(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून)
ओळखलत का सर मला, दारात आला कोणी
केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून,
‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’
कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली,
सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली.
कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले
गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले
वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे
एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे
फोनकडे हात जाताच हसत हसत उठला
‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला.
काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त चर म्हणा!
मित्रहो
https://mitraho.wordpress.com
प्रतिक्रिया
15 Apr 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा
:)
15 Apr 2015 - 12:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हाहाहा मस्तं !! फक्त चर म्हणा हे भारीये.
15 Apr 2015 - 12:38 pm | संदीप डांगे
एक नंबर फर्मास....
15 Apr 2015 - 1:03 pm | अविनाश पांढरकर
:)
15 Apr 2015 - 1:08 pm | चुकलामाकला
;०;०
15 Apr 2015 - 2:11 pm | वेल्लाभट
चर्र...... कन चटका लावून जाणारी कविता....
15 Apr 2015 - 3:18 pm | सूड
मस्त!!
15 Apr 2015 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा
येंडिंग ल्यँडींगसाठी जोरदार टाळ्या!
15 Apr 2015 - 4:00 pm | होबासराव
खतरा लिहिलयस मित्रा.
15 Apr 2015 - 4:34 pm | जयराज
शेवट एक नंबर.
B-)
15 Apr 2015 - 4:57 pm | स्पंदना
असा त्या फण्यान काळजावर चरा ओढला बघा!!
मस्त!!
15 Apr 2015 - 6:00 pm | चिनार
मस्त!!...एक नंबर.
15 Apr 2015 - 6:01 pm | अनुप ढेरे
भारी!
15 Apr 2015 - 9:40 pm | विवेकपटाईत
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त चर म्हणा! हे आवडलं
15 Apr 2015 - 11:14 pm | रुपी
भारीच..
16 Apr 2015 - 10:33 am | मित्रहो
मनापासून धन्यवाद
जी ओळ सुचल्यामुळे ही कविता लिहायला घेतली ती म्हणजे
"तुम्ही फक्त चर म्हणा" कुसुमाग्रजांची मूळ कविता माझीही आवडती कविता आहे आणि त्याला हात लावायची हिंमत होत नव्हती. तरीही प्रयत्न केला. कुसुमाग्रजांच्या कवितेत एक गोष्ट होती तेंव्हा या विडंबनात पण मग गोष्टच असायला हवी हा विचार करीत इतर ओळी लिहील्या. शेवटी सुचलेली ओळ
"‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला"
16 Apr 2015 - 10:52 am | नाखु
अशी कोडगे मंडळी पाहायला मिळाली आहेत.
(फक्त काय मीच खातो का माझ्या खात्यात बघ किती खातात त्यामानाने मी स्वस्तात काम करतो असे कोड्गे समर्थनही अनुभवले आहे.
===
कंपनी कामाने सर्कारी दफ्तरकिड्यांशी संबंध ठेवावे लागणारा
नाखु
16 Apr 2015 - 10:55 am | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai
17 Apr 2015 - 9:57 pm | संदीप डांगे
संपली आहे दारू तरी, संपला नाही चना,
ग्लासात ओतुन पुन्हा थोडी, फक्त पी म्हणा...
पुढे काही सुचतंय का कुणाला...?
21 Apr 2015 - 9:07 am | अविनाश पांढरकर
संपली आहे दारू तरी, संपला नाही चना,
ग्लासात ओतुन पुन्हा थोडी, फक्त वढ म्हणा...
जास्त समर्पक वाटतंय
23 Apr 2015 - 12:34 pm | Vimodak
23 Apr 2015 - 12:34 pm | Vimodak
23 Apr 2015 - 12:35 pm | Vimodak
23 Apr 2015 - 12:49 pm | सस्नेह
भारी !!
23 Apr 2015 - 12:53 pm | बॅटमॅन
भारी एकच नंबर!!!!!!!!!!
23 Apr 2015 - 12:56 pm | पैसा
मस्तच!