स्वखी भाग २
नव्याचे नऊ दिवस सरले आणि माझ्या भाषेची अडचण आणि मराठी व्याकरणाची बोंब यामुळे अनर्थाला सुरुवात झाली..
मी बोललेल्या प्रत्येक वाक्यातून वेगळेच अर्थ काढू लागले शिवाय फोन आला तर किंवा पुण्यातील दोन्ही वहिनींशी कानडीतून बोलले तरी काय बोलले याचा जाब द्यावा लागे.
हे फारसे विचारत नसत आणि मी ही तक्रार करीत नसे पण घरच्या चालीरीती आणि इथल्या जुळवून घ्यायला थोडासुद्धा समजूतदारपणा (शेजारचे तथाकथीत हितचिंतक करू देत नव्हते)
अगदी छोट्या गोष्टीतही त्यांची लूड्बूड चाले आधी अशी मदत ठीक होती कारण त्यांच्या (शेजार्यांच्या) मुलांसाठी विना शुल्क पाळणाघर सासुबाईने चालवले होते पण आता त्यांची मुले बरीच मोठी झाली होती आणि फावला वेळ हाताशी बराच होता.
या परवडीमध्ये अगदी आनंदाची बाब म्हणजे यांना प्राधिकरणातून भूखंड मिळणार आणि आपल्याला स्वतंत्र घर बांधता येईल ही सुवार्ता कळाली.(हा माझा पायगुण असे हे मानत तर माझ्या मते ही युवराजांचा आगमनासाठी परमेश्वराने दिलेली भेट होती असे मला नेहमी वाटे)
त्यातच वन्संचे लग्न ठरले आणि त्या त्यांच्या घरी गेल्या.यांनी तीचे शिक्षण अगदी स्वतःचे मुलीसारखे केले होते. लग्नात कन्यादान ही त्यांनीच केले.मी "गोड बातमी"असल्याने लग्नात पूजेला बसू शकले नाही.
यांनी होता होईल तितके (कधी घरच्यांपासून लपवून) डोहाळे पुरवीले.
हम और बंधेंगे, हम तुम कुछ और बंधेंगे
होगा कोई बीच, तो हम तुम और बंधेंगे
बांधेगा धागा कच्चा, हम तुम तब और बंधेंगे ...
थोड़ा हमारा थोड़ा तुम्हारा
आयेगा फिर से बचपन हमारा
जीवन की बगिया ...
आता दिवस कापरासारखा उडून जाई आणि रात्र मंद उदबत्तीच्या सुवासासारखी दरवळे. मातृत्व ही फार मोठी गोष्ट आहे का नाही हे मला माहीत नाही पण आपल्या सगळ्या वेदना-व्यथांवर फुकर मारते हे मी खात्रीने सांगू शकते.
जोडीला यांची नवीन घरासाठी धावपळ चालू होतीच आणि मी ही पाण्याची अडचण असूनही नव्या घरी जाण्यासाठी तयार होते अर्धवट बांधकाम तसेच ठेवले तर पूर्ण होत नाही तेव्हा तिथे रहायला जाऊन ते करू असा विचार केला.
शेवटी २००३ मध्ये आम्ही नवीन जागेत रहायला गेलो.
तिथे स्वागताला अनाहूत पाहुणे होतेच्,सासुबांईची तब्येत ठीक नसल्याने (त्यात पाण्याची परवड) व तिथून भावजींना बस्-सोय नसल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था घरापासून २ किमी अंतरावर चिंचवड्मध्ये केली. जेणेकरून वन्सही भेटू शकतील. कारण वन्संनी लग्नानंतरही नोकरी सोडली नव्हती.
मी माझ्या आवडीप्रमाणे आहे त्या जागेत बाग सजवली. मुख्य म्हणजे देवाला रोज ताजी फुले आणि स्वतंत्र अशी जागा मिळाली हे पाहून माझ्या आईला फार आनंद झाला. सासुबाईसुद्धा सणवार किंवा भाऊजी कामानिमित्त परगावी गेल्यावर घरी रहावयास येऊ लागल्या वातावरण थोडे निवळत आले होते.
मी यांची समजूत घालून ताणलेले संबंध पुन्हा जुळवीत होते.
सुदैवाने २-३ वर्षातच भाउजींचे लग्न ठरले पण जाऊबाई नोकरी करणार्या असल्याने सासुबाई तिथेच थांबल्या.
ऑगस्त २००६ ला मी काकू झाले (पुतण्याचा जन्म) आणि जून २००७ ला आमच्या राजकन्येचे आगमन झाले
परी अगदी लहान असतानाही हाच शब्द वापरायचे हे, माझा दिवस आता आगदी अपूरा पडू लागला शिवाय कामावरून येण्यास यांना उशीर झाला की मला कुणी शेजारी (स्वतंत्र घरात) नसल्याने आधार नसायचा.शेवटी मीच विचारले की जर आपण वरती एक मजला वाढवला तर भाडेकरू ठेवता येईल आणि शेजारही होईल. दादा आता शाळेत जाऊ लागला होताच त्याची शाळा आणि कन्येची सरबराई यात दिवस मजेत जात होते.
***
हळू हळू वाढता खर्च पाहून आणि दोन्ही मुले शाळेत जात आहेत हे पाहून मी ही शिवण्-क्लास+ ड्रेस डिझाइन वैगेरे शिकण्यास सुरुवात केली. आता भाषेची अडचण आस्ते-आस्ते दूर होत होती. मलाही मराठी भाषेतले चित्रपट आवडत होते आणि समजू लागले होते. काही मराठीच काय हिंदी गाण्याचा पण अर्थ मला त्यांनी सांगीतला त्यामुळे मला ही ती आवडू आणि समजू लागली. अर्थ माहीती अझाल्यामुळे गाणे गुणगुण्याइतपत पाठ झाली (मराठीचा गंध नसलेली मी, मराठी गाण्यांच्या इतकी प्रेमात कशी याचेच माझ्या माहेरी आश्चर्य वाटे.) कदाचित मी मराठी माणसावर आधी प्रेम केले आणि मग मराठी भाषेवर त्याच्या साठीच असेही असेल !
अगदी पुण्यातलं प्रभात माझं आवडतं ठिकाण अगदी घरगुती पब्लीक आणि त्या बरोबर तुळशीबाग फेरी हा बोनस असायचाच.
पकपक पकाक बघताना यांना मी "कार्ट्या"ह्या शब्दाचा अर्थ विचारला आणि त्यांनी अर्थ सांगीत्ल्यावर त्याचा प्रयोग त्यांच्यावरच करायला सुरुवात केली
(त्यांनी माझी फोनवर चेष्टा/मस्करी) केली तरच फक्त
त्यातच एका साँदर्य प्रसाधनाची एजन्सी मिळाली आणि माझा आत्मविश्वास वाढला. मी ट्परवेअरची एजन्सीही घेतली आणि त्यात पूर्णपणे झोकून दिले. कामातून वेळ काढून हे ही साथ देत होतेच.
माझे आई-वडीलही वयोमानाने गावी सारखी ये-जा करता येत नाही म्हणून पुण्यात भावांकडेच ४-६ महिन्याकरता राहू लागले.
धन से ना दुनिया से, घर से न द्वार से
साँसों की डोर बंधी है, प्रीतम के प्यार से
दुनिया छूटे, पर ना टूटे
ये कैसा बंधन है
ये जीवन है
आधी कुचंबणा होत असूनही लेकीकरता आई पुण्यात राहायली तयार झाली हे विशेष (गावाकडे नेमाने कुळाचार्-सोवळे ओवळे यातच जन्म गेलेला तिचा)
आई-वडीलांची लग्नाची ५० वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळाही पुण्यातच झाला. बाबा आता ८१+ झाले होते.सहस्त्रचंद्रदर्शन सोहळाही झाला सासुबाई व भाऊजी आले नाहीत कुठल्याच कार्यक्रमांना, तरीही हे सम्जावून घेत होतेच आत्ता त्यांची काय अवस्था होत असेल पूर्वीच्या दिवसात याचा अंदाज येत होता. बरीच वर्षे घराबाहेर शिक्षण्+निर्वाह वसतीगृहात आणी ती ही काही भल्या माणसांच्या मदतीने काढलेली , त्यात सख्ख्या नातेवाईकांकडून अवहेलना+उपेक्षा (अगदी दोन मामा+४ आत्या पुण्यात होत्या त्यांच्या) यामुळे थोडे कडवट (नातेवाईकांबाबत) वागत होते पण मीच समजावयचे त्यांना माझ्या बाबांचे उदाहरण देऊन.
आघात.
अशातच अमंगलाचे सावट आमच्या संसारावर आले.
वन्संचा सासुरवाडीच्या लोकांनी पद्ध्तशीर घात्-पात करून जीव घेतला आणी त्याला आत्महत्येचे रूप दिले
क्रमशः
प्रतिक्रिया
28 Apr 2015 - 8:58 am | जेपी
...
28 Apr 2015 - 9:52 am | एस
...
28 Apr 2015 - 9:31 am | प्रचेतस
खूपच छान तरीही अस्वस्थ करणारं असं लिहित आहात.
28 Apr 2015 - 9:46 am | अजया
बाप रे!पुभाप्र
28 Apr 2015 - 9:56 am | पैसा
अस्वस्थ करणारे.
28 Apr 2015 - 10:29 am | सौंदाळा
अतिशय सुंदर वाक्य. मस्त लिहिताय.
शेवट मात्र अस्वस्थ करणारा.