छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
****************************************************************************************
राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या.
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !
प्रतिक्रिया
14 Apr 2015 - 7:53 pm | टवाळ कार्टा
स्पाला शेप्रेट बक्षिस देउन टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल तो
14 Apr 2015 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा
@ स्पाला शेप्रेट बक्षिस देउन
टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल
तो>> :-D शमत हाय! :-D
15 Apr 2015 - 8:59 am | प्रचेतस
छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ
15 Apr 2015 - 9:50 am | स्पा
प्र का टा आ
15 Apr 2015 - 9:48 am | स्पा
छायाचित्र सुंदर आहे, पण विषयाला अनुसरुन नाही.
ह्या प्रकाराला सिलहाउट्स. ( silhouette) म्हणतात, जो की वेगळा स्पर्धाविषय होउ शकतो
15 Apr 2015 - 10:52 am | प्रचेतस
वोक्के जी.
हे छायाचित्र स्पर्धेसाठी कृपया बाद धरण्यात यावे.
15 Apr 2015 - 8:21 pm | मोहन
हा / हे कोण विषय निवडताहेत ना त्यांच्या कल्पना शक्तीला मानले. मेंदूचा पार भुगा होतो विचार करुन फोटो टाकायला.
15 Apr 2015 - 8:48 pm | स्पा
अगदी अगदी
सर्वात आवडलेला विषय आहे हा, कल्पनाशक्तीला चालना देणारा
16 Apr 2015 - 3:25 pm | सौरभ उप्स
क्ष्झ
अजून एक हि एन्ट्री नाही आली, सगडे इचार करून गुंग झालेन कि काय….
16 Apr 2015 - 4:00 pm | स्पंदना
काय राव?
मोदकाच्या धाग्यावर किती मस्त सावली आली आहे फोटोत.
16 Apr 2015 - 4:17 pm | तुषार काळभोर
येकदम झक्कास्स फोटो बगायला मिळनार!!
16 Apr 2015 - 4:58 pm | प्रचेतस
पृथ्वीची सावली - चंद्रग्रहण १० डिसेंबर २०११.
फोटो साध्या कॅमेर्याने काढला असल्याने साधारण आहे.
16 Apr 2015 - 5:51 pm | स्पंदना
बुल्स आय!!
17 Apr 2015 - 7:15 pm | श्रीरंग_जोशी
२००७ साली हापिसातल्या सहकार्यांबरोबर कोकणातील दिवे आगर येथे सहलीला गेलो होतो. तेव्हा काढलेला हा फोटो.
प्रवेशिका म्हणून टाकला होता. तो सावलीपेक्षा प्रतिबिंब या प्रकारात अधिकपणे मोडत असल्याने ही नवी प्रवेशिका.
अमेरिकेतील एका प्रसिद्ध मानवनिर्मित आश्चर्यातून काढलेला हा फोटो आहे. जमिनिपासून ६३० फुटांवरून. जाणकार लोक हे स्थळ सहजपणे ओळखतील.
16 Apr 2015 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला फोटो.
17 Apr 2015 - 10:15 am | पॉइंट ब्लँक
फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा प्रतिबिंब ह्या प्रकारात जास्त योग्य राहिल.
17 Apr 2015 - 11:18 am | स्पा
येस
17 Apr 2015 - 6:20 pm | श्रीरंग_जोशी
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
या विषयावर मी काढलेला दुसरा फोटो शोधतो.
16 Apr 2015 - 7:42 pm | sagarparadkar
16 Apr 2015 - 8:02 pm | श्रीरंग_जोशी
दोन्हीही सुंदर परंतु जो चांगला वाटेल तो घ्या हे काही पटले नाही बुवा.
प्रवेशिका ज्याची आहे त्याने हे स्वतःच ठरवायला हवे. मला तर एकापेक्षा अधिक चित्रे सुरुवातीलाच टाकणे पटत नाही. निकाल लागल्यावर त्या विषयासंबंधी अधिक चित्रे जरूर टाकावीत.
16 Apr 2015 - 8:54 pm | असंका
+ १
...पुट युवर बेस्ट फुट फॉरवर्ड.
16 Apr 2015 - 10:13 pm | रवीराज
हेच म्हणतो मी.
17 Apr 2015 - 10:21 am | शैलेन्द्र
मला विचाराल तर दुसरा फोटो ठेवा.. :)
16 Apr 2015 - 8:11 pm | मराठे
16 Apr 2015 - 10:17 pm | शब्दबम्बाळ
सिंहगडावरून काढलेला फोटो…
16 Apr 2015 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
अतृप्ताऽकृतीबंध..
17 Apr 2015 - 12:08 pm | स्पा
घाबल्लो
17 Apr 2015 - 12:55 pm | अत्रुप्त आत्मा
सरलतेचे भय आहे का आपणास? :P
17 Apr 2015 - 12:57 pm | पॉइंट ब्लँक
जरा काँट्रास्ट आणि सॅच्युरेशन वाढवले की हॉरर मुव्हीचे पोष्टर तय्यार!
17 Apr 2015 - 1:55 pm | स्पा
17 Apr 2015 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह!
लोकहो/संपादकहो...
पांडुनी (आपणहून..) घेतलेल्या अपार मेहेनतीला फळ यावे. आता माझा हाच फोटू स्पर्धेसाठी-धरा. (खरोखरच हं! )
सूचणा समाप्त!
17 Apr 2015 - 2:16 pm | सूड
प्रकाटाआ
17 Apr 2015 - 11:48 am | स्वीत स्वाति
17 Apr 2015 - 11:53 am | स्वीत स्वाति
मला टाकायला जमले नाही मदत कराल का कोणी
कसे टाकायचे छायाचित्र ?
17 Apr 2015 - 1:58 pm | स्पंदना
फोटो पिकासावर अपलोड करा. अन मग त्याची इमेज इन्फो येथे द्या.
पिकासाला पब्लिक अॅक्सेस द्या.
17 Apr 2015 - 12:48 pm | पिलीयन रायडर
मला आजवर सावली ह्या विषयावरचा आवडलेलला फोटो म्हणाजे हा:-
ह्यात जे उंट वाटत आहेत, ती त्यांची सावली आहे!
17 Apr 2015 - 12:59 pm | पॉइंट ब्लँक
काही तरि घोळ आहे. कारण जर त्या सावल्या असतील तर त्यांची सावली परत कशी पडली ? सूर्य डोक्यावर असल्याप्रमाणे, पायात सावली पडली आहे.
17 Apr 2015 - 1:06 pm | स्पंदना
पिरा हा फोटो स्पर्धेकरीता नाही घेता येणार.
पॉइंट ब्लँक हा वरुन सॅटेलाइट मधुन घेतलेला फोटो आहे. अन हा अतिशय फेमस आहे. सुर्याच्या मावळतीच्या उन्हात अन कोणताही अडथळा नसल्याने या एगदी परफेक्ट सावल्या लांबच्या लांब पसरलेत.
17 Apr 2015 - 1:46 pm | पिलीयन रायडर
हो मग नाहीचे स्पर्धेसाठी!! सहज दिलाय..
17 Apr 2015 - 1:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. पुर्वप्रकाशित चालत असेल तर मग स्पर्धेसाठी देतोय.
फोटोविषयी अधिक. तिसर्या मजल्यावरुन काढलेला फोटो आहे. झाडाच्या फांद्या आणि सावल्या अगदी नीट पाहिल्या तरचं फरक कळुन येतोय. हा ग्राह्य नसेल तर मग दुसरा टाकीन.
17 Apr 2015 - 2:06 pm | पॉइंट ब्लँक
भारी आहे.
17 Apr 2015 - 2:11 pm | भुमन्यु
आवडेश...खुप मस्त
17 Apr 2015 - 2:14 pm | नंदन
बोरकरांची 'छायेसम मज गमले खोटे, सत्यचि ते उफराटे' ही ओळ आठवली.
कुठला फिल्टर वापरला आहे इन्स्टाग्रामवर?
17 Apr 2015 - 2:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
Mayfair बहुतेक. बरेच दिवस झाले अपलोड करुन.
17 Apr 2015 - 5:06 pm | मिनियन
सावली या विषयाला वेगळा द्रुष्टिकोन! :)
18 Apr 2015 - 10:10 am | सौरभ उप्स
क्लास... मस्त फ्रेम......
18 Apr 2015 - 11:15 am | कविता१९७८
डहाणु बीचवर काढलेला फोटो
17 Apr 2015 - 4:31 pm | स्वीत स्वाति
18 Apr 2015 - 5:22 pm | स्पंदना
लहाण माझी बाहुली
कोठे गेली सावली?
17 Apr 2015 - 4:58 pm | मिनियन
एका महाविद्यालयातील सरावाचे हे छायाचित्र
19 Apr 2015 - 12:15 am | जातवेद
आवडला
18 Apr 2015 - 8:01 pm | शब्दबम्बाळ
गेल्या उन्हाळ्यामध्ये घरच्यांसोबत अजंठा-वेरूळला भेट दिली होती.
ऐन दुपारी बाहेर कडकडीत उन्ह असताना, सावलीत उभं राहून निवांतपणे लेण्यांचे सौंदर्य बघत असताना काढलेला हा फोटो…
स्पर्धेच्या विषयाला अनुसरून आहे कि नाही याबद्दल साशंक, फक्त चांगला वाटला म्हणून येथे चिटकवला
18 Apr 2015 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजिंठा सुंदर.....
-दिलीप बिरुटे
19 Apr 2015 - 2:53 pm | चैदजा
ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो होतो. बर नव्हत म्हणुन ऑफिस मधुन लवकर घरी आलो होतो. संध्या़काळी हॉल मध्ये हा नजरा दिसला. पश्चिमेच्या खिडकीतुन जमिनिवर ऊन पडले होते, व ते भिंतीवर परावर्तित होऊन सुंदर दिसत होते. मग नुकत्याच घेतलेल्या सॅमसंग एस ने फोटो काढला. चेपु व फ्लिकार दोन्हीची लिंक देत आहे.
19 Apr 2015 - 8:13 pm | मोहन
पडद्या मागचे सावलीतले कारागीर ! त्यांच्या कलाकृती तर प्रकाशात येतात पण हे अनाम कलाकार सावलीतच !
19 Apr 2015 - 8:50 pm | सर्वसाक्षी
नाईल पर्यटनात टिपलेले हे चित्र.
19 Apr 2015 - 9:05 pm | अत्रुप्त आत्मा
NO-1
20 Apr 2015 - 7:41 pm | रवीराज
20 Apr 2015 - 11:07 pm | वेल्लाभट
क्रॉप करायला हवा होतात.... :)
21 Apr 2015 - 2:25 pm | रवीराज
बघतो प्रयत्न करुन.
20 Apr 2015 - 11:09 pm | वेल्लाभट
अशाच एका रात्री रस्त्यावरच्या झाडाच्या फांद्यांची तिथल्या दिव्यामुळे पडलेली सावली.
कॅनन इओएस ७०डी एफ ४ १/५ १८ एम एम आयएसओ ६४००
22 Apr 2015 - 2:18 pm | स्पा
मस्त रे
21 Apr 2015 - 6:57 pm | खेडूत
माझीही प्रवेशिकां :
ग्रीनिच (लंडन ) इथलं सौर घड्याळ :
सावलीने दाखवलेली वेळ - दुपारचे पावणेतीन !
22 Apr 2015 - 2:03 pm | स्पंदना
फर्स्ट्क्लास!!
22 Apr 2015 - 12:49 pm | ज्ञानोबाचे पैजार
स्थळ बोरीवली नॅशनल पार्क,
पैजारबुवा,
23 Apr 2015 - 1:03 am | मस्तानी
24 Apr 2015 - 6:25 pm | anandphadke
24 Apr 2015 - 7:08 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही!!! हा भारी आहे.
28 Apr 2015 - 10:14 am | तुषार काळभोर
लंबूटांग या जुन्या आय-डीचा नवा अवतार?
28 Apr 2015 - 11:56 am | खंडेराव
संध्याकाळ होतांना
28 Apr 2015 - 11:15 am | पॉइंट ब्लँक
प्रवेशिका माघारी घेण्यात येत आहे.
28 Apr 2015 - 10:51 am | प्रचेतस
फोटो खूप सुरेख आहे पण ही सावली होऊ शकत नाही. अंधारातल्या मूर्तीवर उलट प्रकाश पडलेला आहे.
28 Apr 2015 - 11:01 am | पॉइंट ब्लँक
हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही ती सावली असा अर्थ लावला होता. अजून कोणी सांगू शकेल का, ही ठेवावी कि मागे घ्यावी?
28 Apr 2015 - 11:31 am | पैसा
प्रकाश नसेल तिथे काळोख असेल. सावली ही नेहमीच कोणत्यातरी वस्तूची असेल.
28 Apr 2015 - 11:38 am | पॉइंट ब्लँक
ठिक आहे :). नवीन टाकतो :)
28 Apr 2015 - 11:42 am | ज्ञानोबाचे पैजार
ओ काका तो फोटो का काढलात?
नियमात बसत नसला तरी राहुद्या ना तिकडे.
लैच आवडला होता. (लव्ह अॅट फस्ट साईट का काय ते झाले होते)
पैजरबुवा,
28 Apr 2015 - 2:05 pm | पॉइंट ब्लँक
पैजार बुवा हे घ्या तुमचं "लव्ह अॅट फस्ट साईट". संपादक हा फोटो स्पर्धेसाठी नाही आहे.
28 Apr 2015 - 2:33 pm | एस
कल्पकतेने घेतलेली चित्रचौकट! प्रतिमा आवडली. हायलाइट्स अजून थोडे सुधारायला वाव आहे.
28 Apr 2015 - 2:01 pm | पॉइंट ब्लँक
फारशी जमलेली नाही पण असो.
28 Apr 2015 - 2:18 pm | खंडेराव
छान आलाय.
29 Apr 2015 - 12:56 am | सौरभ उप्स
अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…. आसनगाव येथील मानस मंदिराला जाऊन आलो तोच येताना रस्त्यात मागून ट्रक चा ह्यालोजन पडला आणि म ही आयडिया सुचली
सोनी सायबर शॉट ७०० ह्या मोबाइल ने काढलाय
29 Apr 2015 - 1:08 am | श्रीरंग_जोशी
खासंच आहे हा फोटो.
29 Apr 2015 - 11:57 am | टवाळ कार्टा
सहीच
29 Apr 2015 - 11:58 am | स्पा
ले शारूक उप्स
29 Apr 2015 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा
आता पांडु आज मैदानात उतरेल!
.
.
.
.
.
.
.
कदा चीत! ;-) :-D ;-)
29 Apr 2015 - 11:50 am | स्पा
कान्हेरीला काही वर्षांपूर्वी सगळे मिपाकर जमले होते
तेंव्हा काढलेला एक असाच फोटो
क्यामेरा : kodak डिजिटल
29 Apr 2015 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा
@बुव्या ने पुकारा और हम चले आये>> ह्या ह्या ह्या ह्या! :-D
दोन कठड्यातलि सावली
मधाल्यामधे-लावली! ;-)
29 Apr 2015 - 12:09 pm | प्रचेतस
कोण कोण होते रे मिपाकर तेव्हा??
29 Apr 2015 - 12:14 pm | स्पा
http://www.misalpav.com/node/20983
http://www.misalpav.com/node/21165
29 Apr 2015 - 12:25 pm | प्रचेतस
=))