सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

ganeshpavale's picture
ganeshpavale in जनातलं, मनातलं
28 May 2015 - 10:25 am

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर
ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.
असामान्य व्यक्तिमत्व, आणि कर्तुत्ववान देशभक्त
आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे
प्रगाड बुद्धिवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा

मित्रांनो,आपल्याकडे बरीच अशी व्यक्तिमत्व होवून गेली कि जी आजही जनमाणसात अजरामर आहेत.
त्यात प्रत्येक हिंदुच्या मनात, मराठी माणसाच्या मनात आपल अढळ स्थान बनवणारे थोर क्रांतिवीर, स्वातंत्रवीर
आपल्या पैकी बरेच जणांचे आदर्श………।
आपल्या लेखणीने उभ्या हिंदुस्थानात नव चैतन्य निर्माण करणारे
ज्यांचे शिवछत्रपती आदर्श होते. ते मवाळ, जहाल आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे
"स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर"

जय शिवराय
जयस्तु हिंदुराष्ट्राम…।
- गणेश पावले

साहित्यिकशुभेच्छा

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 May 2015 - 10:47 am | पैसा

स्वातंत्र्यवीरांना अभिवादन! सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत मग विरोधकांची काय कथा! अर्थात हे त्यांचे आणि आपल्या सर्वांचेच दुर्दैव!

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 11:48 am | प्रसाद गोडबोले

ओ ओ ओ

सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत

हे काय भलते बोलताय तुम्ही ?
आमच्या शिंव्हरोडवरील एक मित्र आहेत त्यांन्ना सावरकर पुर्ण म्हण्जे पुर्ण म्हण्जे पुर्ण १००% कळाले आहेत आणि म्हणुन ते आम्हा टनाटन धर्माच्या लोकांवर कडाडुन टीका करत असतात !!

अभ्यास वाढवा =))

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा

तो तुमचा भ्रम आहे

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 12:18 pm | प्रसाद गोडबोले

चालु द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन

आज सकाळपासून जयोस्तुते --- गाणी रेडिओवर वाजताहेत.

या महानायकास कोटी कोटी प्रणाम !
उपेक्षित सावरकर

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2015 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

फक्त नाव उच्चारताच आपोआप नतमस्तक होतो. समग्र विविधांगी लिखाण्,प्रखर देशाभिमान आणी अत्यंत दूरदर्शी+ विज्ञानवादी परखड विचार असलेला भारतमातेचा सुपुत्र पुन्हा होणे नाही.

त्यांच्या जीवनावर दूरदर्शन मालीका बनली तर किमान आजच्या पिढीला असाही एक समर्पीत योद्दा होता हे तरी कळेल.
(पुस्तकातून वाचायचे दिवस दूरून्दर्शनले आहेत त्यामुळे हाच एक उपाय शिल्लक आहे)

hitesh's picture

28 May 2015 - 12:20 pm | hitesh

सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी कायदा आला नसता

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 12:23 pm | प्रसाद गोडबोले

आज कधी नव्हे ते आपले एकमत झाले हितेशराव !!

आमचे एक कट्टर सावरकरवादी मित्र बीफ लांब राहिले पण नुसते अंडा भुर्जीच्या वासाने लांब पळतात शिव शिव शिव म्हणत =))

जर शिव शिव म्हणतात तर पळतात कशाला म्हणे? शिवाशिवी खेळायची म्हणून?

तुम्हाला काय सावरकर या एकाच वाक्यासाठी माहित आहेत का ओ ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 May 2015 - 1:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

सावरकर आले, अजून गाय कशी आली नाही … दिसली दिसली.

आदूबाळ's picture

28 May 2015 - 2:39 pm | आदूबाळ

असल्या धाग्यांवर सहसा प्रतिसाद देत नाही, पण तुम्ही बॉल एकदम मिडल केलात, म्हणून टाळ्या!

..जन्मजात सवय दिसतेय, हा राजकारणावरचा धागा नाही याचे तारतम्यही तुला नाही, काय म्हाणावे तुला ?? मुळ धाग्याचा विषय काय आणि आपण प्रतिक्रीया देतो काय कुठे बारीकशी जरी संधी मिळाली की लगेच खाजवायला सुरवात करतोस तु, याचा अतिरेक करु नकोस तसेच इथले वातावरणसुध्धा खराब करु नकोस.

तुला स्वताला स्वातंत्र्यवीर किती समजलेत हे तुझ्या आजवरच्या दिलेल्या प्रतिसादांनी सर्व मिपाकरांच्या लक्षात आले आहेच तसेच स्वा. सावरकर आम्हाला समजाविण्याच्या भानगडीत आपण पडु नये हे उत्तम, इथले स्वा.सावरकरप्रेमी त्यासाठी सर्वार्थाने समर्थ आहेत याची नोंद घ्यावी.

गोहत्याबंदी कायद्यामुळे जर तुझी किंवा अन्य कोणाची उपासमार होत असेल तर ते समजु शकते, परंतु त्याला नाइलाज आहे, त्याविषयी सरकारकडे दाद मागावी इथे नव्हे, हा कायदा बाद करण्याचा अधिकार 'मिपाला किंवा मिपाकरांना' नाही. त्यामुळे त्याविषयीच्या वांझोट्या चर्चेलासुद्धा काही अर्थ रहात नाही. तेव्हा आता ह्या असल्या विषयाला पुढे करुन आपला आवडता 'हिंदुविरोधाचा अजेंडा' पुढे रेटणे थांबवावे अशी णम्र विनंती.

चिनार's picture

29 May 2015 - 9:41 am | चिनार

हितेश तुझं बरोबर आहे ..
गोहत्या या विषयावर सावरकरांचे एका वाक्यातले मत म्हणजेच संपूर्ण सावरकर तत्वज्ञानाचे सार आहे !
सावरकरांना समजण्यासाठी तू आणि राहुल गांधी यांचासारख्या विचारवंताची गरज आहे .
राहुल गांधींना पंतप्रधान करा !
पण माझे पामराचे एक प्रामाणिक मत..सावरकरांचे विचार समजून जर खरच अमलात आणले असते तर गोहत्याबंदी साठी वेगळा कायदा करायची गरजच पडली नसती..!
तरीपण ...राहुल गांधींना पंतप्रधान करा !

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2015 - 9:56 am | पिवळा डांबिस

सावरकर समग्र वाचून आणि नंतर समजून घेण्याचे कष्ट उठवण्यापेक्षा त्यांचा फक्त टिळा लावून फुकटची बोंबाबोंब करणारेच भ*वे आज अधिक!!!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 May 2015 - 1:24 pm | अनिरुद्ध.वैद्य

स्वातंत्र्यवीरांना अभिवादन!

अस वाटतय कि हि पोस्ट मी उगाच लिहिली…।

काही फायदा नाहीय…।
वरील प्रतिक्रिया वाचून डोक फिरतंय….

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 1:46 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला सीरीयस प्रतिसाद हवाय का ? तर मग हे घ्या = >

सावरकरवाद हे खर्‍याअर्थाने निरर्थक अत्मरंजन आहे . कारण सावरकरांचे विचार प्रअ‍ॅक्टिकल नाहीत आजच्या काळाला काळसुसंगत नाहीत .
प्लीज नोट : मी कोणी गांधीवादी किंव्वा काँग्रेसजन नाहीये . सावरकरांचे सहा सोनेरी पाने हिंदुत्वाचे पंचप्राण माझी जन्मठेप सारे लहानपणी वाचले होते आणि प्रभावितही झालो होतो , हळु हळु लक्षात आले की हा ही भाबडा आशावादच आहे , एकी कडे गांधींचा आशावाद अन दुसरी कडे सावरकरांचा ! तार्किक दृष्ट्या काहीच फरक नाही . हिंदुंचा देश अस्तित्वात येणे शक्य नाही , जर फाळणीच्या वेळेला देशाचे द्विभाजन न होता , पाकिस्तान , सेक्युलर इंडिया आणि हिंदुराष्ट्र भारत असे त्रिभाजन झाले असते तर कदाचित सावरकांचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकारले असते . पण आता ते शक्य नाही . हा सारा भाबडा आशावाद आता आपण विसर्जित करावा .

आणि ह्याही पुढे जाऊन सावरकर ब्राह्मण होते त्यामुळे त्यांचे सारे तत्वज्ञान हे सारेच मुसळ केरात टाईप प्रकार आहे . सावरकारांचे साहित्य हे कायम ब्राह्मण्यवाद ह्या टोपलीतच टाकले जाणार . अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही ! हेच जर एखाद्या बंगाली नेत्या विषयी झाले असते तर कम्युनिस्ट दीदी कांग्रेसी सारे मतभेद विसरुन तुटुन पडले असते मणी जींवर !

जाति निर्मुलन तर काही मोजक्याच लोकांनी केले असे आजकाल जवळपास सर्व समाजाचे मत होत चालले आहे . सावरकरांन्नी रत्नागिरीत जे काम केले ते कुटील कारस्थान होते असा समज होत चालला आहे , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सावरकर आगरकर कर्वे रानाडे आणि हो इतकेच काय तर लोकहितवादींच्याही समाजसुधारणेच्या प्रयत्नांना काडीमोल किंमत राहिलेली नाहीये हे कटु सत्य आहे .

सावरकरांन्नीही अंधश्रधेवर कडाडुन हल्ला केला पण अंनिसला मात्र सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍या संस्थांचा जास्त लळा आहे .

थोडक्यात आहे हे असे आहे . कालाय तस्मै नमः !!

सावरकरांचा काळ गेला , हिंदु धर्माभिमानी लोकांनी आणि त्यातही ब्राह्मणांनी हा सारा हिंदुराश्ट्र स्वप्नांचा आदर्शांचा पोकळ डोलारा किती दिवस वहायचा ?
बास झाले आता . विसर्जन करा ह्याचे !

अमृत's picture

28 May 2015 - 2:12 pm | अमृत

पोर्ट ब्लेअर विमानतळाचं नाव वीर सावरकर विमानतळ असचं आहे हो.बाकी सावरकरांच लिखाण जास्तं वाचनात न आल्यामूळे प्रतिक्रीयेवर पास.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 May 2015 - 7:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

हल्ली मलासुद्धा असेच वाटायला लागले आहे!फक्त आपल्याइतकी स्पष्टपणे लिहिण्याची किंवा व्यक्त करण्याची कला नव्हती!
सगळ्या पोस्टीस अनुमोदन!

कालाय तस्मै नमः !!

अजया's picture

29 May 2015 - 10:43 am | अजया

सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन.
प्रगोंच्या प्रतिसादास अनुमोदन!

श्रीगुरुजी's picture

28 May 2015 - 8:29 pm | श्रीगुरुजी

>>> अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही

वाजपेयी पंतप्रधान असताना अंदमानात सेल्युलर जेलसमोर एक स्मृतिस्तंभ उभारण्याची योजना होती. त्यावर सावरकरांची वचने कोरण्यात येणार होती. परंतु २००४ साली सत्ताबदल झाल्यावर सावरकरद्वेष्ट्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या वचनाऐवजी गांधीजींची वचने कोरण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर ज्या कोठडीत सावरकरांनी खिळ्याच्या सहाय्याने कोठडीच्या भिंतीवर काव्य कोरले होते, ते काव्य सुद्धा भिंतीला चुना फासून नष्ट करण्यात आले.

मणिशंकर अय्यरला शिवसेनेने व भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केलेला होता. शिवसेनेने त्याला २-३ वेळा मुंबईत विमानतळावरून बाहेर येऊन न देता उग्र निदर्शने करून व घेराव घालून परत जायला लावले होते. त्याच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलनही सेनेने केले होते. कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही. त्यामुळे ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 8:41 pm | प्रसाद गोडबोले

ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.

ह्म्म . मीही हेच म्हणतोय , आता संपुर्ण सावरकरवादाचाचा गणपति बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या केले पाहिजे !

आदूबाळ's picture

28 May 2015 - 9:05 pm | आदूबाळ

त्या वेळेला (२००४ ते २००६) अंदमानचे नायब राज्यपाल भाजपचे - आणि मराठी - आणि मराठीचे प्राध्यापक असलेले - प्रा० राम कापसेच होते ना हो?

http://en.wikipedia.org/wiki/List_of_Lieutenant_Governors_of_Andaman_and...

खंडेराव's picture

28 May 2015 - 9:24 pm | खंडेराव

कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही

हिशोब बघा देशाचा, आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो
सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी

शिवसेनेने जे केले ते आंदोलन नसावे. पुतळ्याला जोडे मारुन बदलत नाहीत असे निर्णय. भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण.

पिंपातला उंदीर's picture

28 May 2015 - 9:42 pm | पिंपातला उंदीर

मान गये खंडेराव . एकदम सहमत

@ प्रगो- एवढे अप्रतिम तार्किक लिखाण मी फार दिवसांनी वाचले! अभिनंदन! फार सुंदर लिहिलंत!!

आणि या आपल्या कुवतीबद्दल -
_/\_

विकास's picture

29 May 2015 - 12:07 am | विकास

आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो... सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी

यातील प्रत्येक आंदोलनाची सांगता कशी झाली? एन्रॉन प्रकल्प गेला त्याला जबाबदार हे युतीचे राज्य होते असे युतीविरोधक म्हणतात. सरदार सरोवर अस्तित्वात आलेले आहे. भोपाळचे दुर्दैव तसेच राहीलेले आहे... हे सगळे उत्तम आहे असे म्हणायचे नाही. पण असली आंदोलने यशस्वी का झाली नाहीत अथवा होत नाहीत ह्यावर देखील चर्चा करायला हवी.

इरोम शर्मिला हे एका व्यक्तीचे आंदोलन आहे. म्हणजे कमी आहे असे म्हणायचे नाही पण त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना वरील आंदोलनांवरच्या टिपण्णीत ठेवणे योग्य वाटत नाही.

खंडेराव's picture

29 May 2015 - 10:10 am | खंडेराव

१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही.
२) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच.
३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत.
४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे.
५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे.

मृत्युन्जय's picture

29 May 2015 - 10:23 am | मृत्युन्जय

धागा कश्यावर आपण चर्चा कशावर करतो आहे. थोडेफार भान सग्ळ्यांनी ठेवा की. धागा सावरकरांवर आहे, त्यांच्या कार्यावर आहे त्यांच्या महत्तेविषयी आहे. यात मुर्ख मणिचा उद्धार होणे साहजिक आहे कारण त्याने सावरकरांची वचने खोडायला लावली. त्या आधीच्या आणि त्या नंतरच्या कुठल्याही सरकारने तसले कुठलेही अभद्र काम केलेले नाही. त्याला शिव्या घालणे अपरिहार्य होते. तसे भाजपाला यात ओढण्याचे काहीच कारण नव्हते.

शिवाय सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी आली नसती हे म्हणणे सुद्धा मुर्खपणाचे आहे हे म्हणजे अहिंसावादी गांधी समजले असते तर त्यांच्या खून्याला फाशी झाली नसती असे म्हणण्यासारखे आहे. कुठुनतरी बादरायण संबंध जोडायचा आणि विषय नसत्या वळणावर नेउन भाजपाला शिव्या घालायच्या याला मी "अपप्रचारकी कारस्थाने" मानतो.

कोणीतरी आ* घात** निषेध भाजपाने आणी सेनेने जास्त काळ केला नाही म्हणुन त्यांना शिव्या घालणे म्हणजे निर्भया प्रकरणात सगळ्यात अमानुष आरोपी सज्ञान नसल्याच्या कारणावरुन सुटल्याचा निषेध सामान्य जनतेने जास्त काळ केला नाही म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासारखे आहे. गुन्हेगार गुन्हा करणारा असतो त्याचा "जास्त काळ" निषेध न करणारा नाही.

मृत्युन्जय's picture

29 May 2015 - 10:29 am | मृत्युन्जय

वरील प्रतिसाद जरी खंडेरावांच्या प्रतिसादाला आला असेल तरी तो त्यांना वैयक्तप्रतिसादातो तिथे चुकुन पड्ला. वरील प्रतिसादात नमूद केलेले प्रतिसाद देणार्‍यांसाठी आणि गरज नसताना यात भाजपाला ओढलेल्या लोकांसाठी आहे,

श्रीगुरुजी's picture

29 May 2015 - 2:34 pm | श्रीगुरुजी

१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही.

सहमत

२) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच.

मराठवाडा नामांतर आंदोलनाला सावरकरांची वचने हटविण्याच्या तुलनेत प्रचंड मोठा पाठिंबा होता. त्याचबरोबर दोन्ही आंदोलनात जातीचे राजकारण होतेच. नामांतर आंदोलनाला विरोध म्हणजे दलितांना विरोध असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा होता. सावरकरांच्या बाबतीत सावरकरांना पाठिंबा म्हणजे ब्राह्मणांना, हिंदुत्ववादाला पाठिंबा असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा नव्हता.

>>>> ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत.

त्या आंदोलनाला मी बहुतेक श्रेय शिवसेनेला दिले आहे, भाजपला नाही.

४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे.

त्यांनी विरोध केला होता हे वाचले आहे. परंतु त्यांनी राजीनामा दिला होता का नाही ते माहिती नाही. दिला नसल्यास का दिला नाही याची कल्पना नाही.

>>> ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे.

वेगळा धागा काढा.

श्रीगुरुजी's picture

29 May 2015 - 2:34 pm | श्रीगुरुजी

सहमत

श्रीगुरुजी's picture

29 May 2015 - 2:40 pm | श्रीगुरुजी

>>> भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण.

२००४-२०१४ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे भाजपला हा निर्णय बदलणे शक्य नव्हते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर अंदमान स्मृती स्तंभावरील गांधीजींच्या ओळी काढून तिथे पुन्हा सावरकरांच्या ओळी कोरणे आता शक्य नाही. मणि अय्यरने द्वेषबुद्धीने सावरकरांनी कोठडीच्या भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळी चुना फासून नष्ट करायला लावल्या. आताचे सरकार त्या ओळी पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयन करणार आहे असे नुकतेच वाचले.

विकास's picture

5 Jun 2015 - 3:14 am | विकास

हे घ्या!

Modi govt to reinstall Veer Savarkar's plaque at Andaman jail

काही निवडक भाग :

...
After Modi came to power last year, there have been a series of demands made to reinstall the plaque by BJP and Shiv Sena leaders. Sena MP Rahul Shewale had raised the issue in Parliament and demanded the reinstatement of the plaque bearing Savarkar's poetry.

Speaking to India Today TV, Shewale said the removal of the plaque had "insulted" the nation. "The controversy over Savarkar is unfortunate. The Congress did not recognise his contribution towards our freedom struggle, but now the NDA government is getting it done. Both Sena and BJP follow his ideology and we are happy about it," he said.

Sources have told India Today TV the plaque is likely to be installed again on July 4, the day Savarkar was jailed by the British during the freedom movement. Shewale said 2015 is also the 50th year of his death in 1966.
....

विनोद१८'s picture

29 May 2015 - 12:20 am | विनोद१८

..वैचारिक बाटग्यांकडुन तसेच गुढग्यात मेंदु असलेल्यांकडुन यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, केवळ सामाजिक वातावरण गढूळ करणे एवढ्या एकाच उद्देशाने हे असले प्रतिसाद येताहेत, स्वातंत्र्यवीरांचे नाव घेण्याची ज्यांची पात्रता नाही असली माणसे त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करताहेत आणि संपादक ती गंम्मत बघताहेत असे मला वाटते.

मतस्वात्रंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारची निर्भत्सना मिपावर करता येते का ?? किंवा मिपाला तशी ती अपेक्शित आहे का ?? याचे उत्तर मिपाकडे मागण्याची वेळ आता आली असे मला वाटते.

@.....प्रगो.. कुणी आमंत्रण घेउन आले होते का तुमच्याकडुन हा असला मळ्मळीत प्रतिसाद मागण्यासाठी. तुमचा उद्देश समजलाय पण हे लक्षात ठेवा अशा प्रव्रुत्तींना संरक्षण देणारे व उठता बसता 'शाहु, फुले आंबेडकरांचे' नाव घेणारे सरकार आता इतिहासजमा झाले.

खंडेराव's picture

28 May 2015 - 1:48 pm | खंडेराव

शहाणा समाज आहोत, महापुरुषांचे जे सोयिस्कर वाटते त्याचा उदोउदो आणि जे अडचणीचे त्याकडे दुर्लक्ष.

सावरकरांना अभिवादन..

अमृत's picture

28 May 2015 - 2:07 pm | अमृत

सेल्युलर जेलला भेट दिलेली आहे त्यामूळे काळ्या पाण्याची शिक्षा काय होती हे थोडंफार बघून आलोय संग्रहालयात. या सर्व यातना भोगून सुद्धा स्वातंत्र्यवीरांमधील कवी कसा काय जगला हे आश्चर्यच वाटतं.

स्वातंत्र्यवीरांना अभिवादन!

पिंपातला उंदीर's picture

28 May 2015 - 2:43 pm | पिंपातला उंदीर

सावरकरांची सगळीच राजकीय मत मान्य नाहीत . . राजकीय नेत्यांपेक्षा मला तरी त्यांचातला परखड सामाजिक सुधारक जास्त भावतो . अभिवादन .

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !!!!!

श्रीगुरुजी's picture

28 May 2015 - 8:24 pm | श्रीगुरुजी

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन!

आजच अटलबिहारी वाजपेयींचे सावरकरांवरील अत्यंत सुंदर व्याख्यान ऐकले.

विवेकपटाईत's picture

28 May 2015 - 9:42 pm | विवेकपटाईत

तसे म्हणाल तर महाराष्ट्रात कुणीच नेता महाराष्ट्राचा नाही. प्रत्येकाला जातीत जखडून टाकले आहे. कुणी गैर मराठी व्यक्तीने मराठी आदर्श पुरुषांवर चिखल फेकले तरी ही तो माझा नाही तो ... जातीचा आहे. आपले रक्त खळवळत नाही. हेच सत्य. म्हणून केंद्राला ही महाराष्ट्रावर अन्याय करायला कुठलीच भीती वाटत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2015 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

महाराष्ट्राइतके संकुचित गोष्टींवर (पक्ष-धर्म-जात-उपजात-विचारधारा-विभाग-जिल्हा-इ-इ) विभागलेले आणि राज्य व राज्यभाषेकडे (महाराष्ट्र व मराठीकडे) दुर्लक्ष करणारे दुसरे राज्य नाही. "दुफळी हा मराठ्यांना कायम लागलेला शाप आहे" हे वचन खरे आहे.

स्वधर्म's picture

29 May 2015 - 1:21 pm | स्वधर्म

जातींचे अस्तीत्व हा एक फार मोठा जटील प्रश्न अाहे अन उत्तर अजूनतरी दृष्टीपथात नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

28 May 2015 - 9:49 pm | अत्रुप्त आत्मा

आपापल्या परिनी सावरकर जगता येणे शक्य आहे,
.
.
.
.
अर्थातच, इच्छा असली आणि गैरसोय होत नसली तरच!

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 11:32 am | प्रसाद गोडबोले

आपापल्या परिनी सावरकर जगता येणे शक्य आहे,
.
.
.
.
अर्थातच, इच्छा असली आणि गैरसोय होत नसली तरच!

>>>

बुवा ह्या वाक्याचा सरळ सरळ अर्थ " आपल्या सोयीने सावरकरांचा वापर करुन घ्यावा " असा निघत आहे . =))

बहुतेक तुम्हाला मिरान्डा राईट्स माहीत नसावेत म्हणुन रीइटरेट करतो

You have the right to remain silent . Anything you say or do may be used against you in a court of law. You have the right to consult an attorney before speaking to the police and to have an attorney present during questioning now or in the future.

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा

हवा-तोच्च अर्थ-काढुन घेउन अत्यंत अपेक्षित प्रतिसाद दिल्याबद्दल हार्डिक ढण्य वाद!

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 12:02 pm | प्रसाद गोडबोले

आपणास मुद्दा कळालेला नाही

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

आपण आत्मकुंथिकारक निरर्थक भ्रामक संध्यावादाचि पळि आहात! :P

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 1:57 pm | प्रसाद गोडबोले

तो तुमचा समज आहे

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा

............................. http://www.freesmileys.org/smileys/smiley-gen101.gif

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 2:21 pm | प्रसाद गोडबोले

चालुद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन !!

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-003.gif

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 2:42 pm | प्रसाद गोडबोले

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

या महान राष्ट्रापुरुशास विनम्र अभिवादन !

सुधीर's picture

29 May 2015 - 3:22 pm | सुधीर

टिळक आणि गोखले यांच्या विचारांच्या दरीतला सुवर्णमध्य काढण्याची क्षमता असणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा, जाज्वल्य देशाभिमान असेलेला नेता. पण दुर्दैवाने मोलाची वर्ष (टिळक आणि गोखल्यांच्या पाश्चात) काळ्यापाण्याच्या शिक्षेत गेल्याने आणि परत येईपर्यंत ती पोकळी गांधींनी भरून काढल्यामुळे इतिहासात एका भरीव कामगीरीपासून वंचित राहिलेला नेता. (शेवटच्या वाक्यावर बर्‍याच जणांचा आक्षेप असतो). इतिहासात सशस्त्र चळवळीचा पुरस्कार करणार्‍या नेत्यांची धरपकड करून काळ्यापाण्यावर पाठविल्यावर सशस्त्र चळवळ अगदीच ठप्प झालेली दिसते. १९११ मध्ये ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावल्यावर, टिळकांच्या पाश्चात, गांधींचा उदय होण्यापूर्वी (मोक्याच्या वेळी) सावरकरांची राजकीय कारकिर्द जवळजवळ संपुष्टात येते. माझ्या मते जेव्हा सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगातून मुक्त झाले तोपर्यंत गांधी हे "हिंदूंचे" मोठे नेते झालेले होते. काँग्रेसपाठी सामान्या जनता (बहुसंख्या हिंदू) होती. सावरकरांसारखा नेता टिळक-गोखल्यांच्या काळापासूनच काँग्रेसपासून दूर होता. सावरकरांनी त्यानंतर (1937 मध्ये) नेतृत्व केलं ते "हिंदू महासभेचं". लंडन मध्ये "इंडिया हाऊस" चालवणारा, पॅरिस मध्ये मॅडम कामांकडे भूमिगत म्हणून वावरणार्‍या नेत्याला पाश्चात्य संस्कृतीतला सुधारणावाद दिसला नाही असे समजणे हा त्या उत्तुंग नेत्याचा अपमान आहे. कट्टर हिंदुत्वाने भारलेल्या लोकांपुढे (ज्यांनी हिंदुस्थानाव्यतिरिक्त इतर जग पाहिलंच नाही, समुद्र पार केला तर सुचिर्भूत व्हाव लागतं, मुसलमान हे देशाचे कट्टर शत्रू आहेत अशी समज असलेल्यांपुढे) "गो-हत्या पाप नाही" वा हिंदू [संस्कृती] म्हणजे भारतात राहणारे सगळी लोक (मुसलमानांसहीत) अशा आशयाचे, बुद्धिभेदाचे तार्किक विचार मांडले तर त्यांना सावरक कसे समजतील? मग "सावरकर कोणाला कळले नाहीत" हा एक मतप्रवाह बनतो. जिथे आजही नेत्यांना 'जुमल्यांच्या' भाषेत बोलाव लागतं तिथे ७०-८० वर्षापूर्वीची काय कथा. नेता जे बोलतो ते अनुयायांना सोडा, बुद्धिवाद्यांनाही समजण्यात गोंधळ असेल तर त्या नेत्यापाठी जनाधार तरी कसा असेल? सावरकरांसारख्या उंचीच्या माणसाचं दु:ख कदाचित इथे असावं.

देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, वेगवेगळ्या भाषा संस्कृतीसाठी, साहित्यासाठी सावरकरांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उचित आदर नक्कीच केला पाहिजे. त्याची जाण ठेवली गेली पाहिजे.
(माझा मूळ लेख विषयाशी विसंगत इथे आहे. त्यातला हा काही भाग.)