थोड्ड्स्स्स्स्सं खोटं...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
15 Jun 2015 - 5:24 pm

थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला
तंबाखुतल्या चुन्या इतकं
त्याच्याशिवाय मेली खर्‍याला कीकच येत नाही,हवी तशी.!

मी लै चांगला आहे, हे जनात.
आणि मनात???
मायला..., कुठंतरी थोडा वाइटंहि आहे की!
हे उत्तर ठरलेलं!
भरपूर खय्रा बरोबर खोट्याचा सूड काढायला येणारं.

देव? धर्म?? आध्यात्म???
छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ!
हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"
हे कसं येतय बरं अजुन तोंडातून !
( मनात काहीही असलं तरी! )

शाळेतले जुने मित्र भेटतात. काही जुने चष्मे असलेले!
काही नवे धारण केलेले! त्यांना हे दाखवायचि इच्छा होतेच.."मी अजुनही तसाच्च आहे!"
आतून आवाज येतो, "भाड्या..किती बदलतो स्वत:ला...सारखा सारखा!"

अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!?
मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्‍यात????
सत्य अजुन आळणि आहे ?
का मीच???

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

15 Jun 2015 - 5:34 pm | अनुप ढेरे

व्वा!

बॅटमॅन's picture

15 Jun 2015 - 5:56 pm | बॅटमॅन

वा!!

सूड's picture

15 Jun 2015 - 6:21 pm | सूड

अवडल्या गेले आहे.

जेपी's picture

15 Jun 2015 - 6:45 pm | जेपी

आवडल..

खटपट्या's picture

15 Jun 2015 - 6:47 pm | खटपट्या

खूप छान कविता.

देव, धर्म, अध्यात्मावरचं कडवं पटलं

आतिवास's picture

15 Jun 2015 - 6:47 pm | आतिवास

मुक्तक आवडलं.

पद्मावति's picture

15 Jun 2015 - 8:42 pm | पद्मावति

देव? धर्म?? आध्यात्म???
छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ!
हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"----हे हे अप्रतिम जमलय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2015 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

किती तो फटकळपणा ! आँ ?? =))

एक एकटा एकटाच's picture

15 Jun 2015 - 9:24 pm | एक एकटा एकटाच

अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!?
मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्‍यात????
सत्य अजुन आळणि आहे ?
का मीच???

हे मस्त

हाडक्या's picture

15 Jun 2015 - 9:26 pm | हाडक्या

गुर्जी, मस्त हो.. :)

संदीप डांगे's picture

15 Jun 2015 - 9:40 pm | संदीप डांगे

द्या टोले.... फाडा बुरखे...

जमलंय फक्कड...

सूड's picture

15 Jun 2015 - 9:47 pm | सूड

फाडा बुरखे

स्वत:चे मुखवटे गळून पडले की मग लोक दुसर्‍याचे बुरखे फाडायला सरसावतात, आपलं एक निरीक्षण नोंदवलं हो!!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2015 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा

गळुन पडले किंवा फेकून दिले, की असं होतं. याच्याशी सहमत.
मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!", म्हणुन स्विकारायाला सुरवात केलि आहे. :)

संदीप डांगे's picture

15 Jun 2015 - 10:50 pm | संदीप डांगे

मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!", म्हणुन स्विकारायाला सुरवात केलि आहे. :)

"पलटू, शुभ दिन शुभ घडी, याद पडे जब नाम
लगन-मुहुरत झूट सब, और बिगाडे काम"

आदूबाळ's picture

15 Jun 2015 - 9:49 pm | आदूबाळ

देव? धर्म?? आध्यात्म???
छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ!
हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"
हे कसं येतय बरं अजुन तोंडातून !
( मनात काहीही असलं तरी! )

एक नंबर लिहिलंय!

तसंच मांजर आडवी गेल्यावर, संध्याकाळी पाल चुकचुकल्यावर, एकटी साळुंकी दिसल्यावर, तळहाताला शीत चिकटल्यावर, लहान मुलाने गोल प्रदक्षिणा घातल्यावर...

सूड's picture

15 Jun 2015 - 9:52 pm | सूड

कावळा ओरडल्यावर, कुत्रं-मांजर रडल्यावर, केरसुणी उभी ठेवल्यावर

चिगो's picture

15 Jun 2015 - 10:13 pm | चिगो

मुक्तक जमलंय, बुवा..

सुधीर's picture

15 Jun 2015 - 10:20 pm | सुधीर

छान जमलं आहे.

मधुरा देशपांडे's picture

15 Jun 2015 - 10:29 pm | मधुरा देशपांडे

खासच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2015 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान मुक्तक !

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 10:47 pm | श्रीरंग_जोशी

मुक्तक आवडलं

यावरून रंगोलीमध्ये लागणारं एक जुनं हिंदी गीत आठवलं.

थोडा थोडा सच और थोडी बेइमानी,
मुझे पानी में आग लगानी आ गई
हाय रे दैया हाय जवानी आ गई... :-)

किसन शिंदे's picture

15 Jun 2015 - 11:13 pm | किसन शिंदे

मला तरी मुक्तक आवडलं, आणखी दोघांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत...

प्रचेतस's picture

15 Jun 2015 - 11:30 pm | प्रचेतस

मलाही आवडलं.
तसाही मी बुवांच्या कवितांचा फ्यान आहेच.

स्वाती दिनेश's picture

16 Jun 2015 - 12:20 am | स्वाती दिनेश

मुक्तक आवडले,
स्वाती

गणेशा's picture

16 Jun 2015 - 12:29 am | गणेशा

मस्त .... आवडले

कंजूस's picture

16 Jun 2015 - 7:00 am | कंजूस

रामा शिवा गोविंदा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jun 2015 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला
तंबाखुतल्या चुन्या इतकं
त्याच्याशिवाय मेली खर्‍याला कीकच येत नाही,हवी तशी.!

संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. (गुण १०) =))

अजया's picture

16 Jun 2015 - 7:27 am | अजया

आवडलं मुक्तक!

नाखु's picture

16 Jun 2015 - 10:52 am | नाखु

आवडलं मुक्तक!

सकाळचे ११.०० वाजलेत ऐकूय एक सुमधूर गीत जवा मर्द धरम

विविधभारती श्रोता
नाखु

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 11:01 am | टवाळ कार्टा

गुर्जींना खरे ज्ञान उमगले :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jun 2015 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

खोट बोलण खरच इतक वाईट असत का की खोट बोलल्यावर भयंकर अपराधी पणाची भावना मनामधे दाटून यावी?

नेहमी खरे बोलावे या शिकवणूकी मुळे बर्‍याच वेळा नको तेव्हा फार दडपण येते.

पैजारबुवा,

प्रभाकर पेठकर's picture

16 Jun 2015 - 11:14 am | प्रभाकर पेठकर

काहीं खरं, कांही खोटं. कांही आतलं, कांही बाहेरचं. ह्या आंत आणि बाहेरच्या दोन वेगळ्या जगांनीच आयुष्य सुंदर आणि रंगीबेरंगी बनविले आहे. आणि तसेही आपण अंतर्मनाशी प्रामाणिक आहोत हे काय कमी आहे?

कविता/मुक्तकातला प्रामाणिकपणाच भावला.

स्पंदना's picture

16 Jun 2015 - 11:21 am | स्पंदना

एक सही पाऊल पडलयं तत्वज्ञानाकडे.

मदनबाण's picture

16 Jun 2015 - 11:39 am | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 9:17 am | अत्रुप्त आत्मा

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार व धन्यवाद.

पैसा's picture

17 Jun 2015 - 9:45 am | पैसा

आवडलं. "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबरजानी" हे गाणं आठवलं.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2015 - 10:11 am | अत्रुप्त आत्मा

हे हे हे हे :) एकदम बरोब्बर गाणं.