ड्रिल

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
14 Apr 2015 - 9:41 pm

ड्रिल म्हणजे कवायत
हे शारीरिक शिक्षण( physical Training) नव्हे.
यातील मुळ फरक काय ? तर एक शारीरिक प्रशिक्षण आहे आणि दुसरे मानसिक प्रशिक्षण.
आमच्या एका मित्राच्या भाषेत डोक्याला भोक पडून काही गोष्टी डोक्यात घुसवल्या जातात आणि मग सिमेंटने सील केल्या जातात.
शस्त्र चालवायला शिकवणे सोपे असते पण प्रत्यक्षात त्याचा वापर करणे हे तेवढे सोपे नसते. जेंव्हा तुम्ही शत्रूच्या समोर बंदूक हातात घेऊन उभे राहता आणि चहुबाजूनी गोळीबार सुरु होतो तेंव्हा तो आवाज तुम्हाला गर्भगळीत करून टाकतो तेंव्हा तुमची मती गुंग होते आणि हात पाय काम करेनासे होतात. अशा वेळेस काही गोष्टी यांत्रिकपणे करायला शिकवले जाते. म्हणजे जेंव्हा सैनिकांच्या तुकडीचा सुभेदार आज्ञा देतो "लोड युवर गन" तेंव्हा सैनिक डोके न चालविता बंदुकीचे मैग्झीन त्यात लोड करतो. "कॉक युवर गन" म्हटले कि आपोआप बंदूकीची स्प्रिंग ताणली जाते आणि फायर म्हणून आज्ञा दिली कि आपोआप गोळी मारायला सुरुवात करतात. या क्रिया प्रितिक्षिप्त( reflex) तर्हेने घडतात. एकदा सैनिक त्या मानसिक धक्क्यातून सावरला कि पुढचे काम फक्त त्याला स्फुरण देणे एवढेच राहते. असामान्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आठवी पास माणसाला तयार करणे यासाठी याच गोष्टी परत परत त्याच गतीने आणि लयीने करायला शिकवाव्या लागतात.
साधारण लष्कराला जेंव्हा दिसता क्षणीच गोळी घालायची आज्ञा मिळते तेंव्हा पुढच्या फळीतील सर्व सैनिक एकदम बंदुका लोड करतात परंतु त्यातील अगोदर ठरवलेल्या क्रमाप्रमाणे त्यातील एक किंवा दोनच जण गोळ्या झाडतात आणि ती तुकडी मागे सरकते. परत दुसरी तुकडी पुढे येते आणि हीच क्रिया परत केली जाते. यात बघणाऱ्या माणसाला नक्की कोणी गोळी मारली आहे हे कळत नाही त्यामुळे त्या सैनिकावर डूक धरून कारवाई होण्याची शक्यता खूप कमी होते.
बाकी कवायत करण्याचे फायदे इतरही आहेत. मुद्दाम आपण खांद्याच्या वर हात नेउन पाच मिनिटे चालून पहा. खांद्याच्या पुढच्या भागाला रग लागते कि नाही? खांदे पाडून चालणारा माणूस कवायत करून पंधरा दिवसात कसा रुबाबदारपणे चालू लागतो. नाहीतर अवधेस कुमार नाव असलेला भय्या कडक इस्त्रीच्या गणवेशात सैनिक म्हणून कसा देखणा दिसतो ते पहा. आमच्या पुण्याच्या कमांड रुग्णालयात कमांडंट कार्यालयाच्या बाहेर एक ६ फुट उंच आरसा लावलेला आहे त्याच्या खाली लिहिलेले आहे आहे. Am I looking smart? आपण चांगले कपडे घातले आणि व्यवस्थित तयार झालात तर आपला आत्मविश्वास दुणावतो हे प्रत्येकाने अनुभवलेले आहेच. मग रोज तुम्ही व्यवस्थित पणे गणवेश घालून दाढी करून बुटाला पॉलिश करून येता. तेंव्हा आपला आत्मविश्वास नक्कीच सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असतो. ढिसाळपणा किंवा बावळटपणाला लष्करात थारा नाही. लष्करात एक शिकवले जाते." साधेपणा आणि बावळटपणा यात एक सूक्ष्म रेषा असते आणि आपण ती केंव्हा पार करतो ते आपल्याला लक्षात येत नाही. " यामुळे लष्करात तुमचे कपडे तुमची वेशभूषा आणि केशभूषा व्यवस्थित असली पाहिजे हा आग्रह धरला जातो हे यासाठीच.
बाकी ९ mm पिस्तूल हातात घेतल्यावर तुम्हाला जेम्स बॉन्ड झाल्यासारखे वाटते. http://en.wikipedia.org/wiki/Pistol_Auto_9mm_1A
हि अतिशय सुटसुटीत आणि वापरायला सरळ अशी पिस्तुल आहे. शिवाय आत मध्ये आटे पाडलेले असल्याने ( rifling) गोळीला स्वताभोवती फिरण्याची गती मिळते(spin) आणि गोळीचा पल्ला आणि मारक क्षमता वाढते.
आम्हाला प्रथम ०. ३०३ रायफल वर सुरुवात केली होती. यात इतका जोरदार उलटा झटका(recoil) बसतो कि खांदा निखळला कि काय असे वाटू लागते. त्यातून मी तो झटका बसु नये म्हणून तो बंदूक १ सेमी दूर धरली तर तिचा जोरदार खांद्याला झटका बसला आणि पुढे ३ दिवस खांदा दुखत होता. ती खांद्याला प्रत्येक वेळेस एक गोळी लोड करावी लागत असे आणि मग ती मारायची. सुदैवाने हि बंदूक लष्करातून निवृत्त केली आहे. या बंदुकीचा पल्ला २ किमी पर्यंत होता. यानन्तर ७.६२ मिमी रायफल वापरली याला जो उलटा झटका येतो त्याने पुढची गोळी म्यागझीन मध्ये चढवली जाते त्यामुळे झटका कमी बसतो आणि एकामागोमाग एक गोळ्या हि झाडता येतात. भरपूर गोळ्या मारूनही खांदा दुखत नाही हा अजून फायदा. नंतर ९ मिमी कार्बाईन मशीन गन हे वैयक्तिक हत्यार म्हणून लष्करी अधिकार्यांना दिले जाते. ही वापरायला फारच सोपी आहे परंतु काही वेळेस पटकन गोळी सुटू शकते आणि अपघात होतो. http://ofbindia.gov.in/products/data/weapons/wsc/8.htm
या नंतर आता जी शस्त्रे लष्करात वापरतात ती INSAS म्हणजे ५.६५ मिमी ची गोळी असलेली आहे.
http://en.wikipedia.org/wiki/INSAS_rifle.
गोळीस मिळणारी उर्जा १/२ m v वर्ग या सूत्राप्रमाणे आहे तर गोळीचा आकार कमी केला तर तिची मारक क्षमता कमी होते असे असताना हे का होता? याचे कारण आता युद्धाची तंत्रे बदलली आहेत. पूर्वी युद्धात शत्रूच्या सैनिकास ठार करणे हा हेतू असे परंतु आता अभ्यासात असे लक्षात आले आहे कि सैनिकास मारण्यापेक्षा जायबंदी केले तर त्याच्या वर इलाज करण्यासाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार सैनिकांचा व्यय होतो म्हणजे एका सैनिकाला जायबंदी केले तर तीन ते पाच सैनिक काही दिवसांसाठी कामास येतात. आजच्या गतिमान युद्धात हे काही दिवस फार महत्त्वाचे ठरू शकतात. शिवाय ठार मारण्यापेक्षा जायबंदी करणे हे जास्त मानवतावादी आहे.
असो. हि उप पुरवणी बापूसाहेबांच्या उत्तम लेख मालेस पूरक व्हावी. मारक होऊ नये हा हेतू आहे. यास्तव येथेच थांबतो.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2015 - 10:01 pm | श्रीरंग_जोशी

या सर्व गोष्टी वर वर ठाऊक होत्या पण या लेखात वाचल्यावर माझ्या माहितीमध्ये अधिक स्पष्टता आली.

सैनिकास मारण्यापेक्षा जायबंदी केले तर

हे वाचून एक जुनी आठवण वर आली.

१९९९ जुलैमध्ये प्रथम वर्षाला शिकत असताना कारगिल युद्धात प्रत्यक्ष फ्रंटवर काम केलेल्या कॅ.डॉ.राजेश अढाऊ यांचे भाषण माझ्या कॉलेजमध्ये ऐकण्याची संधी मिळाली होती. डॉक्टर तुकडीबरोबर हजर असल्याने गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या अनेक सैनिकांचे प्राण वाचवता आले होते. एलओची कारगिल या चित्रपटात कॅ. राजेश यांची भूमिका मिलिंद गुणाजी यांनी केली होती.

एक सूचना - शक्य असल्यास वर वर्णन केलेल्या बंदुकांचे व गोळ्यांचे फोटोज लेखात डकवावे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2015 - 10:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुपचं मस्तं लेख. बाकी एखाद्यावर गोळी चालवायपुर्वी एखाद्या सैनिकाची मनस्थिती कशी असेल ह्याची फक्त कल्पनाचं करवते.

बॅटमॅन's picture

14 Apr 2015 - 11:10 pm | बॅटमॅन

एकदम मस्त लेख.

रामपुरी's picture

14 Apr 2015 - 11:29 pm | रामपुरी

किती mm ची पिस्तूल भारतात विनापरवाना बाळगता येऊ शकते? अर्थातच अधिकॄतपणे...

'रामपुरी' ने पिस्तुलाबद्दल चौकशी केलेली पाहून मजा वाटली! :)

बाबा पाटील's picture

15 Apr 2015 - 8:18 pm | बाबा पाटील

इतर एकही पिस्ट्ल अथवा रिव्हाल्वर भारतात विनापरवाना वापरता येत नाही,अथवा मिळत नाही. आणी बेकायदेशिर सगळच मिळत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Apr 2015 - 8:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाबा बिहारात एक जागा आहे , मुंगेर, तिथे घरोघरी लेथ आहेत अन कलाकारी असली आहे की त्यांस ग्लॉक किंवा हेकलर एंड कोच द्या एक ओरिजिनल मॉडेल , साले असले क्लोन करतील का कोण्या बेल्जियन हेर्स्टल चा सीईओ आला तरी ओळखु नाही शकणार ओरिजिनल कुठले अन कॉपी कुठले!!

बाबा पाटील's picture

16 Apr 2015 - 11:56 am | बाबा पाटील

त्याच ग्लॉक बिघडल होत,त्यांच्या डिपार्टमेंट माणसाला काही ते दुरुस्त होइना,मग त्याच्या एका कनिस्ट अधिकार्‍याने असाच एक कार्यकर्ता पकडुन आणला,त्याने मोजुन १० मिनिटांत दुरुस्त करुन दिले वरती सांगतो,साब ऐसाच सेम मॉडेल बना के दुंक्या, आपको रिझर्व्ह में रहने दो.आमच्या मित्रवर्याने त्याला कोपरापासुन दंडवत घातला होता.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 8:22 pm | संदीप डांगे

अधिकृतपणे + विनापरवाना

मजेदार आहे. :-)

नंदन's picture

14 Apr 2015 - 11:36 pm | नंदन

पुरवणी आवडली. अधिक विस्तारानेही याबद्दल वाचायला आवडेल.

आनन्दिता's picture

15 Apr 2015 - 9:17 pm | आनन्दिता

मस्त माहीती !! मागे तुम्ही जेडींच्या लेखमालेला दिलेल्या पुरवण्या पण अशाच माहीतीपुर्ण होत्या.
तुमच्या पुरवण्या पुरक आहेत, मारक नाहीत. :)

खटपट्या's picture

15 Apr 2015 - 2:03 am | खटपट्या

खूप छान लेख !!

रुपी's picture

15 Apr 2015 - 2:47 am | रुपी

छान लेख!

अन्या दातार's picture

15 Apr 2015 - 6:04 am | अन्या दातार

माहितीपर लेख. पण विषय ड्रिलपासून शस्त्रांवर कसा वळला हे कळलेही नाही. शीर्षक वाचून मला ड्रिल (लष्करी, भोकं पाडायचे नव्हे), त्याचे प्रकार इ. बद्दल माहिती असेल असे वाटले होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Apr 2015 - 6:46 am | कैलासवासी सोन्याबापु

. हि उप पुरवणी बापूसाहेबांच्या उत्तम लेख मालेस पूरक व्हावी. मारक होऊ नये हा हेतू आहे. यास्तव येथेच थांबतो.

देवा सगळे ट्रेनिंग लिहिण्याच्या नादी मी इतके डिटेल्स नाही देऊ शकलो, काही मारक बिरक नाही डॉक्टर साब लिहा की अजुन!आवडेल वाचायला "एक्सपीरियंस ऑफ़ एन आर्मी डॉक्" :)

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 7:46 pm | संदीप डांगे

बापूसाहेब,
डीटेल्स देऊच नका. ज्या पद्धतीने तुम्ही लिहिताय तीच बेश्ट हाय. डॉक्टरसाहेबांनी ही पुरवणी लिहुन खरंतर तुमच्या लेखमालेला अप्रतिम मदत केली आहे. हा असा प्रयोग होत असेल तर खरंच अभिनव ठरेल. म्हणजे एकाने ह्युमन-एक्स्पीअरंस सांगायचे दुसर्‍याने त्यातले टेक्नीकल्स उलगडून सांगायचे. त्यामुळे मुख्य कथेच्या प्रवाहास टेक्निकल अडथळा न येता रसग्रहण अजून छान होते. नंतर टेक्नीकल वाचल्यावर आधीच वाचलेल्या कथेची खुमारी अजून वाढते. संपूर्ण अनुभव.

तुषार काळभोर's picture

16 Apr 2015 - 9:03 am | तुषार काळभोर

सहमत

सूड's picture

15 Apr 2015 - 6:14 pm | सूड

पुरवणी वाचणेबल!!

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2015 - 7:05 pm | दिपक.कुवेत

आवडली.

किती जणांना MCC हा प्रकार आठवतो.?

प्रश्न इथे अप्रस्तुत आहे तरी उगाच आपल कायतरी..

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2015 - 8:36 pm | श्रीरंग_जोशी

एमसीसी म्हणजे एनसीसीची राज्य स्तरावरची आवृत्ती नं?

आम्ही शाळा सोडल्यावर ते सुरू झालं. माझ्या शाळेत एनसीसी पण नव्हतं. आरएसपी नावाचा एक प्रकार होता त्याऐवजी.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 9:19 pm | संदीप डांगे

हा हा हा. मी एमसीसी ला मार्चिंग ट्रेनर होतो. मार्चिंगमधे शिस्त ठेवत नाही म्हणून एका मुलाच्या पायावर फटका दिला तर लगेच त्याचे आई-बाप बोंबलत आले. ट्रेनर डिसमिस्स. तेव्हा मी बारावीला होतो, मुलं आठवीची. त्यांची भयंकर बेशिस्त बघून येणार्‍या काळाचा अंदाज आला होता.

#बदल केला, जेपी. धन्यवाद!

जेपी's picture

15 Apr 2015 - 9:27 pm | जेपी

प्रकाटाआ

आदूबाळ's picture

15 Apr 2015 - 9:09 pm | आदूबाळ

मी नववीत असताना हा एमसीसी प्रकार आला. त्यासाठी शाळेने रीतसर नवीन मास्तर नेमले. पहिल्याच दिवशी त्यांनी "क्रू कट" करून आणायचा फतवा काढला. आता मास्तरांच्या डोक्यातला क्रू कट आणि तत्कालीन न्हाव्यांच्या हातातला क्रू कट यात काहीतरी फरक होता. मास्तरांना सगळेच "डक कट" वाटत. (म्हणजे काय कोण जाणे.)

सगळ्यांना काय तो फरक कळावा म्हणून त्यांनी दोघातिघांना कुटला, आणि परत कटिंग करून यायला फर्मावलं. आता एकापाठोपाठ एक कटिंगा केल्यावर ते दोघंतिघं टकलू दिसायला लागले. त्यांच्यापैकी एकाच्या घरी वडील वारल्यावर तसं टक्कल करत असत. त्याचे वडील आपल्या हयातीचा पुरावा म्हणून कोकलत हेडमास्तरीणबाईंकडे पोचले.

मग त्या मास्तरांचा ताठा उतरलाच, आणि एमसीसीचे तास मोकळेढाकळे मिळायला लागले.

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2015 - 9:16 pm | श्रीरंग_जोशी

लै हसलो बघा हे वाचून :-) .

हे MCC वाले सगळे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत तर..
कारण मी शाळा सोडून बरेच वर्षाने MCC सुरु झाले. आमच्या वेळेला बर्‍याच विद्यार्थ्यांची कारकीर्द NCC मुळे घडली. काही मित्रांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. माझी एक मैत्रिण निव्वळ एनसीसी मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरची नेमबाज बनली.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 12:54 am | काळा पहाड

हे ९ एम एम वगैरे काय असतं? म्हणजे गोळीचा व्यास असेल हा अंदाज आहे. पण मग पिस्तुलाची गोळी इन्सास रायफलच्या गोळीपेक्षा (५.६५) मोठी का असते?

९ एमएम हा आपण अंदाज व्यक्त केल्याप्रमाणेच गोळीचा आडवा छेद घेतल्यास मिळणारा कमाल व्यास असतो. गोळी म्हणजे फक्त बुलेट. आक्खे काडतूस (कार्ट्रिज्) नाही. पूर्ण नॉमिन्क्लेचर हे 5.56 × 45 mm INSAAS अशा पद्धतीने लिहिले जाते. काडतुसाचे बुलेट, केस, प्रॉपेलंट आणि प्रायमर असे मुख्य चार भाग असतात. ९ एमएम ची गोळी ही पुढच्या बाजूला गोल असते, तर ५.५६ ची गोळी अणकुचीदार असते. ७.६२ चा आकार आणखीच वेगळा असतो. ९ एमएम हे मॉर्टल स्मॉल आर्म्स अ‍ॅम्युनिशन आहे. ह्या गोळीचा उद्देश शत्रूला ठार करणे हा आहे. कारण ही गोळी पिस्तुलात वापरली जाते (क्लोज कॉम्बॅट). या गोळीच्या आत शिसे आणि आर्सेनिक ह्या विषारी धातूंची अजून एक गोळी एम्बेड केलेली असते. त्यामुळे गोळीचे वजनही वाढते आणि लिथलनेसही. ५.५६ मात्र शत्रूला जायबंदी करण्यासाठी बनवलेली असल्याने तिचा व्यास कमी असतो तसेच ही गोळी तितकी विषारी नसते. ५.५६ चे बरेच प्रकार आहेत. NATO, कार्बाइन, INSAAS, AK-47 इत्यादी.

याशिवाय .३०३, .२२, १२ मिमी बोअर, इत्यादी अनेक प्रकारच्या गोळ्या असतात. .२२ ही ट्रेनिंगसाठी वापरली जाणारी छोटी गोळी आहे. अर्थात वर्मी लागली तर तीही घातकच आहे. १२ मिमी मध्ये कागदी केस असलेली छर्र्‍याची गोळी येते जी कोकण, उ.प्र., बिहार इत्यादी ठिकाणी शिकार अथवा लग्नसमारंभात शायनिंग मारायला वापरतात.

अ‍ॅम्युनिशन किंवा दारूगोळ्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे स्मॉल आर्म्स अ‍ॅम्युनिशन आणि दुसरा म्हणजे आर्टिलरी अ‍ॅम्युनिशन. (SAA & AA) दुसर्‍या भागात तोफांचे बॉम्बगोळे उदा. बोफोर्स येतात तर पहिल्या भागात गोळ्या, छोटे बॉम्ब येतात. अजून एक प्रकार म्हणजे पायरोएक्स्प्लोझिव्ज. यात प्रत्यक्ष हल्ल्याव्यतिरिक्त वापरावे लागणारे उदा. सिग्नल फ्लेअर्स इत्यादी प्रकारचे अ‍ॅम्युनिशन येते.

मोबाइलवरून टंकत असल्याने फार माहिती देता येणार नाही. अन्यथा प्रत्येक प्रकारच्या गोळीची आकृती आणि प्रत्येक भागाचे कार्य व्यवस्थित सांगता आले असते. उदा. प्रॉपेलंट आणि प्रायमरमधील फरक, केसचे बारकावे, शस्त्रास्त्रे इत्यादी.

या विषयावर इतर कोणाला अजून माहिती असल्यास जरूर टाका. चर्चेला मजा येईल.

(स्वसंपादित. SAA आणि AA च्या उदाहरणांमध्ये अदलाबदल झाली होती. क्षमस्व!)

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Apr 2015 - 5:57 am | कैलासवासी सोन्याबापु

एकच नंबर!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं प्रतिसाद. एखादी सिरिजही होउ शकेल ह्याच्यावर.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 2:06 pm | काळा पहाड

धन्यवाद. हे .३०३, .२२ म्हणजे सेंमी मध्ये आहे का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 2:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इंच. प्रत्येक . पासुन सुरु होणारा बोअर साईझ गोळीचा व्यास आणि बंदुकीच्या नळीचा व्यास दर्शवतो.

एस's picture

16 Apr 2015 - 2:52 pm | एस

बरोबर. .३०३ (उच्चार पॉइंट थ्री नॉट थ्री) असे जेव्हा दर्शविलेले असते तेव्हा त्याचे एकक इंच असेल हे गृहित धरतात. मिमी असेल तर तसे त्या काडतुसाच्या पार्श्वभागावर किंवा पॅकवर लिहिलेले दिसेल.

नवनवीन शोधली जाणारी शस्त्रास्त्रे ही नवीन मानकांप्रमाणे एमएम मध्ये मोजली जातात.

जयन्त बा शिम्पि's picture

16 Apr 2015 - 6:11 am | जयन्त बा शिम्पि

रिव्हॉल्वर आणि पिस्तुल यातला फरक अजुनही लक्षात येत नाही. समजावून सांगू शकाल काय ?

श्रीरंग_जोशी's picture

16 Apr 2015 - 7:37 am | श्रीरंग_जोशी

तीनों बच गयें या शोलेमधील प्रसिद्ध प्रसंगामध्ये गब्बर जे वापरतो ते रिव्हॉल्वर. त्यात सहा गोळ्या वर्तुळाकार चक्रामध्ये ठेवायच्या असतात.

पिस्तुलात ट्रिगरमागे गोळ्यांनी भरलेले मॅगझीन काढायला व घालायला कप्पा असतो. हे माझे चित्रपट बघून मिळवलेले ज्ञान ;-).

आता सोन्याबापू, डॉ. खरे किंवा स्वॅप्स यांच्या प्रतिसादाची वाट बघूया.

हे चित्र जालावरून साभार.

काळा पहाड's picture

16 Apr 2015 - 2:01 pm | काळा पहाड

ते दोन्ही हत्यारामधल्या गोळया (दोन्ही हातात एक्दम धरून पळतापळता) वापरून मारून संपल्या की ती दोन्ही हत्यारं त्यांचे गोळीचे रिकामे दस्ते एका झटक्यात खाली फेकून (तुम्ही पळत पळतच) वर उडवायची असतात. मग तुमच्या पाठीवर बांधलेल्या दोन गोळीच्या भरलेल्या दस्त्यांना एका झटक्यात हस्तगत करून वरून खाली येणारी हत्यारं त्या दस्त्यावर बरोबर ((तुम्ही पळत पळतच) लँड आणि फायरींग चालू ठेवायची. हे सगळं ज्याच्यात करता येतं ते पिस्तुल.

ज्याच्यात गोळी एक एक भरायला लागते पण एका झटक्यात ज्याचं चेंबर उघडून शेवटची गोळीच उरलीये हे पाहीलं जातं ते रिव्हॉल्व्हर.

- संदर्भः हिंदी सिनेमा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 2:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते दोन्ही हत्यारामधल्या गोळया (दोन्ही हातात एक्दम धरून पळतापळता) वापरून मारून संपल्या की ती दोन्ही हत्यारं त्यांचे गोळीचे रिकामे दस्ते एका झटक्यात खाली फेकून (तुम्ही पळत पळतच) वर उडवायची असतात. मग तुमच्या पाठीवर बांधलेल्या दोन गोळीच्या भरलेल्या दस्त्यांना एका झटक्यात हस्तगत करून वरून खाली येणारी हत्यारं त्या दस्त्यावर बरोबर ((तुम्ही पळत पळतच) लँड आणि फायरींग चालू ठेवायची. हे सगळं ज्याच्यात करता येतं ते पिस्तुल.

टुंब रेडर. लारा क्रॉफ्ट चा पंखा.

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2015 - 2:14 pm | टवाळ कार्टा

नशीब सौदिंडिअन पिच्चर नै बघत तुम्ही...तिथे तर आप्ले जग थांबते आणि दुसरे जग सुरु होते

संदीप डांगे's picture

16 Apr 2015 - 2:14 pm | संदीप डांगे

- संदर्भः हिंदी सिनेमा.

संदर्भ वाचल्यावर ठो ठो हसत सुटलो. परत वाचलं. परत हसत सुटलो

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2015 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

बॉलिवूड अ‍ॅक्शन फिल्लमचा पटकथालेखक म्हणून तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे ! =))

सुबोध खरे's picture

16 Apr 2015 - 9:26 am | सुबोध खरे

रिव्होल्व्हर मध्ये ज्यात गोळ्या भरतो तो दंडगोल एक गोळी मारल्यानंतर गोल फिरतो आणि दुसरी गोळी ट्रिगरच्या पुढे येते. सहा गोळ्या त्यात भरता येतात. उदा. कोल्ट http://en.wikipedia.org/wiki/Revolver
याचा दंडगोल जाडा असल्यामुळे ती सहज खिशात लपवून नेता येत नाही. रिव्होल्व्हरला सेफ्टी कॅच नसतो परंतु रिव्होल्व्हरमधून स्वतः हून कधीच गोळी सुटत नाही. शिवाय त्याचा ट्रिगर चांगलाच घट्ट असतो त्यामुळे सतत सहा गोळ्या मारल्या तर बोटे दुखायला लागतात. शिवाय यात उलटा झटका येत असल्याने नेम अचूक मारण्यासाठी आपल्याला हात घट्ट धरून ठेवावा लागतो. त्यामुळे शोलेतील अमिताभ बच्चन सारखे झोपून कैरी उडवणे हे तितके सोपे अजिबात नाही.
याउलट पिस्तुल मध्ये १२ ते ३२ गोळ्या नळीच्या खाली असलेल्या म्यागझीनमध्ये साठवता येतात आणि त्यात z वर z लावल्यासारखी स्प्रिंग असते त्याने एक गोळी मारली कि पुढची गोळी नळीत येते. आणि यामुळे गोळ्या एका मागोमाग एक मारता येतात. याचा उपयोग लष्करी किंवा निमलष्करी उपयोगासाठी होतो. यात गोळी मारल्यावर मागे येणाऱ्या झटक्याने स्प्रिंग लोड होत असल्याने हाताला झटका कमी बसतो त्यामुळे एक एक गोळी मारणे सुद्धा रिव्होल्व्हर पेक्षा सोपे असते. रिव्होल्व्हरपेक्षा पिस्तुल जास्त अद्ययावत आहे. उदा बेरेटा http://en.wikipedia.org/wiki/Beretta_92
दोन्हींचा पल्ला साधारण ५० मीटर आहे.

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2015 - 10:44 am | टवाळ कार्टा

५० मीटर???

खटपट्या's picture

16 Apr 2015 - 10:51 am | खटपट्या

कमी वाटतोय की जास्त ?

टवाळ कार्टा's picture

16 Apr 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

खूप जास्त वाटते आहे...रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुलाच्या नळीची लांबी बघता...पण माझा अंदाज फोटो बघून आहे हो...कध्धी हातात नै घ्यायला मिळाली

संदीप डांगे's picture

16 Apr 2015 - 12:32 pm | संदीप डांगे

गोळी सुटुन कुठलाही अडथळा न येता जिथे पडेल तितकी रेंज समजुया. यात लेथल, ईफेक्टीव आणि टोटल रीच अशा तीन भागात रेंजचे वर्गिकरण केले तर माझ्या मते, लेथल ही ५० फूट, ईफेक्टीव ही १०० फूट आणि टोटल रीच हा १५० फूट असा असावा. बाकी चित्रात दाखवलेल्या गन्समधून २५-३० फूट ची ईफेक्टीव रेंज मिळत असावी. हा माझा तर्क आहे. जाणकार जास्त चांगले सांगू शकतील.

(आयुष्यात फक्त एकदाच .३०३ मधून ७ गोळ्या चालवल्या. मुर्खासारखे उगाच मस्ती म्हणून ७ पैकी पाच गोळ्या टार्गेट लावलेल्या काठीवर चालवण्याचा आगावूपणा केला. पहिल्या दोन टार्गेट भेदून गेल्या म्हणून फुकटची मस्ती दाखवायला.)

कंजूस's picture

16 Apr 2015 - 11:41 am | कंजूस

संरक्षण खात्यात जबरी हत्त्यारापेक्षा दसपटजबरी मानसिकता हवी असते.मरेपर्यंत मारायचं आणि जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती पडतोय असं वाटलं तर एक गोळी जपून ठेवायची ---*

एकतर तुम्ही फारच हिंदी सिनेमे बघता किंवा फारच हेरगिरीच्या कथा वाचता.

सुबोध भाऊ १ गोळी जास्तीत जास्त किती लांब पर्यंतचा पल्ला गाठू शकते. आणि त्यासाठी कोणती बंदूक वापरतात?

सुबोध खरे's picture

16 Apr 2015 - 1:33 pm | सुबोध खरे

५० मीटर हा परिणामकारक पल्ला आहे. ( ५० मीटर वर आपण शत्रूला ठार करू शकतो) गोळी प्रत्यक्ष कितीतरी जास्त अंतर कापू शकते. वीस फुट तर आपला घराचा दिवाणखाना असतो परंतु जसे अंतर वाढते तसे त्याची अचूकता कमी होत जाते यास्तव हा परिणामकारक पल्ला ठरवला जातो. The round was originally designed to be lethal to 50 m, but the bullet travels and is lethal at longer ranges
SEE -- http://en.wikipedia.org/wiki/9%C3%9719mm_Parabellum

British Army sniper beat the Canadian's record by 150 ft (46 m), by killing two Taliban insurgents at a range of 8,120 ft (2,470 m). He was using a standard issue British Army sniper rifle, the L115A3
http://www.dailymail.co.uk/news/article-1270414/British-sniper-sets-new-...
हे अंतर (२.५ किमी) म्हणजे डेक्कन जिमखान्यावर उभे राहून दशभुजा गणपतीशी असलेल्या शत्रूला ठार मारण्य़ाइतके आहे.

संदीप डांगे's picture

16 Apr 2015 - 1:58 pm | संदीप डांगे

माझ्या प्रतिसादातले चुकीचे मुद्दे समजले. धन्यवाद.

स्नायपर-शूटींग भयंकर गणिती आणि गुंतागुंतीचे असते हेही तेवढेच खरे. अंतरापेक्षा अचूकतेला जास्त प्राधान्य आहे असे मला वाटते. स्नायपर हे सैन्यातले फारच लेथल आणि मर्मभेदक अ‍ॅसेट आहे. त्यांच्यावरचा ताण, जबाबदार्‍या, कामाची पद्धत, वातावरण बघितले तर एक स्नायपर हा तांत्रिक, बौद्धीक, शारिरिक व मानसिक उत्कृष्टतेचा नमुना आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Sniper

चित्रपटांमधे रेखाटलेला माझा आवडता स्नायपरः rr

अजून एक चित्रपट आहे. शूटर ज्यात देशातल्या बेस्ट स्नायपरकडून एक विशिष्ट टार्गेट हिट करण्यासाठीची टेक्निकल माहिती काढली जाते अर्थातच त्याला अंधारात ठेवून. नंतर ते टार्गेट त्यांनीच उडवल्याचा त्याच्यावर आळ आणल्या जातो. मस्त होता चित्रपट.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2015 - 1:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गुगल वरती "द व्हाईट डेथ" म्हणुन सर्च मारा. सिमोहाया नावाच्या फिनिश स्नायपर ची गोष्ट आहे. त्याच्या रेकॉर्डला ५००+ कन्फर्म्ड किल्स आहेत. बहुतांश रशियन लोकांच्या.

सांगलीचा भडंग's picture

16 Apr 2015 - 3:25 pm | सांगलीचा भडंग

हा पिकचर पण भारी आहे .Enemy at the Gates

एस's picture

16 Apr 2015 - 3:31 pm | एस

बरोबर. ५० मीटर रेंज म्हणजे त्या गोळीने किमान त्या अंतरावर ठराविक व्यासाचे (टॉलरन्स) लक्ष्य भेदले पाहिजे. केलेल्या लक्ष्यभेदाचे स्टॅण्डर्ड डिव्हिएशन मोजले जाते आणि ते ठराविक मर्यादेत असावे लागते. ५.५६ मिमीची रेंज ही ३०० मीटर असते. पण ह्या सर्वच गोळ्या त्यापेक्षाही लांबवरचे लक्ष्य अचूक भेदू शकतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2015 - 12:16 am | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर !

ही आहेत ब्राउनिंग ९ मिमी पिस्तल्च्या रेंजची स्पेसिफिकेशन्स :

Dispersion (firing 10 shots with rest)

at 15 metres: 95 mm (height 50 mm, width 45 mm)

at 30 metres: 200 mm (height 105 mm, width 95 mm)

at 50 metres: 320 mm (height 170 mm, width 150 mm)

सविता००१'s picture

16 Apr 2015 - 1:56 pm | सविता००१

खूप आवडलं.

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2015 - 8:38 pm | श्रीरंग_जोशी

एक नवी बातमी
Watch This Unnerving Video of Defense Department’s Self-Steering Bullets

लक्ष्य स्थिर नसल्यासही झाडली गेल्यानंतर ऐनवेळेवर दिशाबदल करून लक्ष्याचा वेध घेणारी ही सेल्फ स्टिअरींग बुलेट.

पैसा's picture

28 Apr 2015 - 9:11 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद!