थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर.
खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही. पण ४ थ्या दिवशी पासुन मिळायला हरकत नाही. शास्त्रीय कारण नंतर सांगेन.
जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.
प्रतिक्रिया
28 Nov 2008 - 4:25 pm | टारझन
हे येता येता च कळलं होतं ...
असो .. हा उपाय खात्रीशीर आहे. मजा येते
- टारझन
28 Nov 2008 - 4:28 pm | विनायक प्रभू
खराच करुन बघलास का उगाच.
28 Nov 2008 - 4:28 pm | अमोल केळकर
धन्यवाद
एकदम साधी सरळ युक्ती/ गोष्ट सांगितल्याबद्दल
सध्या अतीशय आवश्यक गोष्ट आहे ही !
स्वगतः कंपनीत आत्ताच कॉस्ट कटिंग बद्दल मिटिंगला जाऊन आलो.
(चिंतातुर ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
28 Nov 2008 - 4:29 pm | सखाराम_गटणे™
मला वाटले दुसरे काही तरी असेल.
28 Nov 2008 - 4:38 pm | विनायक प्रभू
मंजे काय रे गटणे
28 Nov 2008 - 9:38 pm | सखाराम_गटणे™
जोरदार योगासन
28 Nov 2008 - 4:29 pm | सुनील
मास्तूर, ते आकडे १ ते १०० अशे सुलटे मोजले तर नाही का चालणार. उलटे मोजताना मध्येच गडबड होतेय!
जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.
आता ही "इतर" टिकाणं कुठली ते पण सांगा की राव!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Nov 2008 - 4:36 pm | विनायक प्रभू
तीच तर गंमत आहे.पहिल्यांदा करताना जरा त्रास होणारच. पण जमल की फायदाच फायदा
28 Nov 2008 - 5:27 pm | अवलिया
वा वा प्रभूजी की जै हो
अजुन अनेक ताण निर्मुलन आहेत
जिज्ञासुंनी अदर साईट ऑफ मिडनाईट वाचावे
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
28 Nov 2008 - 5:43 pm | खादाड
हे सिल्वा मेथड च्या पुस्तकात सान्गितल आहे ख्ररच काम करत!
28 Nov 2008 - 5:44 pm | विनायक प्रभू
कोन रे बाबा ह्यो?
28 Nov 2008 - 5:58 pm | विकेड बनी
बसलो.
हो तेवढाच सरळ बसलो.
ठेवले.
केले.
आ...ता पुढचे काही दिसत नाही. डोळे बंद करून टाइपता येते कारण सवय आहे.
28 Nov 2008 - 6:10 pm | टारझन
आ...ता पुढचे काही दिसत नाही. डोळे बंद करून टाइपता येते कारण सवय आहे.
काय काय करायच्या सवई असतात लोकांना .. कमाल आहे ... डोळे बंद करून .. चालू द्या
- टाऋषीमुणी
28 Nov 2008 - 6:35 pm | चंबा मुतनाळ
हात आपल्याच मांडीवर ठेवावे
28 Nov 2008 - 9:05 pm | टारझन
आणि 'म' ला 'म' च म्हणावे. गाडी घसरू देऊ नये.
- मारझन
28 Nov 2008 - 8:45 pm | विनायक प्रभू
हात मांडीवर आहेत ना? मग कशाने टाईपता बॉ.
28 Nov 2008 - 6:06 pm | खादाड
जोस सील्वा नावाचा एक लेखक आहे त्याच सील्वा माइन्ड कन्ट्रोल मेथड म्हणुन एक छान पुस्तक आहे !
28 Nov 2008 - 9:19 pm | लिखाळ
चांगले आहे.. कधी थकून जाण्या येवढे काम केले तर हा उपाय करुन पाहीन :)
>जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.<
अरे वा.. तेव्ह हात कुणाच्या मांडीवर ठेवावेत ;)
-- लिखाळ.
28 Nov 2008 - 9:23 pm | विनायक प्रभू
तेव्हा हाताच्या पोझिशनचे महत्व नाही. जमेल तिकडे.
28 Nov 2008 - 9:20 pm | सूर्य
हम्म.. बरे झाले तुम्ही ऑफीसचा ताण कमी कसा करायचा सांगितले ते. आज घरी गेल्यावर करुन बघितले पाहीजे.
-सूर्य.
3 Dec 2008 - 4:58 pm | केवळ_विशेष
यांपैकी कुठल्यातरी आकड्यापाशी आलो आणि अंमळ डुलकी लागली...