नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग 1

योगविवेक's picture
योगविवेक in जनातलं, मनातलं
7 Jun 2015 - 10:16 am

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग 1
प्रा अद्वयानंद गळतगे

मिसऴपाव धारक हो, खालील लेख मला भावला. नाडीग्रंथांचे अवलोकन करायला जाणाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर मला मिळाले ते सोबत एका नाडीपट्टीचा फोटो नमुन्यादाखल सादर. अनेकांना याविषयाची कल्पना नसेल. त्यांनी पुढील भागातून लिंक मिळवून वाचावी ही विनंती.

नाडी ग्रंथ प्रेमी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी प्रस्तूत लेखकाला (प्राचार्यअद्वयानंद गळतगे यांना) प्रश्न विचारला होता.
" आपल्या लिखाणात नवग्रह मानवावर प्रभाव टाकत नाहीत, ते एका फल ज्योतिष नामक व्यवस्थेचा भाग आहेत. असे म्हणता, ते योग्यच आहे. मात्र नाडी ग्रंथात नवग्रह मंदिरात जाऊ शांती-पुजा करा असे सांगितले जात. जर नवग्रह प्रभाव टाकत नसतील तर पूजेचा उपयोग काय? असे वाटून वाचकांचा संभ्रम होण्याची शक्यता आहे. यावर आपण प्रकाश टाकावा. "
हा प्रश्न महत्त्वाचा आहे यात शंका नाही. या प्रश्नात तीन मुद्दे आहेत.
१. ग्रह मानवावर प्रभाव पाडत नाहीत. (कारण ते एका व्यवस्थेचा भाग आहेत.)
२. नाडीग्रंथात नवग्रह मंदिरात जाऊन शांती - पुजा करण्यास सांगितले जाते.
३. ग्रह मानवावर प्रभाव पाडत नसतील तर त्यांची शांती-पुजा करून काय उपयोग?
प्रथम पहिला मुद्दा घेऊ. या मुद्यातील विषय माहीत नसावा. म्हणून त्या विषयी सांगितले पाहिजे. कारण तो मुद्दा परंपरागत ज्योतिषातील कल्पनेच्या विरुध्द आहे. परंपरागत ज्योतिष ज्वावर प्रभाव पाडतात असे मानते. किंबहुना या कल्पनेवरच पूर्णपणे आधारित आहे. त्याच्या उलट ग्रहांच्या व्यवस्थेच्या कल्पनेत ग्रह मानवावर प्रभाव पाडत नाहीत, असे मानण्यात येते. ही ग्रहांच्या व्यवस्थेची कल्पना प्रस्तूत लेखकाने आपल्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन, आणि विज्ञान आणि चमत्कार या दोन ग्रंथात सविस्तर मांडली आहे. मात्र ही कल्पना लेखकाची नसून ब्रह्मविज्ञानाची आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण ते सत्य ब्रह्म विज्ञानातील, ' आकाश लेखन ' या वास्तवावर आधारलेले आहे. (या 'आकाश' विषयाची ब्रह्म वैज्ञानिक माहिती छांदोग्य व तैतिरीय उपनिषदात सूत्र रूपाने दिली आहे.)
या आकाश लेखनाविषयीचे वस्तुनिष्ठ पुरावे महत्वाचे असून ते प्रस्तूत लेखकाने आपल्या उपर्युक्त 'चमत्कार' ग्रंथात तीन क्षेत्रातून दिले आहेत.
पहिले क्षेत्र 'अर्थ पूर्ण घटना ' यांचे आहे.
दुसरे क्षेत्र 'खरी ठरणारी स्वप्ने व भाकिते' यांचे आहे.
तिसरे क्षेत्र ' नाडी ग्रंथातील भविष्यकथन 'हे आहे. येथे आपल्याला फक्त नाडी ग्रंथातील भविष्य कथनाचा विचार कर्तव्य आहे.
नाडीग्रंथात - विशेषतः अगस्त्यादि अंगठ्याच्या ठशांवरून सांगितले जाणाऱ्या नाडीग्रंथात- भविष्य पहाणार्‍या व्यक्तीचे नाव व जन्मवेळ - त्यावेळची ग्रहस्थिती - अगदी अचूकपणे सांगितली जातात. जी व्यक्ती अजून जन्मलेली नाही, तिची ही माहिती
नाडी महर्षींना ती व्यक्ती जन्मण्यापुर्वीच कुठून मिळते हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून त्याचे ब्रह्म विज्ञानाचे उत्तर असे की ही माहिती त्यांना आकाशलेखनातून मिळते.

नवीन वाचकांना नाडीपट्टीचा फोटो व त्यात उदय नामक व्यक्तिचे नाव कसे कोरून लिहिलेले दिसते याचा नमुना

'आकाश' रूपी कॅनव्हासवर प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची व त्यावेळच्या ग्रह स्थितीची नोंद अगोदरच करून ठेवली असून नाडीग्रंथकर्ते महर्षी आपल्या योगसिद्धीमुळे ती वाचू शकतात. याच नोंदी नाडीग्रंथात त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. या नोंदीनुसारच प्रत्येक व्यक्तीचा जन्म होतो. याचा अर्थ असा की कोणत्या ग्रहस्थिती खाली कोणती व्यक्ती जन्मणार आहे हे अगोदरच निश्चित केले गेले आहे. म्हणजे ग्रहांची भ्रमणे व व्यक्तींचे जन्म हे अगोदरच ठरलेले आहेत. या ठरलेल्या 'व्यवस्थे' नुसारच प्रत्येक व्यक्तीचा जन्म व तिच्या जीवनातील इतर घटनाही घडत असतात. या पूर्वनियोजित 'व्यवस्थे' मुळेच ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत असल्याचा भास होतो. पण मुळात ग्रह मानवावर कसलाच प्रभाव पाडत नाहीत. दोन घटना जेव्हा एकत्र घडतात तेव्हा एक घटना दुसरीवर प्रभाव पाडत आहे अशी माणसाची अर्थात चुकीची समजूत होते.समजा भूकंप होत असताना एक स्त्री बाळंत झाली, तर ती त्या भुकंपामुळे झाली असे ठरत नाही. किंवा भूकंपाचा त्या गरोदर स्त्री वर प्रभाव पडला व ती बाळंत झाली असे कोणी म्हणत नाही. भुकंप व बाळंत होणे या दोन घटना एकाच वेळी योगायोगाने घडल्या आहेत असेच कोणी म्हणेल. त्याचप्रमाणे ग्रहांची आकाशातील स्थिती व एखाद्या व्यक्तीच्या त्या स्थितीतला जन्म या दोन स्वतंत्र घटना असून त्यांच्यात कार्यकारण संबंध नाही. विशिष्ट 'व्यवस्थे' मुळे त्या दोन घटना एकाच वेळी घडल्या आहेत इतकेच.
पुढे चालू भाग 2

ज्योतिषमत

प्रतिक्रिया

लेखाचा विषय समजावण्यात अंमळ गोंधळ उडालेला दिसतो आहे तरी एकच विचार घेऊन तो मांडावा.नाडी ग्रंथात काय लिहिले आहे ते द्या. मतमतांतरंचे प्रतिक्रियांत समर्थन खंडन होइलच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2015 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा.

दोन प्रश्न विचारायचे होते भविष्य कथनाबद्दल विचारु का ?

-दिलीप बिरुटे

योगविवेक's picture

8 Jun 2015 - 9:55 am | योगविवेक

नमस्कार,
आपल्याला पडलेल्या २ प्रश्नांची उत्सुकता निर्माण झाली आहे...

शशिकांत ओक's picture

7 Jun 2015 - 8:25 pm | शशिकांत ओक

मित्रहो,

लेखाचा विषय समजावण्यात आहे तरी एकच विचार घेऊन तो मांडावा. नाडी ग्रंथात काय लिहिले आहे ते द्या.

आता माझे नाव धाग्यात आले आहे तेंव्हा मला या लेखन प्रक्रियेत पडावे लागते आहे. अन्यथा मी या बाबत लिहायचे शक्यतो टाळतो.
कारण इथे नाडी ग्रंथांबाबत माहिती घ्यायच्या पेक्षा टाईमपास म्हणून घागेबाजी करण्यात काहींना मौज वाटते. तर काही अंनिसच्या विचारांविरुद्ध काही कुभांड रचले गेले आहे असा प्रभाव वाटतो.
नाडी ग्रंथांतील मजकुराच्या कथनातील भाषा, लिपी व काव्याची सौदर्य स्थळे शोधायची कोणाला इच्छा नाही अशांसमोर या विषयाला मांडून वैचारिक आदान प्रदान होणे अवघड वाटून मी या इथे अन्य लेखन करताना आपल्याला दिसत असेल. असो.
नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. तरीही ज्यांना याबाबत काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात म्हणता येईल की तमिळ भाषेत ताडपत्रावर कोरून लिहिलेले जे भविष्य असते त्याला नाडी ग्रंथ भविष्य म्हणतात. त्या भविष्य कथनाचे जनकत्व अगस्त्य, वसिष्ठ, शुक्र भृगु आदि विविध महर्षींकडे जाते.
सामान्यपणे हात दाखवून किंवा पत्रिका पाहून जे भविष्य कथन केले जाते त्यात भविष्यकथन करणाऱ्याकडून त्या व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, भावाबहिणींची, मुलांची संख्या, शिक्षण, नोकरी-धंदा वगैरे वर्णन सांगणे अपेक्षित नसते. नाडी ताडपत्रात ते संदर्भ कोरून लिहिलेले असतात आता नेमका प्रश्न निर्माण होते की जर हे ताडपत्रावरी लेखन त्या व्यक्तीच्या अपरोक्ष जन्मा आधीच लिहून ठेवलेले असेल तर मग नवग्रह त्या व्यक्तीच्या जन्मवेळी कसे काय प्रभाव पाडणार?
नाडी ग्रंथात नावांशिवाय त्याच्या जन्मदिनांकाची व त्यावेळच्या अवकाशातील नवग्रह नेमके कुठे कुठे होते त्याचे वर्णन येते. जेंव्हा ते वर्णन 100 टक्के जुळले असे तो व्यक्ती म्हणतो तेंव्हा मग पुढे त्याच पट्टीतील भविष्य कथन एका वहीत लिहून काढले जाते. नंतर त्याचे ग्राहकाला सोईच्या भाषेत टेप करून सुपूर्त केले जाते.
हे भविष्यकथन कर्मसिद्धांत व पुनर्जन्म सिद्धांतावर आधारित आहे म्हणून व्यक्तीच्या पुर्वजन्मातील कर्मदोषांचे वर्णन करून काही शांती-पुजेचे सोपस्कार नाडीमहर्षी सुचवतात. या पार्श्वभूमीवर गळतगे यांचे मत की नवग्रह व्यक्तीवर प्रभाव टाकत नाहीत असे आहे. जे प्रचलित ज्योतिष शास्त्राच्या विद्वानांना मान्य होताना दिसत नाही. नवग्रहगोल जर मानवावर प्रभाव टाकत नसतील तर मग नवग्रहांच्या मंदिरात जाऊन शांतीपुजेचे सोपस्कार महर्षी का सुचवतात? ते तसे केल्याने व्यक्तीचे जीवनात त्याचा प्रभाव कसा काय पडतो? याचा संदर्भ कसा लावावा? असे प्रश्नांवर प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांचे विचार महत्वाचे असतात ते योग विवेकांनी सादर केले आहेत. नेपाळच्या यात्रेत हे विवेक माझ्या सोबत होते.
(नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय. असा दावा निश्चितच चमत्कारिक ठरतो. ह्या प्रकारच्या चमत्कृतिपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादापवाद आतांपर्यंत उद्भवून गेलेले आहेत. अशामुळे अभ्यासकांच्यामध्ये नाडिग्रंथांवर ’विश्वास ठेवणारे’ आणि ’विश्वास न ठेवणारे’ असे दोन मुख्य गट सिद्ध झाले आहेत. बरे, अशा दाव्यांमुळे होते काय, की विविध अभ्यासक विविध प्रकारचे दृष्टीकोन घेऊन नाडिग्रंथावलोकन करताना दिसतात. काहीजण, "धादांत खोटा दावा आहे. अशाप्रकारे माहिती लिहून ठेवलेली असणे अशक्य आहे, चला दाखवतोच मी" अशा आविर्भावामध्ये नाडिवाचकास आणि पर्य्यायाने नाडिग्रंथांस खोटे सिद्ध करण्याकरिता ग्रंथावलोकन करतात, तर इतर काही "चला बघुया कसे काय नांव लिहून येते ते" असा थक्क होण्याचा "विलक्षण थरार" अनुभविण्यासाठी म्हणून ग्रंथावलोकन करावयास जातात. ह्या काही चिकित्सकांच्या अशास्त्रीय दृष्टीकोनामुळे आतांपर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासाकडे एक दृष्टीक्षेप टाकतां, वास्तवापासून दूर आणि तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानी येते. असो.- हैयोहैयैयोंच्या एका घाग्यातून साभार)
वरील दाव्याच्या पुष्ठ्यर्थ एक फोटो योगविवेकनी टाकला आहे. ज्यांना नाडीपट्टीत व्यक्तीचे नाव ताडपत्रात कसे कोरलेले असते याचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल त्यांसाठी तो उपयोगी. ज्यांनी नाडीग्रंथांना थोतांडच मानायचे ठरवले आहे त्यांच्यासाठी कितीही पुरावे कमीच पडतील.

कंजूस's picture

7 Jun 2015 - 11:09 pm | कंजूस

शशिकांतकाका जेव्हा नाडीग्रंथाच्या शोधात नेपाळ ते उत्तर भारत अशा प्रवासाला तुम्ही निघालात आणी तो हेतू जाहिर करून तो दौरा पार पाडून ही लेखमाला लिहिण्यास घेतली याबद्दल फारच आदर वाटतो. सुरुवातीचे लेख फार आवडले .यश किती मिळाले हा मुद्दा नसून प्रवासात जे काही घडले हे वर्णन वाचण्यात समाधान होत आहे.वरचा एका पानाचा फोटोही महत्त्वाचा भाग आहे.मला असे म्हणायचे आहे की त्यात काय दिले आहे ते येऊ दे परंतू ते चूक का बरोबर (जन्माअगोदरच भाकित लिहिलेले असणे,नवग्रहशांती करण्याचे औचित्य अथवा समर्थन/खंडन ) चर्चा र्अपेक्षित नाही. त्याचा वेगळ्या धाग्यात विचार करता येईल.

शशिकांत ओक's picture

7 Jun 2015 - 11:37 pm | शशिकांत ओक

वरचा एका पानाचा फोटोही महत्त्वाचा भाग आहे.मला असे म्हणायचे आहे की त्यात काय दिले आहे ते येऊ दे

याची चर्चा करायला हरकत नाही पण वरील आपल्याला अपेक्षित वर्णन नाडीवरील कार्यशाळेत केले जाते त्यातील प्रत्येक ओळीत काय लिहिले आहे याचे वर्णन आपल्याला ऐकायचे किंवा पहायचे असेल तर पुढील वेळी कार्यशाळेत जरूर यावे...
या ध्याग्यातील भागाचा रोख फक्त वैचारिक आहे. मजा अशी आहे की फोटो टाका म्हणून खिजवले जाते. तो टाकला की फोटो वगैरे ठीक आहे आहे पण ... म्हणून फोटो व धाग्यातील मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयोग केला जातो?
त्या फोटोतील मजकूर खोटा आहे असा दावा नाडी ग्रंथातील मजकुराला थोतांड म्हणणाऱ्यांनी सादर करावा. पण अशा कामाला नाडी विरोधक पुढे येताना दिसत नाहीत...उलट आत्ता चुटकी सरशी उघडे पाडतो म्हणणारे महाभाग काही काळानी अदृष्य होतात. नावच घ्याचे तर प्रकाश घाटपांड्यांचे घेता येईल... त्यांनी मा. स. रिसबुडांबरोबर एक नाडी ग्रंथांची बदनामी करणारे पुस्तक अंनिस तर्फे प्रकाशित केले आहे मात्र प्रकाश काकांनी आता जणू या विषयाबाबत पूर्ण सन्यास घेतल्याचे दिसते...असो.

कंजूस's picture

8 Jun 2015 - 7:47 am | कंजूस

आपणास जुन्यात जुना आणि ताडपत्रावरील ग्रंथ पाहाण्यास मिळाला आहे,त्यात काय लिहिले आहे हे वाचण्याची उतसुकता आहे.त्यामध्ये ज्योतिष कशाप्राकारे लिहिले आहे ते प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्याची खरेखोटे चिरफाड करण्यात ,इतर ज्योतिष पद्धतींशी तुलना करणे यात स्वारस्य नाही. एक संशोधन-प्रेरित प्रवास आणि मिळालेले अनुभव म्हणून या लेखमालेला एक वेगळे महत्त्व आहे आणि ते तपशिल येऊ द्यात.

सत्तर साली एक छापील प्रत पाहाण्यात आली होती त्यातील माझी निरीक्षणे नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यावर लिहीनच परंतू तो या लेखमालेचा विषय नाही.

योगविवेक's picture

8 Jun 2015 - 9:46 am | योगविवेक

वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यातल्या विचारांची देवाणघेवाण करू.

आदूबाळ's picture

8 Jun 2015 - 10:15 am | आदूबाळ

नाममदु उदय दान यातल्या प्रत्येक द च्या लेखनपद्धतीत वरच्या फोटोत फरक जाणवतो. असं का?

योगविवेक's picture

8 Jun 2015 - 2:06 pm | योगविवेक

नमस्कार,आपल्याला जर या फोटोतील अक्षरे वाचायला येत असतील तर आमच्या सारख्या तमिळ भाषेच्या अज्ञ लोकांना जी अक्षरे व शब्द आणि त्यांचे अर्थ दाखवले आहेत ते तेच आहेत काय याचा खुलासा अपेक्षित. त्यात काही बनवाबनवी आहे किंवा नाही याचा ही खुलासा करावा ही विनंती. मला किंवा ओक सरांना तमिळ भाषेतील शब्द अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला हवा तो खुलासा शोध घेऊन करावा. ही विनंती.

मला लिखाणात फरक जाणवला, आणि तो प्रश्न मी नम्रपणे विचारलेला आहे. कृपया सटकू नये.

(कॉनन डॉईलची "डान्सिंग मेन" कथा वाचणे अपेक्षित.)

प्रचेतस's picture

8 Jun 2015 - 9:00 pm | प्रचेतस

डान्सिंग मेन अफाट आहे. डॉईलने सांकेतिक भाषा जबरी रचलीय.

आदूबाळ's picture

8 Jun 2015 - 9:08 pm | आदूबाळ

नमस्कार,आपल्याला जर त्या कथेतील अक्षरे वाचायला येत असतील तर आमच्या सारख्या नाचर्‍या माणसांच्या भाषेच्या अज्ञ लोकांना जी अक्षरे व शब्द आणि त्यांचे अर्थ दाखवले आहेत ते तेच आहेत काय याचा खुलासा अपेक्षित. त्यात काही बनवाबनवी आहे किंवा नाही याचा ही खुलासा करावा ही विनंती. मला किंवा होम्स सरांना नाचर्‍या माणसांच्या भाषेतील शब्द अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आपणच आपल्याला हवा तो खुलासा शोध घेऊन करावा. ही विनंती.

- आदूबाळ वॉट्सन

योगविवेक's picture

8 Jun 2015 - 11:23 pm | योगविवेक

हे आपल्या सारख्या शोधकाला शक्य आहे...

तमिळ लेखनातल्या 'द'मध्ये चूक नाहीयै. दु,द आणि ता(=दा) अशी तीन अक्षरे धावती लिहिली आहेत.

योगविवेक's picture

8 Jun 2015 - 5:59 pm | योगविवेक

धाग्यातील विषयावरील लक्ष विचलित होऊन जाते आहे का?
ग्रहांचा प्रभाव मानवावर पडत नसेल तर मग शांती-पुजा करायला नवग्रहमंदिराना जाण्यामागे विचार काय असावा?

फोटो तमिळ पोथी अथवा ग्रंथातला दिला आहे त्याने काही फरक पडत नाही. माझे म्हणणे आहे की प्रथम तुमची नेपाळ ते वाराणसी नाडीग्रंथाच्या शोधात ही प्रवास अधिक अनुभव ही लेखमाला पुरी करा.ग्रंथाचे फोटो ,कुठे भेट दिली त्याची माहिती,ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते काय सांगतात,ते कसा वापरतात इत्यादी वर्णन अपेक्षित आहे. त्यामध्ये काय लिहिले आहे ते कसे चूक आहे किंवा परस्परविरोधी आहे वगैरे यावरचे लेख आता अपेक्षित नाहीत.तुम्ही तीनचारशे वर्षांपुर्वीचे हस्तलिखिते पाहाण्यास गेला होता तर तो अनुभव इतरांपर्यंत नेणे गरजेचे आहे.चुक का बरोबर याचि न्याय निवाडा न करता फक्त नोंद द्या.

शशिकांत ओक's picture

9 Jun 2015 - 11:31 am | शशिकांत ओक

माझे म्हणणे आहे की प्रथम तुमची नेपाळ ते वाराणसी नाडीग्रंथाच्या शोधात ही प्रवास अधिक अनुभव ही लेखमाला पुरी करा.ग्रंथाचे फोटो ,कुठे भेट दिली त्याची माहिती,ग्रंथ ज्यांच्याकडे आहे ते काय सांगतात,ते कसा वापरतात इत्यादी वर्णन अपेक्षित आहे.

आपणांस अपेक्षित नेपाळ नंतर मेरठ, लखनौ, प्रतापगड येथील यात्रेचा अहवाल योगविवेकनी इथे सादर केला होता. त्यावरील आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

नवग्रह मंदिरात जाणे,शांती करणे,अशी उपाययोजना करावी का वगैरे याबद्दल एकजरी मत मांडले तर सगळा लेखच भरकटेल. नाडीग्रंथात असं लिहिलेलं असेल तर तसं लिहा की अमुक पानावर वगैरे अशा ओळी आहेत आणि फोटो असला तर उत्तम. त्याकाळचे लोक काय विचार करत होते हे फक्त जाणून घ्यायचे आहे. समजा त्या पोथीतला उल्लेख दाखवून एखाद्या नवग्रह मंदिरात तशी शांत केली जात आहे का?ती नोंद विषयाला धरूनच होईल.

योगविवेक's picture

8 Jun 2015 - 11:19 pm | योगविवेक

आणि या धाग्याचा संबंध मला अपेक्षित नाही.
नाडी ग्रंथ भविष्य पाहिल्यावर काही शंका उपस्थित होतात. त्यात नवग्रहांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही असे म्हणणे असेल तर पुढील प्रश्न निर्माण होतात. त्यावर काही स्पष्टीकरण ओकसरांनी मिळवले ते गरजूंना विचारार्थ सादर केला आहे.
फोटोचे प्रयोजन फक्त धागा सुशोभित करायला आहे असे समजावे.