तू ये...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
26 Apr 2015 - 10:07 am

तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन
तू ये, तुला फुकट देईन...

वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती
तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती

तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन
तू ये, तुला फुकट देईन...

अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी
परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी

तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन
तू ये, तुला फुकट देईन...

अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी
नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी

तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन
तू ये, तुला फुकट देईन...

विराणीकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Apr 2015 - 10:16 am | प्रचेतस

विलक्षण प्रत्ययकारी कविता.
कवीने व्यथा आणि कथा (किंवा व्यथेची कथा किंवा कथेची व्यथा) ह्या दोहोंचा संगम अतिशय सुरेखरीत्या येथे दर्शवला आहे.

सतिश गावडे's picture

26 Apr 2015 - 10:17 am | सतिश गावडे

अता कुणी "कथा कुणाची, व्यथा कुणाला" असं म्हटलं नाही म्हणजे झालं.

पॉइंट ब्लँक's picture

26 Apr 2015 - 4:40 pm | पॉइंट ब्लँक

सहमत!

पैसा's picture

26 Apr 2015 - 10:28 am | पैसा

कसं व्हायचं तुझं! णो फ्रीबीज!!

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:32 am | टवाळ कार्टा

तीच्या पर्यंत साद पोचली का ;)

सतिश गावडे's picture

26 Apr 2015 - 10:36 am | सतिश गावडे

तसलं कै नै हो...

एखादी हटके ओळ आणि यमके यांच्या जोडीने कविता विशेषतः आर्त कविता कशी पाडता सॉरी प्रसवता येते याचं प्रात्यक्षिक करुन बघत होतो.

पैसा's picture

26 Apr 2015 - 10:42 am | पैसा

'तुला चांदणे देईन' असा बदल कर. मग किती रोम्यांटिक वाटेल बघ!

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:43 am | टवाळ कार्टा

पैसा तै जोरात आहेत आज :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Apr 2015 - 11:44 am | ज्ञानोबाचे पैजार

तू ये,

असा बदल जास्त रोम्यॅंटीक वाटेल

असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

पैजारबुवा,

सतिश गावडे's picture

26 Apr 2015 - 11:57 am | सतिश गावडे

आपल्या सुचनेची विनम्रपणे पोच देऊन असे सांगू इच्छितो की कवितेचा डोलाराच मुळी "तू ये, तुला फुकट देईन..." या ओळीवर उभा आहे. आणि ही ओळ जिथून उचलली आहे तिथे "तू ये, तुला फुकट देईन..." अशीच असल्यामुळे त्यात बदल करणे ही कवितेच्या प्रेरणेशी प्रतारणा होईल.

तस्मात, क्षमस्व.

सतिश गावडे's picture

26 Apr 2015 - 11:06 am | सतिश गावडे

"कविता - एक पाडणे" या परिसंवादातील आपल्या सहभागासाठी तसेच मौलिक मार्गदर्शनासाठी धन्यवाद. =))

पैसा's picture

26 Apr 2015 - 11:53 am | पैसा

कवीच्या बाजूने: हॅ हॅ हॅ कस्चं कस्चं!
वाचकांच्या बाजूने: अजून पाडलीय कुठे? जरा उभी रहू दे. मग पाडू!

पैसा ताई सुचवलेले मस्त आहे, परंतु
तू ये, तुला फुकट देईन..

या ओळी या कवितेच्या जान आहेत असे वाटते आहे. .

जेपी's picture

26 Apr 2015 - 11:08 am | जेपी

50 अपेक्षीत

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2015 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

या कवितेतले दोन गुप्त संदेश :

१. तू ये, तुला फुकट देईन...

हे सारखं सारखं लिहून कवी "निवडणूका जवळ आल्या आहेत आणि मी उभा राहणार आहे" असा छुपा संकेत देत आहे.

२. "मठधिपतींच्या कवीशिष्यांत ता अजून एक अ‍ॅडीशन झाली आहे" असा महत्वाचा गुप्त संदेशही कवीने मोठ्या खुबीने कवितेत पेरला आहे.

;) :)

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 11:50 am | टवाळ कार्टा

ते अधीपासुनच मानाचे शिष्य आहेत ;)

तुझ्यासाठी परातभर जिलब्या मी तळीन
तू ये, तुला फुकट देईन.

किसन शिंदे's picture

26 Apr 2015 - 2:07 pm | किसन शिंदे

अतिशय प्रत्ययकारी कविता. अजून कडवी जोडायला हवीत खरं तर

द-बाहुबली's picture

26 Apr 2015 - 2:09 pm | द-बाहुबली

हे "तू" कोण आहे ?

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 2:12 pm | टवाळ कार्टा

तुमच्य सरखाच एक अवतार =))

सतिश गावडे's picture

28 Apr 2015 - 11:35 pm | सतिश गावडे

यांचे मिपावरील अवतार मोजले तर पुराणातील एखादया देवतेच्या अवतारांच्या संख्येपेक्षा जास्त भरेल.

द-बाहुबली's picture

28 Apr 2015 - 11:47 pm | द-बाहुबली

I take it as a compliment... after all its the only thing you are very capable of giving me. :)

सतिश गावडे's picture

28 Apr 2015 - 11:50 pm | सतिश गावडे

:)

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 12:13 pm | टवाळ कार्टा

बॉमकेस बॅक्षी - Tue, 28/04/2015 - 23:47
I take it as a compliment... after all its the only thing you are very capable of giving me. :)

तुम्ही कोणाचेही कितवेही अवतार असा...हे वाक्य जाम आवडले आहे :)

नक्की कोण का येत नाहीये? वटी घ्या.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 4:09 pm | टवाळ कार्टा

तस्ला प्रॉब्लेम नै ओ त्याला :)

कवितानागेश's picture

26 Apr 2015 - 5:17 pm | कवितानागेश

कुठे गेले ते थोर थोर विडंबनकार?

फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं पुस्तक द्यायचं राह्यलंय!! ;) बाकी पुण्यात राहून फुकटच्या वार्ता म्हणजे अतीच!! ;)

सतिश गावडे's picture

27 Apr 2015 - 10:50 pm | सतिश गावडे

>> फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं पुस्तक द्यायचं राह्यलंय!! ;)
धन्यवाद, मी तुम्हाला माझा पत्ता व्यनि करतो. कुरियरने पाठवून दया.

>> बाकी पुण्यात राहून फुकटच्या वार्ता म्हणजे अतीच!! ;)
वार्ताच त्या. तुम्हाला काय वाटलं, खरंच फुकट देईल का कवी?

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2015 - 10:35 pm | प्रसाद गोडबोले

कविता आवडली नाही !

आपण आम्हाला ऐकवलेली कविता बरीच हलक्या नोट वर होती .... इथे अर्थस्य पुरुषः दासः वगैरे घातल्याने चाल लावता येत नाहीये ... असं कसं चालायचं ...

श्यॅ .... कविता आवडली नाही

यशोधरा's picture

28 Apr 2015 - 8:25 am | यशोधरा

भलतेच उदाराचे कर्ण आहेत कवीश्वर! हे फुकट, ते फुकट! मज्जाय ब्वॉ!

नाखु's picture

28 Apr 2015 - 11:46 am | नाखु

ते पौष्टीक या न्यायाने कवीतेचा अर्थ सकस आहे पण "अता" या शब्दाचे विशेषाधिकार राखीव आणि "रेखीव" असल्याने ही कवीता ती प्रतीभेची उंची गाठत नाही आणि भावार्थात खोलीही नाही.

"आधी वस्तरा मग निस्तरा" या झी(ट) टिव्हीच्या कवीता समीक्षण कार्यक्रमातून साभार.

मूळ अवांतर : यमकांचा गूढअभ्यास वाढवावा, आणखी दर्जेदार खमके यमके कवी होण्याची लक्षणे आहेत तुमच्यात हा वाचकांचा प्रेमळ सल्ला !!

स्पंदना's picture

28 Apr 2015 - 12:46 pm | स्पंदना

अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी
परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी

हे अंतिम सत्य!!
चेष्टा करतानाही मुळच्या स्वभावाने कविता छानच झाली आहे.

सहज आपल्या आवडत्या काव्य विभागात आज डोकवावे म्हंटले आणि ही कविता वाचुन छान वाटले..

सर्वात आवडले म्हणजे "तू ये, तुला फुकट देईन..." कवीतेतील नायक ज्या पद्धतीने हे बोलतो आहे ते एकदम आवडले..

जाता जाता : तु हसत दूर जा या कवितेची आठवण झाली.

गणेशा, जाताना कवी काहीच फुकट देणार नाहीये, हे लक्षात असूदेत मात्र! =))

गणेशा's picture

29 Apr 2015 - 9:00 am | गणेशा

हा हा हा.

मांत्रिक's picture

11 Sep 2015 - 8:41 pm | मांत्रिक

फार सुंदर, अर्थपूर्ण कविता सगाजी!!!
अतिशय आवडली!!! खूप खूप आवडली!!!

मांत्रिक's picture

11 Sep 2015 - 8:46 pm | मांत्रिक

तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन
तू ये, तुला फुकट देईन...तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन
तू ये, तुला फुकट देईन...

या ओळी अगदी अगदी आवडल्या. सुंदर!!! सुंदर!!!

ज्योति अळवणी's picture

12 Sep 2015 - 10:23 am | ज्योति अळवणी

कविता छान आहे. कल्पना आवडली

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 9:21 pm | विजय पुरोहित

सगाबोवा...
पुन्हा येऊ देत हो असं काहीतरी हृदयाच्या कोन्यातून वरवर तरंगत येणारं...
भर उकाड्याच्या दिवसातही वादळवारा वीजकहारा अनुभव देणारं...

विजय पुरोहित's picture

25 Feb 2016 - 9:21 pm | विजय पुरोहित

सगाबोवा...
पुन्हा येऊ देत हो असं काहीतरी हृदयाच्या कोन्यातून वरवर तरंगत येणारं...
भर उकाड्याच्या दिवसातही वादळवारा वीजकहारा अनुभव देणारं...

स्पा's picture

29 Feb 2016 - 1:25 pm | स्पा

मस्तच