निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 1:54 pm

हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा. मात्र आपल्या कर्माचे आपण स्वत: मूल्यमापन करू नका. ते काम निसर्गावर सोपवा. कारण आपण चांगले आणि साधे आहोत, गर्विष्ठ नाही आहोत याचासुद्धा अनेकांना व्यर्थ गर्व असतो. आपण बोलतो, करतो तेच फक्त सत्य आणि योग्य असे समजू नका. सत्याचे मूल्यमापन स्वत: करू नका. सत्याला नेहेमी तीन बाजू असतात. एक स्वत:ची, दुसरी इतरांची आणि तिसरी म्हणजे खरे सत्य जे निसर्ग ठरवतो. तसेच कुणाचीही सतत आणि विनाकारण निंदा, द्वेष, तुलना, निर्भत्सना करू नका कारण कुणीही परिपूर्ण नसतो. कारण या जगातला प्रत्येक मानव हा निसर्गाची निर्मिती असतो आणि आणि तो एकमेव असतो. कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात. त्यामुळे कुणाही दोन व्यक्तींमध्ये तुलना करू नका. कारण आवडता आणि नावडता व्यक्ती अशी तुलना केल्यास आवडत्या व्यक्तीचे दोष आपल्याला गुण वाटतात आणि नावडत्या व्यक्तीचे गुण आपल्याला दिसतच नाहीत. तसेच स्वत:ची इतरांशी तुलना करू नका. त्यापेक्षा "पूर्वीचा स्वत: आणि आजचा स्वत:" यात तुलना करा. एखाद्यातले चांगले गुण शोधून ते गुण वाढवण्यासाठी त्याला प्रेरणा द्या. प्रेरणेचे आणि कौतुकाचे दोन शब्द सुद्धा एखाद्याच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि श्रद्धेला नवे ठेवू नका. एखाद्याच्या आशेच्या आणि स्वप्नांच्या दिव्याला विझवू नका. आजच्या धकाधकीच्या जीवनात इतरांना इतके प्रेम, प्रशंसा, कौतुक, आधार द्या की द्वेष, निंदा, शत्रुत्व याला वेळ मिळणार नाही. आपण आधी स्वत:वर प्रेम करायला शिका, स्वत:चे मन आणि शरीर निरोगी ठेवा मग तुम्ही इतरांवर प्रेम करायला शिकाल. एखाद्या घटनेवर किंवा कुणी काही बोलल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो ते आपले कर्म. पण जर कुणी मुद्दामहून आपल्याला डिवचत असेल, आपल्याला कुणी धोका दिला असेल तर त्याला एकदा माफ जरूर करा आणि विसरून जा. पण त्यानंतरसुद्धा पुन्हा तेच घडल्यास पुन्हा माफ करू नका. नेहेमी सगळ्यांना मदत करा आणि विसरून जा. त्याची परतफेड व्हावी अशी अपेक्षा करू नका पण ज्याला मदत केली त्याला त्याची किंमत आणि जाणीव नसेल तर कृपया पुन्हा मदत करू नका. त्याला योग्य ती जागा जरूर दाखवा. भिडस्त बनू नका. उफाळून स्फोट होईपर्यंत कुणाकडून दबले जावू नका. मग तो कुणीही असो कारण अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या इतकाच दोषी असतो. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग सुद्धा त्याचेवर अन्याय करणाऱ्या मानवाला त्याची जागा दाखवतोच. तसेच जगातले लोक हीच आपली संपत्ती. या जगातला आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा आपल्यासाठी महत्वाचा असतो, कुणीही कमी किंवा जास्त नसतो. प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायचे असते. जसे निसर्गातले प्रत्येक झाड, कीटक प्राणी याच्या अस्तित्वाचा काहीतरी अर्थ असतो. जोडलेली माणसे ही आपली सर्वश्रेष्ठ संपत्ती. त्यांना टिकवून ठेवण्यासाठी एखादा गैरसमज झालाच तर पूर्वग्रहदुषित मनाने गैरसमज करण्याआधी समोरच्याचे म्हणणे पूर्ण आणि लक्ष देवून ऐकले पाहिजे. तसे न करता आपलेच म्हणणे सत्य आहे असे मानून आपलाच मुद्दा लावून धरणे योग्य नाही. गैरसमज हे दोन्ही बाजूंच्या मताला सारखेच व्यक्त करायला दिल्याने दूर होतात, आपलेच म्हणणे पुढे दामटण्याने नाही! या जगात प्रत्येकाला आपले स्वतंत्र मत असण्याचा अधिकार आहे. जे इतरांच्या मताचा आदर करत नाहीत ते एक प्रकारे निसर्गाला विरोध करत असतात कारण निसर्गाने प्रत्येकाला इतरांपेक्षा वेगळे बनवले आहे. ज्याचा मेंदू आणि हृदय यांची दारे नेहेमी बंदच असतात, त्याला कुणाचेच नवीन मत ऐकून घ्यायचे नसते तेव्हा त्याला कितीही समजावून सांगितले तरी उपयोग नाही आणि ज्याचा मेंदू आणि हृदय यांची दारे नेहेमी उघडे असतात तुयाला फारसे समजावून सांगण्याची गरज पडत नाही पटले तर तसे सांगा करा, नाही पटले तरी हरकत नाही. कारणे प्रत्येकाचे मत वेगळे असते, नाही का?

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2015 - 2:03 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/gym/weight-machine-smiley-emoticon.gif

वरिल १००० सुविचार इथे देण्याचे प्रयोजन नाही कळाले..

अन्यायग्रस्त
भामटे काका (अंतिम भाग ७३ वा)

निमिष सोनार's picture

23 Mar 2015 - 8:44 pm | निमिष सोनार

लेखाच्या ओघाने तो सुविचार आपोआप आला. मुद्दाम नाही घातला. बाय द वे, कॉपीराईट हक्क कुणाचे आहेत त्या सुविचाराचे?

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2015 - 5:21 pm | अत्रन्गि पाउस

फारच गरगरतय !!!

निमिष सोनार's picture

23 Mar 2015 - 8:38 pm | निमिष सोनार

सम्जेल

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2015 - 3:58 pm | अत्रन्गि पाउस

लक्ष असू द्या बाबाजी

कपिलमुनी's picture

23 Mar 2015 - 5:57 pm | कपिलमुनी

killme

निमिष सोनार's picture

23 Mar 2015 - 8:40 pm | निमिष सोनार

माझे विचार इतक्या तीव्रतेने तुमच्या डोक्यात घुसले की ते काढायला तुम्हाला बंदूकीची गोळी चालवावी लागली? बापरे.!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Mar 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

कपिलमुनी's picture

24 Mar 2015 - 12:26 pm | कपिलमुनी

यांचे विचार इतक्या तीव्रतेने तुमच्या डोक्यात घुसले की ते काढायला तुम्हाला हातोडा चालवावा लागला? बापरे.!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Mar 2015 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

A

जयन्त बा शिम्पि's picture

24 Mar 2015 - 2:23 am | जयन्त बा शिम्पि

" आस्था " च्यानेल वरील एखाद्या महान (?) बाबाच्या प्रवचनाचा मराठी अनुवाद वाटतोय ! एकदा वाचायला काही हरकत नाही म्हणुन वाचून " टाकला " ! ! कुठं ते विचारू नका !

नेत्रेश's picture

24 Mar 2015 - 10:28 am | नेत्रेश

तुमच्या लेखातले सगळे 'विचार' हे तुमचे स्वतःचे आहेत? की तुम्ही स्वतः संकलीत केले आहेत?
- तुम्ही दोन तीन प्रतिसादात 'माझे विचार' असे लीहीले आहे म्हणुन विचारले.

वेल्लाभट's picture

24 Mar 2015 - 12:27 pm | वेल्लाभट

हं................
नाही बरोबर आहे तुमचं. एकदम बरोबर.
रिलॅक्स.

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2015 - 4:00 pm | अत्रन्गि पाउस

पुढचे वाक्य "केव्हा पासून होतंय हे असे ?"

अन्या दातार's picture

24 Mar 2015 - 2:12 pm | अन्या दातार

उगीच नाही मी निमिष सोनार सरांचा फ्यान. एका लेखात कित्ती लोकांचा खुर्दा उडाला बघा. सर तुम्ही लिहित जा. किती मुडदे पडतात याकडे पूर्ण कानाडोळा करा. :)

सस्नेह's picture

24 Mar 2015 - 3:54 pm | सस्नेह

तुझ्यासारखं सगळ्यांच्या डोक्यात दगड नाहीत भरलेले !
मिपाचं काय मुडदाघर करायचंय काय ? ;)
..एक आत्मा पूर्वी थैमान घालत असे, तो हल्ली 'मुक्त' झालाय, आता हे आणि काय नवीन ?

आत्मा मुक्त झाला असला तरी जे काही अत्रुप्त होतं ते अजून आंतरजालावर दुदु दुदु करत फिरतंय!! ;)

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 10:26 am | टवाळ कार्टा

ते "लुल्लूल्लु" विसरलास कै? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 11:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मेल्या तुझी मेमरी नको तिथं बेक्कर ष्ट्राँग आहे..

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2015 - 1:14 pm | अत्रुप्त आत्मा

:-/ .. :-/ .. :-/

ते तू लिहायला येशील हे माहीत होतं म्हणून मुद्दाम लिहीलं नाही.

अन्या दातार's picture

25 Mar 2015 - 4:34 pm | अन्या दातार

काहीजणांच्या डोक्यात स्प्रिंगा पण असतील की. ;)

अरुण मनोहर's picture

25 Mar 2015 - 11:29 am | अरुण मनोहर

ती प्रसिद्ध उक्ती तुम्ही थोडी बदलवून लिहीली आहे कां?

सत्याला नेहेमी तीन बाजू असतात. एक स्वत:ची, दुसरी इतरांची आणि तिसरी म्हणजे खरे सत्य जे निसर्ग ठरवतो.

असे नसून,

-- सत्याला नेहेमी तीन बाजू असतात. एक स्वत:ची, दुसरी इतरांची आणि तिसरी ह्यांच्या मधे कुठे तरी असते ती.

असे ऐकले होते.

निमिष सोनार's picture

26 Mar 2015 - 10:12 am | निमिष सोनार

अनुभवातून आलेले

हेमन्त वाघे's picture

26 Mar 2015 - 10:55 am | हेमन्त वाघे

येका असम्बद्ध बोलण्याची स्पर्धेत भाग घ्यायचा इरादा आही . हा लेख थोडा बदलून मिउलेल का ? कि तसाच वापरू ?

सस्नेह's picture

26 Mar 2015 - 11:19 am | सस्नेह

इडंबन पाडा इडंबन !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2015 - 11:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!! आपणास पोतदार पावसकर बैंचा आशिर्वाद मिळो.

नाखु's picture

30 Mar 2015 - 9:38 am | नाखु

सकाळचे ९.३० झालेत मुवी "बाबांच्या" प्रवचनाची वेळ झाली.
टका,जेपी जरा जाजम अंथरायला मदत करा मला.
आजचा विषय "आधि निमित्त मग निमिषात निदान* "

वि.सू. निदान भलतेच निघाल्यास हा आप्लयाच गेल्या किंवा या जन्मीच्या पापांचा परिपाक आहे समजून गप रहावे आश्र्मात तक्रार करू नये. निदान बदलून द्यायला हे वाणसामानाचे दुकान नाही हे लक्षात असू द्यावे.
मंडळाचे नाव व संपर्क क्र्मांक जॅक चिमणराव कडे आहे.

जेपी's picture

30 Mar 2015 - 10:00 am | जेपी

आलो आलो आलो..

हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते.