(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.)
मालवणातिल सागरलहरी
मला खिजविती अष्टौप्रहरी
बाण लागता नको तिथे हा
पर झाली 'कनका'ची नगरी
'कुक्कुट गेले साथ सोडुनी
'विकास' दिसता दुज्या अंगणी
चोचीमधला दाणा जपती
नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी
'वाघ' लागला मागावरती
'वांदरे'हि किलकारा करती
वनवासातुन सुटका या हो
कधी व्हायची? घटिका सरती..
'सोनिया'सम ते दिन ना उरले
'घड्याळा'तलेही क्षण सरले
ठेवावे हे मस्तक ऐसी
दिसतिल का चरणांची 'कमले'?
प्रतिक्रिया
15 Apr 2015 - 10:07 pm | श्रीरंग_जोशी
वाह, एकदम समयोचित काव्य.
15 Apr 2015 - 10:52 pm | सूड
वाह !!
15 Apr 2015 - 11:24 pm | hitesh
घड्याळातले क्षणही सरले.
असे केले तर सुरात बसेल
15 Apr 2015 - 11:47 pm | योगी९००
वाह !!
क्या बात .... क्या बात .... क्या बात....!!!
15 Apr 2015 - 11:50 pm | वेल्लाभट
क्या बात है राव ! क्या बात है !
आहा !
जम्या है!
16 Apr 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा
ह्हा ह्हा ह्हा ह्हा! जबरी एकदम!
16 Apr 2015 - 12:36 am | रुपी
छानच!
16 Apr 2015 - 12:43 am | मित्रहो
जबरी एकदम
लय भारी
16 Apr 2015 - 1:29 am | रमेश आठवले
+१
16 Apr 2015 - 2:04 am | रमेश आठवले
नुकत्याच झालेल्या चार पोट निवडणुकी मध्ये तीन ठिकाणी मृत आमदाराच्या पत्नी त्यांच्या पतिने जिंकलेल्या जागेवर त्याच्याच पक्षातर्फे निवडून आल्या. उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस, वांद्र्यात शिवसेना व तासगावात पवारांची पार्टी जिंकली. पंजाब मध्ये मात्र तसे काही सुतक नसल्याने अकाली दलाने कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने रिकामी झालेली जागा कॉंग्रेस कडून हिसकावून घेतली.
ही पक्षीय राजकारणा पलीकडची मतदारांची भावनिकता, राणे यांच्या सारख्या जुन्या खेळाडूला आधीच लक्षात यायला हवी होती.
समयोचित आणि समर्पक हास्यरस कविता.
16 Apr 2015 - 8:45 am | कहर
कहर केला राव …
16 Apr 2015 - 8:56 am | नाखु
ही "मुसाफीरी" जाम आवडली.
आता नगरसेवक म्हणून निवडणूक लढविणार का हे बघावे लागेल. नाहीतर कोकणात ग्रामपंचायत आहेच की.
16 Apr 2015 - 8:58 am | प्रमोद देर्देकर
जबरदस्त. समयोचित कविता.
16 Apr 2015 - 9:16 am | चुकलामाकला
समयोचित!
16 Apr 2015 - 10:02 am | मदनबाण
वाह्ह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai
16 Apr 2015 - 10:05 am | चलत मुसाफिर
प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व कुक्कुटप्रेमींचे आभार.
रच्याकने, "समयोचित"चा अर्थ "कविता काही खास नाही, पण टायमिंग बरं आहे" असा होतो हे समजण्याइतका आता मिपावर रुळलो आहे :-)
16 Apr 2015 - 10:28 am | स्पा
कचकुन एकदम
16 Apr 2015 - 2:39 pm | मूकवाचक
क्या बात है!