आज मिपा वारंवार बंद पडत होते. जेव्हा सुरू होत होते, तेव्हादेखिल त्याचा वेग समाधानकारक नव्हता.
सांगितले जाते, त्याप्रमाणे खरोखरच जर "जुन्या चौपाटी"वरील मंडळी येथिल मिसळीत वाळू मिसळीत असतील, तर त्याचा बंदोबस्त मिपाच्या तांत्रिक सल्लागारांनी त्वरीत करावा, ही विनंती. नेहेमीच "परकीय हाताचा" दाखला देणे योग्य नाही.
हा लेखदेखिल मला तीनदा लिहावा लागला.
तसेच, दुहेरी प्रतिसाद (आणि लेखही) पडणे हेही आजकाल नित्याचे झाले आहे.
ही तक्रार मला तात्यांना खरडीने वा पोस्टकार्डाने पाठवणे शक्य होते, तरीही मी लेख लिहिला, कारण अन्य कोणाच्या काही तांत्रिक तक्रारी असतील तर त्या एकदमच गेलेल्या बर्या, असे वाटले.
याउप्पर संपादक मंड्ळ हा लेख येथे ठेवण्याविषयी निर्णय घेण्यास सक्षम आहेच.
(व्यथित) सुनील
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 10:37 pm | कलंत्री
मिपाच्या स्मृतीकोषावर आक्रमण केले जाते आणि मिपा बंद पडते.
आजपर्यंत जे झाले ते झाले. यापूढे माझे असे जे कोणी करत असतील त्यांना विनंती आहे की कृपया आता ही मस्करी / चेष्टा थांबवावी.
मिपा हे स्थळ केवळ एका व्यक्तिच्या मालकीच्याच कक्षेत राहिलेले नसुन सध्या अनेक मराठीप्रेमी साठी ते विसाव्याचे स्थान झालेले आहे. असे स्थळ बंद पाडण्यात आपणास यश मिळत असेलही पण नकळतच यामुळे आपण मराठीच्या प्रगतीला बाधा आणत आहोत असे मला नमूद करावेसे वाटते.
परत एकदा विनंती आहे की कृपया जे झाले ते विसरु या आणि यापूढे मिपावर असे आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी.
मिपावर जास्तीत जास्त सभासद आणा, जास्तीत जास्त लिखाण होईल ते पहा आणि यात मिपा अकार्यक्षम झाला तर मला आनंदच होईल, पण असे स्मृतीकोषावर हल्ला करुन मिपाला निपचित पाडण्यात कसलेही पौरुष नाही असे मला परत लिहावेसे वाटते.
शेवटी आपण सर्व एकच आहोत आणि मराठीच्या यशात आपल्या सर्वांचे सौख्य सामावलेले आहे.
मराठी प्रेमी आणि तांत्रीक अज्ञानी ( द्वारकानाथ)
27 Nov 2008 - 12:17 am | विसोबा खेचर
सांगितले जाते, त्याप्रमाणे खरोखरच जर "जुन्या चौपाटी"वरील मंडळी येथिल मिसळीत वाळू मिसळीत असतील, तर त्याचा बंदोबस्त मिपाच्या तांत्रिक सल्लागारांनी त्वरीत करावा, ही विनंती.
सुनीलराव, गैरसोयीबद्दल मी आपली क्षमा मागतो..
मिपावरील दहशतवादी हल्ल्यांच्या बंदोबस्ताचे काम सुरू आहे.. गेले आठ दिवस नीलकांत त्यावरच काम करतो आहे...
नीलकांतच्या हाती आलेल्या बातमीनुसार कुणीतरी अगदी व्यवस्थितरित्या, अगदी माणसं हायर करून मिपावर हे हल्ले करत आहे..!
मिपाची वाढती लोकप्रियता काही लोकांना बघवत नाही.. तीच मंडळी अगदी मन लावून मिपा कायमचं बंद पाडण्याच्या कामात व्यग्र आहेत..!
परंतु सच्च्या मिपाकरांच्या मिपावरील विलक्षण प्रेमामुळे मिपा ह्यातूनही तावूनसुलाखून निघेल आणि अधिकच उजळेल असा माझा विश्वास आहे..
कलंत्रीसाहेब म्हणतात त्याप्रमाणे आता मिपा हे केवळ माझं राहिलेलं नाही तर बहुतांशी आंतरजालीय मराठी माणसांचा तो एक मानबिंदू आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.. आणि म्हणूनच मिपाद्वेष्टी मंडळी अत्यंत अस्वस्थ असून त्यांचे मिपावरील हल्ले कायम सुरू आहेत..!
मिपावर युनिक व्हिजिट्सची दररोज वाढणारी आकडेवारी खरोखरच आश्चर्यकारक आहे..
मिपाच्या सध्याच्या ह्या अडचणीच्या काळात सच्चा मिपाकर मिपाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा माझा विश्वास आहे..!
आपला,
(मायबाप मिपाकरांचा कृतज्ञ) तात्या.
27 Nov 2008 - 3:05 am | कपिल काळे
ही समस्या नक्की कश्यामुळे येते?
विदाकोषावरील अनावश्यक भारा / ताणामुळे?
की
हिट्स मुळे? विदाकोषावरील आक्रमण म्हणजे नक्की काय?
जाणकारांनी शंका समाधान करावे..
27 Nov 2008 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
I Think Someone D-Dosing The Website With The Help of SO Many Bots.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
आमचे राज्य
27 Nov 2008 - 2:09 pm | नीलकांत
मिपाच्या सेवादात्याकडे एकाच वेळी प्रचंड प्रमाणात हिट्स होतात आणि एकाच वेळी प्रचंड मागणी होते आहे. ती मागणी पुरवतांना इतरांना आपण पुरवठा करू शकत नाही. त्यामुळे मिपा उघडण्यासाठी पाठवलेली इतरांची विनंती "रिक्वेष्ट टाईम आऊट" होऊन जाते. लक्षात घ्या यावेळी मिसळपाव बंद नसते तर त्याच वेळि एवढ्या मोठ्याप्रमाणात मागणी असते की तुमची मागणी पुरवायला मिपाचा सर्व्हर असमर्थ होतो.
याचा अर्थ असा की मिसळपाव चालु तर असतेच.मात्र एकाच वेळी असंख्य सेवामागणीचा पुरवठा करतांना अडचण होत आहे.
हे नैसर्गीक नाही.
नीलकांत
27 Nov 2008 - 4:36 pm | विसुनाना
मजकुराची निळाई बंद करण्यासाठी हा प्रतिसाद.
पण मला तर ड्रुपलकडून विदागारासंबंधी काही सूचना येत होती. सकाळी दोन तास मिपा उघडू शकलो नाही. :(
27 Nov 2008 - 5:22 pm | सुनील
तात्या आणि नीलकांत,
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
देशावरील दहशतवादी हल्ले कधी थांबतील कुणास ठाऊक पण मिपावरील हे हल्ले लवकरच थांबून, मिपावर विना-अडथळा स्वैर संचार करता यावा, ही इच्छा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Dec 2008 - 10:55 am | उदय
काही उपाय सुचवत आहे.
१. कॅप्चा (captcha) टाकणे.
२. कॅशिन्ग सुरु करणे.
३. ड्रूपलमध्ये थ्रोटल सुरु करणे.
४. ज्या IP address मधून जास्ती वाहतूक येत आहे, त्याचा reverse IP ने शोध घेऊन त्याच्यावर बंदी टाकणे.