४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे!!!!!!!!!! अजुन संपले नाही असे समजते आहे?
ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे.
काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का? का तर तुंम्हा श्रीमंताच्या सगळ्या आवड्त्या जागांचा अतिरेक्यांनी त्यांचे मनसुबे पार पाडण्यासाठी जास्त करुन वापर केला आणि नासधुस केली म्हणुन ?,मुंबई लोकलमधे ११/७ ला जेंव्हा स्फोट झाले होते आणि मध्यमवर्गातली आणि कसे तरी दोन वेळचे पोट भरणारी माणसे अतिरेक्यांच्या भक्ष ठरली होती तेंव्हा कुठे गेल्या होत्या तुमच्या संवेदना.
आज नरेंद्र मोदी मुंबईत येउन गेले आणि १ करोड रुपये विरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांना देण्याची घोषणा करुन गेले ,(राजकारण करु नये त्यांनी अश्या वेळी खरतर.) पण गुलछबु विलासरावांना लगेच मिरच्या झोंबल्या.व लगेच त्यांनी प्रतिक्रिया दिली "मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणी राजकीय फायदा घेवू नये. आणि महाराष्ट्रात येवून कोणीही नाटकबाजी करू नये, असा टोला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लगावला." हिच भाषा उत्तरभारतियांच्या विरोधात व मराठी साठी महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनाच्या वेळेस लालु आणि त्यांच्या चेल्यांना सुनवायला काय वाचा बसली होती की काय या विलासरावांची?
अतिरेक्यांवर विजय मिळवायला अजुन कीती वेळ लागणार अशी विचारणा सगळ्या वृत्तवाहिन्यांकडुन सैन्याच्या अधिकार्यांना विचारला जात होता.मला त्यांच्या या प्रश्नाचच हसु येत होत ,ज्या अतिरेक्यांना या हल्ल्याची तयारी करायला ६महिन्याचा कालावधी लागला.मग काहि दिवस अथवा काही अधिक तास त्यांचा खात्मा करायला भारतिय सैन्याला लागत असेल तर आपण वाट बघायला काय हरकत आहे?
जमेची बाजु एकच की या वेळेस व ते फालतू खट्ले आणि मानवाधिकारवाल्यांना व्यथा तोंडसुख घेण्याची संधी आपल्या शुर सैनिकांनी ठेवली नाहि.पार संपवुनच टाकले सगळ्यांना.आपल्या सैन्याच कौतुक कराव तितक थोड आहे.
माझी तर फार इच्छा होती ताज मधिल शेवटच्या अतिरेक्याला भर रस्त्यात भारतिय सैनिकांनी गोळ्या घातलेल्या बघायची .कुणाला हे फार जहाल वाटेल.पण जो पर्यंत अश्या प्रकारच मरण आपल्यालाही येऊ शकत हा संदेश या निर्दयी अतिरेक्यांपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्यांना दहशत बसणार नाही.भारत आणि जास्तकरुन मुंबई म्हणजे सहज ,निर्धोक येऊन निरपराधांचे बळी घेण्यासाठी आंदण दिले आहे का या अतिरेक्यांना?
येताजाता जी काँग्रेस कंदहार विमान प्रकरणाचा आणि भाजपा सत्तेत असताना संसदेवर झालेल्या हल्लाच पल्हाळ लावत असते ..........आता मुंबईवर झालेल्या भिषण हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची तयारी आहे का काँग्रेसची?तरी बर महाराष्ट्रात सरकार देखिल यांचच आहे .आता भविष्यात प्रत्येक वेळेस काँग्रेसला देखिल या हल्यासाठी जबाबदार धरुन कायम आरोप केले जातील तेंव्हा कुठे तोंड काळ करणार आहेत सगळे काँग्रेसी. आज मनमोहनसिंग यांच्या बरोबर आडवाणी मुंबईला आले नाहित यामागे राजकारण दिसतय्?स्वतः कायम अल्पसंख्याकाच लांगुलचालन करण्याच्या नादात मुसलमानांना डो़क्यावर बसवल .आणि ते देखिल केवळ आणि केवळ एकगठ्ठा मतांसाठी ...............बहुसंख्य हिंदुना डावलुन निधर्मिवादाचे फालतु गोडवे गाणार्या काँग्रेसला भाजपाला नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार तरी पोहोचतो का?
आताच त्या शकिल अहमद्ला एका वाहिनीवर प्रतिक्रिय देताना बघितल .....काय तर म्हणे आम्ही पाकिस्तानकडे त्यांच्या प्रदेशातील अतिरेक्यांच्या छावण्यां उध्वस्त करण्यासाठी परवानगी मागु?आणि जणु राजरोसपणे पाकिस्तान देणार आहे यांना परवानगी?मुर्ख पणाचा कळस म्हणायला हवा.
काहीही झाल तरी मुंबई थांबत नाही हा संदेश देण्याचा अट्टाहास आणि व्यर्थ कौतुक आता पुरे. .....हे स्पिरिट नसुन आपल्या संवेदना दिवसेंदिवस किती बधिर होत चालल्यात याच लक्षण आहे .........शेवटि देशासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी देश आहे हे विसरता कामा नये..........आता सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरुन जनतेच्या संरक्षणासाठी सरकारला भाग पाड्ण्यावाचुन दुसरा पर्याय उरला नाही आता.
अवांतर -मुंबईवर इतका अघोरी प्रसंग ओढवल्यावर मनसे आणि शिवसेना कुठे होती ?असे प्रश्न विचारणार्यांनी ह्या पण गोष्टिंची खातरजमा करुन घेण्याचा प्रयत्न जरुर करावा की शहरात भिषण परिस्थिती ओढवली असताना रक्तदान करुन आणि रुग्णवाहिका पुरवण्यात याच दोन संघटना आघाडिवर होत्या. .................
ता क-अजुन संपले नाही असे समजते आहे? पण संपेल थोड्या अवधित .
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
प्रतिक्रिया
28 Nov 2008 - 11:29 pm | प्राजु
काहीही झाल तरी मुंबई थांबत नाही हा संदेश देण्याचा अट्टाहास आणि व्यर्थ कौतुक आता पुरे. .....हे स्पिरिट नसुन आपल्या संवेदना दिवसेंदिवस किती बधिर होत चालल्यात याच लक्षण आहे .........शेवटि देशासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी देश आहे हे विसरता कामा नये
लाख बोललीस.
अतिशय पोटतोडकीने लेख लिहिला आहेस. पण या क्षणी काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला दोष देण्यात काय अर्थ आहे. कोणताही राजकीय पक्ष कितीही पैसे खाऊ असला .. मतांसाठी राजकारण खेळत असला तरी आपल्या देशामध्ये असा हल्ला घडवून आणण्याइतक्या खालच्या थराला गेलेला नाही. मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. दहशत वाद ही संपूर्ण जगाला लागलेली वाळवी आहे. तिथे नॅशनॅलिटी न बघता अतिरेकी दिसला की ठेचणं हाच उपाय हवा. मग तो ब्रिटीश असो.. पकिस्तानी असो की अगदी भारतीय!
आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे जे काही सुरक्षिततेचे उपाय आहेत ते चोखपणे बजावणे.
जो अतिरेकी जीवंत सापडला त्याला लगेच ठार न करता हाल हाल करून मारणे. म्हणजे सहजासहजी मरणही त्याला मिळालं नाही पाहिजे. इतके वाईट हाल करायचे की, त्याने जगू देण्यासाठी नव्हे तर मरणासाठी भिक मागितली पाहिजे. असं झालं तरच.. कोणीही तरूण अतिरेकी होण्या आधी हजार वेळा विचार करेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Nov 2008 - 11:42 pm | टारझन
सहमत !! गोळ्यांपेक्षा इस्लामी शिक्षा हवी. दगडाने मारून मारून संथ मृत्यू. आणि ही क्लिप परत परत दाखवून आपल्या प्रिय वृत्तवाहिन्यांनी हे काम अजुन चांगलं केलं असतं
=)) =)) =)) आयला काय पण हेलमेट ए ... छ्या
फारच मनापासून आलाय लेख ... उत्तम ,,,, काँग्रेस या वेळी मतं मागताना जोडे खाणार हे नक्कीये आता. हे षंढ लोकांच सरकार आहे. ते आबा पाटिल रडकुंडी आलेले न्युज वर बोलताना,,, आता आपल्या नेत्यांनी हातापाय गाळल्यावर बाकींनी काय करायचं ? यांच्यात गुडदाच नाही. .. या बाबतीत शिवसेनेला मानायला पाहिजे;
- टारझन
28 Nov 2008 - 11:44 pm | व्यंकु
लेखणीतून एके47 च अवतरलीये म्हणायची अप्रतिम
मधेच हॅंड ग्रेनेड पण मस्त टाकलेत
29 Nov 2008 - 12:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनामिकाताई,
तुम्ही म्हणतात ४८ तासांचं दुष्टचक्र संपलंय. दुष्टचक्र या शब्दाच्या निवडीबद्दल माझी काही प्रतिक्रिया नाही (?), पण ते भयनाट्य खरंच संपलंय का? आपल्या देशाच्या आजी, माजी दोन पंतप्रधानांचा मृत्यु अशाच कारवायांमुळे झाला आहे, आणि तरीही आजही ही अशी युद्धासारखी परिस्थिती उगवली आहे. आजचा एक अंक संपला (?) आणि पुढचा कधी सुरु होणार याची वाट बघत आहोत झालं!
मुंबईत जे झालं, होतंय ते भयंकर आहे; पोलीस आणि कमांडोज आपल्या जिवाची बाजी लावून मुंबईच काय संपूर्ण देश वाचवत आहेत. अशा वेळी, मला असं वाटतं आपण सर्वांनीच कोणाची चूक आहे, कोण कसलं कसं राजकारण करत आहे याऐवजी आपण या परिस्थितीत काय मदत करु शकतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. मदत कोणत्याही प्रकारची असेल, सध्यापुरतं आवश्यकता असलेलं रक्तदान असेल, कुणाला मानसिक सहाय्य हवं असेल ... दुसरा विचार हाही करायला हवा की आपण यापुढे काय करु शकतो. या राजकीय नेत्यांना आपणच निवडून दिलेलं आहे, तेव्हा आपणही काही अंशी या राजकीय घडामोडींना जबाबदार आहोत. आपण त्यासाठी काही करु शकतो का! आपल्याच काही देशबांधवांकडून या लोकांना मदत मिळाली आहे (कारणं काहीही असतील) पण पुढे असं होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो का? शोभा डे (यांना राजकारणाची किती समज आहे?) काय म्हणतात आणि कोण कसलं राजकारण करतोय याहीपेक्षा आपण काय करु शकतो याची चर्चा महत्त्वाची नाही का?
आपण जहालमतवादी आहात का नाहीत, याबद्दल मी काही बोलणार नाही. पण एक लक्षात घ्या, हे अतिरेकी मरण्याच्या तयारीनिशीच आलेले असतात. एका पकडलेल्याला रस्त्यात गोळ्या घातल्या तर इतर चार असं करणार नाहीत, दहशतवाद्यांना दहशत बसेल, हे समजणं म्हणजे वस्तुस्थिती नाकारणं आहे. शिवाय असे दोन मागे फिरले तरी इतर दोन अतिरेकी येऊ शकतात आणि दोन माणसं दोनशे लोकांचाही जीव घेऊ शकतात. या विषवल्लीचं एक पान, एक अतिरेकी, मारून काय मिळणार आहे? इलाज मुळापासूनच नको का करायला? शिवाय ह्या पकडलेल्या अतिरेक्याकडून जी माहिती मिळण्याची शक्यता आहे ती का संपवून टाकायची? या अतिरेक्याच्या तोंडून असं काही बाहेर येणार आहे का जे ऐकण्याची आपली तयारी नाही?
काँग्रसने संसदेवरचा हल्ला, कंदाहार प्रकरण (कारगिल राहिलंच या यादीमधून) या गोष्टींवरुन भाजपला बोलू नये कारण त्यांना नैतिक अधिकार नाही असं तुम्ही म्हणता! पण नामुष्की ही नामुष्कीच असते ना? कंदाहार प्रकरण कंदाहारपर्यंत गेलंच का, ते विमान भारताच्या विमानतळावरुन का जाऊ दिलं? या मुंबईतल्या दहशतकांडामुळे आधीच्या गोष्टींचं महत्त्व कमी होतं का, आपण आधीच्या गोष्टी नवीन घटना झाल्या म्हणून विसरुनच जायचं का? मी कोणत्याही प्रकारे काँग्रसचं समर्थन करत नाही आहे, किंवा या दोन दिवसांच्या दहशतकांडाची तीव्रता कमी भासवण्याचा प्रयत्न करत आहे, पण अपयश हे अपयशच असतं ना! त्याहीपेक्षा महत्त्वाचं, व्हायचं ते झालं आहे, नावडत्या गोष्टी टाळता कशा येतील याचा विचार महत्त्वाचा आहे ना?
थोडं अवांतर, संपादक मंडळी, आक्षेपार्ह असेल तर खुशाल उडवून लावा:
आता भविष्यात प्रत्येक वेळेस काँग्रेसला देखिल या हल्यासाठी जबाबदार धरुन कायम आरोप केले जातील तेंव्हा कुठे तोंड काळ करणार आहेत सगळे काँग्रेसी?
थोडासा ब्लॅक ह्यूमर, जिथे आज भाजप, त्यांचे "पोलादी" माजी गृहमंत्री संसदेवरचा हल्ला प्रकरण, कारगिल, कंदाहार नाव काढल्यावर तोंड काळं करतात तिथेच.
अप्रकाशितः मिपावरील ही बंदी उठवली आहे काय?
29 Nov 2008 - 12:04 am | आजानुकर्ण
29 Nov 2008 - 12:28 am | अनामिका
आपल्या देशाच्या आजी, माजी दोन पंतप्रधानांचा मृत्यु अशाच कारवायांमुळे झाला आहे,
प्रत्येकाने आपल घर सुरक्षित कराव दुसर्याच्या घरात काय चाललय हे वाकुन बघायला गेलो किंवा उगिचच नाक खुपसायला गेलो कि राजिव सारखी अवस्था होते याचा धडा काँग्रेसला मिळाला आहेच्.राजिवना अश्या प्रकारे आलेल्या मृत्युच मला नेहमीच वाईट वाटत आलय.
आणि इंदिरांच म्हणशील तर भस्मासुर स्वतःच तयार केल्यावर त्याचे परिणाम असेच व्हायचे.
५५ वर्षॅ सत्तेत राहुन निर्माण केलेले प्रश्न भाजपाला च काय कुणाच्याच ****ला ५ वर्षात सोडवता येणार नाहित.....
आणि हे दुष्टचक्र कायमच संपलय असले विधान करण्याचा अथवा समज करुन घेण्याचा मुर्खपणा मी करणार नाही जो पर्यंत काँग्रेस आणि तीचे पुरस्कर्ते या देशात श्वास घेतायत तो पर्यंत तरी नाहीच नाही......................!यांच्या(कॉ) कारकिर्दित किंवा इतर कुणाच्याही कारकिर्दित हे अश्या प्रकारचे अंक परत परत पहावे लागण्याचेह भोग आपल्याला चुकणार नाहित याची खात्री आहेच.
अवांतर-गांधीनी जाण्यापुर्वी स्वहस्ते जन्मास घातलेल काँग्रेस नावाच अपत्य स्वतःच्या अट्टाहासाने जर बरखास्त अथवा विसर्जित करण्याचे पुण्यकर्म केले असते तर आज या मितीला सगळ्या भारतियांनी गांधीना राष्ट्रपिता म्हणुन आपल्या मनात आदराचे स्थान दिले असते
"अनामिका"
29 Nov 2008 - 12:46 am | बिपिन कार्यकर्ते
अवांतर-गांधीनी जाण्यापुर्वी स्वहस्ते जन्मास घातलेल काँग्रेस नावाच अपत्य स्वतःच्या अट्टाहासाने जर बरखास्त अथवा विसर्जित करण्याचे पुण्यकर्म केले असते तर आज या मितीला सगळ्या भारतियांनी गांधीना राष्ट्रपिता म्हणुन आपल्या मनात आदराचे स्थान दिले असते
म्हणजे आज जे भारतिय गांधीजींना राष्ट्रपिता मानत नाहीत ते केवळ या एकाच काराणामुळे त्याना राष्ट्रपिता मानत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुमच्या विधानाचा प्रत्यास (कॉन्व्हर्स) अर्थ तसाच होतो आहे म्हणून विचारतो आहे. आणि अजून एक... स्वातंत्र्यानंतर फार काळ ते जिवंत नव्हते. लगेचच गेले (वध झाला त्यांचा) ते. मग तेवढा वेळ मिळाला नाही असे नाही का वाटत? आणि त्यांचा हट्टी स्वभाव लक्षात घेता ते जिवंत राहिले असते तर त्यांनी बहुधा काँग्रेस विसर्जनासाठी एखादं उपोषण केलंही असतं, कोणी सांगावं!!! तसेही ते तत्कालिन नेत्यांना डोईजड झालेच होते काही प्रमाणात. (हे माझं मत :) )
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गांधीनी जाण्यापुर्वी स्वहस्ते जन्मास घातलेल काँग्रेस नावाच अपत्य स्वतःच्या अट्टाहासाने जर बरखास्त अथवा विसर्जित करण्याचे पुण्यकर्म केले असते तर आज या मितीला सगळ्या भारतियांनी गांधीना राष्ट्रपिता म्हणुन आपल्या मनात आदराचे स्थान दिले असते
माझ्या माहितीमधे गांधीजींच्या आधीच, १८५७ च्या बंडानंतर 'सेफ्टी व्हॉल्व्ह' म्हणून काँग्रसची स्थापना इंग्रजांनी केली होती, आता नावं आठवत नाहीत, गुगलकाका लगेच देतील ती नावं. दादाभाई नौरोजी हे भारतीय नावांपैंकी एक असावं असं यत्ता नववीच्या इतिहासात वाचल्याचं आठवतंय.
माझ्या वाचनात आल्याप्रमाणे गांधीजींनी असा हट्ट धरला होता, पण इतर काँग्रेसी नेत्यांनी त्याला मोडता घातला. आता संदर्भ आठवत नाहीत, जाणकारांनी प्रकाश टाकावा.
भाजपने त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीमधे प्रश्न सोडवण्याचा काय प्रयत्न केला ते कळलंच जेव्हा कारगिलच्या वेळी अतिरेक्यांना भारताच्या भूमीवर आतपर्यंत येऊ दिलं किंवा विमान भारताबाहेर जाऊ दिलं; तेव्हा त्याबद्दल माझ्या "नो कमेंट्स".
29 Nov 2008 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते
ऍलन ऑक्टाव्हियन ह्युम
http://en.wikipedia.org/wiki/Allan_Octavian_Hume
शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातला त्याचा फोटो अजून आठवतो आहे. :)
बिपिन कार्यकर्ते
28 Nov 2008 - 11:54 pm | अनामिका
प्राजु !मी कुठ्ल्याही एक पक्षाची विचारसरणी मान्य करते म्हणुन बाजु घेतेये असे कृपया कुणीही समजु नये.पण भारताला मिळालेली दहशतवादाची देणगी ही पुर्ण पणे काँग्रेसची कृपा आहे ही वस्तुस्थिती आहे . बोटचेपेपणाला अहिंसेचे नाव देवुन या इस्लामी दहशतवादाला भारतात फोफावण्यास याच लोकांनी मदत केली .आताच ऐकलेल्या बातमी नुसार केंद्र सरकारच्या आखत्यारीतील गृहखात्याने ह्या संभाव्य हल्ल्याची पुर्वकल्पना १८ नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला दिली होती असे असताना हे कुठल्या तोंडाने दुसर्या पक्षांवर आरोप करतात तेच कळत नाही.
करकरे साळस्कर्,कामटे यांसारखे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपण गमावले .त्यांच्या मृत्युबद्दल शंका घेतली तर लोकांनी अफवा पसरवण्यास हातभार लावु नका असे सांगितले.
आजचा मटा वाचल्यानंतर मी कुठे चुकते असे मला वाटत नाही.या तीन अधिकार्यांना तयार(groom) करायला किती वर्ष लागली असतिल.त्यांच्या बरोबर त्यांचा या क्षेत्रातला पुढिल पिढ्यांच्या कामी येणारा अनुभव ,विचारसरणी, कृती करण्यातली दुरद्रुष्टि हे सगळ देखिल संपल.यामागे राजकारण किती ते माहित नाही .पण कुठल्याही व्यक्तीच्या जिवाच मोल काही लाख अथवा काही कोटि रुपये असु शकत नाही .पण मग केवळ दुसर्या एका नेत्याने आपल्या पेक्षा जास्त पैसा देवु केला म्हणुन एव्हढा त्रागा करण्याच काय कारण्?असेल तुमच्यात दानत तर तुमच्या पदरचे द्या पैसे?पण स्वतःची खळगी जितक जमेल तितक भरायची सवय जडलेल्यांना कसल्या आल्यात संवेदना?
जो अतिरेकी जीवंत सापडला त्याला लगेच ठार न करता हाल हाल करून मारणे. म्हणजे सहजासहजी मरणही त्याला मिळालं नाही पाहिजे. इतके वाईट हाल करायचे की, त्याने जगू देण्यासाठी नव्हे तर मरणासाठी भिक मागितली पाहिजे. असं झालं तरच.. कोणीही तरूण अतिरेकी होण्या आधी हजार वेळा विचार करेल.हाच विचार माझा देखिल आहे अगदी कातडि सोलुन अथवा जश्या प्रकारच्या शिक्षा कुठल्याही गुन्ह्यासाठी या इस्लामी देशांमधे दिल्या जातात तश्याच प्रकारच्या शिक्षा या अतिरेक्यांना करणे जेंव्हा भारताला जमेल त्या क्षणी कुणासही आपल्या देशाकडे डोळा वर करुन वाईट नजरेने बघण्याची हिंम्मात देखिल होणार नाही...............जो पर्यंत हे फुटकळ गांधी वादाचे पुरस्कर्ते या देशात आहेत तो पर्यंत हे कसे साध्य व्हायचे?
"अनामिका"
29 Nov 2008 - 9:09 pm | विनायक पाचलग
माझे वय समज बघता मी कोणत्या पक्शाचा असण्याचे कारण नाही आणि मी नाही आहे.पण आपल्या मतशी मी २००% सहमत आहे
29 Nov 2008 - 12:07 am | लवंगी
माझी तर फार इच्छा होती ताज मधिल शेवटच्या अतिरेक्याला भर रस्त्यात भारतिय सैनिकांनी गोळ्या घातलेल्या बघायची .कुणाला हे फार जहाल वाटेल.पण जो पर्यंत अश्या प्रकारच मरण आपल्यालाही येऊ शकत हा संदेश या निर्दयी अतिरेक्यांपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्यांना दहशत बसणार नाही.
काय जहाल आहे ग यात अनामिका! तू आता प्रत्येक सच्या भारतीयाची भावना व्यक्त केली आहेस. याने दहशतवाद नष्ट न होवो न होवो, पण मुंबईकरांचा आत्मा थोडासा तरी थंड होईल.
29 Nov 2008 - 12:33 am | बिपिन कार्यकर्ते
अनामिकाताई,
तुम्ही हा लेख खूपच पेटून वगैरे (म्हणजे मनापासून) लिहिला आहे. घटना चीड येणारी तर आहेच आहे. पण कुठलाही विचार / कृति जर का मनात खळबळ असताना केली तर ती कधीच सर्वंकष ठरत नाही. आजकाल मला एक नविन शब्द सुचतो आहे अश्या लोकांसाठी... विचारशत्रू.
तुम्ही म्हणता:
जो अतिरेकी जीवंत सापडला त्याला लगेच ठार न करता हाल हाल करून मारणे. म्हणजे सहजासहजी मरणही त्याला मिळालं नाही पाहिजे. इतके वाईट हाल करायचे की, त्याने जगू देण्यासाठी नव्हे तर मरणासाठी भिक मागितली पाहिजे. असं झालं तरच.. कोणीही तरूण अतिरेकी होण्या आधी हजार वेळा विचार करेल.
जरा शांतपणे विचार करा. खरंच असं होईल? तुम्हाला खरंच वाटतं का की असं होईल? अहो मग सौदी अरेबिया मधे बलात्कार, अंमली पदार्थ वगैरे तर नावालाही उरणार नाहीत ना हो. तिथे तर सरळ मुंडकंच उडवतात की हो. पण सत्य काय आहे? सगळे धंदे तिथे चालतात. थांबलंय का? नाही... बरं त्या दहशतवाद्यांना तिथल्या तिथे ठार मारले (त्यांना जिवंत पकडू शकत असताना सुद्धा) तर तपास काय करणार? काही सायकॉलॉजिस्ट्स असं म्हणतात की अश्या आत्मघाती प्रकारच्या हल्लेखोरांना पूर्णपणे ब्रेन-वॉशिंग केलेलं असतं. कोणत्यातरी धार्मिक, वैचारिक जहाल संकल्पना पूर्णपणे त्यांच्या मनात बिंबवलेल्या असतात. मग एकदा का वास्तवाशी संबंध तुटला की मग कसलीही भिती नसते. मग त्यांना देहदंडाची तरी कशी भिती वाटेल. प्रत्येक गोष्ट उगाच गांधीवादावर आणून काय होणार?
तुम्ही भाजप आणि काँग्रेस अशी तुलना करत आहात. मी तर म्हणतो दोन्हीही पक्ष सारखेच वाईट आहेत. मोदींना काय गरज होती आज मुंबईत यायची? थांबले असते अजून ५ दिवस. तसाही त्यांचा प्रत्यक्ष असा काही संबंध नव्हता की त्यांनी इतक्या तातडीने यावे आणि हे पुण्यकर्म करावे. ते शुद्ध राजकारणच खेळले. (तुम्ही म्हणता असेल तुमच्या दानत तर द्या तुमच्या पदरचे पैसे... मोदींनी पदरच्या पैशातून देणगी देऊ असं जाहिर केलं का हो?) आणि त्यांना या बाबतीत विलासरावांनी दूषण दिले तर काय चुकले? आणि काँग्रेस तरी काय सरळ आहे का? तेही त्याच चिखलात तितक्याच खोलवर बुडले आहेत. मला केवळ आपण एखाद्या पक्षाचा / विचारसरणीचा पुरस्कार करतो म्हणून जीवनातल्या सगळ्याच गोष्टींकडे त्याच रंगाच्या चष्म्यातून बघायचे हे चूक वाटते. आणि आता तर मला खरी गंमत हीच बघायची आहे की हिंदूहितशत्रू करकरेंबद्दल तमाम भाजप नेत्यांचे काय म्हणणे आहे. आज तुम्हीच म्हणालात की करकरे कर्तव्यदक्ष वगैरे वगैरे वगैरे होते. मला एकच सांगा... "कर्णा, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?"
पण स्वतःची खळगी जितक जमेल तितक भरायची सवय जडलेल्यांना कसल्या आल्यात संवेदना?
या साठी फक्त काँग्रेसच प्रसिद्ध आहे का हो? बंगारू लक्ष्मण माहित आहेत का?
मुंबईवर इतका अघोरी प्रसंग ओढवल्यावर मनसे आणि शिवसेना कुठे होती ?असे प्रश्न विचारणार्यांनी ह्या पण गोष्टिंची खातरजमा करुन घेण्याचा प्रयत्न जरुर करावा की शहरात भिषण परिस्थिती ओढवली असताना रक्तदान करुन आणि रुग्णवाहिका पुरवण्यात याच दोन संघटना आघाडिवर होत्या. .................
जरी अजून अश्या प्रकारचे काही कानावर आले नाहिये तरी आजवरचा शिवसेना / मनसेचा इतिहास बघता, मी बर्यापैकी सहमत आहे. पक्षिय पातळीवर काहीही घाण असली तरी या पक्षांत खरोखर संकटसमयी धावून येणारे शेकडो कार्यकर्ते आहेत. नक्कीच मदत केली असेल त्यांनी. अर्थात त्याला फारशी प्रसिद्धी नाही मिळणार!!!
***
मी खरंच अशी आशा करतो की,
आपण सगळेच कुठलीही घटना घडली की पेटून वगैरे उठतो. पेटायलाच पाहिजे. आणि कृतिही करायला पाहिजे. पण ती अतिशय थंडपणे. आणि शक्य तितकी सर्वंकष असावी. नाहीतर वीस वर्षांपूर्वीच्या रेल्वे भरती नियमाबद्दल काही माहितच नाही आपल्याला आणि माथेफिरू सारखे कल्याण स्टेशनवर १०० मुलांना मारहाण करून नाहक पापाचे धनी व्हायचे उद्योग होतात. (इंग्रजी मधे एक छान म्हण आहे, पेनी वाईज पाउंड फुलिश.... नको तिथे लक्ष देऊन, द्यायचं तिथे दुर्लक्ष करून उगाच आपलं स्वतःचंच नुकसान करून घायचं.)
मी काय लिहिले आहे यावर (मला लेबलं न लावता) नीट विचार होईल अशी रास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं नसावं, नाही का? :)
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 12:44 am | छोटा डॉन
अतिशय संयमी व उत्तम प्रतिसाद ...
ह्यातल्या जवळजवळ सर्व बाबींशी सहमत ...
सध्या वेळ भावनाप्रधान होण्यापेक्षा नक्की काय करायला हवे याचा विचार करायला हवा. जर कुठल्या "राजकीय पक्षाने" मदत केली असेल तर ते कर्तव्य आहे, त्याच्या जोरावर मदत मागण्याचा मुर्खपणा कुणीही करु नये ...
माझ्या मते कुठल्याही महाराष्ट्राबाहेरच्या नेत्याने ( केंद्रीय मंत्रीपदावर असणार्यांचा सन्माननीय अपवाद सोडुन ) ह्यावेळेला इथे येण्याची गरज नव्हती / नाही.
जे काही कौतुक / बक्षिक जाहीर करायचे आहे ते नंतर करता येईल, सध्या युद्ध अजुन संपले नाही ...
शिवाय " जाहीर शिक्षा " ही एक भावना आहे, सत्य परिस्थीती असे होऊ शकत नाही व तो योग्य उपाय नाही.
"फिदाईन उर्फ आत्मघाती दस्ता " ह्याचा अर्थ असा आहे की मरणाची भिती नाही, मग ते कुठल्या कोपर्यात येवो अगर १ लाख लोकांच्या समोर येतो. त्यांच्यासाठी ही बाब अजिबात महत्वाची नाही, आत्तापर्यंतच्या उदाहरणातुन हेच दिसले आहे, भिती वगैरे बसणे मनातुन काढुन टाका ...
अवांतर : आज भाजपाने कुठल्याश्या हिंदी वॄत्तपत्रात "भाजपाला मत म्हणजे सुरक्षीत भविष्याला मत, काँग्रेसला मत म्हणजे असुरक्षीत जीवनाला मत " ह्या आशयाची जहिरात दिल्याचे न्युज चॅनेलवर सांगत आहेत. हे सत्य असल्यास आम्ही त्याचा "निषेध" करु इच्छितो ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
29 Nov 2008 - 1:04 am | अभिजीत
उत्तम प्रतिक्रीया.
राजकीय पातळीवर याक्षणी नेतृत्वाची वानवा आहे असे वाटते.
- अभिजीत
29 Nov 2008 - 2:41 am | शक्तिमान
माझेच विचार मी वाचत आहे असा भास झाला...
29 Nov 2008 - 12:43 pm | निखिलराव
खरच अनामिकाताई,
माझेच विचार मी वाचत आहे असा भास झाला...
जबरद्स्त विचार
29 Nov 2008 - 12:43 pm | निखिलराव
खरच अनामिकाताई,
माझेच विचार मी वाचत आहे असा भास झाला...
जबरद्स्त विचार
29 Nov 2008 - 1:00 am | llपुण्याचे पेशवेll
तुमच्याशी पूर्ण सहमत आहे . पुष्कळ चर्चा झाली आहे आतापर्यंत पण त्या चर्चे चा निष्कर्श काय? आणि आता पुढे काय.. ह्या प्रश्नांनी अस्वस्थ आहे.
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 1:09 am | बिपिन कार्यकर्ते
पेशवेसाहेब... पुढे काय? हा प्रश्न आहे खराच. बरंच काही करता येईल खरं तर. पण तातडीने करायची एकच गोष्ट आहे... आजच विप्रसरांनी सुचवली आहे.
इथे बघ... http://www.misalpav.com/node/4844
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 1:24 am | अनामिका
बिपिनजी
"व्यक्ती तितक्या प्रकृती "
कुठलेच राजकिय पक्ष चारित्र्यवान ,निस्पृह,निस्वार्थी वगैरे मुळीच नाहीत हे अगदी मान्य.
पण शेवटि गेले जवळपास २ दिवस मुंबईसारख्या भारताच्या आर्थिक राजधानीत अतिरेक्यांनी अश्या प्रकारे थैमान घालणे ही राज्यसरकारसाठी लज्जास्पद बाब असु नये.
आज ओबेरॉय मधिल मोहीम पुर्ण झाल्यावर आबांनी प्रसार माध्यमांना मुलाखत दिली(अर्थात हिंदितुनच)ती देत असताना महाराष्ट्र पोलिसदलातील जे अधिकारी अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडले त्यांचा उल्लेख शहिद असा न करता "मर गये" असा आबांनी केला ?केव्हढी ही संवेदना नाही का?
करकरे नक्कीच कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्याबद्दल शंकाच नाही.पण मालेगाव प्रकरणात राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला होता हे देखिल तितकेच उघड आहे.खरच जर हिंदु दहशतवाद असा काही प्रकार असता तर सर्वसामान्य हिंदु अश्या प्रकारे किड्यामुंगी सारखा चिरडला गेला नसता.मुळात हिंदु सहिष्णु असल्याचा सगळा परिणाम आहे.असो.............
मोदी स्वतःच्या पदरचे पैसे देणार नाहीत हे मला देखिल माहीत आहे .पण म्हणुन त्यांनी जाहिर केलेल्या मदतीबद्दल त्रागा करायलाच हवा अस काही नाही.मोदींच्या मदत देण्याला काँग्रेसचा आक्षेप नसावा असलाच तर त्यांनी देवु केलेल्या आकड्याला असु शकेल.आकडा ऐकुन डोळे पांढरे होणे स्वाभाविक आहे. 8|
आखातातील देशात ज्या प्रकारच्या शिक्षा कुठल्याहि गुन्ह्यासाठी दिल्या जातात त्याने गुन्हे थांबले नाहित हे मान्य पण प्रमाण तर अत्यल्प आहे ना? मग झाल तर .त्यातील काहि शिक्षा फक्त इतर देशांच्या नगरिकांसाठी देखिल असु शकतील मला नक्की माहित नाही पण त्याच मुळे दुसर्यादेशातुन नोकरि निमित्त जाणारे लोक असल्या फंदात पडायला जातच नसावेत.
आपल्या देशात कायदा हा प्रकार फक्त नावालाच अन्यथा तो राज्यकर्त्यांच्या हातातल खेळण झालाय.
तुमच्या इतक मला प्रभावी ,प्रगल्भ लिहिता येत नाही .मी आपल माझ्या सुमार बुद्धी नुसार उत्तर देण्याचा प्रामाणि़क प्रयत्न केलाय. :>
मनसे व सेने बद्दल मात्र मी काही वावग ऐकुन घेणार नाही हं X(
"अनामिका"
29 Nov 2008 - 1:33 am | बिपिन कार्यकर्ते
अहो....
तुमच्या इतक मला प्रभावी ,प्रगल्भ लिहिता येत नाही .मी आपल माझ्या सुमार बुद्धी नुसार उत्तर देण्याचा प्रामाणि़क प्रयत्न केलाय. :>
बस क्या, मॅडम? आपुनको इतना 'उच्च' मत समझो. ;)
मनसे व सेने बद्दल मात्र मी काही वावग ऐकुन घेणार नाही हं
बोललोच नाहिये... :)
आम्ही पण मनात येतं तेच लिहितो हो... फक्त थोडा शांतपणे विचार करून लिहितोय. ज्या गोष्टींचा राग तुम्हाला येतोय त्याच गोष्टींचा राग मला पण येतो हो. पण म्हणून नी-जर्क रिऍक्शन दिली ना की तोटा आपलाच होतो म्हणून वाईट वाटतं.
बिपिन कार्यकर्ते
29 Nov 2008 - 2:45 am | शक्तिमान
बिपिन भाऊंशी सहमत.
29 Nov 2008 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार
काश्मीर मध्ये लागलेला वणवा आता हळुहळु संपुर्ण भारतभर पसरत चालला आहे. हळुहळु आपली वाटचाल अराजकतेकडे चालु आहे. रक्षकचा आता भक्षक बनले आहेत. सत्तेची हाव आणी खुर्चिची लालसा ह्या पुढे सामान्य माणसाची किंमत आता फक्त मतदानाच्या दिवशी उपयोगास येणारे मशीन अशी उरली आहे. "मला काय त्याचे ?" हि व्रुत्ती दिवसेन दिवस वाढत चालली आहे. एक तर लहान सहान कारणावरुन सरळ आगी लावा, बसेस फोडा, दुकाने फोडा असे छान छान उपाय योजणारी मानसीकता आहे, नाहीतर मग अगदी मतदानाचा दिवस हा आपल्याला मौज मजा करायला म्हणुन दिला आहे असे समजुन सहल, चित्रपट, पार्टि ह्या मध्ये संपवणारी एक मानसीकता आहे. अशा दोन टोकांच्या मध्ये विभागलेल्या गेलेल्या या समाजत समजुतदारपणा, आपल्या हक्कांची जाणीव, आणी योग्य मार्गाने न्याय मिळवण्याची ताकद येणे गरजेचे आहे ! नेत्यांचा समाजावर नाही तर समाजाचा नेत्यांवर धाक बसायला हवा आहे. येव्हडे सगळे लिहितोय खरे पण राहुन राहु डोळ्यासमोर 'क्रांतिवीर' मधला नाना उभा राहतो आणी म्हणतो "जगाया तो जिंदा लोगोको जाता है, मुर्दो को नहि, ४७ से कौनसा तख्त पलटा ? कौनसी क्रांती हुई ? जो लोग गीता, रामायण, कुराण पढके नहि जागे वो तुम्हारा अखबार पढके क्या खाक जागेंगे ?"
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
29 Nov 2008 - 11:36 am | वेताळ
अनामिकाशी सहमत.
फक्त एकच भिती वाटते मुस्लिम दहशतवादी जसे हिंसाचाराचा थैमान घालतात तसा प्रयत्न हिंदु धर्मियातील युवकानी स्विकारला तर? हे असे व्हायला नको आहे. म्हणुन मालेगाव व इतर ठिकाणी केलेल्या बॉम्बस्फोटांचा मी निषेध करतो. दहशतवादाचे प्रतूत्तर दहशतवाद हे कधीही होत नाही. हिंदु धर्मात खुन का बदला खुन असे काही सांगितले असावे असे मला वाटत नाही.म्हणुन तर हिंदु हा जगात आपला प्रभाव टिकवुन आहे.ज्या धर्मात नवनिर्मितीवर ज्यादा भर दिला गेला आहे तेच धर्म काळाच्या ओघात टिकले आहेत.आजपर्यंत जगात कितीतरी विकसित संस्कृती त्याच्या आततायी पणामुळे लयास गेल्या आहेत तसे मुस्लिम धर्माची गत भविष्यात होण्याची भिती आहे.
गांधीजीची विचारसरणी अजुनही भारतात कित्येकाच्या पचनी पडलेली नाही आहे. परंतु गांधी विचारसरणी पुर्णतः हिंदुधर्मातील व बौध्द धर्मातील अहिंसा व दया ह्यावर आधारित आहे.कितीजरी गांधीना नावे ठेवली तरी त्या हडकुळ्या माणसात खुप ताकत होती हे तुम्हाला मान्य करावेच लागेल.गांधीजीच्या चरित्रात त्यानी स्पष्ट केले आहे की त्याची अहिंसा हे तत्व त्यानी स्वातंत्र्य चळवळी करता वापरले आहे पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा अतंर्गत शत्रुवर लगाम घालण्यास बळाचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. हे आपले दुर्दैव आहे की स्वातंत्र्यानंतर त्याची लगेचच हत्या केली गेली.
तसेच कठोर शिक्षा असल्यामुळे आखाती देशात व सौदीअरेबिया मध्ये गुन्ह्याचे प्रमाण खुपच कमी आहे. रानटी लोकाना चांगले कपडे घातले व पैसा दिला तर ते चांगले नागरिक होतील हा एक गैरसमज आहे.हे आपण सौदीअरेबियाकडे बघुन सांगु शकतो.तेथील नागरिकाना खुप कडक कायदे आहेत पण तिथले राजे मात्र कायद्यापासुन दुर आहेत . तेथे म्हणे सौदीराजपुत्र ज्या हॉटेलात उतरतो त्या हॉटेलमधले बाकी सगळे लोक आपल्या घरातील स्त्रियांना रुम मध्ये बंद करुन ठेवतात.कारण त्याला जी बाई पसंद पडेल तीला त्याचे अंगरक्षक उचलुन घेऊन जातात.आणि हाच देश जगातील सगळ्या दहशतवाद्याना मुक्त हस्ते पैसे वाटत असतो.
बाकी आम्ही पण मनसे बरोबर मन से आहोत.
वेताळ
29 Nov 2008 - 12:10 pm | स्वप्निल..
>>माझी तर फार इच्छा होती ताज मधिल शेवटच्या अतिरेक्याला भर रस्त्यात भारतिय सैनिकांनी गोळ्या घातलेल्या बघायची .कुणाला हे फार जहाल वाटेल.पण जो पर्यंत अश्या प्रकारच मरण आपल्यालाही येऊ शकत हा संदेश या निर्दयी अतिरेक्यांपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत त्यांना दहशत बसणार नाही.
माझी सुद्धा हीच इच्छा होती..सर्व अतिरेक्यांना आणि जगाला समजायला हवी भारताची ताकद!
मान्य आहे यानी सर्व प्रश्न सुटणार नाही पण मनाला शांती तरी मिळेल..
स्वप्निल
29 Nov 2008 - 1:08 pm | बबलु
अतिशय योग्य लेख.
संपूर्ण भारतियांची (भारतात नुसते राहतात ते नव्हे) भावना व्यक्त केल्यात तुम्ही.
ईस्लाम्यांना ईस्लामी शिक्षाच योग्य.
बाय द वे.... हा अबू आझमी कुठे गेला आता ? त्याचे भाऊबंद काय करताहेत ते बघ म्हणावं.
....बबलु
29 Nov 2008 - 1:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ईस्लाम्यांना ईस्लामी शिक्षाच योग्य.
बबलू महाराज, हे म्हणताना दुसरी बाजूही लक्षात घ्या की मुसलमानांना त्यांच्या धर्मग्रंथातली शिक्षा लागू करायची असेल तर त्यांना त्यांच्या धर्मग्रंथात जे काही म्हटलेलं आहे ते सगळं कायदेशीर मानावे लागेल, अगदी 'जिहाद', तोंडी 'तलाक', बहुपत्निकत्व मान्य असेल तर तो सुद्धा! तेव्हा समान नागरी कायदा असा आवाज चालणार नाही; ते आपल्याला मान्य आहे का?
बाकी अबु आझमी काय आणि इतर भडकावू नेते काय, सगळेच लपले होते. आणि इथे या चर्चेत त्याचं नाव काढून, बबलूमहाराज, आपणच त्यांना मोठं करत आहात हे विसरु नका.
अवांतरः कृपया भडकावू प्रतिसाद, लेखही लिहू नका अशी सगळ्यांनाच विनंती.
29 Nov 2008 - 10:27 pm | llपुण्याचे पेशवेll
हे म्हणताना दुसरी बाजूही लक्षात घ्या की मुसलमानांना त्यांच्या धर्मग्रंथातली शिक्षा लागू करायची असेल तर त्यांना त्यांच्या धर्मग्रंथात जे काही म्हटलेलं आहे ते सगळं कायदेशीर मानावे लागेल, अगदी 'जिहाद', तोंडी 'तलाक', बहुपत्निकत्व मान्य असेल तर तो सुद्धा
मग आता त्याना बहुपत्निकत्व नाहीयेका? त्यांच्या शरीयत साठी पोटगीचा कायदा वेगळा नाहीयेका? आहे ना! मग ठेवा ना त्याना शिक्षाही तशाच....
पुण्याचे पेशवे
29 Nov 2008 - 10:35 pm | आजानुकर्ण
कृपया ह्या घटनेचा हिंदू-मुसलमान अशी फूट पाडण्याकरता वापर करू नका. वैयक्तिक आयुष्यातले कायद्यांसाठी (लग्न-घटस्फोट वगैरे) हिंदूंना हिंदू कोड बिल वगैरे आहे. भारतात शरीयत लागू नाही. घटनेत मान्य केलेल्या कायद्यांनुसारच न्यायाची अंमलबजावणी होते.
मात्र क्रिमिनल स्वरूपाचे कायदे दोघांसाठी सारखेच आहेत. मनुष्यवध, फसवणूक वगैरे गोष्टींमध्ये मुसलमानांनाही हिंदूंप्रमाणेच ३०२, ४२० वगैरे कलमे लावून त्याअंतर्गत शिक्षा केल्या जातात.
29 Nov 2008 - 9:19 pm | आजानुकर्ण
छान म्हणजे हे जिहाद केल्याबद्दल त्या दहशतवाद्यांची इस्लामी पद्धतीने मृत्यूनंतर स्वर्गात कुमारिका वगैरे चंगळ होईल. आणि त्या आकर्षणाने अजून जिहादी तयार होतील
29 Nov 2008 - 9:34 pm | सर्वसाक्षी
ज्या देशात मंत्र्याच्या मुलीला सोडविण्यासाठे हिंदुस्थानी शिपायांनी रक्त सांडुन पकडलेले अतिरेकी सोडले जातात, पंतप्रधानांच्या मारेकर्यांना फाशी द्यायला एक तप उलटुन जात, प्रत्यक्ष संसदेवर हल्ला करणार्या दहशतवाद्याला अभय मिळतं, दहशतवादविरोधी कठोर कायदे मागे घेतले जातात, जिथे गुन्हेगारांवर ह्त्यार परजणार्या पोलिस अधिकार्यांना आरोपींच्या पिंजर्यात उभं केल जात तो देश म्हणजे दहशतवाद्यांचे नंदनवन का ठरु नये?
एकट्या गोवंडीत काही महिन्यात १०००० बांगलदेशींना इथली शिधापत्रे सहज वाटली जातात, कसली आली आहे सुरक्षा? जेव्हा शत्रु सीमेपलिकडुन चालुन येतो तेव्हा सैन्य चोख उत्तर देते. जेव्हा हल्ले घरातुन होतात तेव्हा कोण कुणाला वाचवणार?
कारकुनाहुन कमी पगार मिळणार्या, बहुतांश वेळ नेत्यांच्या सरबराईत घालवावा लागणार्या आणि अत्याधुनिक शस्त्र व तंत्रद्यानाने सुसज्ज दहशतवाद्यांशी लढण्यासाठी दुसर्या महायुद्धातली ३०३ बंदूक वापरावी लागत असलेल्या पोलिसांकडुन काय आणि किती अपेक्षा ठेवायच्या?
दुर्दैवाने आज प्रत्येका नेत्याला व्यापार करायचा आहे. खुर्ची आहे तोवर किती छापता येतील हा एकच प्रश्न महत्वाचा.
1 Dec 2008 - 1:28 pm | राघव
सारासार विवेक नष्ट झाला की दिशा ही विनाशाचीच असते. तो फक्त आपणच आपला घडवणार की कुणी दुसरा येऊन घडवणार हाच काय तो फरक.
पक्ष, पक्षादेश, पक्षाची मतं या सगळ्यांना महत्त्व आहेच, पण ते देशाच्या सुरक्षेशी अन् प्रगतीशी तडजोड करून नसावे.
दहशतवाद, मग तो कोणत्याही धर्माच्या लोकांनी केलेला असू देत, वाईट हे सगळेच मान्य करतील.
आपले नेते याला दहशतवादाविरुद्धचे युद्ध असे म्हणतात. पण या तथाकथीत युद्धात नुकसान हे सर्वस्वी आपलेच होत आहे. युद्धात महत्त्वाचे असणारे प्रतिआक्रमण येथे कुठे आहे? केवळ बचाव करून युद्ध जिंकता येत नाहीत. माझ्या मते दहशतवादाविरुद्ध लढायचे कसे हेच अजून सरकारला स्पष्ट नाहीये.
दहशतवादी आपल्या भूमीवर येऊन हमला करतात त्यामुळे आपलेच जास्त नुकसान होते ते उघड आहे. अन् त्यांच्यावर आक्रमण करता येत नाही कारण त्यासाठी आपल्याला शेजारच्या देशाशी युद्ध छेडावे लागेल, जो दहशतवाद्यांचा उघड प्रयत्न आहे.
पण, इतर ज्या दहशतवादी/नक्षलवादी संघटना भारतात आहेत त्यांचे तरी सरकार काय बिघडवू शकले आहे? फक्त संघटनांवर बंदी घालून यांस आळा बसेल काय?
माझ्या मते सरकारला (ते कोणत्याही पक्षाचे असो) राजकीय इच्छाशक्ती असणे महत्त्वाचे आहे. जो वीरप्पन १५-२० वर्षांपासून हुलकावण्या देत होता, त्याला उखडायचा एकदा निर्धार केला तेव्हा ते शक्य झालेच ना?
मुमुक्षु