मिपाजाल -सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
22 Nov 2008 - 9:09 pm

विप्र मास्तरांना मिपाजालवर येउन साधारण चार महिने झाले होते. तेवढ्यात त्याना ठाणे मिपा कट्ट्याचे आमंत्रण मिळाले. मिपाच्या मालकांना व इतर विभुतींना भेटायला मिळणार हे बघून त्यांचा आनंद त्यांच्या ब्लॉकमध्ये मावेना.
मास्तर मिपाजालावर क्रिप्टीझम चे बादशाह म्हणुन प्रसिद्ध झाले होते. त्यांनी शिक्षण ह्या रुक्ष विषयाला सोडून वेगळेच विशय हाताळायला सुरु केल्याने मिपा सद्स्य रामदास त्यांच्यावर नाराज झाले. मास्तर पण आपला हट्ट सोडेना. म्हणून रामदासानी स्वःत ती जबाबदारी उचलली. "पीक लुटून नेले, केव्हा नेले, किती वेळा नेले" अशा कविता करणारे रामदास सध्या "मराठी मुले सी.ई.टी. सारख्या परिक्षात मागे का पडतात" किंवा आय्.आय.टी. परिक्षेत पास होणा-या मुलांची संख्या कमी का? अशा अर्थशुन्य गोष्टीत गुंतलेले बघुन मास्तर खंतावलेले होते. तुम्ही तुमचे बघा. मी माझे बघतो अशी मांडवली करुन दोघानी भांडण संपविले. असे झाले नसते तर कट्टा बिघडला असता हे भान दोघांनी ठेवले.
त्यादिवशी अगदी सकाळी लवकर उठल्याने मास्तरांनी सर्व काम लगबगीने आटोपले. कट्ट्याला जायला मिळणार ह्याचा उत्साह ओसंडून जात होता त्यांच्या प्रत्येक कामात. "लै भारी" अशा विशेषणानी पालकांनी सत्कार केल्याने मास्तर त्या दिवशी फार खुश होते मास्तर.
८ वाजता उषा आणि किरण जवळ पोहोचले. तात्याबा जरा उशिरा आले. त्यांच्या वहानाच्या कार्ब्युरेटर मधे कचरा आल्याने उशिर झाला असे तात्यानी कळवले. आणि कट्टा सुरु झाला. कट्टा सुरु झाल्यावर सुमारे अर्धा तासाने ब्रिटीश पोचले. मुंब्र्याला रेतीबंदरात ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे त्याना उशिर झाला होता.
मास्तरांनी सुरुवातीलाच क्षमता वाढविण्यात सदस्यांच्या सहभागाची सुचना केली. "देवाच्या दयेने सर्व काही क्षेमआहे. गरज लागली तर हाक मारेन" असे म्हटले. आणि सुरमईचा मोट्ठा तुकडा तोंडात कोंबला. ब्रिटिशचा डायेट चालू असल्याने त्याने फक्त डायेट बिअर घेतली. मदन बाण मधे मधे त्याच्या अनुभवाचे बाण सोडत होता. त्याने फक्त सुप घेतले आणि आपण इतर पेय घेत नसल्याचे सदस्यांच्या मनावर ठसवले. सर्वसाक्षी च्या इतिहासाच्या ज्ञानाने सर्व कट्टाकरी कातर झाले. तात्या आणि मास्तर ह्या संभाषणात रामदास सुत्रधाराची भुमिका निभावत होते. त्यांना खरे म्हटले तर मास्तरांचा भरवसा नव्हता. तरी सुद्धा मास्तरांनी २, ३ बॉम्ब टाकलेच. त्यावर तात्यानी दिलखुलास दाद दिली. असो.
मजेदार कट्टा झाला. उषा आणि किरण ने दरवाजा बंद केल्यावर सुमारे १ तास कट्टा फुटपाथ वर जमला. सर्व आनंदित होउन घरी पोचले. मास्तर घरी उशीरा गेल्यामुळे त्यांची बायडी अंमळ रागवली. वयाच्या ५३ वर्षी असे थेर शोभतात का? असा प्रष्न आल्यावर आपण ३५ वर्षाचे असल्याचा पुरावा लगेच द्यायची तयारी दाखवली. वर "सुन सायबिणी सुन, ये है कट्टा की टुन्न" हे गाणे म्हणुन दाखविले. तात्यानी कट्ट्यात थोड्याफार ताना शिकविल्या होत्या.
दुस-या दिवशी हे सर्व आठवताना असताना मास्तराना एक कल्पना आली. लगेच त्यांनी तात्याना सकाळी व्यंनि केला. सुमारे १० वाजेपर्यंत उत्तर न आल्याने नाइलाजाने मास्तरांनी तात्याबाना भ्रमणध्वनी केला. तात्या "माल लेके बैठ जाव" ह्या १००१ मंत्रोच्चारात गुंतले असल्यामूळे त्यांनी अंमळ त्रासिक आवाजात नंतर फोन करा असे सांगितले.
जातीचे मास्तर असल्यामुळे अशा गोष्टीने मास्तरांनी धीर सोडला नाही. काहीही म्हटले तरी सर्व देशी आणि विदेशी मिपाकरांच्या फायद्याची गोष्ट होती. अर्थात मास्तर सुद्धा स्टोव दुरुस्त करुन कंटाळलेले होते. आणि स्टोव पीनांचा सप्लाय बेभरवशाचा झाला होता. सप्लायर सारखा समुद्रकिनारी विसावा घेत असे. आणि त्याचा सप्लाय वर परिणाम होत असे. राहिलेल्या वेळात सायन्स विरोधी आंदोलन करे हा सप्लायर. म्हणुन पोटापाण्याकरिता आपली कल्पना तात्याबांना सांगणे भाग होते. स्वार्थ पण परमार्थ पण.
क्रमशः

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

22 Nov 2008 - 9:17 pm | मुक्तसुनीत

मास्तर ! ( "सामना" सिनेमातल्या निळू फुलेंच्या स्टायलीत ) लई भारी रीपोर्ट!

पण मल्लिकाशेरावतचा सिनेमा डीटेल्स वगळून "सेन्सॉर्ड" केल्यावर "फिल्म्स डीविजन की भेंट " उरते तसे झाले बुवा !
"तरी सुद्धा मास्तरांनी २, ३ बॉम्ब टाकलेच. त्यावर तात्यानी दिलखुलास दाद दिली."
म्हणजे आम्ही काय समजायचे ? इतक्या बाबतीत फ्यांटसी वापरावी लागते .... निदान इथे तरी रीपोर्ट द्या ! कसले बॉम्ब ?? कशी दिली दाद ?

काहीही म्हटले तरी सर्व देशी आणि विदेशी मिपाकरांच्या फायद्याची गोष्ट होती
च्यामारी , पुन्हा तेच ! नक्की काय गोठ हाय ? लईच के एल पी डी ! ;-)

घाटावरचे भट's picture

22 Nov 2008 - 9:26 pm | घाटावरचे भट

सहमत....

विनायक प्रभू's picture

22 Nov 2008 - 9:21 pm | विनायक प्रभू

थांबा की राव. कॅफे बंद झाल्यामुळे नाईलाज झाला.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Nov 2008 - 9:26 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर लोकाग्रहाला मान देऊन तुम्ही कट्टा वृत्तांत टाकला, लै आनंद झाला. पण तो असा मधेच नको तिथे थांबवला, निषेध निषेध निषेध. आणि तुम्ही बरेच उत्कंठावर्धक गोष्टी सांगून एकदम जय महाराष्ट्र केलात. काय म्हणावं तुम्हाला? वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ का?

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

22 Nov 2008 - 9:57 pm | टारझन

बिप्सभाईंच्या शब्दाशब्दाशी सहमत .. असेच म्हणतो

- टारायक ट्रभू

जैनाचं कार्ट's picture

23 Nov 2008 - 8:56 am | जैनाचं कार्ट (not verified)

टार्याच्या शब्दाशब्दांना सहमत आहे.. असेच म्हणतो :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

विसोबा खेचर's picture

23 Nov 2008 - 2:20 am | विसोबा खेचर

लै भारी सुरवात..:)

येऊ द्या फुडले भागही पटापट..

तात्या.

सर्किट's picture

23 Nov 2008 - 5:33 am | सर्किट (not verified)

सप्लायर सारखा समुद्रकिनारी विसावा घेत असे. आणि त्याचा सप्लाय वर परिणाम होत असे.

मास्तर,

समुद्रकिनारी सध्या दोन सप्ल्यायर आहेत. त्यातला तुम्चा कोन ते बोला !

-- (सप्ल्यार नंबर २) सर्किट

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

23 Nov 2008 - 7:43 am | विनायक प्रभू

निवडून निवडून येणार कोण?
सर्किटराव शिवाय आहे कोण

सर्किट's picture

23 Nov 2008 - 7:51 am | सर्किट (not verified)

काय राव, सप्लायर नं १ विसरलात, त्या ह्याला आणि त्याला ते आणि हे द्यायचे सोडून हे आणि तेच करत बसलात !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2008 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रमशः वगैरे च्या भानगडीत पडू नका.
आणि वृत्तांत जरा डिटेल द्या...काहीही वगळायचं नाही :)

वेताळ's picture

23 Nov 2008 - 11:58 am | वेताळ

पुढच्या भागाची वाट पहात आहे.
वेताळ