शब्द्नाद - पगार, वेतन, Salay..या शब्दांची जन्मकथा..

ग्रेटगणेश's picture
ग्रेटगणेश in जनातलं, मनातलं
29 Apr 2015 - 5:05 pm

पगार, वेतन, Salay..

सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो.

महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने 'पगार' घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..!

मित्रांनो हा कोणत्याही भाषीकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात 'पोर्तुगीज़' आहे हे माहित आहे का आपल्याला..?

'हापूस (अल्फान्सो)' आंब्याप्रमाणेच 'पगार' हा शब्द देखील आपल्याला गोव्यातील पोर्तुगीज़ांकडून वारशात(?) मिळालेला आहे.
('हापुस' व 'पायरी' हे शब्द पोर्तुगीज 'अल्फान्सो' व 'परेरा' या शब्दांचे अपभ्रंश आहे.)

पोर्तुगीज 'पागा' या शब्दापासून 'पगार' हा शब्द सिद्ध झाला आहे व त्याचा मुळ पोर्तुगीज अर्थ 'श्रमाचा मोबदला' असाच आहे. कोळी बांधव मासेमारीला 'मासे पागणे' असे म्हणतात ते याच अर्थाने इतकेच कशाला मुंबईतील लोक खोली घेताना 'पागडी' देत, म्हणजेच मालकाला 'मोबदला' देत तोही याच अर्थाने.

'वेतन' हा शब्द चक्क वेताच्या छडी वरून आला आहे. तर कसा ?

फौऊन्टन पेनाचा शोध लागण्यापुर्वि बोरूने लिहीण्याची पद्धत होती व हा बोरू वेतापासून बनवत असत. वेतापासून तयार केलेल्या बोरूने कारकून लिखानाचे काम करीत व त्याबद्दल त्यांना जो मेहेनताना दिला जाई त्याल 'वेतन' असे नांव प्राप्त झाले.

'वेतन' या शब्दाची आणखी एक गम्मत आहे. वेताची काठी म्हणजे गवताचाचं एक प्रकार. अतिशय 'लवचीक' असणे हा या वेताचा गुणधर्म! आता बघां, नोकरदार माणसानं 'लवचीक' म्हणजे दुल-या अर्थाने 'नम्र' असावच लागतं असेच 'वेतन' शब्द सुचवित नाही का?

'पगार' हा शब्द साधारणतः शारिरीक कष्टाची कामे करणारा कामगार वर्ग उपयोगात आणतो तर 'वेतन' हा शब्द पांढरपेशे बुद्धीजीवी नोकरदार वापरतात. ही विभागणी आजही लक्षात येते.

इंग्रजी 'Salary' हा शब्द मुळ रोमन असून तो 'Salt' म्हणजे 'मीठ' या शब्दापासून तयार झाला आहे. पुर्वीच्या काळात रोमन सैनिकांना दिला जाणारा मोबदला मीठाच्या स्वरूपात दिला जाई तर फ्रान्सच्या सैनिकांना मीठ देण्याऐवजी ते विकत घेण्यासाठी 'सोल' या नांवाचे नाणे दिले जाई. है मीठ सैनिकांना त्यांच्या घोड्यासाठी उपयोगास येई. पुढच्या काळात मीठ देणे बंद झाले तरी केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी Salary हा शब्द सुरूच राहीला.

आपणं नेहेमी आपल्या मेहेनतीच्या पैशाला 'घामाचा पैसा' असे म्हणतो. आता बघा, घामाची चव खारट असते म्हणजेच त्यात 'मीठ' असते हे विज्ञान सांगते. म्हणजे 'Salary' हा मोबदल्यासाठी किती योग्य शब्द आहे नाही? आपल्या मराठीतील 'खाल्ल्या मीठाला जागणे' या वाकप्रचाराचा अर्थ आता आपल्या नीट लक्षात येईल.

गणेश साळुंखे
९३२१८११०९१

व्युत्पत्तीप्रकटन

प्रतिक्रिया

या बद्दल अजुन काही माहिती मिळेल का??

(बिन पगारी ,फुल्ल अधिकारी) जेपी

आदूबाळ's picture

29 Apr 2015 - 5:29 pm | आदूबाळ

या सर्व etymologyचा स्रोत काय आहे?

ग्रेटगणेश's picture

29 Apr 2015 - 5:32 pm | ग्रेटगणेश

मराठी व्युत्पत्ती कोश..

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा का? पण तो प्रकल्प अजूनही चालू आहे ना? कुठे मिळेल हा कोश?

ग्रेटगणेश's picture

29 Apr 2015 - 5:48 pm | ग्रेटगणेश

तुम्ही म्हणताय तो विश्वकोश..तो इंटरनेटवरही उपलब्ध आहे..
मी सांगतोय तो मराठी व्युत्पत्ती कोश, फारसी - मराठी, कन्नड-मराठी हे श्ब्द्कोशही अभ्यासावे लागतील..

आदूबाळ's picture

29 Apr 2015 - 6:09 pm | आदूबाळ

इथे पहा. "ब) योजनांतर्गत योजनांची माहिती (PLAN)" इथे क्रमांक १० वर आहे.

मराठी व्युत्पत्ती कोश कोणी संपादित केला आहे, कोणी प्रकाशित केला आहे, कुठे मिळेल वगैरे माहिती मिळाली तर उपकार होतील.

मराठी व्युत्पत्ती कोशाचे कोशकार हे कृ.पां. कुलकर्णी आहेत, शिवाय श्रीपाद जोशी यांनीही एक पुरवणी जोडलेली आहे. हा कोश अप्पा बळवंत चौकात प्रगती बुक ष्टाल येथे मिळतो. दोनेक वर्षांमागे ४६८/- ला मिळाला होता.

हां ये ब्बात! हीच माहिती हवी होती! धनवाद.

हाडक्या's picture

29 Apr 2015 - 7:03 pm | हाडक्या

आदूबाळ, सोहो स्ट्रीटच्या मागच्या गल्लीत देखील जुन्या पुस्तकांच्या दुकानात मिळतो हा.
अता जौन घेओन एणे आणि ऐसेच लेख पाडणे करावे, कसें ?

(अगदीच नै मिळला तिथे तर ते हॅरी पॉटर नै का जायचा पुस्तके घ्यायला, तीच गल्ली तिथून थोड्याच अंतरावर आहे तकडे जाणे करावे..))

बॅटमॅन's picture

29 Apr 2015 - 7:07 pm | बॅटमॅन

काय सांगता? खरं का काय??????

हाडक्या's picture

29 Apr 2015 - 7:35 pm | हाडक्या

हो तंर.. आहांत कुठे ?? :))))

(जळ्ळ्या मेल्या आमच्या स्मायल्या कुठे कडमडल्यात कोण जाणे.. ;) )

बॅटमॅन's picture

29 Apr 2015 - 7:39 pm | बॅटमॅन

आयला सहीच की!!!! अत्र्यांची लंडनबद्दलची भविष्यवाणी खरी झाली म्हणायची का काय मग? ;)

हाडक्या's picture

29 Apr 2015 - 7:58 pm | हाडक्या

(डोले मिचकावणारी स्माईली कल्पावी)

कोनाचं डोलं मिचकावनारी?

सूड्ण्यास अधिक सांगणे न लगे.. (एकच डोला मारणारी स्माईली कल्पावी)

अत्रन्गि पाउस's picture

30 Apr 2015 - 7:49 am | अत्रन्गि पाउस

कोश म्हटल्यावर कानटोपी मागे सारून सरसावणारे बाबुकाका आठवले

शब्दांच्या ज्ञन्मकथा मस्त आहेत .. आवडल्या.

मध्यतरी सकाळ मध्ये असेच शब्दकथा येत होत्या ... बरेचसे अरबी भाषेतुन शब्द आलेले ते देत होते

ग्रेटगणेश's picture

29 Apr 2015 - 5:49 pm | ग्रेटगणेश

सकाळ मधल्या शब्दकथा बहुतेक यु. म. पठाण साहेब लिहित होते..ते संत साहित्याचे व फारसी-अरबी-उर्दू शब्दांचे गाढे अभ्यासक आहेत..

ग्रेटगणेश's picture

29 Apr 2015 - 5:50 pm | ग्रेटगणेश

सकाळ मधल्या शब्दकथा बहुतेक यु. म. पठाण साहेब लिहित होते..ते संत साहित्याचे व फारसी-अरबी-उर्दू शब्दांचे गाढे अभ्यासक आहेत..

उगा काहितरीच's picture

29 Apr 2015 - 5:37 pm | उगा काहितरीच

ग्रेट गणेशजी तुम्ही खरंच ग्रेट आहात . काय काय माहिती सांगता तुम्ही ! वा!!

सूड's picture

29 Apr 2015 - 5:38 pm | सूड

घामाची चव खारट असते

आता घामाची चव घेऊन बघणे आले.

कपिलमुनी's picture

29 Apr 2015 - 7:06 pm | कपिलमुनी

आता काही खौचट मिपाकर भलतेसलते प्रश्न विचारतील तयार रहा

@ आता घामाची चव घेऊन बघणे आले.>>>>>>>>

कोणाच्या?

सूड's picture

30 Apr 2015 - 2:45 pm | सूड

कोणाच्या?

अग्दीच हौसेखातर चव घ्यायचीच झाली तर तितका घाम आम्हाला स्वत:ला येतो. काळजी नसावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दाच्या चित्तर कथा आवडल्या. अजून येऊ दे.

फोन नंबर सेव केला. कधी कै विचारावं वाटलं तर फोन करीन.
एकच नंबर आहे का ? आणि तो चालु असतो का ? ;)
-दिलीप बिरुटे

वेतनबद्दल असहमत आहे. हा शब्द सावरकरांनी तयार केलेला आहे. वेताशी संबंध लावणे उगा कैच्याकै आहे. वित्त अर्थात पैशाशी लावलेला संबंध अजून त्यातल्यात्यात ठीक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण आता पुरावे शोधायचा कंटाळा आला.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Apr 2015 - 6:30 pm | प्रचेतस

सहमत

बाकी पगार शब्द मला मूळ अरेबिक वाटत होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगार शब्द पोर्तुगीजच* आहे. पण वेतावरुन वेतन अंहं ही गोष्ट कै पटेना.
 
पगारला वेतन शब्द सावरकरांनी दिला. (चला मराठी विकीवर)
*अभारतीय शब्दकोश. रामदासस्वामी सोनार. -दिलीप बिरुटे

अभारतीय शब्दकोश काय प्रकार आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भुसावळ तालुक्यातील बोदवड गावचे रामदासस्वामी सोनार यांनी '' अभारतीय शब्दकोश'' संकलीत केला आहे. मराठी भाषेत वापरात असलेल्या अभारतीय शब्दांची सूची त्यांनी संकलित केली आहे. त्या शब्दांचे पर्यायी मराठी शब्द त्यांनी शोधुन काढले आहेत. अभारतीय शब्दांना त्यांनी भारतीय शब्द पर्याय म्हणुन ठेवले आहेत. (सावरकर परंपरेतील) :)

एक चांगलं संकलन आहे. अरबी, पोर्तुगीज, इटालियन, खानदेशी, नेपाळी, नागपुरी, मलायी, तामीळ, ओरिया, आंग्ल, अशा विविध देश आणि भाषेतील शब्द आणि त्याचे मराठी पर्याय या पुस्तकात दिले आहेत. मला बरेच शब्द इथेच कळले आणि वाचतांना अनेकदा मजा आली आहे.

गमेलो (पोर्तुगीज) = घमेले = टोपलं, पाटी, लोहपाटी.
चपरास्त/ चपरासी (पारशी) = पट्टेवाला
चरबी ( पारशी) = मेद
चर्च ( आंग्ल) = ख्रिस्तमंदिर, प्रार्थनामंदिर
ग्रीस (आंग्ल) = वंगन, माखण,आवसा, ओंगण,
गोता (अरबी) = डुबकी, बुडी, धोका.
तंबूरा (अरबी) = तानपुरा, वीणा,
थर्मास (आंग्ल) = तापिका, स्थिर तापिका
तोफ (तुर्की) शतघ्नी, गोळामार,

-दिलीप बिरुटे

रोचक!!! पहायला पाहिजे हा कोश, कुठे मिळेल?

लिहित रहा भौ! त्यानिमित्ताने इथे जी चर्चा होते त्यात आम्हालाही ज्ञानकण मिळतात!
मराठी व्युत्पत्तीकोशाच्या माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

मोहनराव's picture

29 Apr 2015 - 6:55 pm | मोहनराव

पदार्पणातली फटकेबाजी जोरात चालु आहे. लिहित रहा!!

कृ.पां. कुलकरणी यांनी निर्मिलेला आणि श्रीपाद जोशी यांनी सुधारित केलेला मराठी शब्दांचा व्युत्पत्तिकोश हे खरोखरच मराठी भाषेचे लेणे आहे. याशिवाय मराठी साहित्य मंडळ पुणे (नाव जरासे इकडेतिकडे झाले असेल,)यांच्या शब्द्कोशाचे सर्व खंड हेही ऑथेंटिक आहेत. मराठी ग्रामनामांचा इतिहास हेही पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त आहे.शिवाय अनेक जुनी पुस्तके,बखरी,इतिहास वाचले तर त्या त्या काळात रूढ असलेले शब्द म्हणजे सध्याच्या शब्दांची जुनी रूपे कळतात. पुणे आणि मुंबईसंदर्भात अनेक जुनी प्रवासवर्णने,स्थळवर्णने, गॅझेटीअर्स उपलब्ध आहेत. शिवाय गतकाळातील महापुरुषांची चरित्रे वाचताना आज रूढ नसलेली त्या काळातली स्थळनामे, सामान्यनामे कळून येतात. माधवराव पटवर्धन(माधव ज्युलियन) यांचा फारसी-मराठी शब्दकोशही आहेच. अगदी गुरुचरित्र, शिवलीलामृत,मनाचे श्लोक, दासबोध, (भीमरूपी)हनुमान स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र या नित्यपाठाच्या पोथ्यांतूनही अगणित शब्द त्यांच्या मूळ अथवा जुन्या रूपात सापडतात.
वाचल्याने होत आहे रे, आधी वाचलेच पाहिजे..
असो. आजच्या विकीपीडांच्या जमान्यात हे अरण्यरूदनच ठरेल.

कपिलमुनी's picture

29 Apr 2015 - 7:08 pm | कपिलमुनी

कुलकरणी नव्हे कुलकर्णी !
लिहा बघू १० वेळा

मोहनराव's picture

29 Apr 2015 - 7:09 pm | मोहनराव

कुलकर्णी चिडले का?

प्रचेतस's picture

29 Apr 2015 - 7:14 pm | प्रचेतस

मुळ शब्द कुळकरणी असाच आहे.
कुळकरणी म्हणजे ठराविक प्रांतातील जमिनीच्या नोंदी ठेवणारा सरकारी अधिकारी.

मूळ संस्कृत शब्दात ळ नाही. (वैदिक संस्कृतात असला तरी पाणिनीय संस्कृतात ळ नाही.)

शिवाय मराठीतला या शब्दाचा जुन्यातला जुना उल्लेख काय दर्शवतो? ळ की ल?

रादर, ब्रह्मानंद देशपांड्यांचे यावर मत काय आहे? ;)

ब्रह्मानंद देशपांडे यांचे मत माहीत नाही पण हा शब्द "श्रीकरणाधिप" ह्या पासून उत्क्रांत झाला असावा.

१३ व्या शतकातल्या महिकावतीच्या बखरीत कुळकरणी असाच उल्लेख आहे.
प्रतापबिंबाने हरबाजीस दमण प्रांताचे कुळकरणी म्हणून नियुक्ती केली होती.

अर्थातच. श्रीकरणाधिपातला करण तेवढा उचललेला आहे इथे.

बाकी १३ व्या शतकातील बखर म्हटली तरी वालजी पाटील यांनी लिहिलेले हस्तलिखित अव्वल इंग्रजी अर्थात १८२० च्या जरासेच अगोदरचे होते. त्यामुळे काळानुरूपही फरक झालेले असू शकतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2015 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> ब्रह्मानंद देशपांड्यांचे यावर मत काय आहे ?
महानुभाव संप्रदायाचे ब्रम्हानंद देशपांडे अभ्यासक यांचा संस्कृतमधील ळ शी कसा संबंध
काय कल्ला नाय ?

-दिलीप बिरुटे

ब्रह्मानंद देशपांड्यांनी यादवांशी संबंधित बराच विदा दिलेला आहे त्यांच्या पुस्तकात. त्यात एखादवेळी श्रीकरणाधिपाच्या निमित्ताने तसा काही उल्लेख असल्यास नकळे, म्हणून विचारले.

राही's picture

29 Apr 2015 - 7:14 pm | राही

कुलकरणाचे अधिकार किंवा वृत्ती ज्यांच्याकडे आहे, ते कुलकरणी!
'पारले'चे पार्ले झाले, गावसकरचे गावस्कर झाले, फुरसुंगीचे फुर्सुंगी होऊ घातले आहे, तसेच हे.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2015 - 10:44 pm | चौथा कोनाडा

पुण्याजवळचे हिंजवडी हे हिंजेवाडी झाल्यातच जमा आहे !

लोहगांवचं 'लोहेगांव' झालं, वानवडीची 'वानोव्री' केली आणि आता सांगवीचं 'संघवी' होऊ घातलंय. आपलीच लोकं शिंची नसते उच्चार अंगी लावून घेतात.

आदूबाळ's picture

29 Apr 2015 - 11:18 pm | आदूबाळ

रंजनगाँव

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 11:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

यझ बिहार्‍यांचा परिणाम हा.

मराठी ग्रामनामांचा इतिहास

हे नाव अतिरोचक वाटतेय. कुठे आनलैन मिळेल का हे पुस्तक? च्यायला मराठीत अशा पुस्तकांचं रीप्रिंटिंगच होत नाय. तीच ती स्वामीछावायुगंधरादि रतीबवाली पुस्तकंच दिसत राहतात.

राही's picture

30 Apr 2015 - 12:05 am | राही

लेखक विश्वनाथ खैरे (की खाइरे?)सीओईपीच्या जुन्यात जुन्या अ‍ॅल्युम्नायपैकी एक.
मला वाटते 'साधना'मध्ये हा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला होता आणि पुढे त्याचे पुस्तकही निघाले होते. अर्थात चूभूद्याघ्या. तमीळ्-कन्नड आणि मराठी यांमधल्या शब्दांच्या देवघेवीवर त्यांनी बरेच लिहिले आहे. अडगुलं मडगुलं हे पुस्तकही छान आहे. बहुभाषाकोविद,विद्वान आणि चतुरस्र व्यक्तिमत्व. द्राविडी भाषांचा प्राकृत आणि पर्यायाने संस्कृतवरचा प्रभाव हा त्यांच्या लेखनाच्या अनेक विषयांपैकी एक.

खैरे सीओईपियन आहेत हे माहिती नव्हते!! अतिरोचक! बहुत धन्यवाद.

राही's picture

30 Apr 2015 - 2:26 pm | राही

तुमचा सीओईपीविषयीचा (सार्थ) अभिमान लक्षात घेता तुम्हांला ही माहिती रोचक वाटेल अशा अंदाजानेच ती अधिकची माहिती लिहिली.

:)

माहितीकरिता बहुत धन्यवाद.

राही's picture

29 Apr 2015 - 11:32 pm | राही

सध्या कुलकरणी हे आडनाव दोन तर्‍हांनी लिहिले जाते.१)कुलकर्णी २)कुळकर्णी.
याविषयी असे समजले होते की चांद्रसेनीय कायस्थ लोक हे 'कुळकर्णी' लावतात आणि (देशस्थ)ब्राह्मण कुलकर्णी. काही काळात हे कुलकर्णीचे 'कुल्कर्णी' झालेलेसुद्धा वाचायला मिळू शकेल.
जाता जाता: 'कुलकरणी' हा शब्द मी अनेक ठिकाणी, अनेकदा वाचला आहे. माझ्या वाचनात आलेले उल्लेख कितपत जुने, किंवा जुन्यात जुने आहेत किंवा कसे, ते मात्र माहीत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2015 - 1:59 am | श्रीरंग_जोशी

विदर्भ अन खानदेशात कुलकर्णी हे आडनाव फारसे प्रचलित नाही. तिथे कुळकर्णी हेच आडनाव प्रचलित आहे.

प्रत्यक्ष कुलकर्णी आडनाव असलेला मित्र लाभेपर्यंत माझा स्वतःचा असा समज होता की इंग्रजी स्पेलिंगच्या प्रभावामुळे काही कुळकर्णी लोक आपल्या आडनावाचा उच्चार कुलकर्णी असा करतात. संत ज्ञानेश्वरांचे आडनावही अशाच लोकांनी या पद्धतीने बदलले आहे ;-) .

आवडीच्या विषयावरचा लेख आवडला.

चिमिचांगा's picture

29 Apr 2015 - 9:07 pm | चिमिचांगा

'जुगार' सुद्धा पोर्तुगीजची देणगी.
jogar = gamble/play

राही's picture

29 Apr 2015 - 11:28 pm | राही

हिंदीतला 'जुआँ' हा शब्द संस्कृत 'द्यूत' वरून आलेला आहे. हिंदीत 'द'चा 'ज' होणे किंवा उलट,हे सर्वसाधारण आहे. रमज़ान-रमादान, जहेज़-दहेज, द्वि वरून जुड्वाँ(हे थोडे संदिग्ध आहे, युज्- युक्त- जुडा-जुळलेले असेही असू शकेल.), जोडी, आपल्याकडे जानबा-(ज्ञानबा)-द्न्यानबा इ.

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2015 - 10:47 pm | चौथा कोनाडा

रोचक धागा ! छान शब्द-चर्चा !

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.ग्रेटगणेश यांचा सत्कार एक मिपा शब्दकोश* देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

*त्यांनी या शब्दकोशातील शब्दांची व्युत्पत्ती सांगावी हि नम्र विनंती.

नाखु's picture

30 Apr 2015 - 10:06 am | नाखु

जोर्दार हाणुनमोदन.
तसेच त्या शब्दांचे प्रचलीत्+काढीव्+वाढीव अर्थ सांगावेत हि अतिनम्र विनंती.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते अंतर्गत चिमन हटेला गँग पिंचिवडकर

सौंदाळा's picture

30 Apr 2015 - 10:34 am | सौंदाळा

आजचा शब्द कोणता?
नविन धागा आलेला दिसत नाहिये अजुन

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2015 - 11:57 am | चौथा कोनाडा

पगार, वेतन अन सॅलरी झाले.
आता भत्ता चर्चेला घेतला तर चालेल ?

बबन ताम्बे's picture

30 Apr 2015 - 2:52 pm | बबन ताम्बे

किंवा खलबत्ता आणि खलबत या शब्दांची उत्पत्ती ?

खलबत्ता -> काथ्याकुट ?

ते तुम्ही आणाल हे माहीत होतं म्हणून बाकीच्यांनी कष्ट नाही घेतले.

पीसी's picture

30 Apr 2015 - 3:22 pm | पीसी

छान धागा! ज्ञानात भर पडते आहे...

नूतन सावंत's picture

30 Apr 2015 - 4:56 pm | नूतन सावंत

सामान्यज्ञानात भर घालणारा धागा.धन्यवाद ग्रेटगणेश.