हाफ शर्ट

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
29 Nov 2008 - 1:37 pm

मला काही प्रष्न पडतात. गेले कित्येक वर्षे अनुत्तरित आहेत. ९२ च्या दंगलीत मी जसलोक मधे ४ दिवस भावाच्याबरोबर होतो. हार्ट ऍटॅक नंतर एडमिट केले होते. बाहेर पडणे शक्यच नव्हते. सर्वच पेटले होते. चारही दिवस माणसे बकर्-या सारखी कापलेली अर्धमेली माणसे स्ट्रेचर घालुन आणलेली बघितली. रक्ताचा तुटवडा. शेवटी वेटींग लाउंज मधील बाहेर न जाउ शकणा-या रुग्णांच्या परिचीतांनी पुढाकार घेतला.
काल रक्तदान करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. कठीण प्रंसंगात आजही तीच उदासिनता समाजात दिसते. दोन्ही (जे.जे. किंवा सेंट जॉर्जेस) म्हणावे तेवढे दाते पोचलेले नाहीत.
सकाळी ९.३० मिनिटांनी मुंबईतल्या एका प्रसिद्ध स्टेशन बाहेर शहिदांच्या तसबिरी लागल्या होत्या. खुर्च्यांवर भगिनी समाज स्थिरावला होत्या. अंगावर दागिने, ठेवणीतल्या साड्या. पक्षाचे मोठे शेठ आले. त्यानी फुले अर्पित केली. सुरु झाली भाषणे.
काय वाटले कोणास ठाउक भाषणे झाल्यावर आजुबाजूच्या सुमारे ३३ जणाना रक्तदान केले का? हा प्रष्न विचारला. त्यातील ३० जणाना गेल्या २ महिन्यात काविळ, मलेरिया, टॉयफॉइड ह्या विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. एकाला हेमोग्लोबिन डिफिशियंसी ची ट्रीट्मेंट चालु होती. दोघे सि.एस्.टी वर परिस्थिती सुधारल्यावर(?) विचार करणार होते.एकाने रक्त दिले होते. हाफ शर्ट घातला होता. हाताच्या रंगावरून तर स्प्ष्ट दिसत होते की तो इतर वेळी तो फूल शर्ट घालत असणार.
जाता जाता:सर्व वृत्तवाहीनींवरील चर्चांत एकच गोष्ट आवडली. तो म्हणजे रिटायर्ड मेजर जनरल अशोक मेहता ने विचारलेला प्रष्न. १६ वर्षात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे स्वःत ची कमांडो टीम का नाही.
जर काउंटर ऑफेन्सिव असल्या टीमने २४ तास आधी घेतला असता तर काही जीव वाचले असते का? हा मला पडलेला प्रश्न. आणखी किती वर्षे वाट पहायची आहे आपण?
वाहीनी वर चर्चा करायला येणा-या पाहूण्याना आधी रक्तदान करा आणि नंतर बोला अशी अट घातली तर. हे खर्-या जगात होउ शकत नाही. स्वप्नरंजन करायला काय हरकत आहे.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Nov 2008 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

विप्र...

या धाग्यावर ५६ वाचने आणि प्रतिसाद १............... अजून काही बोलायची जरूरी आहे? नियतिचा एक अतिशय क्रूर नियम आहे. यू गेट व्हॉट यू डिझर्व्ह.... हे तमाम लोकांना कळेल तो सुदिन. तो पर्यंत स्वप्नरंजन करायला काहीच हरकत नाही.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Nov 2008 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-|

या धाग्यावर n वाचनं, m प्रतिसाद, आणि त्यातले रक्तदाते किती? :-(

टारझन's picture

29 Nov 2008 - 7:22 pm | टारझन

या धाग्यावर n वाचनं, m प्रतिसाद, आणि त्यातले रक्तदाते किती?

दे टोला , बाहेर कोणी काय केलं यावर इथं चर्चा करण्यात काय हाशिल ? तुझ्या वाक्याने निदान मिपावरच्यांना टोचनी लागेल आणि रक्तदान होइल.

बाकी विप्रंचे प्रश्न मलाही पडलेत.

- टारझन

विसोबा खेचर's picture

29 Nov 2008 - 3:55 pm | विसोबा खेचर

जाता जाता:सर्व वृत्तवाहीनींवरील चर्चांत एकच गोष्ट आवडली. तो म्हणजे रिटायर्ड मेजर जनरल अशोक मेहता ने विचारलेला प्रष्न. १६ वर्षात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे स्वःत ची कमांडो टीम का नाही.

अगदी योग्य मुद्दा..!

तात्या.

मृदुला's picture

29 Nov 2008 - 9:45 pm | मृदुला

वृत्तवाहिन्यांनी रक्ताची आवश्यकता आहे असे जाहीर केले होते का? त्याचा उपयोग झाला असता असे वाटते.

किमान वजनाच्या अटीत न बसल्याने आत्तापर्यंत दोन वेळा रक्तदान शिबिरांतून रक्त न देताच परत आल्याच्या अनुभवाच्या शिदोरीवर हा प्रतिसाद देते आहे.

स्वप्निल..'s picture

30 Nov 2008 - 1:32 am | स्वप्निल..

दुसरया धाग्यावर वाचले की यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते रक्तदान करण्यात पुढे होते म्हणुन...

विप्र साहेब, तुमचा लेख वाचल्यावर त्याबाबतची उदासीनता समजते..

स्वप्निल

चतुरंग's picture

30 Nov 2008 - 1:39 am | चतुरंग

मी स्वतः दरवर्षी रक्तदान करायचेच अशा भूमिकेचा होतो. सलग ५ वर्षे केलेही. त्यानंतर रक्त नीट साठवले जात नाही, अतिरिक्त पुरवठा चक्क ओतून, फेकून दिला जातो अश स्वरुपाच्या माहितीनंतर ठरवले की उगीचच शिबिरातून वगैरे करायचे नाही, तातडीच्या, आणीबाणीच्या परिस्थितीत, जशी मुंबईतली दोन दिवसापासून होती, तशाच स्थितीत रक्त द्यायचे. जिथे आपल्याला बर्‍यापैकी खात्री असू शकते की रक्त वापरले जाईल, उपयोगी येईल!
सर्वसामान्य लोकांच्या मनात उदासीनता का असेल हे थोडेफार समजू शकते! प्रबोधन त्यांचेही आणि रक्त साठवणार्‍यांचेही आवश्यक!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

30 Nov 2008 - 7:43 am | विसोबा खेचर

अश स्वरुपाच्या माहितीनंतर ठरवले की उगीचच शिबिरातून वगैरे करायचे नाही, तातडीच्या, आणीबाणीच्या परिस्थितीत, जशी मुंबईतली दोन दिवसापासून होती, तशाच स्थितीत रक्त द्यायचे

सहमत आहे..

मीदेखील कधी शिबिरात रक्तदान करत नाही.. त्या रक्ताचा धंदा केला जातो..

मात्र इमर्जन्सीच्या काळात नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीच्यातले, किंवा सामाजिक स्तरावर (जसे मुंबईची कालची घटना) अगदी हटकून रक्तदान करतो...

तात्या.