सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते.
नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती.
बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई. शिक्षणासाठी शहरात आलो आणि माझ्या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करावाच लागे. यातुन फक्त उलट्या कमी होत गेल्या पण अढी तशीच होती.
यावेळेच मात्र माझ्या मातोश्र्ीकडुन सर्व नातेवाईकांना सुचना गेल्या होत्या की यावेस मला सिटी बसचा प्रवास घडवुन आणायचाच आणि कोणीही मला कुठेही सोडायचे नाही.
मी मावशीकडे उतरलो होतो आणि पुढच्या दिवशी जुरासिक वल्ड बघण्याचा कार्यक्रम माझ्या भाऊजींनी ठरवला. ते रक्षकचौकात रहात. आता यात मेख अशी होती की जर मला पिच्चर पहायचा असेल तर मला एकट्यालाच जावे लागणार होते. शेवटी हो ना करत डायनासोअरवरच्या पेमामुळे मी जाण्याचे ठरवले.
१२६ नंबरची बस तिथे पोहचते अशी मोघम माहिती मला दिली गेलेली होती. कुठून बसायचे ते ठिकाण सांगण्यात आले होते. फक्त बस पकडणे तिकीट काढणे आणि योग्य ठिकाणी उतरणे एवढी तिनच सोपी कार्ये पार पाडायची होती. पण माझ्यासाठी ती चक्क एका युद्धासमान होती.
मी त्या ठिकाणी पोहचलो. आणि पहिला झटका बसला.तिथे चार स्टॉप होतो. तिथे एका स्टॉपकडुन दुसरीकडे पळण्यात अर्धा तास गेला. तरीही त्यापैकी कुठला निवडावा हे कळेना. पुण्यात पत्ता विचारणे म्हणजे काय हे सुज्ञास सांगणे न लगे. मी मावशीला फोन केला. ती उचलेना. पत्ता विचाणे हेच आत नशीबी होते. शेवटी तो स्टॉप सापडला. तो त्या चारपैकी कुठलाच नव्हाता. मुळात तो स्टॉप आहे यावरच विश्वास बसेना. कारण तिथे माझ्यामागे फक्त एक झाड उभे होते.
मला फक्त १२६ हा आकडा माहिती होता. ती बस जर चुकली तर नेमकी कुणीकडे जाणारी बस पकडायची हा नवा प्रश्ण पडला कारण कोणत्याही बसवर सर्व थांबे लिहिलेले नसतात. तेवढ्यात एक बस माझ्याकडे येऊ लागली. आता तो १२६ नंबर नेमका कुठे असतो हा नवा प्रश्ण. जवळ येता येता तो नंबर मला दिसला आणी वैश्विक कोडे सोडविल्यासारखा आनंद झाला.एखाद्या चित्याला लाजवेल अशी झेप मी बसच्या पुढच्या दरवाज्यात मारली. अर्थात तो स्टॉप गर्दीचा नसल्याने मला कोणी अडवले नाही.
लगेच समोरच्या चालकाला प्रश्ण टाकला"ही बस रक्षकनगरला जाते ना?" " नाय" माझा ठोका चुकला. "रक्षकचौकात जाते. " माझा जीव समोरच्या सिटवर पडला.
आत पाहतो तर निम्मी सिट्स नव्हती. हा तिसरा धक्का. कंडक्टर माझ्याकडे येऊ लागला. " रक्षक.." या तिन शब्दानंतर माझा तोल गेला. मागे लेडीजसिटवर पडता पडता वाचलो. पाकीट काढुन तिकीट काढले आणि त्याच्याकडे माफक हसण्याचा करुण प्रयत्न केला आणि तो चौक आल्यावर सांगण्याची विनंती केली. एक करुण कटाक्ष टाकुन त्याने मूंडी हलवली आणि पुढे गेला.
काही वेळाने माझा शेजारचा माणुस उठणार आहे हे जाणवले. माझ्या पुढची आणि मागची माणसे बाह्या सावरु लागली. पण तमाम पुणेकरांच्या हातावर तुरी देऊन मी ती जाग बळकावली.
आता मोबाईलमद्ये मी माझी लोकेशन बघु लागलो.नेहमीप्रमाणे नेटवर्क नव्हते.मी नेटसाठी धीर धरायला शिकलो आहे. काहीवेळाने आम्ही बससहीत मुळानदीमद्ये आहोत असे गुगलने सांगितले. मोबाईलमद्ये अचानक आमची बस मुळानदीतुन बाहेर आली आणि फूटपाथवरुन चालु लागली.
आत तो चौक जवळ येत होता. मला त्या चौकात दोन रनगाडे आहेत एवढे आठवत होते. एखाद्या सैनिसारखी मी त्या रनगाडाची वाट पाहत होतो.
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला तो कंडक्टरचा होता. आमचे हावभाव बघून कंडक्टरच्या मनात करुणा दाटली होती म्हणुन आता पुढच्या चौकात उतरा हे सांगायला आमच्यापाशी आला होता. आम्ही अधिक करुणाभिनय केला असता तर त्याने आमचे पार्सल घरपोच पोहचवले असते असे वाटून राहिले.
शेवटी एकदाची बस थांबली. आम्ही थाटात उतरलो. समोरच्या रनगाड्यांना डोळेभरुन पाहिले. भाऊजी थोड्यावेळात येणार होते. त्यांनी मला रनगाड्या'खाली' उभे रहायला सांगितले होते तसा मी थांबलो आणि प्रवासाचे कार्य यथासांग पार पडले.
पण एका गोष्ट मनात कायम येत होती की पुण्यात किंवा इतर शहरात नवखा माणुस हमखास गडबडतो. एखादे ऑफलाईल चालणारे साधे अॅप तयार का होऊ शकत नाही? तुम्ही कुठे आहात आणि कुठे किती वाजता जायचे आहे एवढे सांगितले की त्या रुटचे बसेस येणारे स्टॉप्स त्यांच्या योग्य वेळा आणि वेळापत्रकाप्रमाणेच चालणारी बस हे शक्य असावे का? जेव्हा गाड्या बदलत जाण्याची गरज असते तेव्हासुद्दा या अॅपने उपलब्ध पर्याय दाखवावेत.
गुगल मॅपवर काही प्रमाणातच उपयोगी पडते. असे काही अॅप अगोदरच असल्यास सांगावे.
प्रतिक्रिया
21 Jun 2015 - 4:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्रीसत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह व मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अव्हेर केल्याने रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने त्याचे शंभर मुलगे व धनधान्य संपत्ती सर्व नष्ट केली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पून्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंत:करणाने त्यांने श्रीसत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर्य यांनी संपन्न झाला व या लोकांत सुखी होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला.
जो कोणी अतिदुर्लभ असे श्रीसत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो; दारिद्य्राला धन मिळते, बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला इच्छिलेले सर्व फल मिळते. त्याला सत्यनारायणलोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्यनारायणव्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले श्रीसत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. ह्या सत्यनारायणाला म्हणतात, तर कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात.
याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो, त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात, यात काही शंका नाही.’’ हरये नम: हरये नम: श्रीस्कंदपुराणातील रेवाखंडातील श्रीसत्यनारायणकथेचा पाचवा अध्याय येथे समाप्त झाला.
पैजारबुवा,
21 Jun 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा
छान स्वागत केलेत पुण्यात =))
21 Jun 2015 - 8:00 pm | अत्रुप्त आत्मा
जय जय दिनदयाळा सत्यनारायण देवा.. सत्यनारायण देवा.. सत्यनारायण देवा..।
घालीन लोटांगण,वंदिन चरण................जानकी नायकं रामचंद्रं भजे, हरे राम हरे राम ,राम राम हरे हरे ,हरे कृष्ण हरे कृष्ण,कृष्ण कृष्ण हरे हरे.
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने........
.... ॐ एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंति:प्रचोदयात्| ....
नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु:प्रचोदयात्|
अकाल मृत्युहरणं सर्वव्याधि विनाशनम्
नारायण पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्|
नारायण प्रसादोस्तु गृहीत्वा भक्तिभावत:
सर्वां कामां अवाप्नोति प्रेत्य:सायुज्य मवाप्नुयाSत्|
झालि पूजा पूर्ण.. ;-)
दक्षिणा कांढां ब्रें अंतां! :-D
21 Jun 2015 - 9:27 pm | शब्दानुज
बळजाबरीने पुजा करणे त्याचा प्रसाद न देणे यासाठी अखिल भारतिय पुणेबाह्य मिपाकर संघटनेकडुन निषेध नोंदवत आहोत. सत्यनाराणय आपणास तुप्ती देवो.
21 Jun 2015 - 9:59 pm | अत्रुप्त आत्मा
@त्याचा प्रसाद न देणे>> अच्चं काय त्ते!? अहो... वरती तीर्थाच्या मंत्राखाली प्रसादाचाही मंत्र टैपलाय की. नारायण प्रसादोस्तु...
असो...आता प्रसादाचा*नारळ देऊन , उत्तरपूजेच्या (मंत्रयुक्त#..)अक्षताही ठेवतो.. (मग [तरी ;) ] कांढांल कांय दक्षिणां??? ;) )
हे घ्या ...ओंजळ करा ब्रे हाताची... *फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यै सचराचरम्।तस्मात् फल प्रदानेन सफलाश्च मनो-रथा:॥ ;)
करा ब्रें हांत पुढें... #यांतु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिविम्।इष्टकाम प्र'सिद्ध्यर्थम् पुनरागमनाय च॥
.....................................................
21 Jun 2015 - 5:07 pm | टवाळ कार्टा
अता ं मिपाकर टेंप्युत बसवतील ;)
21 Jun 2015 - 6:52 pm | कंजूस
धन्यवाद पैजारबुवा-कथा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिल्याबद्दल.कॅापी करून नोटमध्ये साठवली आहे.
मुख्य विषयाकडे वळून -मोठे अॅप वगैरेची गरज नाहीयै फक्त PMPL ने प्रत्येक स्टॅापवर नाव लिहिले की काम झाल.मुंबईत बेस्टचे उदाहरण घ्या.पुढचे काम बस शोधण्याचे go4mumbai dot comकरते.पुण्याच्या साइटचे नाव हवे असल्यास देतो.
21 Jun 2015 - 7:02 pm | शब्दानुज
पण मी अॅप यासाठी म्हणालो की जर ते ऑफलाईन चालणार असेल तर अधिक सोईस्कर ठरेल असे वाटते कारण नेट प्रवासात नेहमीच दगा देते हा पुर्वानुभव आहे.
मुंबई बेस्टबद्दल अधिक माहिती तपशिलवार द्यावी.
26 Jun 2015 - 3:58 pm | भटक्या योगी
मुंबै साठी 'यम-यिन्डीकेटर' (m-indicator) वापरा. ट्रेन, बेस्ट, टीएमटी, मेट्रो, मोनो, फेरी सगळ्यासाठी एकच app. अर्थात अजून तरी ऑफलाईन चालत नाही, पण झक्कास आहे.
26 Jun 2015 - 4:03 pm | भटक्या योगी
sorry, पहिली प्रतिक्रिया दुरुस्ती…
aap ऑफलाईनच चालत, फक्त नवीन updates साठी नेट लागतं.
21 Jun 2015 - 7:02 pm | विअर्ड विक्स
पुण्यापेक्षा सुद्धा बंगळूरू बस सेवेचा आवाका फार मोठा आहे. BMTC app हे फारच उपयुक्त आहे. पुण्या संदर्भात अनभिज्ञ…
22 Jun 2015 - 12:08 pm | बॅटमॅन
पुण्यापेक्षा बंगळूरूचा आवाका मोठा म्हणजे श्रीलंकेपेक्षा भारत तसा जरा मोठाच आहे असे म्हणण्यापैकी आहे. =))
22 Jun 2015 - 6:41 pm | आदिजोशी
काडी फुकट केली आहे असे सखेद नमूद करू इच्छितो :)
22 Jun 2015 - 6:43 pm | बॅटमॅन
केली की गेली? ;)
21 Jun 2015 - 7:11 pm | रेवती
असे अॅप तयार व्हायला हवे या म्हणण्याशी सहमत.
21 Jun 2015 - 7:52 pm | आदूबाळ
अहो गेलात की व्यवस्थित... फिर डर कायका?
21 Jun 2015 - 7:53 pm | पिशी अबोली
21 Jun 2015 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
पाहिजे तिथे पोचूनही अर्धा जीव... घाबरट स्वभाव असला तर असेच होणार ! :) ;)
पुणेकर पहिल्यांदा मंगळावर पोचला तरी बरोबर पत्ता शोधून काढेल !
आजचा प्रश्न : बघा, बघा, पुण्याला नावे ठेवताय तरीसुद्धा तुमचा घाबरट स्वभाव पाहून परोपकारी वृत्तीने धाग्याच्या शंभरीला मदत करत आहे ! दुसर्या कुठल्या शहरवासियाने हे केले असते काय !? :)
21 Jun 2015 - 9:37 pm | शब्दानुज
संपुर्ण लेखात मी कोठेही पुण्याला नावे ठेवलेली नाहीत. उलट दयाळू कंडक्टर दाखवला आहे. फक्त त्या प्रसंगातुन पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येईल यावर भर द्यायचा होता.
21 Jun 2015 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुण्याचं काहीच कधीच चुकत नाही. त्यामुळे ते सुधारण्याची सुचना करणे म्हणजेच उपमर्द नव्हे काय ? :) ;)
22 Jun 2015 - 12:20 am | रवीराज
"पुण्यात पत्ता विचारणे म्हणजे काय हे सुज्ञास सांगणे न लगे."
"एखाद्या चित्याला लाजवेल अशी झेप मी बसच्या पुढच्या दरवाज्यात मारली"
"पण तमाम पुणेकरांच्या हातावर तुरी देऊन मी ती जाग बळकावली."
निष्कर्ष
चुकीचा पत्ता विचारुन योग्य उत्तराची अपेक्षा?
बेशिस्तपणा.
अकारण घाईगडबड-रेटारेटी.
आणि हे सर्व पुणेकराच्या नावावर खपवले जाणार.(हे बघणाऱ्याला तरी निदान असेच वाटणार)
22 Jun 2015 - 9:47 am | यशोधरा
त्यांना लेखासाठी ट्यार्पी हवाय, तेव्हा पुण्याचं नाव वापरलंय त्यांनी.
समझा करो.
कित्ती कठीण प्रवास, खरंच!
21 Jun 2015 - 9:06 pm | कंजूस
पुणे बससाठी
पुणे बस रूट ? ?
आणि मुंबई बेस्ट बस-
मुंबई बेस्ट बस ? ?
या साइटवर "choose from the list of bus stop" करा आणि हवा असलेला स्टॅाप सिलेक्ट करा मग त्या ठिकाणी थांबणाय्रा बस येतील.
उदाहणार्थ "महानंद डेअरि" दिल्यावर काही बस येतील. मग भांडुप स्टेशन वेस्ट दिल्यावर फक्त या दोन्ही ठिकाणी थांबणाय्रा बस नंबर येतील.
22 Jun 2015 - 7:47 am | कंजूस
वरची पुणे बसची लिंक थोड़ी बदलली आहे-
पुणे बस रूट ? ?
21 Jun 2015 - 9:14 pm | उगा काहितरीच
मला तर बुवा मज्जा येते पी.एम.टीत! पुण्यात पहिल्या दिवशी मनपा-लोहगाव, लोहगाव- मनपा- वनाज , वनाज- शिवाजी नगर असा प्रवास केला होता. त्यापुर्वी एकदाही पुण्यात आलेलो नसतानाही .
21 Jun 2015 - 9:35 pm | वगिश
सध्या गूगल मॅप हे ही सुविधा पुरवते पण ते ऑनलाइन app आहे. PMPL च्या वेळा व हव्या त्या स्थळी पोचण्यासाठी कोणत्या बसेस उपलब्ध आहे ते(वेळेसहित) कळते. GPS लॉक झले की तुम्ही हे ऑफलाइन ही वापरु शकता.(आपण ह्या App वर भरोसा ठेऊ शकटा पण PMPL वर...)
22 Jun 2015 - 12:35 am | राजेंद्र मेहेंदळे
मी ३-४ वर्षे कोथरुडहुन हिंजवडीला जायला पी.एम.टी. बस रुटचा बराच शोध घेतला. शेवटी थकलो आणि सरळ चांदणी चौकापर्यंत पी.एम.टी. ,नंतर डुगडुगीने वाकड आणि पुन्हा दुसर्या डुगडुगीने फेज- १ किंवा २ असे जाउन प्रश्न मिटवला.
शेवटी कंटाळुन नोकरी बदलली. आता येरवड्याला जायला मस्त बस आहे दर १०-२० मिनीटाला.विश्रांतवाडी, धानोरी,लोहगाव,आळंदी कोणतीही चालतेय बघा.
22 Jun 2015 - 9:01 am | असंका
"निम्मी सिटस नव्हती" म्हणजे नक्की काय?
22 Jun 2015 - 11:18 am | शब्दानुज
अहो बसमद्धये नेहमी जेवढ्या सिट्स असतात त्यापेक्ष्ा कमी होत्या. मद्धये जास्तीत जास्त लोकांना उभे राहता यावे यासाठी ही सोय(!) असावी.
22 Jun 2015 - 11:33 am | आदूबाळ
तुम्ही चुकून breakdown service van मध्ये तर बसला नव्हता ना?
23 Jun 2015 - 1:13 pm | असंका
:-))
22 Jun 2015 - 9:18 am | नाखु
घरचा अभ्यासः
लेखक मजकूरांना नक्की कशाचा राग आहे नातेवाईकांच्या कारने किंवा गाडीने प्रवास झाला नाही याचा?
का भिकारड्या पीएम्पील्ने प्रवास करावा लागला याचा?
स्थानीक नातेवाईकानाही बसबद्दल नीट्+पुरेशी माहीती नाही याचा?
आणि भाउजींना बस थांब्याचे नाव (रक्षक नगर चौक) जो पुणे मनपा ते चिंचवड या (औंध मार्गे) वर आहे.आपण आप्ल्या भाऊजींच्या ज्ञानजाणीवा प्रग्ल्भ करण्यासाठी काही प्र्यत्न केलेत काय?
याच मार्गाने किमान २०-२५ बसेस जातात पुण्याच्या विविध भागातून (कात्रज २९८,हडपसर २९९,कोथरूड २७६,पुणे स्टेशन ते चिंचव्ड,)
१८ वर्षांपूर्वी २९८ चा ३ वर्षे नियमीत प्रवासी
नाखुस बसवाला.
22 Jun 2015 - 2:19 pm | वपाडाव
आपला अभ्यास कमी पडला आहे.
२९९ कात्रज-भोसरी मार्ग
सलग ३ वर्शे ह्या मार्गावर जाणं-ञेणं केलेलं आहे.
आणि हि बस वाकडेवाडीहुन कासारवाडीला जाते.
अशी असतात पुणेकर मंडळी... मदत नाही पंण कुचेश्ष्टा मात्र करणार...
22 Jun 2015 - 2:32 pm | नाखु
हडपसर बसचा नं २९७ आहे आणि मार्ग मनपा पासून ३६ नंबरचाच आहे.
किमान माहीतीला कुचेष्टा समजण्याला तीव्र हरकत असलेला.
सलग ४ वर्षे २९८ +३६+१२२ मार्गावर (कधी कधी ४२ ही) प्रवास केलेला
सिधाडाव
22 Jun 2015 - 9:31 am | तुषार काळभोर
!!!!!!!!!!!!!!!!
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.
पी एम पी एम एल
22 Jun 2015 - 9:37 am | कंजूस
पुणेकरांनी ठरवलेच की मी बसनेच जाणार आणि सर्वमिळून व्यवस्था सुधरुया तर नक्कीच बदल घडेल."हे असेच चालणार" असा विचार काढून टाकला पाहिजे.मी कित्येकवेळा नातेवाइकांकडे बसने जाऊन त्यांना चकीत केले आहे."इथे स्टेशन /शिवाजी नगरहून बस आहे ?"इसे विचारतात.
22 Jun 2015 - 10:37 am | सिरुसेरि
पीएमटीच्या तुलनेत चेन्नई , बेंगलोर , हैदराबाद , मुम्बई येथील बस सेवा खुपच चांगली आहे .
22 Jun 2015 - 6:31 pm | उगा काहितरीच
चेन्नई वगैरे माहीत नाही पण हैद्राबादची बससेवा अतिशय चांगली आहे.
22 Jun 2015 - 12:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय हे ?! लेखात पुण्यावर लपून आडून (पुण्यावर समोरून हल्ला करण्याचे धाडस कोणात आहे म्हणा ! ;) ) हल्ले करूनही दोन दिवसात फक्त ३० च्या आसपासच प्रतिसाद ?! ?! ?!
(ट्यार्पीसाठी 'पुण्यावर विनाकारण टीका' हा मुद्दा घासून घासून बोथट झाला आहे हे हुशार लोकांच्या ध्यानी आले असेलच :) ;) )
22 Jun 2015 - 12:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेखाला लोकांनी कोथरुडमधल्या पौड फाट्यापाशी नेलेले दिसतयं. हल्ली ट्यार्पी मिळत नाही.
22 Jun 2015 - 1:31 pm | कंजूस
दोन तीन तुलनात्मक घटना देऊ शकतो किती फरक आहे ते कळण्यासाठी.केवळ "टिआरपी "आणि "सासय्राने टेंपुत बशिवलं सासवडच्या " छाप पोस्टीच टाकायच्या असतील तर राहिलं.
22 Jun 2015 - 2:01 pm | शब्दानुज
कुठला मुद्दा कुठे चाललाय. विनोद सोडा पण मराठी माणुस ( मग तो कुठला का असेना ) आपल्यातल्या त्र्ुटी स्विकारतच नाही. कायकाय उपायोजना करता येईल यावर चर्चा का नसावी? तुम्ही करा हो तुलना!
22 Jun 2015 - 2:23 pm | वपाडाव
खुणा लक्शात ठेवल्या तर नाहीतच वरुन इथल्या लोकाण्न्ना शिव्या देणयाचे घोर पापही केलेत.
मोबाइल वापर्ण्या ऐवजी अक्कल वापरायला हवी होती.
-बाहेरुन आलेला पण पुण्याला शिव्या न देणारा बाह्यपुणेकर
22 Jun 2015 - 2:53 pm | शब्दानुज
मी कुठेही कोणालाही शिव्या दिलेल्या नाहीत. प्रसंग फक्त रंगवण्यासाठी पुणे शहर वापरलेले आहे. तेव्हा अक्कल काढण्याएवजी जर लेखातल्या मुळ मुद्दा- पुण्यातील सार्वजनिक वाहतुक आणि त्यावरील समस्यांवर उपाय सुचवावे.
22 Jun 2015 - 2:58 pm | टवाळ कार्टा
खिक्क...पुणेकर हेल्मेट घालावे की नाही यावर सुध्धा "चोखंदळपणे" परिसंवाद करत बसलेत अजून...हेल्मेट ते आख्खी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपर्यंत यायला वेळ लाग्णारच की नै...त्याच्यातील समस्यांवर उपाय पुढल्या जन्मात कदाचीत बघायला मिळ्तील ;)
रच्याकने तुम्ही नवे कै मिपावर =))
22 Jun 2015 - 6:30 pm | वपाडाव
इनमिन एक वेळ प्रवास केला ह्यान्नी सिटीबस मध्ये तर लगे लागले शन्ख करायला...
गळे काधत बसणे सोप्पे असते, पण सद्सद्विवेक्बुद्धी वापरणे कठीण...
चार वेळा प्रश्न विचारुन शहानिशा करुन घ्यायचि ना मग...
पुढव्च्या वेळी कधी येताय ते कळवा...
पायघड्या अन्थरुन ठेवतो आपल्यासाठी...
22 Jun 2015 - 6:40 pm | आदिजोशी
पुण्यात जायचंच कशाला?
22 Jun 2015 - 6:40 pm | पैसा
हुंबैकर स्वतःला खूप स्मार्ट समजतात पण त्यांना गोव्यात किंवा रत्नांग्रीत स्वतःच्या जिवावर एकही पत्ता शोधता येत नाही किंवा स्वतंत्रपणे फिरता येत नाही हा अनुभव आहे. ते फोन करून स्टँडवर किंवा स्टेशनवर गाडी घेऊन न्यायला ये अशा ऑर्डरी सोडतात.
22 Jun 2015 - 7:20 pm | शब्दानुज
अहो तो जुना प्रसंग विनोदी करण्यासाठी सत्यघटनेला काही कल्पित कंगोरे मी दिले आहेत. त्यामुळे त्यातुन मी कसा आहे याचे अनुमान काढू नये.
मी योग्यठिकाणी तेव्हाही पोहचलेलो आहे ,आत्ताही पोहचतो.त्यानंतरही मी कैकवार प्रवास केला आहे
पीमटीसाठी सुधारणेला वाव आहे हे काही पुणेकरांनिच मान्य केले आहे तेव्हा त्याकडे लक्ष पुरवा.
तेव्हा पत्ता चुकवू नका आणि योग्य ठिकाणी लेखाला न्या.
22 Jun 2015 - 7:28 pm | टवाळ कार्टा
खिक्क...नया हय यह
22 Jun 2015 - 7:33 pm | पैसा
खाली तिमांचा प्रतिसाद बघा. तुम्ही हुंबैकर नाही हे सिद्ध केलेत!
बाकी लेख जायचा तिथेच गेलाय. मी बापडी कुठे नेणार?
23 Jun 2015 - 2:09 am | पिशी अबोली
बाडिस. नुसतेच शोधू शकत नाहीत असं नाही, अनेकदा त्याच पत्त्यावर येऊन पण पुन्हा येताना परग्रहावर सोडल्यासारखे वागतात.
22 Jun 2015 - 7:18 pm | तिमा
हुंबैकरांना कितीही नांवे ठेवली तरी काही फरक पडत नाही. पुलंनी आम्हाला सांगूनच ठेवलं आहे, कुणी मुंबईला भिक्कार म्हटले तर आपण सातभिक्कार म्हणावे. अगदी हुंबैकर म्हटले तरी.
फार पूर्वी एकदा, माझ्या वडिलांचे गोव्याचे मित्र आले होते. अर्थातच गोव्याचे गुणगान चालू होते. " अहो, गोव्याला कसला अंधार असतो? तुम्हा मुंबैकरांना कधी कल्पनाच येणार नाही. डोळ्यांत बोट घातले तरी दिसणार नाही." मी त्यांच्या आसपासच खेळत होतो. योगायोगाने माझे बोट त्याचवेळी त्यांच्या डोळ्यांत गेले. मग बोलतीच बंद झाली त्यांची.
22 Jun 2015 - 7:34 pm | पैसा
=))
22 Jun 2015 - 9:04 pm | अजया
=))
22 Jun 2015 - 9:10 pm | आदूबाळ
हसताय काय? याला म्हणतात कर्तबगार माणूस. लहानपणापासून इतके पाव्हणे घरी आले. इतक्यांच्या आसपास खेळलो. पण एकाच्याही डोळ्यांत बोट गेलं नाही!
22 Jun 2015 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा
23 Jun 2015 - 9:32 am | यशोधरा
=))
22 Jun 2015 - 8:55 pm | कंजूस
महाराष्ट्रातील इतर शहरे { हु्ंबई ,पुणे ,कोल्हापुर सोडून }मिपाच्या नकाशावर का येत नाहीत?
23 Jun 2015 - 9:14 am | उगा काहितरीच
मराठवाड्याचे नेतृत्व जेपीभौ "सध्या" संन्यस्त आहेत .
23 Jun 2015 - 10:47 am | टवाळ कार्टा
आणि ब्यॅट्यॅला मीरजेची अस्मिता नै lllluuuulllluuuu
23 Jun 2015 - 11:46 am | नाखु
याचा दुसरा अर्थ असा होतो की अस्मिता पुण्यात आहे आणि त्यासाठी बॅट्या पुण्यात आहे (नाईलाजाने) एकडाव मिळाली घेऊन जाईल मिरजेला हाकानाका !!!!
when you are in PUNE be Punekar
23 Jun 2015 - 12:57 pm | बॅटमॅन
नाखुन का का ????
23 Jun 2015 - 12:55 pm | बॅटमॅन
काय झालं टका आँ>>>>>>>>> ळ्ळ्ळ्ळ्ळूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
26 Jun 2015 - 7:55 pm | शैलेन्द्र
जगाच मध्यवर्ती ठिकाण राहील की :)
26 Jun 2015 - 9:04 pm | मुक्त विहारि
डोंबोली, हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, ते अधून मधून मिपाच्या अंगणांत येत असतेच....
23 Jun 2015 - 12:15 am | रातराणी
एन्जॉय व्हाइल इट लास्टस! वातानुकुलीत बसमध्ये बसून पाट्या टाकायला ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा धक्के खात मित्र/मैत्रिणीबरोबर कॉलेजला जाण्यात जास्त मजा आहे. :) सगळ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या तर काय मजा? कधी कधी काही गोष्टी स्वतः फिगर आउट करण्यात पण मजा असते. :)
23 Jun 2015 - 12:51 pm | सिरुसेरि
उदगाव हे गाव जयसिन्गपुरच्या थोडे अलिकडे आहे . तिथुन एक रस्ता वाडीला जातो . जयसिन्गपुरचे भडंग खुप प्रसिद्ध आहे . उदगावची लाकडी खेळणी खुप छान असतात. तसेच तेथे लोकनाट्याचेही बरेच प्रयोग असतात - जसे की - 'वहिनी माझी लक्ष्मी घरची '
23 Jun 2015 - 12:56 pm | बॅटमॅन
उदगावच्या लोकनाट्याचे बोर्ड नेहमी पाहिलेत.
बाकी जैशिंगपुरास आम्ही मजेने शिंगापूरही म्हणतो. तिथले अंबा भुवन भडंग जगातभारी.
तदुपरि- यळगूड डेरीचे 'दूध कोल्ड्रिंक' अजून कुणाला आठवतेय का?
23 Jun 2015 - 12:57 pm | पैसा
अंबाभुवनमधे बसून गरमागर्म भडंग खाल्ले आहे!
23 Jun 2015 - 1:02 pm | बॅटमॅन
मग वाडीचे पेढे अन बासुंदीही खाल्लीच असेल?
23 Jun 2015 - 1:19 pm | पैसा
म्हणजे वाडी अन खिद्रापूरला गेले होते. पण वाडीच्या माश्या बघून तिथले पेढे/बासुंदी खायची हिंमत नाय झाली. सांगलीत खादाडी मात्र चिक्कार आणि मस्स्स्त आहे!
23 Jun 2015 - 2:10 pm | नाखु
जेवण मात्र फर्मास मिळते अगदी वल्ली(ईतीहास पुरुष) साक्षी आहेत !
वाडीपेक्षा सातारी पेढे आवडणारा
नाखु
23 Jun 2015 - 2:23 pm | काळा पहाड
सातारी कंदी पेढे मला (वाडितल्या पेढ्यांच्या मानाने) कधीच आवडले नाहीत. वाडीतले पेढे म्हणजे सोनं असेल तर सातार्यातले पेढे जास्तीत जास्त तांबं वगैरे लेव्हल ला येतील. बाकी पुण्यातल्या पेढ्यांबद्दल जितकं कमी बोललं जाईल तितकं उत्तम.
23 Jun 2015 - 2:14 pm | काळा पहाड
त्या माशा पाळलेल्या अस्तात.
23 Jun 2015 - 2:25 pm | काळा पहाड
कोल्हापूरच्या स्टँडवर जावून ते दूध पिवू नये असं कधी झालेलं नाही. ते पिण्यासाठी पैसे वाचवून कधी कधी घरी चालत गेलोय मी.
26 Jun 2015 - 4:22 pm | बॅटमॅन
आता नैये ना पण? :( की आहे?
26 Jun 2015 - 11:32 pm | काळा पहाड
आहे ना अजून.
23 Jun 2015 - 2:30 pm | मोहनराव
जय शिंगापुर आमची सासुरवाडी असल्याने अंबा भडंग जगातभारी लई वेळा हानलं आहे. :)
23 Jun 2015 - 1:41 pm | कंजूस
आमच्या लहानपणी { ऐकतोस ना टका ?} बत्तासे, गुडदाणे, चिक्की, कवठाची (एक हत्तीच्या आवडीचे फळ बरं का) बर्फी, खारे दाणे, चणे, शेव, भडंग, कुरमुरे, विकायची दुकाने असायची. पिण्यासाठी उसाचा फेसवाला घट्ट रस मिळायचा. सांगली, तासगाव, मिरज, कोल्हापूर भाग [ आता ती सर्व जाऊन तेवढीच "मेडिकल स्टोरस" आलीहेत हे वेगळे सांगायला नको.]
23 Jun 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा
मला का ऐकवताय? ल्ल्ल्लूऊऊ
23 Jun 2015 - 1:44 pm | सिरुसेरि
"सांगलीत खादाडी मात्र चिक्कार आणि मस्स्स्त आहे" यांवरुन आठवले --
"शोले पाहावा तर स्वरुपला , मेकेन्नास गोल्ड पाहावा तर माळीला , माहेरची साडी पाहावा तर आनंदला , मैने प्यार किया पाहावा तर त्रिमुर्तीला " असेच काहीसे धोरण असे .
23 Jun 2015 - 2:32 pm | शब्दानुज
मला कुणीतरी मुळा नदीकडे जाण्यारी बस सांगा. खरच उडी मारावीशी वाटू लागले आहे आता.
गावाचेच म्हणाल तर मी मुळचा बार्शीचा आहे जिथे भगवंताचे जगातिल एकमेक मंदीर आहे.
23 Jun 2015 - 2:38 pm | काळा पहाड
असं बरं जावू देवू? आता भोगा कर्माची फळं.
24 Jun 2015 - 9:53 am | यशोधरा
बसमध्ये उडी मारणार की नदीपात्रात?
24 Jun 2015 - 11:53 am | मुक्त विहारि
ते उडी पुण्यातच पडणार....
(प्रत्येक धाग्यात पुणे शोधणारा) मुवि
24 Jun 2015 - 7:01 pm | यशोधरा
प्रत्येक धाग्यात पुणे शोधणारा >> अरेरे मुविजी, कधीपासून होतंय असं?
25 Jun 2015 - 8:58 am | नाखु
पुण्याने "कम सून" म्हटल्यापासून !!!
आकुर्डीपासून जवळच राहणारा
पुतण्याचा नाखु काका
25 Jun 2015 - 11:16 am | यशोधरा
कैतरीच नाखुकाका तुमचं! मुव्बि कशाला पुण्यात येतील? त्यंना पुणं मुळ्ळीच आवडत नै!
25 Jun 2015 - 11:47 am | नाखु
मुळ्ळी त्यांच्या ल्येकाला पुणे आवडते असे रोचक निरिक्षण आहे!!!!