सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते.
नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती.
बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई. शिक्षणासाठी शहरात आलो आणि माझ्या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करावाच लागे. यातुन फक्त उलट्या कमी होत गेल्या पण अढी तशीच होती.
यावेळेच मात्र माझ्या मातोश्र्ीकडुन सर्व नातेवाईकांना सुचना गेल्या होत्या की यावेस मला सिटी बसचा प्रवास घडवुन आणायचाच आणि कोणीही मला कुठेही सोडायचे नाही.
मी मावशीकडे उतरलो होतो आणि पुढच्या दिवशी जुरासिक वल्ड बघण्याचा कार्यक्रम माझ्या भाऊजींनी ठरवला. ते रक्षकचौकात रहात. आता यात मेख अशी होती की जर मला पिच्चर पहायचा असेल तर मला एकट्यालाच जावे लागणार होते. शेवटी हो ना करत डायनासोअरवरच्या पेमामुळे मी जाण्याचे ठरवले.
१२६ नंबरची बस तिथे पोहचते अशी मोघम माहिती मला दिली गेलेली होती. कुठून बसायचे ते ठिकाण सांगण्यात आले होते. फक्त बस पकडणे तिकीट काढणे आणि योग्य ठिकाणी उतरणे एवढी तिनच सोपी कार्ये पार पाडायची होती. पण माझ्यासाठी ती चक्क एका युद्धासमान होती.
मी त्या ठिकाणी पोहचलो. आणि पहिला झटका बसला.तिथे चार स्टॉप होतो. तिथे एका स्टॉपकडुन दुसरीकडे पळण्यात अर्धा तास गेला. तरीही त्यापैकी कुठला निवडावा हे कळेना. पुण्यात पत्ता विचारणे म्हणजे काय हे सुज्ञास सांगणे न लगे. मी मावशीला फोन केला. ती उचलेना. पत्ता विचाणे हेच आत नशीबी होते. शेवटी तो स्टॉप सापडला. तो त्या चारपैकी कुठलाच नव्हाता. मुळात तो स्टॉप आहे यावरच विश्वास बसेना. कारण तिथे माझ्यामागे फक्त एक झाड उभे होते.
मला फक्त १२६ हा आकडा माहिती होता. ती बस जर चुकली तर नेमकी कुणीकडे जाणारी बस पकडायची हा नवा प्रश्ण पडला कारण कोणत्याही बसवर सर्व थांबे लिहिलेले नसतात. तेवढ्यात एक बस माझ्याकडे येऊ लागली. आता तो १२६ नंबर नेमका कुठे असतो हा नवा प्रश्ण. जवळ येता येता तो नंबर मला दिसला आणी वैश्विक कोडे सोडविल्यासारखा आनंद झाला.एखाद्या चित्याला लाजवेल अशी झेप मी बसच्या पुढच्या दरवाज्यात मारली. अर्थात तो स्टॉप गर्दीचा नसल्याने मला कोणी अडवले नाही.
लगेच समोरच्या चालकाला प्रश्ण टाकला"ही बस रक्षकनगरला जाते ना?" " नाय" माझा ठोका चुकला. "रक्षकचौकात जाते. " माझा जीव समोरच्या सिटवर पडला.
आत पाहतो तर निम्मी सिट्स नव्हती. हा तिसरा धक्का. कंडक्टर माझ्याकडे येऊ लागला. " रक्षक.." या तिन शब्दानंतर माझा तोल गेला. मागे लेडीजसिटवर पडता पडता वाचलो. पाकीट काढुन तिकीट काढले आणि त्याच्याकडे माफक हसण्याचा करुण प्रयत्न केला आणि तो चौक आल्यावर सांगण्याची विनंती केली. एक करुण कटाक्ष टाकुन त्याने मूंडी हलवली आणि पुढे गेला.
काही वेळाने माझा शेजारचा माणुस उठणार आहे हे जाणवले. माझ्या पुढची आणि मागची माणसे बाह्या सावरु लागली. पण तमाम पुणेकरांच्या हातावर तुरी देऊन मी ती जाग बळकावली.
आता मोबाईलमद्ये मी माझी लोकेशन बघु लागलो.नेहमीप्रमाणे नेटवर्क नव्हते.मी नेटसाठी धीर धरायला शिकलो आहे. काहीवेळाने आम्ही बससहीत मुळानदीमद्ये आहोत असे गुगलने सांगितले. मोबाईलमद्ये अचानक आमची बस मुळानदीतुन बाहेर आली आणि फूटपाथवरुन चालु लागली.
आत तो चौक जवळ येत होता. मला त्या चौकात दोन रनगाडे आहेत एवढे आठवत होते. एखाद्या सैनिसारखी मी त्या रनगाडाची वाट पाहत होतो.
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला तो कंडक्टरचा होता. आमचे हावभाव बघून कंडक्टरच्या मनात करुणा दाटली होती म्हणुन आता पुढच्या चौकात उतरा हे सांगायला आमच्यापाशी आला होता. आम्ही अधिक करुणाभिनय केला असता तर त्याने आमचे पार्सल घरपोच पोहचवले असते असे वाटून राहिले.
शेवटी एकदाची बस थांबली. आम्ही थाटात उतरलो. समोरच्या रनगाड्यांना डोळेभरुन पाहिले. भाऊजी थोड्यावेळात येणार होते. त्यांनी मला रनगाड्या'खाली' उभे रहायला सांगितले होते तसा मी थांबलो आणि प्रवासाचे कार्य यथासांग पार पडले.
पण एका गोष्ट मनात कायम येत होती की पुण्यात किंवा इतर शहरात नवखा माणुस हमखास गडबडतो. एखादे ऑफलाईल चालणारे साधे अॅप तयार का होऊ शकत नाही? तुम्ही कुठे आहात आणि कुठे किती वाजता जायचे आहे एवढे सांगितले की त्या रुटचे बसेस येणारे स्टॉप्स त्यांच्या योग्य वेळा आणि वेळापत्रकाप्रमाणेच चालणारी बस हे शक्य असावे का? जेव्हा गाड्या बदलत जाण्याची गरज असते तेव्हासुद्दा या अॅपने उपलब्ध पर्याय दाखवावेत.
गुगल मॅपवर काही प्रमाणातच उपयोगी पडते. असे काही अॅप अगोदरच असल्यास सांगावे.
प्रतिक्रिया
25 Jun 2015 - 11:58 am | यशोधरा
तसं तर माझं अजून काही जणांबाबतदेखील रोचक निरीक्षण आहे! =))
26 Jun 2015 - 6:36 pm | मुक्त विहारि
हे सत्य ....
आणि
मिपाकरांना भेटायला आम्ही नेहमीच तयार असतो...अगदी ते पुणेकर असले तरी...
26 Jun 2015 - 7:43 pm | यशोधरा
तुमच्या लेकराला पुणे खूप आवडो ह्या शुभेच्छे सह. :)
26 Jun 2015 - 8:30 pm | मुक्त विहारि
आता नक्की कुठल्या आकुर्डीकराने की आकूर्डीकरीणीने जादू केली ते सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.
(ह्या बाबतीत मुले अजिबात, ताकास तूर लागू देत नाहीत.)
26 Jun 2015 - 4:22 pm | बॅटमॅन
भगवंताचे>>>म्हंजे कंच्या देवाचे?
23 Jun 2015 - 2:46 pm | कंजूस
बरं र्हाइलं टका.
पुलंच्या एका कथेतलं(?कोणत्या बरं?) एक वाक्य आहे "खुप पाल्हाळ लागलं की तुमची बार्शि लाइट झाली बर्र का अप्पा ." पूर्वी बार्शि ते मिरज मीटर गेज रेल्वे होती ती फार हळू रेंगाळत जायची ताशी दहा किमी .
24 Jun 2015 - 12:40 pm | पिलीयन रायडर
PMPML गुगल केलं. पहिली साईट सापडली - http://www.pmpml.org/
त्यात कुठुन कुठे जायचय / बस रुट नंबर प्रमाणे सर्व माहिती मिळतेय. पुर्वी माझ्याकडॅ एक साईट होती, ज्यात हीच सर्व माहिती जास्त सोप्या पद्धतीने मिळत होती. सापडली तर देते.
वरच्या साईटवरही लवकरच अॅप येत आहे असे लिहीले आहे.
बाकी लेख छान आहे.
24 Jun 2015 - 1:12 pm | शब्दानुज
चला. काहीजणांना तरी हा मुद्दा शिरीअस्ली घेतलेले दिसतयं!
25 Jun 2015 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो तो जुना प्रसंग विनोदी करण्यासाठी सत्यघटनेला काही कल्पित कंगोरे मी दिले आहेत.
असं म्हणुन परत हे...
काहीजणांना तरी हा मुद्दा शिरीअस्ली घेतलेले दिसतयं!
???... काय होनार या जगाचं ??? काय कलंत नाय :) ;)
(धुगधुगी लागलेल्या धाग्यात मी वेळीच प्राण फुंकले होते, हे विसरू नये :) ;) )
25 Jun 2015 - 10:09 pm | शब्दानुज
अहो मुद्दा सिरीअस आहे इनोदातुन तो मांडला आहे इतकच. प्राण फुंकुक फुंकुन तुम्ही तरी किती फुंकणार!
26 Jun 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा
=))
अभीतक तुम डाक्टरसाब को पैचानते नै
24 Jun 2015 - 12:56 pm | कंजूस
"""PMPML गुगल केलं. पहिली साईट पिलीयन रायडर-Wed, 24/06/2015 - 12:40 PMPML गुगल केलं. पहिली साईट सापडली - http://www.pmpml.org/ त्यात कुठुन कुठे जायचय / बस रुट नंबर प्रमाणे सर्व माहिती मिळतेय. ""
जरा ही साइट आणि वर मी दिलेल्या मुंबई च्या साइटशी तुलना करून पाहा बरं .
24 Jun 2015 - 2:07 pm | पिलीयन रायडर
बेस्ट भारीच आहे हो..
पण पीएम्टी अगदीच भिकार नाही.. थोडं फार बरं काम केलय त्यांनीही..
24 Jun 2015 - 6:57 pm | काळा पहाड
<%swargate> te असा सर्च केला सर्वर एरर दाखवतोय. टेस्टींग नीट केलेलं दिसत नाहीये.
26 Jun 2015 - 12:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
आयला अरे सिटी बस प्रवास तो !! त्यात काय विचारायचे ? ह्या बाबतीत आमचा फादर बेस्ट !! स्वतः काही सांगत नसत सवयी ने मी पण विचारणे सोडले होते !! कारण विचारले असता "भो*** खोबणी झाल्यात का डोळ्याच्या" वाला प्रसाद मिळे !! पुणेकर सांगत नसतील पत्ते तरी पुण्यात स्थायिक इतरेजन येतात उमेदवारी करत सामोरे पत्ते सांगायला!!. मी जेव्हा पुण्यात फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा मित्राला फोन केला होता की घ्यायला ये!! त्याने सकाळ सकाळ दिव्य शब्द ऐकवले व "सायच्या को.डेपो नावाच्या बशीत* बसजो" असा सल्ला दिला, थंडी चे दिवस मी पाठीला सॅक लाउन इंजन ची गर्मी खात कोपर्यात उभा होतो, ड्राईवर च्या डाव्या हाताला एक मोठी विटकर ठेवली होती मी हळूच म्हणले "मामा मला गीताई मॉल ला उतरायचे आहे हो" तेव्हा त्यांनी ओळखले कोकरु समिंदरात नवखे हाय !! मला म्हणाले "रहा इथेच उभा आला स्टॉप की सांगतो" इकडे तिकडे पाहत त्याना मी विचारले, "मामा इथे ही विट कश्याला ठेवली हो?" तर म्हणाले "बघ गंमत" बस भरल्यावर जेव्हा पहिला गियर पडना तेव्हा मामांनी शिस्तीत "पुंडलिका वरदेssss" म्हणत साणकन विट घातली गियर च्या टकुर्यात तशी बस सुटली!!पुण्यात पोचल्याच्या पहिल्या आठवड्यात एकच काम केले मित्राची गाडी घेऊन "10....20...30" करत किंवा ज्या रस्त्याचे नाव आवडेल त्या रस्त्याला नुसता मोक्कार हिंडलो!! पुणे आत्मसात केले !! मग ज़रा स्थिरावलो!!!
श्या नॉस्टॅल्जिक व्हायला झाले!!!
*बस मधे (वरहाडी भाषेत)
14 Mar 2019 - 3:12 pm | शब्दानुज
अखेरीस पी. एम. पी. चे अॅप आले आहे. जवळपास तीन महिन्यानंतरही हे अॅप तीन चांदण्यातच रेंगाळत आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.pmp.econnect
18 Mar 2019 - 9:39 am | चौथा कोनाडा
मी दोन वर्षांपूर्वीच हे अँप वापरायला डाऊन लोडवले. फार खास नाहीय. प्रत्यक्षात बस आगमन आणि अँप मधली माहिती यात बऱ्याचदा तफावत आढळते.
एकदा या अँप पीएमपी कनेक्टवर बसची तक्रार केली पण त्यांनी तक्रारीला शिस्तीत मार्ग दाखवला (थुका लावला)
बस प्रचंड प्रमाणात ब्रेक डाऊन होताहेत, खिळखिळ्या झाल्यात बऱ्याच ! शिस्त नाहीय!
एकंदरीत पीएमपी हे प्रकरण सुधारणा नाही याची दिवसेंदिवस खात्री पटत चाललीय.
18 Mar 2019 - 9:40 am | चौथा कोनाडा
मी दोन वर्षांपूर्वीच हे अँप वापरायला डाऊन लोडवले. फार खास नाहीय. प्रत्यक्षात बस आगमन आणि अँप मधली माहिती यात बऱ्याचदा तफावत आढळते.
एकदा या अँप पीएमपी कनेक्टवर बसची तक्रार केली पण त्यांनी तक्रारीला शिस्तीत मार्ग दाखवला (थुका लावला)
बस प्रचंड प्रमाणात ब्रेक डाऊन होताहेत, खिळखिळ्या झाल्यात बऱ्याच ! शिस्त नाहीय!
एकंदरीत पीएमपी हे प्रकरण सुधारणा नाही याची दिवसेंदिवस खात्री पटत चाललीय.