माझी सई तशी समजूतदार
किती थकलो आहे ते पाहून
किती गोड हसायचं
ते निट ठरवता येतं तिला
---
माझी सई तशी शहाणी
आई आजारी असेल तर
आईची आई होणं जमतं तिला
---
माझी सई तशी डँबिस
बाबा आईचे ऐकत नसेल तर
बाबाची सासू होणंही
जमतं तिला
---
माझी सई तशी लब्बाड
किती अन् कोणाला लोणी लावल
तर किती अन् काय मिळेल
हे पक्क ठावूक तिला
---
माझी सई तशी बदमाष
कोण रागावल्यावर किती
भोकांड पसरायचे हे
व्यवस्थित माहीतीये तिला
---
माझी सई तशी निरागस
शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी
मिळवायला किती रुसायचं
हे कळतं तिला
---
माझी सई तशी हुशार
बाबा रागवला तरी
बाबाचं प्रेम
समजतं तिला
---
माझी सई आज आठ वर्षांची झाली....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१२/०५/२०१५)
प्रतिक्रिया
12 May 2015 - 10:24 am | खेडूत
आवडली!
सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
12 May 2015 - 3:10 pm | मधुरा देशपांडे
+१
12 May 2015 - 10:28 am | यशोधरा
खूपच गोड कविता :)
सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
12 May 2015 - 10:37 am | चुकलामाकला
+11111111111111
12 May 2015 - 6:50 pm | सस्नेह
सईला वादिच्या गोड शुभेच्छा !
12 May 2015 - 10:55 am | मदनबाण
माझी सई तशी हुशार
बाबा रागवला तरी
बाबाचं प्रेम
समजतं तिला
वाह्ह... :)
गोड आणि निरागस सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत
12 May 2015 - 11:12 am | प्यारे१
सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
12 May 2015 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे
गोग्गोड सईला वाढदिवसांच्या शुभेच्छा !
बाबाची ही काव्यभेट तिला नक्कीच खूप आवडली असणार !!
12 May 2015 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
कविता आवडले हेवेसांन
पैजारबुवा,
12 May 2015 - 1:50 pm | गणेशा
मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण ...
शब्दांपलिकडले भाव छेदून ओतप्रोत मायेचा झरा ....
सई ला वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा !
12 May 2015 - 2:53 pm | नाखु
एक "बाप" लि़खाण !!!!
वा.हा.शु.
12 May 2015 - 3:08 pm | प्रचेतस
एकदम मिकास्टाईल... अतिशय सुंदर कविता.
12 May 2015 - 3:09 pm | कविता१९७८
मस्तच
12 May 2015 - 3:43 pm | पैसा
मस्त कविता! सई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
12 May 2015 - 3:58 pm | सूड
छान कविता, सईला वादिहाशु!!
12 May 2015 - 4:03 pm | नीलमोहर
डँबिस सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
12 May 2015 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा
माझी सई तशी निरागस
शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी >>> लै मत्त मत्त !!!
ही घ्या आता सईला वाढदिवसानिमित्त माझ्याकडून एक तसलीच लालचुटुक भेट.
12 May 2015 - 5:01 pm | कवितानागेश
किती गोड!
12 May 2015 - 5:27 pm | एक एकटा एकटाच
अगदी आवडली
मुलीच्या वाढदिवसाला बाबाची उत्तम भेट
13 May 2015 - 11:37 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्वांचे मनापासून धन्यवाद!
13 May 2015 - 7:23 pm | चाणक्य
सईला खूप शुभेच्छा...
13 May 2015 - 7:30 pm | तिमा
बर्याच दिवसांनी तुमची सुंदर कविता वाचून मनापासून आनंद झाला. सईला बिलेटेड हॅपी रिटर्न्स !!
मध्यंतरी बर्याच तोतया कवींनी अशी काव्ये प्रसवली होती की डोके भंजाळले होते. तुमची कविता वाचून तहान भागली.
12 Jul 2015 - 3:25 pm | जडभरत
मस्त लिहिलंय, छानच.
माझी सई तशी डँबिस
बाबा आईचे ऐकत नसेल तर
बाबाची सासू होणंही
जमतं तिला
हे मात्र एक्दम खरं.
14 Jul 2015 - 6:13 pm | पद्मावति
फारच छान लिहिलय. खूप गोड कविता. तुमच्या सईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
14 Jul 2015 - 6:30 pm | बॅटमॅन
अरे! ही कविता नजरेतून सुटलीच होती.
मस्त कविता एकदम! सईला अनेकोत्तम शुभेच्छा.