. प्रत्येक कामात हालचाली कमी वेळात करुन वेळ कसा वाचवता येईल याचे अनेक प्रयोग या पुस्तकात आहेत.
मुलाना श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून घरातल्या घरातच कामांचे लीलाव ( सर्वात कमी बोली बोलेल त्याला काम )करायची पद्धत किंवा कामाची वाटणी यातुन घराचे व्यस्थापन असे अनेक प्रसंग यात आहेत.
एकदा त्याना कोणीतरी विचारले की इतका वेळ वाचवुन करायचे काय? गिल्ब्रेथ महोदयाने उत्तर दिले मिळालेले क्षन आनन्दात जगायचे.फ्रॅन्क गिल्ब्रेथने दुसर्या महायुद्धाच्या कालात अमेरेकन सैन्याला हालचालींचे व्यवस्थापन कसे करायचे तेही शिकवले.
फ्रॅन्क गिल्ब्रेथच्या मृत्यु च्या घटनेवर हे पुस्तक संपते. पण त्याचे वेगवेगळे प्रयोग मनातुन कधीच संपत नाहीत
हे पुस्तक वाचुन झाल्यावर मी कोठेतरी वाचले की त्या बारा मुलांची आई लिलीयनला अमेरीकेत १९४७ सालचे लेडी ऑफ द ईयर हे पारीतोषीक मिळाले.
जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बारा मुलंची आई असलेल्या लिलीयनचे पुढे काय झाले याचा जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बेलीज ओन देअर टोज मध्ये बाप नसताना त्यांच्या आईने सगळ्याना कसे साम्भाळले;आणि त्यावेळी करावा लागलेला संघर्ष याबद्दल लिहिले आहे.
फ्रॅन्क गेल्यावर लिलीयन ने त्याचा इन्डस्ट्रीयल कन्सल्तन्सीचा व्यवसाय संभाळला.
एखादी "स्त्री" इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी करु शकेल यावर त्या काळच्या लोकांचा विष्वासच बसत नव्हता परिणिती कित्येक क्लायन्ट इतरत्र जाउ लागले. लिलीयनला आपणही कन्सल्टन्सी करु शकतो हे लोकाना पटवुन सांगावे लागायचे. एखादी स्त्री औद्योगीक सल्लागार असु शकते हे त्यावेळच्या अमेरीकन समाजाला पटतच नव्हते. लिलीयन ने तिची अनेक पुस्तके पती फ्रॅन्क गिलब्रेथ च्या नावावर लिहिले आहेत.
लिलीयनला तिच्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले.त्यात २० वेगवेगळ्या प्रकारच्या मानद पदव्या आहेत. १९२१ साली ती सोसायटी ऑफ इन्डस्ट्रीयल इंन्जेनीयर या संस्थेची पहिली महिला सभासद होती. फूट पेडल ट्रॅश कॅन आणि फ्रीज मधली कप्प्यांची दारे हे शोधही तिच्या नावावर आहेत. होममेकर ऍन्ड हर जॉब आणि लिव्हिन्ग विथ अवर चिल्ड्रेन ही दोन पुस्तके तिने केवळ गृहिणींसाठी स्वातन्त्र्य आणि जगण्याचा आनन्द कसा घ्यावा हे सांगत लिहिली. यात तिने घर ही एक आनन्दाची जागा आहे व्यक्तिमत्व खुलण्यासाठी आनन्दी घर गरजेचे आहे. आनन्दी घर राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलली तरच हे शक्य होते हे ठामपणे मांडले. वयाच्या नव्वद वर्षापर्यन्त लिलीयन कार्यरत राहिली. वेगवेगळ्या कम्पन्यांमध्ये संशोधन करत वेगवेगळ्या विद्यापीठात लेक्चर्स देत तिने काम केले. २ जानेवारी १९७२ ला वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी देहावसान झाले.
गृहिणी झाले की सम्पले चूल मूल हेच आपले करीयर न मानता स्वतःच्या बारा मुलांचे नीट संगोपनकरुनही लिलीयन अखंड कार्यरत राहिली. एक यशस्वी व्यक्ती म्हणून औद्योगीक जगाला तीची दखल घ्यायला लावली.
हॅट्स ऑफ टू लिलीयन गिल्ब्रेथ.
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'चीपर बाय डझन'पुस्तक परिचय आवडला.
त्यातल्या लिलीयनला माझाही सलाम !!!
-दिलीप बिरुटे
1 Dec 2008 - 3:12 pm | राघव
म्हणतो.
मलाही आता परत एक पारायण केल्याशिवाय राहवत नाहीये.
मुमुक्षु
1 Dec 2008 - 10:45 am | कपिल काळे
हो हे पुस्तक आहेच मस्त. लहानग्यांच्या नजरेतून बाबाचे टाइम - मोशन स्टडी वाचताना एक वेगळाच अनुभव येतो, बारा भावंडं असल्यामुळे घडणारे विनोदी प्रसंग तर धमाल.
http://kalekapil.blogspot.com/
1 Dec 2008 - 11:24 am | विसोबा खेचर
सुंदर परिक्षण..!
1 Dec 2008 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार
अप्रतिम !
थोड्याच वाक्यात अख्खे पुस्तक समोर मांडले आहेत. धन्यवाद.
पुस्तक वाचले नाहिये पण आता मात्र जरूर वाचीन.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
1 Dec 2008 - 1:06 pm | घाशीराम कोतवाल १.२
तात्याशी सहमत
असेच म्हण्तो
थोड्याच वाक्यात अख्खे पुस्तक समोर मांडले आहेत. धन्यवाद.
पुस्तक वाचले नाहिये पण आता मात्र जरूर वाचीन.
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
1 Dec 2008 - 1:20 pm | स्वाती दिनेश
चीपर बाय दी डझन ची डझनावारी पारायणे केली आहेत, तुमचे परीक्षण वाचून आणखी एकदा वाचायची इच्छा झाली आता...
स्वाती
1 Dec 2008 - 2:16 pm | श्रावण मोडक
म्हणतो. आज रात्री पुस्तक उघडावे लागणार.
1 Dec 2008 - 1:29 pm | विनायक प्रभू
ह्या पुस्तकाबद्दल समक्ष बोलू.
1 Dec 2008 - 3:18 pm | वेताळ
खुप सुंदर आहे.
वेताळ
1 Dec 2008 - 7:38 pm | संदीप चित्रे
आता पुस्तक वाचायलाच हवं... 'चीपर बाय दी डझन' नावाचा एक चित्रपट होता (स्टीव्ह मार्टिनचा).. अशीच बारा मुले असलेला पण मला वाटतं त्याचा विषय वेगळा होता ना? की तो चित्रपट ह्याच पुस्तकावर आधारित होता?
2 Dec 2008 - 9:04 am | विजुभाऊ
चीपर बाय डझन नावाचे एकूण तीन चित्रपट निघाले आहेत
त्यातला शेवटचा ७७ च्या आसपास निघाला आहे
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच