वास्तू भाग १
हो मी वास्तूच (वास्तुपुरूष म्हणा की वास्तु देवता ते फार महत्वाचे नाहीये.) या स्वखी आणि स्व यांच्या संसाराचा मूक साक्षीदार (मूक कसा म्हणू मी, स्वखी बोलते माझ्याशी अगदी मनापासून, काळजी घेते)
सुरुबातीला मी यांच्यासोबत फ्लॅट्मध्ये होतो साधारण २ वर्ष नंतर त्याने बंगला बांधला तिथे गेलो. हसू नका, वास्तू अशी कुठे जाते का असे प्रश्न्ही विचारू नका.मी स्वखीच्या धार्मीकतेने आणि कुटुंबाप्रती असलेल्या ममत्वाने तीला आपली लेक म्हणून स्वीकरले तेव्हा मी तीच्या बरोबर जाणार की इथे दुसर्याबरोबर राहणार्,तुम्हीच सांगा.
नव्या जागेत मात्र मला आणी तीला सुद्धा जास्त मोकळ्-ढाकळं वाटली, स्वखी ही हरखून गेली होती. बिचारी गावाच्या ५ खोल्यांच्या प्रशस्त घरातून (मागे पुढे आंगण ८-१० नारळाची ३-४ चिक्कूची झाडे असलेल्या)पुण्यात ३ रूम्चे फ्लॅट मध्ये आली होती.
फ्लॅटमध्ये माणुसकी ब्लॉक होते का ब्लॉकमधे आपुलकी फ्लॅट हे न सुटणारे कोडे आहे.
नव्या बंगल्याला फारसे आवार नसले तर चार-पाच झाडांसाठी जागा होती माझ्या लेकीने त्यात दोन नारळ एक आंबा एक चिक्कू असे झाडे लावली आणि खास तिच्या आवडीसाठी जाई-जुई चा वेल दारापाशी कमान करून लावला तिच्या कारभार्याने. हळूहळू त्यात गुलाब्,सोनटक्का,शेवंती,मोगरा यांची भर पडलीच शिवाय टाकीजवळच्या जागेत सिताफळ आणि डाळींबानेही हजेरी लावली.लेक इकडे आलीच मुळी बाळ युवराजाला घेऊन त्याची संपूर्ण घरात लुड्बूड आणि बाळलीला,तीला लक्ष ठेवावे लागे कारण त्यावेळी बंगल्याला कुंपण असे नव्हतेच्.(बिल्डर अर्धवट बांधकाम टाकून जास्ती पैश्यासाठी त्रास देत होता) पुढे १-२ वर्षात ते पूर्ण केले त्याच वेळी छोटे पण सुबक तुळशी वृंदावन करून घेतली आणि माझी लेक खुलली.
दरम्यान एकापाठोपाठ एक अश्या जबाबदारीपूर्तता (बहीणीचा पुनर्विवाह) आणि भावाचे लग्न तोही जरा स्थिरावला.
देव सुख ओंजळीत देत होता.लेकीलाही फारसी आर्थीक भरभराट नसली तरी मनासारखे देव्-धर्म करता येतो याचेच फार सुख-समाधान वाटत होते.
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
मागचे सगळे कटू प्रसंग अगदी विसरून लेकीने आता फक्त संसारावर लक्ष्य केंद्रीत केले.
आत्ता लेकीला चाहूलआस होती कन्येची. त्यालाही कर्तव्यकठोरतेने सुरुवातीला स्वखीवर झालेला अन्याय आणि दुर्लक्ष याची भरपाई करायची होतीच.
आणि राजकन्येचे आगमन झाले (२००७)दरम्यान नोकरीबदल आणि कामाच्या वेळा+प्रवास वाढल्याने त्याला स्वखीकडे नीट लक्ष देता आले नाही. पुढे ती नोकरी सोडून जरा कमी पगाराची, पण जवळच्या अंतरावर नोकरी मिळाली. घरच्या आघाडीवर एकटीच लढत होती लेक (नेमकी धाकटी जाऊच्या नोकरी+बाळंतपण यामुळे स्वखीला सासूची मदत नव्हतीच.)
आता लेकीनेही मनावर घेतले बंगल्यात सोबत पाहिजे,तर वरचा मजला वाढवावा लागेल (भाडेकरू+सोबत असा दुहेरी विचार) शिवाय स्वतंत्र घर असल्याने कुठे मुक्कामी रहिले तर काळजी वाटे कारण त्या दिवसात फार विरळ लोकवस्ती आणि चोर्यांचे भय होतेच.
आणि २००९ मध्ये वरचा मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि वास्तूशांती समयी राहिलेली अपूर्ण इच्छा लेकीने "गणेश याग" करून पूर्ण करून घेतली.(भावाच्या लग्नासाठी त्याला वास्तूशांत अगदी साधी व घाईघाईत करावी लागली होती.)
पण परिस्थीती ही आकाशपाळण्यासारखी असते.
ज्या बहीणीचा पुनर्विवाह करून दिला तिथेही दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती व्यसनी नवरा आणि सरंजामी सासू यांचा जाच सहन करीत होती बिचारी. परिचारिकेची नोकरी होती म्हणून तरी कुणावर अवलंबून नव्हती ती.
सरंजामी= म्हणजे नवर्याने बायकोला काहीही मदत करू नयेच पण अगदी घरची साधी कामे पण करू नये आणि जुन्या श्रीमंतीचा वृथा तोरा (आता अगदी रया+पत उतरली तरी)
तुम्ही लोक वास्तूला दोष देता मी तुम्हाला विचारतो की वास्तू सांगते का तुम्हाला बेजबाब्दार्,व्यसनी वागायला ??
अगदी भर पुण्यात मध्यवर्ती ठिकाणची वडिलोपार्जीत जागा असूनही असे भिकेचे डोहाळे लागावेत, खरंच ज्यांना घर नाही त्यांनाच घराची घर्-घर समजते.असो
वस्तुस्थिती बदलाचे प्रयत्न न करता वास्तुस्थितीचीच जास्ती काळाजी ठेवावी का ?
सन २००९ ला स्वखीच्या दिराने पुण्यात(कात्रजला) फ्लॅट घेतला आणि आई सणावारासाठी दोन्हीकडे राहू लागली.
आणि का कुणास ठाऊक मला येणार्या संसार-ग्रहणाचा अंदाज येऊ लागला पण मी कसे सावध करणार !!
क्रमशः
ऐक स्वखे : त्रिधारा भाग-१
प्रतिक्रिया
22 Apr 2015 - 11:21 am | प्रचेतस
काय प्रतिसाद देऊ काही सुचतंच नाहिये.
22 Apr 2015 - 11:36 am | अजया
वाचतेय.पुभाप्र
22 Apr 2015 - 11:41 am | जेपी
वाचतोय..पुभाप्र
24 Apr 2015 - 9:12 am | पैसा
पुढच्या लिखिताची चाहूल लागली आहे. तुम्ही यापूर्वीही थोडक्यात लिहिले होते त्यामुळे कल्पना आहे.
24 Apr 2015 - 12:39 pm | बॅटमॅन
पुभाप्र इतकेच म्हणतो.