मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
प्रतिक्रिया
8 May 2015 - 3:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
२० - २५ - जास्तीत जास्त ३० रिअलीस्टीक वाटते, पण ३०+ ५०० सीसी इंजिनमधून मिळेल हे जरा जास्त वाटत. मिळत असेल तर चांगलाच!
अजून एक, तुम्हाला GT ही GT म्हणून घ्यायची आहे की, बुलेट म्हणून? कारण ही बुलेटसारखी नाही. त्यामुळे बुलेट घेतली हा फील राहणार नाही. बरेच बुलेट घेणारे त्या बाबतीत इमोशनल असतात, त्यामुळे जर बुलेटचा इमोशनल ऐंगल असेल तर परत विचार करा :)
एकंदरीत ठेवण आणि गाडी आवडली तर घ्या! एन्फिल्डच टॉप एन्ड मॉडेल आहे, बेस्ट इन लाइन!
8 May 2015 - 4:32 pm | खंडेराव
किंमत हा मेन फॅक्टर आहे, उद्या भेटतोय विकणार्याला, बघुया काय होतेय. मार्केट रेटपेक्षा कमी सांगतोय तो.
बुलेटची इमोशनल आवड अशी नाही, त्यामुळे तो अपे़क्षाभंग होणार नाही. फक्त २ लोकांना किती आरामात बसता येते हे मात्र एकदा बघुन घेतो..
अॅवरेजचे खरे आहे, प्रत्येकाचे आकडे वेग वेगळे..२५-३० मिळण्याचेच चान्सेस जास्त आहेत इतक्या मोठ्या मशीनला. अर्थात अगदी ४०चेही दिलेत लो़कांनी हायवेला ८५च्या वेगाला.
8 May 2015 - 4:40 pm | कपिलमुनी
गाडी स्वस्त मिळते म्हणून घेउ नका.
आरामदायी, आवड आणि गरज यांचा मेळ घालून मगच गाडी घ्या.
8 May 2015 - 4:53 pm | खंडेराव
सध्या जुपीटर वापरतोय बायकोसाठीची..मोटारसायकल घ्यायची आहेच आज ना उद्या, त्यामुळे ही बघीतली आणि विचार सुरु झाला. व्यवस्थित चालवुन बघितल्याशिवाय घेणार नाही!
8 May 2015 - 7:48 pm | मोदक
तुम्ही या आधी मोटरसायकल चालवली आहे की बुलेटवरच श्रीगणेशा करणार आहात..?
(कोणत्याही खवचटपणे प्रश्न विचारलेला नाही. बुलेट चालवण्यासाठी किंवा ५५० CC इंजीन पेलण्यासाठी विशेष सराव लागतो.)
ज्युपीटर वरून डायरेक्ट ट्रांझीशन होणार असेल तर पुन्हा विचार करा.
8 May 2015 - 8:29 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी
8 May 2015 - 9:22 pm | खंडेराव
१२ वर्षे मोटारसायकल वापरली आहे, वि़क्टर, नंतर सुझुकी हयाते..लेह लदाख पासुन इतरही अनेक लांबच्या फेर्या केल्या आहेत.७०-८०००० किमी चालवली असेल. फक्त गेल्या सहा महिन्यापासुन मोटारसायकल नाही.
हो, पण बुलेटचा मात्र अनुभव नाही. कधीतरी मित्रांची वगैरे चालवली आहे तेवढेच..
वजन ( माझे ) १०० किलो च्या पुढेमागे आहे, त्यामुळे गाडी जड होणार नाही असे वाटतेय.
8 May 2015 - 2:38 pm | कपिलमुनी
सेकन्डहँड गाडी घेताना पहिला प्रश्न
तो गाडी का विकत आहे?
कुछ तो बात होगी वरना वो यूंही बेवफा नही होता
8 May 2015 - 2:52 pm | खंडेराव
तो परत चाललाय अमेरिकेला..आधी घेउन जाणार होता, आता नेत नाहीये..
8 May 2015 - 8:36 pm | सुबोध खरे
खंडेराव
एक अनाहूत सल्ला
गाडी दाखवायला मेक्यानिक जवळचा नका शोधू. जितकी गाडी खराब तितका त्याचा फायदा जास्त. लांबचा मेक्यानिक मित्राच्या ओळखीचा असेल तर पहा. कारण यातून त्याला फार फायदा होत नसल्याने तो तुम्हाला चांगला सल्ला देईल.
8 May 2015 - 9:00 pm | टवाळ कार्टा
उत्तम सल्ला
8 May 2015 - 10:38 pm | खंडेराव
दुरदर्शी सल्ला :-)
हो, एखादा दुरचा शोधतो, किंवा सरळ एनफिल्ड सर्विस सेंटरला नेतो. अर्थात त्यांच्याविषयी लोकांचे मत फारसे चांगले नाहीये!
आणि खरे सर, सल्ला अनाहुत कसला, त्यासाठीच तर इथे आलोय..धन्यवाद!
13 May 2015 - 5:03 pm | कपिलमुनी
BULLET 500 आणि classic 500 चे इंजिन एखादा अपवाद वगळता सारखे आहे . मुख्य फरक म्हणजे क्लासिक मध्ये ईएफआय ( fuel injection ) आणि BULLET 500 मध्ये carburetor आणि throttle position sensor (TPS) आहे.
या दोन्ही सीस्टमच्या फायद्या- तोट्याबद्दल माहिती कळेल का ?
20 Aug 2015 - 7:57 pm | मी-सौरभ
धागा वर आणण्यासाठी हा प्रतिसाद..
20 Aug 2015 - 8:02 pm | कपिलमुनी
प्रयोजन काय?
9 Sep 2015 - 2:47 pm | कपिलमुनी
9 Sep 2015 - 2:48 pm | कपिलमुनी
9 Sep 2015 - 3:12 pm | मी-सौरभ
हम कितना देणे का??
9 Sep 2015 - 4:54 pm | कपिलमुनी
२ पेटी लागतील.
9 Sep 2015 - 5:37 pm | मी-सौरभ
घेऊन टाकू ;)
9 Sep 2015 - 5:16 pm | भुमन्यु
जो आर. ई. च्या मेन लूक आहे तो क्रुझर लूकच घालवलाय.
9 Sep 2015 - 5:39 pm | कपिलमुनी
ही बुलेटपेक्षा पूर्णपणे वेगळी गाडी आहे हो !
9 Sep 2015 - 5:49 pm | अनिरुद्ध.वैद्य
नेकेड + कॅफे रेसर असं काहीस कॉम्बो दिसतंय ...
ड्युकसे टक्कर होणेवाली है मतबल
9 Sep 2015 - 5:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
कॅफे रेसर नसावी ही ऑफ़ रोड क्रुजिंग बाइक आयला कसले प्रकरण आहे राव! प्रेमात पडलो हिच्या! आवडली मला तरी तूफ़ान
9 Sep 2015 - 6:08 pm | कपिलमुनी
मला सुद्धा ही बाईक आवडली आहे .
ऑन रोड कशी आहे ते बघून घेता येइल :)
9 Sep 2015 - 11:04 pm | अनिरुद्ध.वैद्य
टाकी तसलीच आहे न तिची! त्यामुळे वाटते!
एकुणात धूम इष्टैल बाईक काढतंय एन्फिल्ड ...
४१० सीसी इंजिन, म्हणजे पूर्णपणे नवीन बाईक असणारे ... इकडल इंजिन तिकडे असले प्रकार नाहीत!
आणि हे अजूनही स्पोक्स काय ... असला ढासू लुक्स दिलाय, अलॉय तरी हवेत ... स्पोक्स नक्को.
11 Sep 2015 - 4:11 pm | अभ्या..
एन्डुरो हाय. स्पोक्स असणारच.
लै आधी कावासाकीने काढली होती एन्डुरो नावानेच. (टीव्ही अॅड भारी होती) त्याला केबी १०० इंजिन होते. नाही चालली बाजारात. फायबरचे मोठे मडगार्ड अन रिस्पॉन्सिव्ह ईंजिन होते. २० वर्षानी हिरोने ईंपल्स काढली.
ती पण १५० चे सीबीजीचे ईंजिन लावलेली. त्याला पण स्पोक्स आहेत. अजून आहे मार्केटात.
पॅशनचे पण असेच एक मॉडेल काढलेय रफ युज साठी.
इन्फील्डचे हे सेम स्टाईल असणार. फक्त ईंजिन आरई असणार. रिसॉन्सिव्ह ईंजिन आणि पिकप असला तरच असले मॉडेल चालेल. सध्या दोन्हीत तरी आरई नाही यशस्वी.
11 Sep 2015 - 4:21 pm | कपिलमुनी
Enduro motorcycle चा क्लास आरई पेक्षा पूर्ण वेगळा आहे. हे फ्युजन कसे चालतय ते बघू या
11 Sep 2015 - 10:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
भारतीय मार्केटमध्ये चालेल? ते फार स्पेसिफिक मॉडेल वाटतंय! मलातरी ड्युक टार्गेट वाटतेय :D कारण सध्या ड्युक अपील वाढत चाललाय. पल्सारदेखील ह्या रेंज आणली आहे. रफ युजसाठी बुलेट आहेच.
बाकी इंजिन नवीन आणत आहे आरई.
9 Sep 2015 - 6:24 pm | Dhananjay Borgaonkar
एकच नंबर. फायरिंग कस आहे बघायला पाहिजे.
9 Sep 2015 - 5:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
१.६५ ऑन रोड!
9 Sep 2015 - 6:12 pm | प्रसाद गोडबोले
आमचे वजन छटाकभर असल्याने आम्ही कधीही रायल यनफिल्डचा सीरीयसली विचार केला नाही ... पण ही गाडी राजेशाही दिसते ह्यावर आमचे दुमत नाही ...
असो असते एकेकाचे नशीब ... आम्ही आपले गरीबाची के टी एम घावी म्हणतो , आम्हाला तेवढीच झेपु शकेल =))
9 Sep 2015 - 6:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
वजनाचे काय नाय प्रगो! घ्या रॉयल एनफील्ड!
9 Sep 2015 - 8:49 pm | खटपट्या
हेच म्हणतो, वजनाचं काय नसतं. कीत्येक सडपातळ माणसे बुलेट चालवतात.
9 Sep 2015 - 11:10 pm | अनिरुद्ध.वैद्य
अरे घेऊन टाका ... मग काय केटीएम न काय ... एकदा धडधड व्हायला सुरुवात झाली की वजनाचा प्रश्नच नाय ;)
बाकी केटीएम छान बाईक आहे, कम्फर्टपण मस्तय आणि इंजिन स्मूथ, मख्खन ... शिवाय टेकनिक अडव्हांस आहे एकदम. पल्सार २०० पण चांगलीय, ड्युकच्या इंजिनात थोडेसे बदल करून बनलीय!
इन्फिल्ड नाय तर ड्युक ३९० करून टाका बुक! वेटिंग पण नसेल
9 Sep 2015 - 6:22 pm | Dhananjay Borgaonkar
मी कालच क्लासिक ५०० बुक केली. थंडरबर्ड की क्लासिक यामधे खुप कनफ्युजन होतं. शेवटी क्लासिक घेतली.
9 Sep 2015 - 6:30 pm | कैलासवासी सोन्याबापु
अभिनंदन बोरगावकर साहेब
9 Sep 2015 - 7:19 pm | बाबा योगिराज
बधाई हो......
9 Sep 2015 - 11:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
कधी मिळतेय?
10 Sep 2015 - 12:27 pm | Dhananjay Borgaonkar
धन्यवाद मित्रांनो.
वैद्य साहेब मला १७ सप्टेंबरला मिळते आहे. मिपाच्या वाढदिवसाच्या दिवशी ;)
10 Sep 2015 - 2:37 pm | अनिरुद्ध.वैद्य
आम्हास २ महिने लागलेत ;)
10 Sep 2015 - 5:49 pm | मी-सौरभ
क्लासीक ३५० आणि ५०० मधे पावर सोडून अजून काय जास्त आहे??
11 Sep 2015 - 7:34 am | अनिरुद्ध.वैद्य
जास्त फरक नाही आहे. मलातरी EFI आणि Digital Ignition सोडले तर इतर फरक आढळला नाही!
16 Sep 2015 - 5:14 pm | भटकंती अनलिमिटेड
क्लासिक ही जुनी (रेट्रो) स्टाईलची मोटरसायकल आहे. एकदम दमदार रेट्रो स्टायलिंग आणि शहरातील ट्राफिकमध्ये हॅंडलिंगवर अधिक नियंत्रण यासाठी क्लासिक अतिशय योग्य बाईक आहे. अर्थात इंजिनाचेही ३५० आणि ५०० असे दोन ऑप्शन आहेत. अर्थात क्लासिकच्या हॅंडलच्या पोझिशनमुळे फार मोठ्या राईड्सला थकवा जाणवू शकतो, हात भरुन येऊ शकतात. क्लासिकला पुढील चाकाला डिस्कब्रेक आणि मागील चाकाला ड्रमब्रेक आहे.
थंडरबर्ड ही थोडी प्रगत डिझाईन असलेली बाईक मोठ्या राईड्ससाठी डिझाईन केलेली आरामदायक सीट्स असलेली बाईक आहे. क्रुझर स्टाईलिंग असलेली बाईक शहरातील ट्राफिकमध्ये हॅंडलिंगसाठी जरा त्रासदायक आहे (पण एकदा सवय झाली की अजिबात त्रास नाही). थंडरबर्डला दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक, पुढील चाक थोडे मोठे, मागील चाक अधिक रुंद असल्याने मोठ्या राईड्सना "सोफा ऑन व्हील्स" फील येतो. मी स्वतः थंडरबर्ड वापरतो आणि नॉनस्टॉप दिवसाला चारशे किमी चालवली (चहा ब्रेक्स सोडून) आहे. कुठेही थकवा किंवा पाठीला त्रास झाला नाही.
३५०सीसी- कार्बुरेटरवाले इंजिन असल्याने काही प्रॉब्लेम झाला तरी कुठलाही सर्व्हिससेंटरवाला चालू करु शकतो. कमी पॉवर असली तरी सपाट आणि थोडीफार घाटाच्या रस्त्याला अजिबात loss of power जाणवत नाही. फक्त हिमालयातल्या रस्त्यांसाठी जिथे ५०-६० किमी घाटच असतात तिथे ७० किलोच्या दोन व्यक्ती डबलसीट पिदाडायला जरा शक्ती कमी जाणवेल.
५००सीसी- ईएफआय (electronic fuel injection)मुळे आणि मोठ्या इंजिन स्ट्रोकमुळे अधिक शक्ती. पण ईएफआय सहजासहजी दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला कुशल मेकॅनिकच हवा. रॉयल एनफिल्डलाही अजून तसे तंत्रज्ञ अधिक संख्येने तयार करणे जमले नाही. हिची शक्ती मात्र कुठेही कमी पडणार नाही.
18 Sep 2015 - 5:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
आजची रपेट
जाऊन येऊन १८० किमी
गंतव्य स्थळी जाऊन काम करुन परत येणे ३.५ तास!
19 Sep 2015 - 11:30 am | मोदक
म्हणजे १०० च्या वेगाने गेलात.
उगाच कशाला पळवताय बापू? हेल्मेट होते ना?
20 Sep 2015 - 7:25 am | कैलासवासी सोन्याबापु
यस यस बिना हेलमेट काहीच नाही अहो ४ लेन चा ईस्ट वेस्ट कॉरिडोर मोकळा सापडला (आमचा डिस्पैच रनर सुटी वर असल्याकारणे हे काम आले होते)
7 Oct 2015 - 10:07 am | भटकंती अनलिमिटेड
राईड अधिकाधिक आरामदायी करण्यासाठी आमच्या ’काळाघोडा’चा हॅंडलबार बदलण्यात आला आहे. रुंद हॅंडल आणि बसण्याच्या पोश्चरमध्ये बदल झाल्याने खरेच भारी वाटते आहे. एखाद्या लॉंगराईडनंतर सविस्तर रिव्ह्यू देईनच.
7 Oct 2015 - 11:45 am | मोदक
जागेवर गाडी U टर्न घेताना किंवा घाटामध्ये नागमोडी वळणे घेताना त्रास होत नाही का?
7 Oct 2015 - 12:13 pm | भटकंती अनलिमिटेड
यू टर्नला अजून तरी तसा त्रास झाला नाही. ट्राफिकमध्ये मधेमधे घुसता येत नाही हा एक फायदा (किंवा तोटा म्हणा). मी लॉंग राईडला घाटात चालवून रिव्ह्यू देईनच तसा, पण जे काही अनुभव वाचले आहेत त्यांनी तरी तशी तक्रार केली नाही.