पदर

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
23 Nov 2008 - 8:10 pm

सुमारे दोन महिन्यापुर्वीची घटना. संध्याकाळी ७ वाजता मोबाईल वाजला. दुस-या टोकाला एक मुलगी. आवाजावरुन काहीतरी किचकट प्रकरण आहे हे लक्षात आले. त्यांना लगेच भेटायला बोलवले. अर्ध्या तासात दरवाजावर आई आणि मुलगी हजर. आईचे डोळे तांबारलेले. बायकोने पाणी देउन भाजीच्या निमित्ताने पळ काढला.
सर्व संभाषणात आई गप्प होती. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या त्या मुलीने सर्व कर्मकहाणी सांगितली. हे प्रसिद्ध घराणे. वाडा जाउन मोठी बिल्डींग बांधलेली. शेवट्च्या मजल्यावर १५०० फुटाचा ब्लॉक. घरात आजी आणि आजोबा. आजोबा दशग्रंथी ब्राम्हण. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शुभं करोती संस्काराचे घर. ९०% मार्क मिळवून सायन्स ला ऍडमिशन घेतलेल्या लहान भावाचा अचानक घरात त्रास सुरु झाला होता.
सारखा थू, थू करायचा. आई,बहिणीला घाणेरड्या शिव्या देउ लागला होता. बहीणीची ओढ्णी जरा हलली की लगेच "नीट घे ओढणी- तू काय खिडकीतली आहेस का? असे विचारत होता. आईला जरा पदर हलला की लगेच "काय ग **(नगरवधू) अशी शिवी देत होता. कितीही विचारणा केली तरी काही बोलायचा नाही. घुम्या झाला होता. टीवी
सुरु करायला देइना. मला हा काय प्रकार आहे ते समजेना. नंतर बघु म्हणुन त्या जोडीला परत पाठवले. रामदासाना फोन लावला. त्यांना परिस्थिती ची कल्पना देउन मदत मागितली.
रामदासानी दुस-या दिवशी संध्या़काळी एक जागेचा पत्ता दिला. ते आधीच उभे होते.
"मास्तर तुम्ही ३ वर्ष मागे आहात. तुम्हाला हे सहन होणार नाही. नंतर बोल लाउ नका." इती रामदास. मला साधारण धूसर कल्पना आली. संपूर्ण वातानुकुलित आणि डोम शेप टेबलचा कॅफे होता. रामदासानी साईट उघडल्यावर १.५ मिनिटात माझा श्वास कोंडला. जे बघितले ते एवढे भीषण होते की लगेच उठलो आणि बाहेर आलो. रामदास पण माझ्याबरोबर बाहेर आले. हातात पाण्याची बाटली. संपूर्ण बाटली संपवल्यावर सुमारे १० मिनिटानी मला कंठ फुटला. धीस इज हॉरिबल्-मी.
मास्तर तुम्ही वर्ग अर्ध्यावर सोडला. नंतर कुत्रा येतो. सेल्समन पण येतो.- रामदास
संपूर्ण उघड्या देहाने मांडीवरचे तान्हे बाजुला ठेउन जिवंत राह्ण्यासाठी निर्माण केलेल्या पयाने कॅमेर्-याच्या लेन्स वर केलेली सही बघुन मी कासविस झालो होतो.
तुमच्या केसमधे असेच काही असणार असे रामदास म्हणाले. आणि त्यावरचा उपाय पण सुचवला. पण मुलाने स्वःतच्या तोंडाने कबुल केल्यशिवाय केस मधे यश नाही हे बजावण्यास विसरले नाहीत. आता कसोटी लागणार होती अनुभवाची.
साधारण ३ मिटींग नंतर मुलाने कबुली दिली. ती अशी.
१५ ऑगस्ट ला मित्राच्या घरी पार्टीला गेला होता. बरेच जण होते. घरात मोठी मंडळी नसल्यामुळे मोकळे रान मिळाले. रात्री रहायचे ठरले होते. रात्री ९ नंतर मित्राने ४ सिडी काढल्या. सुरवातीला गंमत वाटली. नंतर शिसारी वाटायला लागली. मित्र काही सोडेनात जबरदस्ती ने पहायला लागले.घोटाळा झाला तो ४ थ्या सिडीने.
मूल जन्माला येण्याचे ग्राफिक डीटेल्स आजकाल लवकरच कळतात. पण त्या जागी इतर वस्तू पण जन्म घेतात हे त्या संस्कारी मनाला झेपले नाही. सर्व स्त्री जाती बद्दल घृणा निर्माण झाली. घरी आला. भडभडा ओकला. जागरणाने पित्त झाले म्हणुन घरची गप्प बसली. साधारण ४ दिवसानी शिव्या सुरु.
मुलाला क्रिकेट आवडते हे कळल्यावर रामदासानी सुचवल्याप्रमाणे क्रिकेट ऍकॅडीमी मधे नाव घालायला सांगितले. आता मुलगा बरा आहे. थूंकणे थांबले आहे. शिव्या बंद आहेत.
भरपूर अभ्यास-भरपूर खेळ.
कट्ट्यावर सर्वसाक्षीनी एकाच बिल्डींग मधे मुले एकमेकाशी नेटवर बोलतात ही माहिती दिल्यावर हा बॉम्ब बाहेर आला.
पॉर्न ला सर्वाना केव्हाना केव्हा सामोरे जावे लागते. मी पण गेलोय. पण आधी ते एवढे सुलभ नव्हते, स्वस्त तर नव्हतेच नव्हते. आता पर्वर्जन ऑफ हाय्येस्ट ऑर्डर विथ क्लिक ऑफ बटन. फक्त १५ रुपयात खाउच्या पैशात. पालक बेसावध. लहान वयात ह्या पर्वर्जनला सामोरे जाउन त्यातल्या खर्-या खोट्याची जाण न आल्याने ही पिढी पंगू मनाने आपल्या भविष्यातील सहजिवनाचा सत्यानाश करणार काय हा प्रष्न अनुत्तरित रहातो.
जाता जाता: वस्तू काय ते इथे लिहू शकत नाही. तेवढा निर्ढावलेला नाही. आय लिव इट टू युअर इमॅजिनेशन.
तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय? नसेल तर देव तुमचे भले करो.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

23 Nov 2008 - 8:24 pm | कलंत्री

प्रभू काका,

एक वेगळाच पदर लक्षात आला. संगोपन हा खराच अवघड प्रकार आहे.

द्वारकानाथ

कपिल काळे's picture

23 Nov 2008 - 9:18 pm | कपिल काळे

प्रभूजी

हे भीषण आहे. कोणत्याही घरात घडू शकते.
मिपावरच्या पालकांना जागे करण्याचे काम असेच चालू राहू दे त.
तुमचे आभार कसे मानू?

http://kalekapil.blogspot.com/

टवाळचिखलू's picture

23 Nov 2008 - 9:36 pm | टवाळचिखलू

पालकांचा अंकुश हवाच....
पण सगळ्यांच्या पालकांना हे माहीत कसे असणार ?
प्रभु आपण फार नाजुक विषय आटोपशीरपणे हाताळलाय आपले आभार.

- चिखलू

संजय अभ्यंकर's picture

23 Nov 2008 - 9:41 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अभिजीत's picture

23 Nov 2008 - 10:16 pm | अभिजीत

प्रभु साहेब.. एकाच लेखात किती गोष्टी सांगाल ...

सहज उपलब्ध होणारं पॉर्न, सोळा सतराव्या वर्षात वाटणार्‍या आकर्षणांची/प्रश्नांची पॉर्न मधुन मिळणारी उत्तरं आणि त्याचा झालेला विस्फोट ..यातली प्रातिनिधिकता खूप वास्तविक आहे. तुम्ही मराठीत हे विषय मांडताय याबद्दल धन्यवाद.

लैंगिक शिक्षण देणं हाच एक उपाय यावर आहे.
आता ते कसं द्यायचं हा सध्या मोठाच वादाचा मुद्दा आहे पण वादाच्या आडुन काहीही न करता शांत बसण्याची किंमत या बाबतीत खूप मोठी आहे.

अवांतर - 'दाम' आणि 'काम' या दोन मुलभूत गरजांचं शिक्षण आपल्या शालेय शिक्षणात नसते. व्यवहारी जगात हेच दोन प्रश्न प्रत्येका(की)ला सोडवावे लागतात. जितक्या लवकर आपण याबाबतीत सजग होउ तितकं चांगलं.

- अभिजीत

टारझन's picture

23 Nov 2008 - 10:31 pm | टारझन

(प्रतिसाद कोरा आहे कारण शब्द फुटले नाहीयेत)

प्राजु's picture

23 Nov 2008 - 10:32 pm | प्राजु

काय लिहू प्रतिसादात समजत नाहीये.
भयंकर आहे. बस्स!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

24 Nov 2008 - 5:25 am | मदनबाण

अहो प्रभु सर ही तर फक्त सुरुवात आहे !! पॉर्न चा पसारा वाढतच जाणार आहे..
लोक पॉर्न ऍडिक्ट होत चालली आहेत्..मुव्हीज्,क्लीप्स्,एमएमएस्,,वेब कॅम्,सांगावे तितके प्रकार कमी..बर हा प्रकार मुले तर पाहतातच पण मुली सुध्दा हे प्रकार पाहण्यात मागे नाहित.
१)माझ्या एका मित्राच्या ओळखीच्याचा सायबर कॅफे होता(आता तो बंद झाला आहे)तिथे कोपर्‍यात एक कॉप्युटर होता..दोन मुली बर्‍याच वेळा त्या कॅफे मधे येत्...आणि तोच कोने वाला पिसी धरत्..कॅफेच्या बाहेर पडताना वेगळेच भाव चेहर्‍यावर असत !!!
मित्राला आधी वाटले असेल यांच्या कोणितरी बॉय फ्रेंड असेल ...करत असतील त्याच्या बरोबर चॅट्...पण त्या मुली नक्की काय बघतात हे त्याचे कुतुहल वाढले व एक दिवस त्याने त्या मुली येण्याच्या आधी सर्व हिस्ट्री क्लीयर करुन टाकली (इंटरनेट एक्स्प्लोररची)..व त्या मुली गेल्या नंतर हिस्ट्री चेक केली तर सापडल्या सर्व पॉर्न साईट्स !!!
२) हे वाचा :--http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/3478918.cms
आणि
३) हे ही वाचा :--http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3402588.cms

वाचल्या नंतर परत त्या मुलाने (प्रभु सरांनी सांगितलेली केस)नक्की काय पाहिले असेल याचा अंदाजा सुध्दा लावण्याचा प्रयत्न करु नका !!!

तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय?
काय प्रभु सर अहो नावातच उत्तर हाय !!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

सर्किट's picture

24 Nov 2008 - 6:01 am | सर्किट (not verified)

प्रभूसर,

एखाद दुसर्‍या कथेतून कुठल्याही निर्णयाप्रत पोहोचता येत नाही.

इंटरनेटवर चॅट हा प्रकार उपलब्ध असल्याने, आणि पॉर्नची मुबलक उपलब्धी असल्याने, लैंगिक अत्याचार कमी झाले आहेत, असे कळते. (आकड्यांतून कळते, एखाद्या कथेतून नव्हे.)

लाखाचे नव्वद हजार झाले, हे कळले, तर त्याच्या तेवढा परिणाम जाणवत नाही.

त्या दहा हजारांतली एखादी कथा आली, की "भयंकर, भयंकर" असे प्रतिसाद येतात, खरे की नाही ?

एकच सांगतो. हे आधीही होत होते, लाखांत. आता होते आहे हजारांत. पण व्यक्त होत आहे पांचांत. त्यामुळे अजाणत्या लोकांना कळते आहे.

कसे ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 9:17 am | विनायक प्रभू

एखाद दुसरी कथा?
हो का?
बरे बरे.
आपला नम्र
होकायंत्र वाला विप्र
अवांतरः मी खजूराच्या झाडावर बसुन कुक्कुट्पालन करण्यावर विश्वास ठेवत नाही.

सर्किट's picture

24 Nov 2008 - 11:41 am | सर्किट (not verified)

एखाद दुसरी कथा?

दहा हजारातली एक कथा असे म्हटले आहे. नीट वाचा की राव..

आणि त्यावर लाखाचे नव्वद हजार झाले असेही म्हटले आहे..

जरा स्पष्ट लिहिलेले समजून घ्या ना राव !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

रामदास's picture

24 Nov 2008 - 8:37 am | रामदास

ही कथा कट्ट्यावर कथाकथनात झालेल्या अनेकापैकी एक होती हे डिसक्लेमर लिहीण्याचं विसरलात का ?
ही एक कथा असून "एक" कहाणी /कथा /किस्सा या स्वरुपात वाचावी. सरसकट निर्णयाप्रत येण्यासाठी सांख्यीकी विदा(?) म्हणून याचा उपयोग नाही.असा स्पष्ट खुलासा करावा
असो.

सर्किट's picture

24 Nov 2008 - 11:21 am | सर्किट (not verified)

ही एक कथा असून "एक" कहाणी /कथा /किस्सा या स्वरुपात वाचावी. सरसकट निर्णयाप्रत येण्यासाठी सांख्यीकी विदा(?) म्हणून याचा उपयोग नाही.असा स्पष्ट खुलासा करावा

हेच तर मी पण म्हणतो.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 5:41 pm | विनायक प्रभू

डीस्क्लेमर एकदा लिहावा किंवा अनेकदा. प्रत्येक वाक्याला लिहावा काय?

रेवती's picture

24 Nov 2008 - 9:30 am | रेवती

खरं सांगायचं तर आम्ही हे असे अनुभव वाचून घाबरून जातो.
असं आपल्या मुलाच्या/मुलीच्या बाबतीत व्हायला नको असं वाटत असतं.
एखादा अनुभव सांगितल्यावर जर आपण थोडे मार्गदर्शनपर लिहिलेत तर
माझ्यासारख्या गोंधळून गेलेल्या पालकांसाठी ती मोठीच मदत होईल.

रेवती

मुक्तसुनीत's picture

24 Nov 2008 - 9:50 am | मुक्तसुनीत

वाचून मला प्रखर वास्तवाची पुन्हा एकदा जाणीव झाली. मात्र पोर्न च्या उपलब्धतेबद्दल भयंकर आश्चर्य वाटले नाही. मीदेखील ८० च्या दशकात पौगंडावस्थेत होतो. " त्या काहीशा मागासलेल्या काळात जर इतके तर आताच्या इन्फोर्मेशन सुपरहायवे च्या काळात किती ?" याचे त्रैराशिक मी मांडू शकतो. त्यामुळे याचा प्रादुर्भाव प्रचंड असणार यात शंका नाही.

आता मी जे लिहीतो आहे ते थोडे संवेदनाविरहित वाटेल. ज्या मुलाची ही "केस" झाली त्याबद्दल मला एक प्रौढ माणूस म्हणून मला सहानुभूती वाटली. त्याला मदतीची गरज आहे हे निर्विवादपणे वाटाले. पण मी त्याच्या वयाच्या मुलाच्या दृष्टीने विचार करतो ; आणि तेव्हा माझ्या मनात काही शिव्यांसमवेत विचार येतो की, "साला अंड्यात आहे. असे काय वागतो ? सगळेच बघतात की. यानेच असे कशाला वागावयाचे ? यांच्यासारख्यामुळे आता हा पार्लर बंद होणार. थोडक्यात , दुसरे शोधणे आले !"

अर्थात असे म्हणणे चुकीचे , समस्येला नाकारणारे ठरेलच. पण ही गोष्ट शिल्लक रहाते की, पौगंडावस्थेतल्या मुलांना हे मार्ग उपलब्ध आहेत. आणि ते आज नाहीत. काही मुद्द्यांचा जास्त खोलवर परामर्श घेता येईल :

१. "बर्डस् अँड बीज्" : मुलांना नक्की कुठल्या वयात लैंगिक मामल्याची कल्पना द्यावी ? की त्यांना इतरांकडूनच हे मिळायला हवे ?
२. "पोर्न" : हा कठीण मामला आहे. थोडासा पुराच्या पाण्यासारखा - किंवा प्रदूषित हवेसारखा . म्हणजे ही गोष्ट अस्तित्वात आहे इतकेच नव्हे तर दारा-खिडक्यांच्या फटीतून ती आत शिरते आहे. तिला कसे थांबवायचे ? थांबविण्याच्या प्रयत्नात मुलांचा श्वास घुसमटेल का ? घुसमटण्याच्या भितीने मग आत येऊ द्यायचे का ? का युगानुयुगे जे होत आले आहे तेच : म्हणजे हे असे काही अस्तित्त्वात नाही असे समजणे ; आपल्या मुलांना त्याची बाधा होणार नाही असे समजणे आणि या आणि असल्या विश्वासाखाली जगत रहाणे.

(मला वाटते क्र. २ चा मुद्दा सर्वसाधारण पातळीवर नेऊन ठेवता येईल : पोर्न हा एक भाग झाला . व्यसने वगैरे इतर बाबीही यात येतील.)

३. सर्कीट यांनी मांडालेला मुद्दा : विदा : पोर्नमुळे बलात्कार कमी होत असतील असे मानायचे का ? (हाच प्रश्न वेश्याव्यवसायालाबद्दलही लागू होईल.) म्हणजे या घटकाने आपले सामाजिक पोत (सोशल फ्याब्रिक ) नक्की कसकसे बदलले आहे ? त्यात ज्याप्रमाणे वाईट असे काही आहे त्याप्रमाणे काही चांगले आहे का ? एक समुपदेशक म्हणून याचा विदा लेखकाला मिळाला का ?

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 11:10 am | विनायक प्रभू

पॉर्न दाखविल्यामुळे बलात्कार कंमी होत असतील तर ह्यापुढे मी १० वीत चांगले मार्क मिळालेल्या मुलांना स्कॉलरशिप अयवजी स्पेशल सि.डी. चा संच देईन.

मुक्तसुनीत's picture

24 Nov 2008 - 11:23 am | मुक्तसुनीत

म्हणजे "विद्या"च्या (बालन नव्हे ! विदा = डेटा ) प्रश्नावर तुम्ही परत टँजंट दिली !

सर्किट's picture

24 Nov 2008 - 11:24 am | सर्किट (not verified)

एक समुपदेशक म्हणून याचा विदा लेखकाला मिळाला का ?

मास्तर,

मुक्तसुनीतांच्या मूळ प्रश्नाला बगल दिलीत !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 11:32 am | विनायक प्रभू

ग्रास रूट लेवलवर काम करणारे विदा तपासत बसत नाही. समोर आलेला प्रष्न सोडवतात.
मी समोर आलेला प्रष्न सोडवला. कट्ट्यावर काय चर्चा झाली ह्या इतर सदस्यांच्या मागणीला मान दिला, व इथे मांडला.
हा प्रष्न जर एखाद दुसरी कथा असेल तर सर्वात जास्त मला खूप आनंद होईल.देव करो तसेच असो.

सर्किट's picture

24 Nov 2008 - 11:33 am | सर्किट (not verified)

देव करो तसेच असो.

तथास्तु !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत's picture

24 Nov 2008 - 11:37 am | मुक्तसुनीत

प्रभुकाका,
तुमच्या कामाबद्दल आदर अनेक वेळेला व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा करतो !

पण काही गोष्टी या नकळत घडत असतात ; कमीत कमी अशा घटनांची शक्यता आपण विचारात घ्यायला नको का ? पोर्नमुळे बलात्कार कमी होतात असे मी छातेठोकपणे सुचविलेले नाही. पण अशी एक (तुमच्या दृष्टीने शून्य !) शक्यता आहे ना ? माझा मुद्दा तितकाच होता.

तुमच्या कामाबदल आणि ज्ञानाबद्दलही अनादर नाही.

राघव's picture

24 Nov 2008 - 1:06 pm | राघव

मला बोलण्याचा कितपत अधिकार ते समजत नाही, कारण यासंदर्भात प्रत्यक्ष कार्य मी केलेले नाही.
"..शक्यता आहे ना?"
यावर असा प्रश्न मनात आला की, बलात्कार कमी होण्याची शक्यता असावी म्हणून पॉर्न योग्य का? वेश्याव्यवसायामुळे इतर स्त्रीयांवर अत्याचार कमी होतात म्हणून ते योग्य का? आपण त्यांचे समर्थन करता आहात असे मी म्हणतोय, असा गैरसमज कृपया करून घेऊ नये. मला फक्त समस्येच्या मुळापर्यंत जावेसे वाटले म्हणून असा प्रश्न पडला. माझ्यामते समाजात कामवासनेचा वारू अनिर्बंध मोकाट सुटलेला आहे अन् यामुळे त्याला पोषणच मिळेल. पॉर्न भरपुर झालेय अन् वाईट असले तरी एक चांगली बाजू ही सुद्धा की बलात्कारासारखे अत्याचार कमी होऊ शकतात हा विचार जरी झाला, तरी पायाच मुळात अयोग्य असल्यामुळे डोलारा पडणारच.

सर्किट's picture

24 Nov 2008 - 1:14 pm | सर्किट (not verified)

मला एक शंका आहे. पॉर्न मुळे मुलगा बिघडला, असे वरील लेखात म्हटलेले आहे.

पण पॉर्न हे तर केवळ निमित्त होते. स्वतःच्या घरातील स्त्रियांविषयी मुलाला आपुलकीची, आदराची भावना नव्हती, हे मूळ कारण, असे मला वाटते.

अनिर्बंध मोकाट सुटलेला समाज मी तरी कुठेही पाहिलेला नाही, म्हणून मला ही शंका आली.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 1:30 pm | विनायक प्रभू

अंदाजपंचे दाहोदरसे.
एकदम चू़क.

विसोबा खेचर's picture

24 Nov 2008 - 10:37 am | विसोबा खेचर

कालाय तस्मै नम:..! दुसरं काय?

मी त्या आईच्या किंवा बहिणीच्या जागी असतो तर 'खिडकीतली आहेस का?' वगैरे भाषा वापरणार्‍या त्या मुलाला आधी बेदम मारला असता..! साला, पुढचं पुढे..!

प्रभूसर, दोन सणसणीत कानशीलात भडकावल्याने बरेचसे प्रश्न सुटतात असा माझा विश्वाश्व आहे..तेच सर्वात उत्तम समुपदेशन आहे! :)

साला, आम्ही आमच्या बापाच्या हातचा मरेस्तोवर मार खाल्ला. काय वाईट झालं आमचं? तेव्हा बाप मारायचा त्याचा राग यायचा पण तोच उपाय उत्तम होता/आहे असं आता वाटतं!

तात्या.

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 11:05 am | विनायक प्रभू

मला पण असेच वाटते. पण हाथ बांधलेले असतात. काय करणार.

सखाराम_गटणे™'s picture

24 Nov 2008 - 11:17 am | सखाराम_गटणे™

साला, आम्ही आमच्या बापाच्या हातचा मरेस्तोवर मार खाल्ला. काय वाईट झालं आमचं? तेव्हा बाप मारायचा त्याचा राग यायचा पण तोच उपाय उत्तम होता/आहे असं आता वाटतं!

सहमत
उगाच नको त्या लोकांना मानवाधिकार दिल्याने फुकट डोक्याला त्रास होतो.

सर्किट's picture

24 Nov 2008 - 11:43 am | सर्किट (not verified)

उगाच नको त्या लोकांना मानवाधिकार दिल्याने फुकट डोक्याला त्रास होतो.

ह्म्म.. कुठे आहेत रे ते एन्जीओ वाले ?? इकडे जरा बघा...

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 11:22 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>>तेव्हा बाप मारायचा त्याचा राग यायचा पण तोच उपाय उत्तम होता/आहे असं आता वाटतं!

आम्ही बी हेच म्हणतो... धोबीघाटावर जसे कपडे धुतात तसा धुतला मला लहानपणी नेहमीच ;) पण त्याच्यामुळेच माझ्या अंगी एक गुण लागला... चिकाटी... त्यांनी मारणे थांबवले नाही व मी मारखाने =))

पण मी त्यांचे आभार देखील मानु शकलो नाही जिवनात कधी हीच खंत !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 10:50 am | जैनाचं कार्ट (not verified)

तीन एक वर्षामागे डिपीएस स्कॅन्डल दिल्ली झालेलं आठवतं का प्रभु ?

मी तर दंग झालो होतो !

त्यावेळी माझे जितके क्लाईन्ट होते (घरगुती) त्याच्या घरात व्यक्तीशः जाऊन मी संगणक चेक केले होते... व ज्यांची मुलं / मुली तरुण होणाच्या मार्गावर आहेत त्या आई-वडीलांना समजावून बेवसाईट ब्लाकर घालून दिलेले... व कशी काळजी घ्यावी ह्या बद्दल देखील प्रशिक्षण दिले !

आज काल लोकं आपल्या मुलाचे अकांऊट ओर्कुट वर आहे.. याहू वर आहे हे पाहून खुष होतात... एक महाशय असेच खुषीने मला आपल्या १२-१३ वर्षाच्या मुलीचे ओर्कुट वरील अकांऊट दाखवत होते.. ती प्रोफाईल पाहून मी दंग झालो... ! मग त्या महाशयांना मी जरा ओर्कुटची काळी बाजू दाखवली ..... त्याचा धक्काच बसला.... व ते तडकाफडकी मुलीला महाजाला पासून दुर रहा अशी तंबी देऊ लागले तेव्हा मी त्यांना संमजावले व त्यामुलीचे ऑर्कुट प्रोफाईल पुन्हा तयार करुन दिले... ! शक्य होईल तेवढी आपली व्यक्तीगत माहिती महाजालापासून लपवावीच !

मागील काही वर्षापासून एक नवीन मनोरोग चालू झाला आहे.. कोणी मुलगी नाही म्हणाली.. नकार दिला म्हणून तीचे फ्रॉड प्रोफाईल महाजालावर चढवायचे व तीचा नंबर द्यायचा.... बापरे विचार करा त्या मुलीला व तीच्या फॅमेलीला काय त्रास भोगावा लागला असेल ! का किस्सा नसुन अनुभव आहे.... ! त्यामुळे प्लीज आपली माहीती जपा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 11:02 am | जैनाचं कार्ट (not verified)

प्रभु !
मी पण दिड एक वर्ष कॅफे चालवला आहे ... दिल्लीच्या पॉश येरियात.... !
असले अनुभव पाहून तर डोक्यात राख घालून बसलो होतो एक दिवस पुर्ण !
माझ्या जवळच्या मित्राच्या घरात कलह निर्माण झाला होता फक्त एका प्रिंन्ट मुळे व त्या मुळे मुलाच्या वडीलांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे लागले होते .. खुप वाईट अनुभव !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 11:06 am | विनायक प्रभू

मला वाटले ही एखाद दुसरी कथा आहे.

मदनबाण's picture

24 Nov 2008 - 11:08 am | मदनबाण

आमच्या इथं एका माणसाने सायबर कॅफे टाकला होता ,,,पण त्याचा कॅफे काही दिवसातच बंद पडणार हे आम्ही मित्रांनी तेव्हाच ओळखले होते कारण ..त्याने पॉर्न साईट बॅन करणारी सॉफ्टवेअर टाकली होती !!! कसा होणार बरं त्याचा धंदा??
शेवटी कॅफे बंद पडला !!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

विसुनाना's picture

24 Nov 2008 - 12:09 pm | विसुनाना

मागचा शहाणा!
अनुभव वाचला. चर्चाही वाचली. दहा हजारात एक अनुभव असेल किंवा दहा लाखात! पण आहे हे निर्विवाद.
(आणि ज्याचे जळते त्यालाच कळते!)
त्या 'अमुक इतक्यातला एक' आपला पाल्य नसावा ही काळजी घेणे जरूरीचे आहे हा संदेश मिळाला.
आणि न जाणो, तसे झालेच तर ओळखायचे कसे? काय करायला हवे? या प्रश्नांची थोडी कल्पना आली हेही नसे थोडके!

प्रभूजी, अशी अपवादात्मक(?) उदाहरणे जरूर लिहित रहावे.

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 1:29 pm | विनायक प्रभू

मनापासुन धन्यवाद विसुनाना. कितीमधे किती हा मुद्दा इथे नाही. त्याबाबतीत मी एकदम विदासिन आहे.

फक्त संदीप's picture

24 Nov 2008 - 12:44 pm | फक्त संदीप

आता काय बोलावे या विचारात गढुन गेलेला ...

विचारात गढुन गेलेला SANDEEP

सखाराम_गटणे™'s picture

24 Nov 2008 - 1:54 pm | सखाराम_गटणे™

नक्की अडचणीची सुरवात कुठे आहे?

१. मुलाने पोर्न पाहीले?
२. आई-बहीनीला वाईट बोलला?
३. आई-बाबा नी मुलाला चांगल्या सवयी लावल्या नाहीत?
४. कि बेभान तारुण्य अडचण?

नाही, पुर्वी ही वाईट गोष्टी होत्या, भविष्यातही राहतील.
मुळ सुरवात कुठुन झाली? हे महत्वाचे.
उगाच लक्षणावर उपचार करण्यापेक्षा मुळ रोगाचा शोध कधीही चांगला.

अवलिया's picture

24 Nov 2008 - 2:16 pm | अवलिया

प्रभुजी की जय हो

एक चांगला विषय पण तुम्ही जितकी समजता तितकी ही समस्या भयानक नाही असे मी तुमच्या वयाचा, ज्ञानाचा व अनुभवाचा आदर ठेवुन सांगु इच्छितो. तथाकथित साईटस जेव्हा नव्हत्या तेव्हा असे नव्हते का? होतेच की. व्हीसीआर वगैरे होते. तत्पुर्वी प्लेबॉय किंवा पिवळ्या वेष्टनाची पुस्तके गल्लोगल्ली मिळायची. आजही मिळतात. पुस्तके नव्हती तेव्हा चर्चा व्हायच्या. आजही तुम्ही नीट विचार करा केवळ एकाच वयोगटातले आणि एकाच लिंगाचे व्यक्ती एकत्र असतात तेव्हा काय ते अद्वैतवादावर गप्पा मारतात का? नाही. (घरी सज्जन असणारे कॉलेजातली पोरे लाईन न देणा-या पोरीबद्दल काय उद्गार काढतात हे ऐका किंवा आठवा.) अहो म्हातारे गेलेल्या अन तरणे येणा-या दिवसांबद्दल तर बायका 'गेलेल्या' दिवसांबद्दल बोलतात...

आज मिडीयामुळे इकडे बलात्कार तिकडे विनयभंग अशा बातम्या येत आहेत. पण न येणा-या बातम्या किती आहेत? तसेच जेव्हा मिडीया नव्हते तेव्हा काय हे नव्हते का? होतेच की. अन प्रत्येक घराघरातुन नातेवाईकांचा होणारा त्रास खास करुन ३ ते ८ वयोगटातील मुलांना आणि मुलींना? मागील शतकातील न्हाव्यांचे अन विधवांचे किस्से तर सुपरिचित आहेत. तेव्हा त्याबद्दल बोलायलाच नको.

पोर्न साईटवर बंदी घालुन काही होणार नाही. उलट समस्या वाढेल. निदान मृगजळ तर मृगजळ पाहु द्या... अहो मृगजळाने तहान भागत नाही हे कितीही खरे असले तरी आपल्याला तहान लागते की नाही हे मृगजळाने कळते तरी. काय झाले आहे की आपल्यावर असलेल्या पुर्वापार संस्काराने आपण काही गोष्टींकडे एका विशिष्ट चष्म्याने बघतो. तो चष्मा निधाला की सगळे स्वच्छ दिसते.

१०० मधे ५-१० असे असणारच. अहो काहीही माहीती नसणारे पण असतात की. चांगले द्विपदवीधर असतात. नंतर डॉक्टरचे खिसे भरतात. आपल्या देशात लैगिंक बाबींबद्दल चर्चा करणे हे तितकेसे प्रशस्त समजले जात नाही जरी त्यातील क्रियांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख आपल्या नेहमीच्या बोलण्यात होत असतो. असो.

यावर अधिक लिहिणे हा आपल्या अधिकारात अधिक्षेप होतो. येथेच थांबतो.

आपलाच,
(माहितगार) नाना

विनायक प्रभू's picture

24 Nov 2008 - 2:52 pm | विनायक प्रभू

धन्यवाद नाना,
परिस्थिती एवढी वाईट नसेल तर चांगले आहे. मी कुठे म्हटले आहे पॉर्न साईट वर बंदी घाला. पण २००५ नंतर मुलांचे सोडा, मोठ्याची डोकी पण ठिकाणावर रहात नाही. प्लेबॉय मी पण बघितलेले आहे. पण त्यात पर्वर्जन नव्हते. निदान मी बघितले त्यांत नव्हते.
पर्वर्जन सोडा, लग्न झालेले पॉर्न बघुन मॉडेल बरोबर स्वःत ची तुलना करुन वैवाहिक जिवनाची वाट लावतात. काहीही फिजिकल प्रॉब्लेम नसतो. असतो तो तुलनेने होणारा मानसिक त्रास. असल्या पेशंट मधे खुप वाढ झाल्याचे माझे ह्या क्षेत्रातील ३० वर्षाचा अनुभव असलेले सांगतात.२००५ नंतर.

अवलिया's picture

24 Nov 2008 - 3:15 pm | अवलिया

हम्म
मी आधीच लिहिले होते आपला शब्द अंतिम आहे.

सर्किट's picture

24 Nov 2008 - 10:35 pm | सर्किट (not verified)

प्लेबॉय मी पण बघितलेले आहे. पण त्यात पर्वर्जन नव्हते. निदान मी बघितले त्यांत नव्हते.

खरे आहे. प्लेबॉय मधले लेखही विचारप्रवर्तक असतात.

मूळ मुद्दा असा आहे, की पॉर्नचे वर्गीकरण व्हायला हवे. एकगठ्ठा पॉर्नवर दोष ढकलणे मला तरी पटत नाही. मुलाने "किळसवाणे" काहीतरी पाहिले, असे प्रभूसरांकडून कळते. सर्वसाधारण शरीरसंबंध किळसवाणे नसतात.

प्रभूसरांच्या प्रतिसादातून २००५ हे वर्ष भारतीय समाजातील लैंगिक "विकृती"च्या दृष्टिकोनातून "टर्निंग प्वाईंट" होते, असे दिसते. ह्याबद्दल उहापोह व्हावा.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

ऍडीजोशी's picture

25 Nov 2008 - 5:57 pm | ऍडीजोशी (not verified)

प्लेबॉय मी पण बघितलेले आहे. पण त्यात पर्वर्जन नव्हते.

पर्वर्जन ची व्याख्या एक्स्पोजर नुसार आणि काळा नुसार बदलते आहे असं नाही का वाटत तुम्हाला. पुर्वी लोकं हेलन चे नाच बघून उत्तेजीत होत असत, बाहोंमें चले आओ ह्या गाण्यावर (सुसंस्क्रुतांकडून) नाकं मुरडली गेली होती आणि आज कुठल्याही चॅनवर 'अग बाई हे तरी का घातलंयस' असं वाटायला लावणारे कपडे घालून उफाड्याच्या मॉडेल्स नाच करताना दिसतात. आम्ही ते जेवता जेवता बघत असतो. काहिही वाटत नाही.
पोर्न पुर्वीही होतंच. आमच्या लहानपणी प्लेबॉय, पेंटहाऊस सारखी इंगर्जी मासिकं तसंच हैदोस, करमचंद, गुलाब सारखी मराठी पुस्तकं होतीच की. पुर्वी वि. सि. आर. होते आज सिडीज आल्या आहेत. आणि पुर्वी मधे जे दाखवायचे तेच आजही दाखवतात.

पुर्वीच्या मुलांना दारू, सिगारेट, पोर्न चं आकर्षण नव्हतं असं थोडीच आहे. ते असणारंच. पण पालकांचा धाकच इतका असायचा की चांगलं वाईट सोडा, बापाचं ऐकलं नाही तर तो घराबाहेर कढायलाही कमी करणार नाही ही भिती माझ्या वडिलांच्या पिढी पर्यंत तरी होती.
आज-काल चा बाप गोगल गाय झालाय. आई-बाबांच्या करियर पायी मुलांकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण आज-काल वाढलंय. मुलाला वेळ देता येत नाही ह्याचं शल्य, नोकरी तर करायलाच हवी ह्याचा मानसीक ताण पुर्वीच्या बापांपेक्षा आत्ताच्या बापांवर जास्त आहे. त्याची भरपाई मग भरमसाठ पॉकेट मनी तून होते. नी त्यावयात सगळेच जे करतात तेच ही मुलं करतात. सद्सद विवेकबुद्धी असण्याचं हे वय नसल्याने मुलं वाया जाण्याचा संभव असतो. आम्हाला निदान घरी गेल्यावर बाप झोडेल ही भिती असायची. आता तिही नाही. झोडायला बापच घरी नसतो.

केस विषयी - पहिल्यांदा शिवी दिल्यावर आई ने कचकचीत कानाखाली वाजवली असती तर मुलगा ताळ्यावर आला असता. त्या वयात अक्कल नसते आणि ती नाहिये हे त्याहून मान्य नसतं. तेव्हा अशावेळी आमच्या आई-बाबांनी केलेली हुकूमशाहीच योग्य आहे असं वाटायला लागतं.

काळानुसार त्याचे व्यक्त होणारे स्वरुप आणि ते आकर्षण शमवण्याचे मार्ग बदलत जाणे अटळ आहे.
पूर्वी फक्त मासिका पुस्तकातून दिसणारी चित्र एवढेच स्वरुप प्रामुख्याने होते. विडीओ कॅसेट्स आणि प्लेअर्स असले तरी किती जणांकडे असतील?
मुलांना धाक होताच. आम्ही ठराविक वेळानंतर घरी आलो नाही की चौकशी व्हायची आणि फालतू उत्तरांना व्यवस्थित फटके पडायचे!
दिवेलागणीला घरात येण्याचे दिवस संपलेत हे खरे.
आजच्या पिढीला मागल्या पिढीसारखे मारणे शक्य नाही आणि ते योग्यही नाही पण मुलांना योग्य तो धाकही हवाच. वाटेल तसे बोलले वागलेले चालत नाही त्याला योग्य ती शिक्षा होते ही जाणीव असणे फार महत्त्वाचे. मारलेच पाहिजे असे नाही पण गरज असेल तर एखाद दुसरा फटका जरुर मारावा! आई-वडील हे योग्य कारणाने नाराज आहेत आणि त्यांचा असहकार हा आपल्याला त्रासदायक ठरतो आहे इतपत जिव्हाळ्याचे संबंध मुलांशी निर्माण होणे हे फार महत्त्वाचे आहे!

मारता येत नाही म्हणून प्रश्न तसेच ठेवता येत नाहीत ते सोडवायला तर हवेच. पालकांनी हे प्रश्न प्रेमाने आणि योग्य मार्गदर्शनाने सोडवायला हवेत. मुला-मुलींच्या वागण्यातले बदल दुर्लक्षू नका. त्याकडे संवेदनशीलतेने पहाणे फारच गरजेचे असते. कित्येकवेळा त्यांनी काय पाहिले किंवा त्याचा अर्थ काय, योग्य-अयोग्य काय, हेही त्यांना माहीत नसते अशावेळी ओरडण्यापेक्षा, समजावून घेणे आणि सांगणे महत्त्वाचे असते. मुला-मुलींना कळत्या वयात किती पालक लैंगिक संबंधांबद्दल माहिती देऊ शकतात?
तुम्हाला देता येत नसेल तर डॉ. आहेत ना? त्यांच्याकडे घेऊन गेलात तर ते नक्की मार्गदर्शन करतील. त्रयस्थ माणसाकडून ही माहिती द्यायला आणि घ्यायला, तेही त्याच्या व्यवसायाचा भाग म्हणून, संकोच निश्चितच कमी वाटतो. आकर्षण हे असणार, त्यात अनैसर्गिक असे काही नाही, ओशाळून जाण्यासारखेही काही नाही पण त्याचे व्यवस्थापन त्या त्या वयानुसार करत जाणे महत्त्वाचे.
मुख्य म्हणजे आई-वडील-मुले हा त्रीकोण/चौकोन व्यवस्थित संतुलित असणे फार महत्त्वाचे. वडील आईला फक्त ऑर्डरी सोडतात किंवा आई वडील सतत घराबाहेरच असतात. मुलांना फक्त पैसे, खाऊ देऊन प्रश्न सोडवण्याकडे कल असला तर भावनिक बंध जुळायचे कधीच जमत नाही.
आई-बाप काय काम करतात, घरात येणारा पैसा कुठून कसा येतो त्याचे महत्त्व काय, त्याची मर्यादा काय ही जाणीव लहान वयातच त्यांना समजेल अशा भाषेत मुलांना द्यावी. त्यांना समजते आणि पैसा गैरमार्गाने वापरला जाण्याची शक्यता खूप कमी होते.

आपल्या समस्यांसाठी घरात माणसे आहेत आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकण्याइतके थेट संबंध निर्माण होणे महत्त्वाचे. मुलांबर जबाबदारी टाका. त्यांना त्यांचे छोटे छोटे निर्णय स्वतः घेऊद्या. चुकीचा निर्णय घेत असतील तर त्याच्या परिणामांची कल्पना द्या आणि त्यालाच जबाबदारी द्या. उदा. थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खायला मागतोय. घेऊद्या पण खोकला झाला तर तू जबाबदार आहेस हे सांगा. खोकला झाला तर त्याला बरोबर कळते. पुढच्यावेळी तो ती चूक करत नाही! लहानपणी मिळालेले हे धडे पुढे नको त्या चुका करण्याला निश्चीतच पायबंद घालू शकतात. आपल्या कृतीला आपणच जबाबदार आहोत ह्याची जाणीव निर्माण करा. मागता क्षणीच सगळे मिळणे ह्यातही त्या गोष्टीची किंमत रहात नाही. एखादी गोष्ट अति सहजसाध्य कधीच असू नये. थोडा तरी प्रयत्न त्यासाठी करायला लागला पाहिजे. मग तो कोणत्याही प्रकारे असू दे. ह्या परिच्छेदात उल्लेखलेल्या गोष्टींचा लैंगिक गोष्टींशी काय संबंध असे वाटण्याची शक्यता आहे पण कृती-परिणाम-जबाबदारी ही शृंखला त्यातून सिद्ध होते, ठसते.

ह्या प्रश्नाची दुसरीही बाजू आहे. कित्येकदा पालकच ह्या असल्या पोर्नच्या जाळ्यात अडकलेले असतात. लैंगिक सुखातला तोचतोचपणा काढून टाकणे ह्या नावाखाली तेच असली मासिके, सिडीज आणि वेबसाईट्स सर्च करत असले तर मुलांवर काय वचक ठेवणार!

चतुरंग

महेश हतोळकर's picture

24 Nov 2008 - 2:21 pm | महेश हतोळकर

काही दिवसांपुर्वी वडील मला म्हणाले "आज कालच्या पोरांना काय झालयं कळतच नाही. जावं त्याच्या घरी भिंतीवर रंगीत पेनाच्या रेघोट्या. तुमच्या वेळेस पेनं नव्हती का काय! पण एकदाही कधी तुम्ही भिंतीवर रेघोट्या नाही मारल्या. भिंती कश्या स्वच्छ होत्या. आता.........."
मी म्हणालो "इतर पोरांची गोष्ट सोडा. माझं पोरगं सव्वा वर्षाचं झालं नाही तर त्याच्या हातात पेन आहे. मी तिसरी पास होई पर्यंत मला पेन सोडा शिसपेन्सील मिळाली नव्हती. आपसुकच हातात पेन येई पर्यंत 'पेन फक्त कागदावर चालवावा, भिंतीवर नाही' येवढी अक्कल आली होती".
************************************
घरात एकदा टी-टाइम चर्चा करताना बहीण भडकून म्हणाली "काय गरज आहे सरकारला ड्रायव्हरचं वय बघण्याची? गाडी चालवता येते की नाही एवढंच पहावं आणि लायसन्स द्यावं."
तिला समजावता समजावता नाकी नऊ आले. बाई गं १८ वर्षाच्या आधीची वर्ष - १२ ते १६,१७ - पौगंडावस्थेची वर्षे असतात. या काळात स्त्री आणि पुरुषात बरेच शारीरीक आणि मानसीक बदल होत असतात. त्यातील एक मानसीक स्थित्यंतर म्हणजे हार्मोनल बदलांमुळे भावनांवर नियंत्रण न रहाणे. बर्‍याच प्रयत्नानंतर तिला समजलं योग्यवेळी हे बदल स्थिरावतात.
************************************
दोन्ही ठिकाणी बलप्रयोग कामाला नक्कीच येणार नाही. "१८ वर्षाच्या आत गाडीची चावी हातात घेतलीस तर फोडून काढेन!" या दटावणीनं काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. हातात पेन घेणंही चुकीचं नाही आणि गाडी घेणंही. फक्त योग्य वेळ येई पर्यंत कळ न काढणं अवघड. दोघांसाठीही - पेन देणारा आणि घेणारा.
प्रभुसर तुम्ही म्हणालात पॉर्न ला सर्वाना केव्हाना केव्हा सामोरे जावे लागते. मी पण गेलोय. पण आधी ते एवढे सुलभ नव्हते, स्वस्त तर नव्हतेच नव्हते. यातच या समस्येचं उत्तर आहे. तुमच्या माझ्या बाबतीत ही योग्य वेळ अपोआपच पाळली गेली.
मला वाटतं पालक आणि पाल्य यांच्यातला सुसंवाद हेच यावरचं एकमेव उत्तर आहे. पाल्याला समजलं पाहिजे, आपल्याला का नाही म्हणताहेत. शिवाय अफाट उत्साहावरही नियंत्रण हवच. आणि सरांनी इथं तेच केलेलं आहे. हर्मोनल इंब्यालंस (आठवतं - अड्रेन्यालिन!) मुळं तयार झालेल्या आफाट उत्साहाला क्रिकेट आणि अभ्यासाच्या माध्यमातून वाट करून दिली. सर्कीट काका आठवतं का "अक्टिविजम".

पण पॉर्न हे तर केवळ निमित्त होते. स्वतःच्या घरातील स्त्रियांविषयी मुलाला आपुलकीची, आदराची भावना नव्हती, हे मूळ कारण, असे मला वाटते.
मुलगा मनोकायिक स्थित्यंतरातून (psycho-somatic trasition) जातो आहे. फक्त येवढंच पहायला हवं की हे परीणाम कायमस्वरूपी नसावेत.

महेश हतोळकर

जैनाचं कार्ट's picture

24 Nov 2008 - 2:31 pm | जैनाचं कार्ट (not verified)

टाळ्या !

सुरेख प्रतिसाद !
आवडला!

टिप : टाळ्यांचा स्माईली चालत नाही आहे... :(

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

महेश हतोळकर's picture

24 Nov 2008 - 3:38 pm | महेश हतोळकर

मुद्दा कळला हे महत्वाचं.

शक्तिमान's picture

24 Nov 2008 - 10:04 pm | शक्तिमान

मलाही पटलं बरं का!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2008 - 2:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सेफ्टी व्हॉल्व्ह खराब झाला, उघडत नसेल तर प्रेशर कुकरसुद्धा हवेत उडतो आणि त्याची जाणीव करुन देतो. इथे तर जिवंत माणूस आहे.

नैसर्गिक गोष्टींवर वाईट, खराब, समाजाच्या आरोग्यासाठी वाईट असे शिक्के मारून माणसाच्या मूळ इच्छा दाबून ठेवल्या की काय होणार? या मुलाच्या बाबतीत त्या दिवसाआधीपर्यंत त्याला कितपत शिक्षण दिलं होतं हा प्रश्न मला पडलाय. त्याला आधीच या गोष्टींची थोडी-फार कल्पना होती का, कोणत्या माध्यमातून मिळाली होती, घरी किती मुक्त वातावरण होतं हे प्रश्न तेवढेच महत्त्वाचे नाहीत का? किंवा उलटपक्षी दर दुसर्‍या घरात ही गोष्ट दिसते का हजारांमधे एक?
अर्थात विसुनानांचा मुद्दा, ज्याचं जळतं त्यालाच कळतं हेही मान्य आहे, पण मुळात आग लागण्याची वेळच का येते याचा विचार पालकांनी केला का? मुलाला त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, ठीक आहे; पण ते आधीच का झालं नाही? योग्य वयात अनेक गोष्टींची कल्पना पालकांनी का दिली नाही? आणि या योग्य गोष्टींमधे फक्त काम हा एकच मुद्दा नाही, तर अर्थ आणि स्वयंशासन या दोन गोष्टी येतात का?

विसुनाना's picture

24 Nov 2008 - 4:51 pm | विसुनाना

पण मुळात आग लागण्याची वेळच का येते याचा विचार पालकांनी केला का?

मुलाला योग्य वयात लैंगिक गोष्टींबद्दल माहिती करून देणे आणि ज्या वस्तूचा (निदान मलातरी) विचार करता येत नाही अशी वस्तू प्रजननमार्गातून बाहेर येताना फिल्ममध्ये दाखवणे या दोन्ही गोष्टी एकाच पातळीवर आहेत असे (निदान मलातरी) मुळीच वाटत नाही.
नैसर्गिक गोष्टींवर वाईट, खराब, समाजाच्या आरोग्यासाठी वाईट असे शिक्के मारून माणसाच्या मूळ इच्छा दाबून ठेऊ नयेत हे ठीक.
पण त्यालाही योग्य वेळ यायला हवी. नाहीतर मुली दहा ते सोळा आणि मुले पंधरा ते आठरा वर्षे वयातच सर्व नैसर्गिक गोष्टी करू शकतात. या वयात माणसाच्या मूळ इच्छांना दाबून ठेऊ नये असे म्हणता येईल काय?

पण इथे नैसर्गिक असे काय होते? असा प्रश्न पडतो. (मुलाने पहिल्या तीन डीव्हीडी पाहिल्या पण चौथी पाहताना त्याला जबरदस्त घृणा आली याचा अर्थ मुलगा सोवळा तर नक्कीच नव्हता.)
आपल्या पाल्या(डबल ल) ला 'लैगिक विचारही मनात आणू नकोस' असे सांगणे किंवा 'चल, ट्रिपल एक्स डीव्हीडी बघू या' असेही सांगणे हे दोन्ही विकृत मार्ग आहेत.

असली आग लागण्याची पाळी का येते?

तर समाजात या दोन्ही प्रकारच्या विकृत गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत.
आजकाल 'अरे... तू हे केलं नाहीस?!' असे सखेदाश्चर्याने काढलेले उद्गार फारच टोकाच्या गोष्टींसाठी असतात. प्रेशर टाकणारे पियर्स भलतेच पुढे गेलेले असतात. 'गेमिंग झोन' च्या नावाखाली सायबर कॅफेमध्ये पाचवीपासूनची मुले सर्रास पोर्न पाहतात हे माहित आहे. चांगल्या घरातली मुले वहावत गेलेली दिसतात. (चांगले घर - सुशिक्षित आईबाप, मध्यमवर्गीय कुटुंब इ.इ.)

पाल्या(डबल ल)वर नियंत्रण ठेवणे म्हणजे त्याच्या इच्छा दाबून ठेवणे नव्हे, किंवा त्याचा सेफ्टी व्हॉल्व बंद करून टाकणे नव्हे. पण भरधाव जाणार्‍या गाडीला ऍक्सलरेटरप्रमाणे स्टियरिंग, क्लच, ब्रेक, आणि कधी हँडब्रेकचीही गरज असते.

लाड करावेत, कौतुक करावे, स्वातंत्र्य द्यावे याबरोबरच लक्ष द्यावे, नियंत्रण ठेवावे हेही पालकांचे कर्तव्यच आहे.
योग्य त्या भूमिकेत शिरल्यावर आपसुकच असं शहाणपण येतं. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2008 - 5:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्याशी सहमत पण तरीही ...

चांगल्या घरातली मुले वहावत गेलेली दिसतात. (चांगले घर - सुशिक्षित आईबाप, मध्यमवर्गीय कुटुंब इ.इ.)
सुशिक्षित आणि साक्षर (+ पदवीधर) यामध्ये गल्लत होत आहे का? चांगलं घर म्हणजेच चांगलं संगोपन असा विचार योग्य आहे का?

प्रेशर टाकणारे पियर्स भलतेच पुढे गेलेले असतात. 'गेमिंग झोन' च्या नावाखाली सायबर कॅफेमध्ये पाचवीपासूनची मुले सर्रास पोर्न पाहतात हे माहित आहे.
लहानपणापासून केलेल्या संगोपनाचा मुलांना आपले 'पिअर्स' निवडताना मदत करू शकत नाही का? किंवा आपल्यालाही नकाराधिकार असतो आणि तो योग्य वेळी वापरायचा असतो याचा वस्तुपाठ किती मुलांना खरोखरच मिळतो?

लाड करावेत, कौतुक करावे, स्वातंत्र्य द्यावे याबरोबरच लक्ष द्यावे, नियंत्रण ठेवावे हेही पालकांचे कर्तव्यच आहे.
योग्य त्या भूमिकेत शिरल्यावर आपसुकच असं शहाणपण येतं.

अनेक पालकांच्या बाबतीत असं होतंही (माझे पालक कमी पडले नाहीत असं वाटतं), पण खरंच प्रत्येक पालकाच्या बाबतीत असंच होतं का?

जसं या एका उदाहरणावरुन संपूर्ण पिढी चुकीच्या दिशेने जात आहे असा निष्कर्ष काढू नये तसंच, सगळेच शिकलेले, पदव्यांची माळ असणारे पालक "सुशिक्षित" असतात यावर विश्वास ठेवावा का?

लिखाळ's picture

24 Nov 2008 - 5:00 pm | लिखाळ

घरातले वातावरण आणि नव्याने मिळालेली लैंगिक जाणिव-माहिती यामुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते. नव्हे आपल्यातल्या अनेकांना सर्वप्रथम जेव्हा समजले की स्त्री-पुरुषांतले लैंगीक संबंध कसे असतात..वगैरे तेव्हा ते पचायला काही दिवस लागले असतील. त्या काळात या समाजात आपले स्थान एक नर किंवा मादी असे आहे की आज पर्यंत समजत होतो तसे आईचा मुलगा, आजीचा नातू इत्यादी आहे असे प्रश्न पडले असतील. ज्यांच्या घरात मोकळे वातावरण आहे किंवा ज्यांना सुबुद्ध मित्र-मैत्रिणी मिळाल्या त्यांच्या बाबतीत असा गोंधळलेला काळ बराच कमी आणि कमी तीव्रतेचा असणार.

वरील उदाहरणात सनातनी सोवळ्या घरातल्या मुलावर 'पावित्र्याचेच' संस्कार असणार. अश्या वेळी त्याचा झालेला गोंधळ अधिक तीव्र आणि जास्त काळ टिकणारा असणार.

पॉर्नोग्राफि हा एक पैलू आहे आणि त्यावर प्रतिसादांत मते आहेतच. पण अशी समस्या पौंगडावस्थेत पॉर्नोग्रफिच्या शिवायही निर्माण होते / होऊ शकते.

घरातले आपुलकिचे मोकळे वातावरण आणि चांगली संगत हाच मुख्य उपाय वाटतो.
(थोबाडित मारणे आणि समस्या दाबणे अथवा थोबाडित मारुन आपण समस्येला एक हात दूर लोटणे हे बरोबर वाटत नाही.)
-- लिखाळ.

सनातनी सोवळ्या घरातल्या मुलावर 'पावित्र्याचेच' संस्कार असणार. अश्या वेळी त्याचा झालेला गोंधळ अधिक तीव्र आणि जास्त काळ टिकणारा असणार....असं मला नाही वाटत...कारण की तुम्ही मुलाना कस वळण लावता ह्यावर मुलं किती परिपक्व असतात हे ठरतं...जसं "मी" म्हणतात की "मला वाटतं पालक आणि पाल्य यांच्यातला सुसंवाद हेच यावरचं एकमेव उत्तर आहे. पाल्याला समजलं पाहिजे, आपल्याला का नाही म्हणताहेत. शिवाय अफाट उत्साहावरही नियंत्रण हवच." ह्याचाच अर्थ वळण लावण आणि ते संवादातुन बरचसं आणि थोडं धाकातुनही. आमचं घर सनातनी होते पण आमचा काडीचाही गोंधळ नाही...उलट आम्ही ठरवलं की हे आपल क्षेत्र नाही आणि त्यापासुन पहिल्या पायरी आधीच लांब गेलो.

तात्या म्ह्मणतात तसे : "प्रभूसर, दोन सणसणीत कानशीलात भडकावल्याने बरेचसे प्रश्न सुटतात असा माझा विश्वास आहे..तेच सर्वात उत्तम समुपदेशन आहे!.." आपण तात्यांच्या बरोबर आहे. इकड तिकड न बघता दोन कानशिलात ठेऊन देणे हाच मार्ग, कारण जर मुलाला पॉर्न बघणं जमु शकतं/कळु शकत तर ते बघु नये हेही कळल पाहीजे तितकी मुलं मोठी असतात नक्की...

गट्ण्या म्हणतो तसं "उगाच नको त्या लोकांना मानवाधिकार दिल्याने फुकट डोक्याला त्रास होतो." एकदम सहमत....

एक निश्चित चांगला विषयावर चर्चा घडवुन आणल्याबद्दल प्रभुसरांचे आभार...

(अश्या बाबतीत मारकुटा) मुकुल...

मृदुला's picture

25 Nov 2008 - 4:23 am | मृदुला

विविध प्रतिसादांतले २००५ सालाचे उल्लेख, व मूळ लेखातील तीन वर्षं मागे असल्याचा उल्लेख समजला नाही.

अदिती, नाना चेंगट व महेश हतोळकर यांचे प्रतिसाद बहुतांशी पटले. योग्य वयात व टप्प्याटप्प्याने लैंगिक 'शिक्षण' मिळणे आवश्यक आहे. त्यातही प्रत्येक माणसाची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. मला स्वतःला बारा पूर्ण तेरा चालू, इयत्ता आठवी या वयात पुष्कळ मूलभूत गोष्टी समजल्या. एका शिकवणीच्या बाईंनी एका तासाला चित्रे वगैरे काढून व्यवस्थित माहिती दिली. त्यानंतर मला सगळ्या व्यवस्थेबद्दल साधारण कोणत्याही वैज्ञानिक गोष्टीबद्दल (उदा क्ष किरण कसे काम करतात) कळल्यावर वाटते तसेच 'अमेझिंग' वाटले होते. तर माझ्या शेजारी बसणार्‍या मुलीला आईवडिलांविषयी 'घाण' वाटायला लागले होते! प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा. लहानपणापासून होणारे संस्कार महत्त्वाचे. जर ह्या सगळ्या गोष्टी बाजारू, घाण, वाईट, पापयुक्त वगैरे आहेत असे संस्कार झाले असतील तर लेखातल्या मुलाची प्रतिक्रिया झाली तशी होण्याची शक्यता आहे असे वाटते.

तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय?

शीमेल म्हणजे धड पुरुष नाही ना स्त्री. ह्यात जनुकीय दोषामुळे काही स्त्रीची तर काही पुरुषाची जननेंद्रिये (अंडाशय, गर्भाशय, बाह्य जननेंद्रिये इ.) एकाच माणसात प्रकटतात. माणसाच्या तेवीस गुणसूत्रांपैकी एक जर एक्सवाय जोडी असेल तर तो पुरूष, एक्सएक्स असेल तर स्त्री हे सहसा आपल्याला माहित असते. जर गर्भधारणेच्या वेळेला अपघाताने, एक्सएक्सवाय असा चुकीचा तिढा त्या जागी आला तर शीमेल व तत्सम माणसे जन्मतात. इतर अनेक जन्मजात अपंगत्वांप्रमाणे हे एक. त्यांच्याविषयी घृणा वाटू नये, करुणा वाटावी.

शैलेन्द्र's picture

25 Nov 2008 - 9:52 am | शैलेन्द्र

"जर गर्भधारणेच्या वेळेला अपघाताने, एक्सएक्सवाय असा चुकीचा तिढा त्या जागी आला तर शीमेल व तत्सम माणसे जन्मतात. इतर अनेक जन्मजात अपंगत्वांप्रमाणे हे एक. त्यांच्याविषयी घृणा वाटू नये, करुणा वाटावी."

खरय, पण, काहीजनं पैसे खर्च करुन शिमेल बनतात, तथाकथीत "स्त्री"मानसीकता असते म्हनुन. ही सारी "होमो"गिरीची लेकरंबाळ आहेत. मुळात या अशा विक्रुति ज्यांना पाळायच्यात त्यांनी पाळाव्यात, पण समाजाने त्यांना मान्यता देवू नये.

पोर्नसंबधी महत्वाचा मुद्दा म्हणजे, जे खरं किंवा नैसर्गीक नसतं(थोडक्यात कॉमन नसत) तेच तेथे वारंवार दाखवंल जातं. अनवधानाने, मुल, त्यालाच खरं समजतात. " इन्सेस्ट" "animal"नावाचे विक्रुत प्रकारही अस्तित्वात आहे आणि त्याचे बरेच चाहतेहि आहेत. म्हणुन, ऊबंरठ्यावरच्या मुलांना, त्यातलहि चांगल- वाइट(खरं-खोटं) काय हे सांगन गरजेच आहे.

विनायक प्रभू's picture

25 Nov 2008 - 11:38 am | विनायक प्रभू

दाखवलेले जाणारे क्तिती खरे आणि किती खोटे हे समजवुन सांगणे महत्वाचे पण तितकेच अवघड.शीमेल ने पुरुषाच्या मुसक्या वळुन त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार करणे ह्या क्लिप्स ना विषेश मागणी आहे असे कळते.

शैलेन्द्र's picture

25 Nov 2008 - 12:08 pm | शैलेन्द्र

खरतरं या अशा मंडळींना "cult" समजुन त्यांना "cultism prevention " चे कडक कायदे लावले पहिजेत.