रावेरी - सीतामंदीर
रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे.
प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते.
लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते.
अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते. काही वर्षापूर्वी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने या मंदीराच्या जिर्णोध्दाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि मंदीराचे काम पूर्ण केले.
या मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांनी सिंहाचा वाटा उचलला, प्रथम त्यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला. पण मंदीराची जिर्णावस्था पाहता तो अपुरा पडल्याने स्वतः वैयक्तिक १० लाख रुपये दिले.
मंदीराचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे.
दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशीं यांनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख, आदी उपस्थित होते.
या विषयावर यथावकाश संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
* * * *
प्रतिक्रिया
3 Jul 2011 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीबद्दल धन्यु.....! कलादालनातील फोटोही मस्त आहेत.
प्राचीन मंदिरांचा जिर्णोद्धार वगैरे चांगलं असलं तरी (पुरातत्त्व विभागाला कै घेणं देणं नै याच्याशी सहमत असलो तरी ) जमलेल्या निधीतून शेतकरी संघटना म्हणून शेतात विहीर नसलेल्या शेतकर्याला विहीर,मोटर,वगैरे अशी काही मदत केली असती तर....असा एक विचार मनात विनाकारण डोकावला इतकेच. :)
बाकी, मुटे साहेब विदर्भ दण्डकारण्यात होता त्यामुळे तिकडे असलेल्या रामायणातील काही स्थळ-प्रसंगाबद्दल काही माहितीपूर्णही लेखन वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
(आपलाच)
3 Jul 2011 - 10:21 am | गंगाधर मुटे
वापरण्यात आलेला निधी शेतकरी संघटनेचा नव्हता. कारण शेतकरी संघटनेजवळ मुळातच निधी नाहीये,
कार्यकर्त्यांच्या सदर्याचा खिसा हाच शेतकरी संघटनेचा निधिचा स्त्रोत आहे. (हे पटणे आणि मान्य होणे, कठीण आहे, याची मला जाणिव आहे.)
मंदीरासाठी शरद जोशींनी वैयक्तीक निधी दिला. आणि इतरांनीही.
............
प्राचीन मंदिर असणे ही बाब दुय्यम आहे.
पहीली परित्यक्ता स्त्री म्हणून याकडे बघीतले तर स्त्रीमुक्तीची सुरुवातच येथून करावी लागते.
यथावकाश सविस्तर लिहिनच. :)
3 Jul 2011 - 2:09 pm | यकु
>>>>पहीली परित्यक्ता स्त्री म्हणून याकडे बघीतले तर स्त्रीमुक्तीची सुरुवातच येथून करावी लागते.
केवळ विधानाच्या आशयाशी सहमत..
पण सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय? काय करता येणार आहे यात आता?
अवांतरः सीता ही रामाची परित्यक्त पत्नी होती त्यामुळं रामरावांच्या अयोध्येतील मालमत्तेतून... त्यांनी सीताबाईला न दिलेला खर्च वसूल करणेत यावा यास्तव याचिका वगैरे.. ;-)
3 Jul 2011 - 8:35 pm | गंगाधर मुटे
मंदीराच्या गाभार्याचे चित्र टाकले आहे. :)
27 Apr 2015 - 10:05 am | गंगाधर मुटे
आज सीतानवमी.
भूमिकन्या सितामाईला दंडवत.
27 Apr 2015 - 1:59 pm | पॉइंट ब्लँक
एक विस्मृतीत गेलेल्या जागेची छान माहिती दिलीत.
अशीच जागा कोलार जिल्ह्यात आहे - "अवनी". लव कुश ह्यांचा जन्म आणि अश्वमेध यज्ञाची कथा तिथे घडल्याचे सांगण्यात येते.
27 Apr 2015 - 8:02 pm | विवेकपटाईत
फोटो आणि लेख दोन्ही आवडले.