विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे
पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ...
ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी
मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ...
शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती
शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ...
राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला,
रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ...
कर्जात बुडलेला, गळफास लावताहे
आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...
प्रतिक्रिया
23 Jun 2015 - 11:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हे
आणि हे
खासचं
23 Jun 2015 - 12:39 pm | रातराणी
:( आज सगळे असं का लिहीत आहेत.
23 Jun 2015 - 1:06 pm | वेल्लाभट
टेक अ बो !
केवळ अप्रतिम ! शब्दच नाहीत.....
एक अन एक शेर खलास.
23 Jun 2015 - 2:16 pm | अत्रुप्त आत्मा
फारच छान!
23 Jun 2015 - 2:19 pm | दमामि
गेलीस तू रुसुनी, किचनात नाही कोणी
पाऊस आमटी अन पाऊस भात आहे
23 Jun 2015 - 3:04 pm | वेल्लाभट
वाह. राहवत नाही म्हणून...
झाले कठीण सारे काही विकल्प नुरला
जमले तसे करूनी मॅगीच खात आहे
24 Jun 2015 - 10:01 am | चुकलामाकला
:):)
24 Jun 2015 - 6:47 pm | दमामि
आमचेयेथे मॅगीचे चार पुडे उरले आहेत. एकावर तिन फ्री. कुणाला हवेत तर व्यनि करा. कुर्डुवाडी कट्ट्याला घेऊन येईन.
23 Jun 2015 - 2:53 pm | वेल्लाभट
आता न दाबतो मी, ओठांत भावनेला
ही मीच काढलेली माझी वरात आहे
का नाव गाव रूप, का शब्द कुणी तोला
वृत्तीत धर्म माझा, ह्रदयात जात आहे
24 Jun 2015 - 10:02 am | चुकलामाकला
वाह!
24 Jun 2015 - 2:51 pm | एक एकटा एकटाच
मस्त आहे
25 Jun 2015 - 4:43 pm | विशाल कुलकर्णी
छानच गझल...
मक्ता तेवढा सुधारून घ्याल. मक्त्याच्या उला मिसर्यात एक मात्रा कमी पडतेय, त्यामुळे वृत्तभंग होतोय. :)
25 Jun 2015 - 4:49 pm | चुकलामाकला
कर्जात बुडला जो, गळफास लावताहे...
25 Jun 2015 - 4:57 pm | वेल्लाभट
कर्जात बुडाला जो, गळफास लावताहे
आई जमीन त्याची, पाऊस तात आहे
किंवा
कर्जात बुडालेला, गळफास लावताहे
आई जमीन त्याची, पाऊस तात आहे
26 Jun 2015 - 7:51 am | चुकलामाकला
कर्जात जो बुडाला , गळफास लावताहे
असे हवे , बरोबर आहे .
26 Jun 2015 - 7:51 am | चुकलामाकला
कर्जात जो बुडाला , गळफास लावताहे
असे हवे , बरोबर का?
26 Jun 2015 - 9:23 am | विशाल कुलकर्णी
हा हे बरोबर आहे आता.
सर्व कडव्यांची लगावली "गागाल गालगागा गागाल गालगागा' अशी आहे. फक्त 'कर्जात बुडलेला.... मध्ये "गागाल ललगागा गागाल गालगागा" झाला होतं :)
26 Jun 2015 - 9:25 am | विशाल कुलकर्णी
वेल्लाभट, तुम्ही दिलेला पर्याय मात्रावृत्ताच चालु शकेल. पण ही गझल अक्षरगणवृत्तातली आहे, त्यामुळे इथे शब्दांचा क्रम समानच हवा. :)
26 Jun 2015 - 10:49 am | वेल्लाभट
परफ्याक्ट !
25 Jun 2015 - 6:06 pm | सटक
सुंदर!
राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला,
रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ...
क्या बात!
25 Jun 2015 - 9:31 pm | यशोधरा
26 Jun 2015 - 7:52 am | चुकलामाकला
धन्यवाद सर्वांनाच!
26 Jun 2015 - 10:02 am | पथिक
सुंदर!