मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 1:00 pm | llपुण्याचे पेशवेll
तेच म्हणणार होतो, ये ग्लासवूल ग्लासवूल क्या है ग्लासवूल ग्लासवूल? एन्फिल्डचा ऑफरोड पण छान आहे.
13 Oct 2014 - 4:40 pm | कपिलमुनी
http://www.team-bhp.com/forum/motorbikes/9757-goldstar-silencer-16.html
अधिक माहिती साठी हा दुवा बघा
13 Oct 2014 - 4:42 pm | कपिलमुनी
ऑफिशियल सर्विस सेंटर मधला अनुभव बर्याच लोकांना वाईटच आहे . मी काही एंन्फील्ड क्लब चा सदस्य आहे.
तिथल्या सर्व लोकांचे मत हेच आहे.
8 Jul 2016 - 3:12 pm | प्रान्जल केलकर
बुलेट साठी शेल चा पेट्रोल चालेल का??
मला मिळालेल्या माहिती प्रमाणे चालत नाही कृपया शंकेचे निरसन करावे
8 Jul 2016 - 5:50 pm | अनिरुद्ध.वैद्य
मी गेले वर्ष शेल्चेच वापरतोय, काहीही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला कोणती माहिती मिळाली ज्यात लिहिले होते की चालत नाही?
16 Sep 2015 - 5:12 pm | भटकंती अनलिमिटेड
क्लासिक ही जुनी (रेट्रो) स्टाईलची मोटरसायकल आहे. एकदम दमदार रेट्रो स्टायलिंग आणि शहरातील ट्राफिकमध्ये हॅंडलिंगवर अधिक नियंत्रण यासाठी क्लासिक अतिशय योग्य बाईक आहे. अर्थात इंजिनाचेही ३५० आणि ५०० असे दोन ऑप्शन आहेत. अर्थात क्लासिकच्या हॅंडलच्या पोझिशनमुळे फार मोठ्या राईड्सला थकवा जाणवू शकतो, हात भरुन येऊ शकतात. क्लासिकला पुढील चाकाला डिस्कब्रेक आणि मागील चाकाला ड्रमब्रेक आहे.
थंडरबर्ड ही थोडी प्रगत डिझाईन असलेली बाईक मोठ्या राईड्ससाठी डिझाईन केलेली आरामदायक सीट्स असलेली बाईक आहे. क्रुझर स्टाईलिंग असलेली बाईक शहरातील ट्राफिकमध्ये हॅंडलिंगसाठी जरा त्रासदायक आहे (पण एकदा सवय झाली की अजिबात त्रास नाही). थंडरबर्डला दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक, पुढील चाक थोडे मोठे, मागील चाक अधिक रुंद असल्याने मोठ्या राईड्सना "सोफा ऑन व्हील्स" फील येतो. मी स्वतः थंडरबर्ड वापरतो आणि नॉनस्टॉप दिवसाला चारशे किमी चालवली (चहा ब्रेक्स सोडून) आहे. कुठेही थकवा किंवा पाठीला त्रास झाला नाही.
३५०सीसी- कार्बुरेटरवाले इंजिन असल्याने काही प्रॉब्लेम झाला तरी कुठलाही सर्व्हिससेंटरवाला चालू करु शकतो. कमी पॉवर असली तरी सपाट आणि थोडीफार घाटाच्या रस्त्याला अजिबात loss of power जाणवत नाही. फक्त हिमालयातल्या रस्त्यांसाठी जिथे ५०-६० किमी घाटच असतात तिथे ७० किलोच्या दोन व्यक्ती डबलसीट पिदाडायला जरा शक्ती कमी जाणवेल.
५००सीसी- ईएफआय (electronic fuel injection)मुळे आणि मोठ्या इंजिन स्ट्रोकमुळे अधिक शक्ती. पण ईएफआय सहजासहजी दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला कुशल मेकॅनिकच हवा. रॉयल एनफिल्डलाही अजून तसे तंत्रज्ञ अधिक संख्येने तयार करणे जमले नाही. हिची शक्ती मात्र कुठेही कमी पडणार नाही.
7 Oct 2014 - 2:53 pm | इरसाल
पीयुसी नीट चेक करुन घेता ना बुलेट्वालेहो, का तो पिवळी टपरी वाला देतो बनवुन असचं.
*** हेचा अर्थ नंतत सांगणेत येईल.
9 Oct 2014 - 11:09 am | योगी९००
या बुलेटला अॅवरेज काय पडतो भाऊ?
(अॅवजेज कमी म्हणून आजून हार्ले घेतली नाही बघा... त्याचा आवाज मात्र लई आवडतो...हार्ले हार्ले हार्ले हार्ले..)
9 Oct 2014 - 11:27 am | मदनबाण
या बुलेटला अॅवरेज काय पडतो भाऊ?
हॅहॅहॅ... हत्ती पोसताना त्याला रोजचा खुराक किती लागतो याचा विचार करायचो नसतो बरं का योगी महाराज ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15
9 Oct 2014 - 1:03 pm | कपिलमुनी
मे़कॅनिक हा बुलेटवाल्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो .
तुम्ही तुमची बुलेट कुणाकडे सर्विंसिंगला देता .
या निमित्ताने चांगल्या मेकॅनिकची / मॉडिफय करणार्यांची माहिती शेयर करता येइल .
9 Oct 2014 - 1:20 pm | टवाळ कार्टा
हे वाक्य "आमची कुठेही शाखा नाही" या वाक्याईतकेच मुर्खपणाचे आहे
9 Oct 2014 - 2:58 pm | कपिलमुनी
असु दे
10 Oct 2014 - 7:36 am | खटपट्या
मुंबईत वर्दे नावाच्या तरुणाने "वर्देंची" नावाचा स्वत:चा ब्रांड काढला आहे. बुलेट मोडिफ़िकेशन मध्ये त्याचा हात धरणारा भारताततरी सध्या कोणी नाही. नवीन/जुनी बुलेट त्याच्याकडे घेवून जायची. त्यातील नको असलेले पार्ट तो आपल्याला परत करतो. उपलब्ध असलेल्या असंख्य मोडल मधील एकावर बोट ठेवायचे आणि घरी यायचे.
नवीन गाडीवर बसल्यावर लोकांनी परत परत वळून बघितलेच पाहिजे.
अधिक माहिती साठी खालील संकेत स्थळाला भेट द्या.
http://www.vardenchi.com/
हा मोडिफ़िकेशन ची किमत तेवढी विचारू नका.
10 Oct 2014 - 7:54 am | टवाळ कार्टा
कमीत कमी २.५ लाख
10 Oct 2014 - 8:25 am | खटपट्या
माझ्यामते ७५ हजारापासून सुरवात आहे.
10 Oct 2014 - 8:27 am | श्रीरंग_जोशी
एकाहून एक बाईक्स बनवतात वर्देसाहेब.
एक तांत्रिक प्रश्न, वर्देंकडून मॉडिफाय केलेली गाडी रस्त्यावर चालवण्यासाठी कोणते कायदेशीर सोपस्कार करावे लागतात? जशी कुठल्याही कंपनीला नवी गाडी खरेदीसाठी उपलब्ध करण्यासाठी एआरएआय सारख्या सरकारी संस्थांकडून प्रमाणित करून घ्यावा लागतात. तसे काही या प्रकारात लागू होते का?
अवांतर - इथे अमेरिकेत माझ्या शेजारी बसणारा स्थानिक सहकारी असाच छंद बाळगून आहे. जुन्या पुराण्या (कधी कधी तर ४०-५० वर्षांपूर्वीच्या) गाड्या विकत घेऊन त्या बर्यापैकी बदलून काही काळ वापरून विकतो. वरील प्रश्न विचारला होता तर तो म्हणाला की बाहेरून कशीही दिसली तरी ज्या मूळ गाडीचे चेसिस असते तीच त्या गाडीची सरकारदरबारी ओळख / नोंद असते.
10 Oct 2014 - 10:30 am | खटपट्या
बहुतेक बेसिक/जुन्या बुलेट चे पासिंग गृहीत धरत असावेत.
13 Oct 2014 - 4:25 pm | चिगो
कसल्या सॉलिड जबरा बाईक्स आहेत, यार.. मजा आ गया.
4 May 2015 - 7:23 pm | मोहनराव
वर्दे साहेबांच्या गाड्या पाहुन थक्क झालो.
रच्याकने समिरा रेड्डीचा नवरा आहे तो!!
16 Sep 2015 - 6:32 pm | प्यारे१
समीरा रेड्डी पण दणकट आहे की!
11 Oct 2014 - 10:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
अक्षय वर्दे हे फ़क्त नव्या बुलेट मॉडिफाई करतात , जुन्या नाहीत असे ऐकले आहे
13 Oct 2014 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत. नवी बुलॅट घ्यायची आणि त्याम्च्याकडे द्यायची.
20 Oct 2014 - 6:51 pm | कपिलमुनी
Slope Of Hell
ही पुण्याजवळ कामशेटपासून साधारण ५ किमी वर असलेले ठिकाण आहे .
अत्यंत तीव्र चढ आणि कच्चा रस्ता या वरून एक खिंड आणि एक चढण चढायची आणि पलिकडे उतरायचा तिथे ( बहुधा) बी एस एन एल च टॉवर आहे . तिथे मस्त पोडीयम बांधला आहे . तिथे विश्रांती घेउन परतायचे.
बायकिंगची मजा आणि थ्रिल अनुभवायचा असल्यास नक्की जावा अशी जागा ( अर्थात सर्व काळजी घेउन )
27 Nov 2014 - 11:35 am | सुधीर
अवांतरः
आयशर मोटार म्हटल की फक्त टेंपोच नजरेसमोर येतात. रॉयल एन्फिल्ड हा आयशर मोटरचा ब्रँड आहे हे आज कळले. आयशर मोटारचा स्टॉक वर्षभरात एवढा का वर चढला याची कारणं शोधताना ही माहिती झाली.
27 Nov 2014 - 12:26 pm | वेल्लाभट
बुलेट म्हणजे माज आहे राव... आहाहा ! काय मझा येतो आवाज ऐकूनच...
घेईन केंव्हा माहीत नाही.
पण कडक्क गाडी.
अरे आवा.......ज कुणाचा ?
बुले........टगडगडग चा
4 May 2015 - 3:28 pm | मोदक
बुलेटला AMP मीटर का असतो? त्याचे नक्की काय काम असते? फ्युएल गेज वगळून याला जागा दिली आहे इतके काय महत्वाचे असते?
4 May 2015 - 3:41 pm | आयुर्हित
जुन्या बुलेट मध्ये आधी हलकीशी किक मारून काटा ० (zero)वर आणावा लागायचा व नंतर जोरात किक मारून बुलेट सुरु व्हायची, नाहीतर किक मारली जात नसे.
आताही नवीन बटन स्टार्ट बुलेट मध्ये विजेरी चार्ज/डिस्चार्ज होत आहे कि नाही हे कळण्यासाठी हे मीटर उपयोगी आहे. विजेरी चार्ज झाली नाही व किक स्टार्ट ची सवय नसल्यास मात्र खूप अवघड होईल.
4 May 2015 - 5:11 pm | कपिलमुनी
थंडरबर्डला हे AMP मीटर नाहिये.
पण काही प्रॉब्लेम येत नाही .
4 May 2015 - 5:00 pm | मोदक
मग क्लासीक ३५० ला हे नाटक का दिले आहे?
4 May 2015 - 5:19 pm | टवाळ कार्टा
क्लासिक लुक तसाच ठेवायला बहुतेक
4 May 2015 - 5:19 pm | टवाळ कार्टा
हा RPM मीटर असलेला फार चांगला...गिअर कधी बदलायचे ते बर्रोब्बर समजते
4 May 2015 - 5:37 pm | मोदक
आम्ही गाडीच्या प्रतिसादावरून गिअर बदलतो.
4 May 2015 - 5:41 pm | टवाळ कार्टा
:)
4 May 2015 - 7:32 pm | आदिजोशी
बुलेट चालवताना पार्किन्सन झाल्यासारखी भरपूर थर थर जाणवायची सोडून आता गाडीवरून आपण फेकले जातो की काय असं वाटायला लागलं की वरचा गिअर टाकायचा.
7 May 2015 - 11:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा हा हा!!!
8 May 2015 - 2:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
एवढे हाल कशाला करता ;) गाडीच्या मन्युअलमध्ये गेअरवाइज किती वेग ठेवावा दिल असेलच. साधारण १५ च्या टप्प्यात ठेवत असतात बहुतेक. इंजिन खुश आणि तुम्हीपण.
7 May 2015 - 9:39 pm | खंडेराव
नमस्कार . ही गाडी मिळते १०००० किमी चाललेली, १३०००० रुपयात। लाल रंगाची आहे, निट वापरलेली. मला आर ई ची फार आवड नाही पण ही गाडी आवडली. घ्यावी का? सल्ला द्या
7 May 2015 - 9:49 pm | कपिलमुनी
घेऊन टाका.
7 May 2015 - 10:10 pm | टवाळ कार्टा
त्यापेक्षा नविन क्लासिक घ्या
7 May 2015 - 10:21 pm | खंडेराव
Sorry..using phone..
Is the price right?this was used by an expat. What can be the best price? As I am not in need, will only go if I am getting an exceptional deal
7 May 2015 - 10:52 pm | टवाळ कार्टा
३५० वाली क्लासिच देइल ३० चा अॅवरेज
8 May 2015 - 11:42 am | खंडेराव
१) किंमत योग्य आहे का?
२) चालवायचा खर्च साधारणतः किती येईल?
३) कोणी ही गाडी वापरली असेल तर काही सल्ला?
४) जुनी घेत असल्यामुळे काही नेमक्या गोष्टी ज्या चेक केल्या पाहीजेत या गाडीसाठी?
8 May 2015 - 1:37 pm | टवाळ कार्टा
१. माझा पास
२. continental gt २० चा अॅवरेज देते बहुतेक
३. टुरींग साठी नाहिये...स्पोर्टी पोझिशन आहे बसण्याची
४. पुण्यात असाल तर कपिलमुनींच्या ओळखीत एक मेकॅनिक आहे बहुतेक
आणि नुस्ते धन्यवाद नक्को...घेतली तर १ राउंड मारायला देणार कै? ;)
8 May 2015 - 2:51 pm | खंडेराव
घेतली तर एक चक्कर पक्की लक्ष्मी रोडला!
8 May 2015 - 2:56 pm | टवाळ कार्टा
नक्की का? तेव्हड्यासाठी येईन मी पुण्यात परत :)
8 May 2015 - 3:02 pm | अनिरुद्ध.वैद्य
ती गाडी लक्ष्मी रोडला जाणार होय? मग काय राईड होणार :P
8 May 2015 - 3:38 pm | मोदक
...आणि इतके करून सिंगल सीट आहे. सिंगल सीट ऐवजी डबल सीट बसवली तर त्या गाडीचा लूक जातो असे माझे वैयक्तीक मत आहे. (किंवा कदाचित मी पाहिलेल्या लोकांनी टुकार सीट बसवली असेल)
8 May 2015 - 3:54 pm | खंडेराव
आणखीन एक घोळ आहे..नवीन घ्यावी लागेल डबल सीट..
आणि चांगली/ टुकार अशी नाही, आहे ती एकच आहे कंपनीची :-) ती टुकारच दिसते.
किमतीची चवकशी केली, ५२०० रु, सीट आणि फुट रेस्ट. हा अजुन खर्च, आणि तो करावाच लागेल.
8 May 2015 - 1:56 pm | अनिरुद्ध.वैद्य
१) किंमत योग्य आहे का?
किंमत व्यवस्थित वाटतेय, सध्या किंमत २+ लाखाच्या घरात आहे.
२) चालवायचा खर्च साधारणतः किती येईल?
५००+ सीसी इंजिन आहे त्यामुळे मायलेज येवढा मिळणार नाही २० - २५ च्या आसपास मिळू शकेल. बाकी ऑइल, रेग्युलर चेकअप एन्फिल्ड स्टाइल. १०००० किमी झालेत म्हणजे फ्री सर्विसिंग संपल्यातच जमा. सो दर ३ महिन्यांनी त्याचा खर्च.
३) कोणी ही गाडी वापरली असेल तर काही सल्ला?
टेस्ट राईड घेतली होती, स्पोर्टी आहे. इतर बाबतीत रायडींग पोझिशन मला कम्फर्टेबल नाही वाटली. तुम्ही किमान ५ - १० किमी चालवून निर्णय घ्या.
४) जुनी घेत असल्यामुळे काही नेमक्या गोष्टी ज्या चेक केल्या पाहीजेत या गाडीसाठी?
गाडी तुम्ही म्हणता तशी जर एक्स्पाटची असेल तर किती कालावधीत १०००० किमी झाले ते बघा. एन्फिल्डचा सुरुवातीचा ३००० - ४००० किमीचा टप्पा फार महत्वाचा. जर त्यात गाडी व्यवस्थित चालली असेल तर ती पुढे जास्त कटकट करत नाही. ह्या गृहस्थांनी कुठे कुठे फिरवली आहे त्याचा पण विचार करा. नवीन गाडी १०K च्या आधी लडाख, किंवा इतर हिली भागात फिरून आली असेल तर इंजिन, क्लचप्लेट सगळ चेक कराव लागेल.
सगळ्यात महत्वाच, जाणकार मेक्यानिकला दाखवूनच घ्या. ते अजून डिटेल सांगू शकतील.
8 May 2015 - 2:50 pm | खंडेराव
बरोबर..गाडी चालवुन बघतो, त्याशिवाय रायडींग पोझिशन किती सुट होते कळणार नाही, बरीच वेगळी आहे आत्तापर्यंत वापरलेल्या गाड्यांपेक्षा. बरेच रिव्यु वाचले, दोन्ही बाजुची मते आहेत.
ज्यांच्याकडे आहे त्यांनी २५ ते ३९ पर्यंत अॅवरेज क्लेम केलय वेगवेगळ्या परिस्थितीत.
सध्याच्या मालकाने १०,००० मधले ४५०० एका ट्रिप मधे केलेत साउथच्या..त्यामुळे चेक करुन घेतो मेक्यानि़क कडुन फायनल झाल्यास.