नमस्कार
कोल्हापुरी दादाचा पुन्हा एकवार रामराम
पहिल्या लेखाला एका तासात ५ प्रतिसाद वा......................
त्याच आनंदात हा दुसरा लेख
आमचा कोल्हापुरी माणुस अवधुत गुप्तेच्या एका झकास गाण्यावर......
कांदेपोहे
"आयुष्य हे चुलिवरच्या क्ढईतले कांदेपोहे'
सनई चौघडे या चित्रपटातील सध्या तूफान गाजत असलेले हे गाणे.अवधुतच्या संगीतामुळे तर हे गाणे गाजत आहेच .पण काय उपमा वापरली आहे गीतकाराने !
खरच,मानवी आयुष्य आहेच कांदेपोह्यांसारखे .जसे पोह्याचे प्रकार निरनिराळे तसेच प्रत्येक व्यक्ति निरानिराळी .प्रत्येक दुकानात मिळणार्या पोह्याप्रमाणे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा .प्रत्येकाची खासियत वेगळि.म्हणुनच दोन दुकानात ज्याप्रमाणे एकसारखा पोहा मिळणे अवघड त्याचप्रमाणे,एकाच स्वभावाची दोन माणसे मिळणे महाकठिण !
एखादा मनुष्य जीवन अनुभवत जाताना हळुहळु आयुष्यरुपी कांदेपोह्यांची डिश आकार घेत जाते .प्रथम पोहे चाळताना त्यातील दुर्गुण बाजूला सारले जातात .संस्कारदेखिल हेच काम करतात .चाळल्यानंतर त्याला भाजतात .म्हणजेच काय ,तर त्यालादेखिल विविध परिक्षाना सामोरे जावे लागते .या परिक्षातुन तावुन सुलाखून निघाल्यावर हळूच त्यात तिखट-मीठ मिसळले जाते .ते तिखट मीठ असते सुख दुःखाचे .त्यामुळेच त्या साध्याषा पोह्याना वेगळिच चव येते .हळूच त्यावर विनोदाची फोडणी टाकली जाते .ज्यामुळे आयुष्याला रंगत येते आणि तिखट मीठाचा समतोल साधला जातो .फोडणी आली म्हणजे डोळ्यातून पाणी काढणारे कांदे आलेच .पोह्याना ज्याप्रमाणे खरी चाव कांद्यामुळे मिळते त्याप्रमाणे जीवनाला खरी लज्जत मिळते ती या आनंदाश्रु व दुखाश्रुंमुळेच .या सर्वाना काळाच्या कढईत भाजताना कडू गोड आठवणिचा आस्वाद घेत पोहे मउ पडत जातात .जणू ते आयुष्याच्या सायंकाळी नम्र होत जाणार्या शरीर व मनाचे प्रतिनिधित्व करतात .मग यात लुटुपुटुच्या भांडणाचे ,रागाचे लिंबु पिळायचे ,चवीला गोड आठवाणिची साखर घालायची की झाले कांदेपोहे तैयार !
हो !पोह्यासारखेच असते आपले जीवन .ज्याप्रमाणे प्रत्येक घराच्या पोह्याची चव वेगळि त्याप्रमाणे प्रत्येकाचे आयुष्य वेगळे .प्रत्येकातिल पदार्थ तेच आसुनही कधी भट्टी जमते तर कधी जमत नही .जमलि तर जीवन रंगून जाते आणि नाही जमली तर ती व्यक्ति आनंदासाठी भटकत राहते .आणि समाजातील बघे पोहे खात खात या जीवनाची चर्चा करत बसतात .काय साम्य आहेना ! कदाचित प्रत्येक घरात बहुतांश वेळी कांदेपोहे केले जातात ते याचसाठी .जणू आयुष्याचा मंत्रच ते सांगतात .शेवटी काय तर प्रत्येकाचे कांदेपोहे नीट जमावेत आशी प्रार्थना करायची
विनायक पाचलग
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 1:37 pm | अन्जलि
आताच हे वाचले झकास वाट्ले. कल्पना मस्त आहे. गाण्याचा खरा अर्थ कळला मनापासुन पटले.
1 Dec 2008 - 2:41 pm | झकासराव
आयुष्य हे चुलिवरच्या क्ढईतले कांदेपोहे' >>>>>>>>>>
हे गाण मी अजुन कुठल्याच चॅनेल वर वै ऐकल नाहिये.
पण हेच गाण घरी बायको ओरडुन म्हणत आहे मागचे ४-५ दिवस आणि हे गाण डोक्यात गेल आहे एवढत कळतय सध्या.
फार किंचाळुन म्हणलय का हे गाण?
अवांतर : बाळा कोणत्या कालेजात जातुस?
मी कोल्लापुरचाच हाय. राजाराम, विवेकानंद, शा तं नि को
अशा तीन कालेजचा आनुभव हाय.
खरडवहीत संपर्क साधुया.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
3 Dec 2008 - 2:27 pm | विनायक पाचलग
धन्यवाद्.मी विवेकानन्द्चा आहे अशीच उत्तरे देत जावा